Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला नाही भाऊ, अँकी यांना
तुम्हाला नाही भाऊ, अँकी यांना म्हटले.. आणि त्यांनाही काही वैतागून म्हटले नाही तर कुठे आता हे सिद्ध करत बसावे म्हणून म्हटले.
मी क्रिकेटला माझ्या आयुष्यातील बराच वेळ दिला आहे आणि आजही देतो. त्यामुळे मला माझी क्रिकेटची आवड आणि ज्ञान कोणाला सिद्ध करत बसायची गरज नाही इतकेच म्हणून म्हटले.
पण जर भारत जिंकला तर मात्र
पण जर भारत जिंकला तर मात्र स्वतः चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करेन
>>>>
बिलकुल नाही.
किंबहुना ऑस्ट्रेलियामध्ये हरल्यावर मी चॅम्पियन्स ट्रॉफी आशा सोडून दिली होती आणि इथे तसे बोलून सुद्धा दाखवले होते.
पण तेच शर्माने इंग्लंड विरुद्ध हिटमॅन स्पेशल शतक मारताच आता त्याची कप्तानी सुद्धा पहिल्यासारखी उंचावणार आणि ते कोणाला ऐकणार नाही असेही म्हटले.. ते ऑलरेडी खरे झाले आहे.
क्रिकेटमध्ये आपला अंदाज खरा झाला की आनंद होतोच.
कोणाला होत नसेल तर मी कशाला दुःखी होऊ
गद्य
उलटं, मलाच घरचा अहेर मिळालाय -
अहो, पण माबोवर जावून तुम्हाला क्रिकेट कळतं हे सगळ्यांना पटवायचा अट्टाहासच कां ? लग्नापासून माझा तसा ठाम गैरसमज तुम्ही केलाय, हे पुरेसं नाहीं का !!!
अँकी यांना म्हटले.. आणि
अँकी यांना म्हटले.. आणि त्यांनाही काही वैतागून म्हटले नाही तर कुठे आता हे सिद्ध करत बसावे म्हणून म्हटले.
>>
पण मी कुठं म्हटलं की तुला आकड्या पलीकडे क्रिकेट कळत नाही
मी तर म्हटलं की भाऊ काय म्हणतात ते तुला कळतं आहे पण वळतं आहे हे दाखवायचं नाहीये...
उलटं, मलाच घरचा अहेर मिळालाय
उलटं, मलाच घरचा अहेर मिळालाय -
>>
भाऊ, सिक्सर...
भाऊ
भाऊ
अँकी, मला मजा येते आकड्यात खेळायला.
एक उदाहरण, आता नुकतेच कांबळी अचानक ट्रेंड झालेला तेव्हाची गोष्ट. एक मराठी मुंबईकर खेळाडू म्हणून त्याच्याबद्दल वाईट वाटते. पण काही नतद्रष्ट लोकं असतात जे केवळ सचिनला हलके लेखायला म्हणून कांबळी कसा सचिनपेक्षा भारी होता, पण त्याचे दुर्दैव, अन्यथा त्याची दोन द्विशतके होती, 54 चा एव्हरेज होता, जो सचिनच्या करिअर एव्हरेजपेक्षा जास्त होता म्हणत त्याची सचिनशी तुलना करतात..
अश्याच एकाचे तोंड बंद करायला आम्ही आकडे शोधले आणि त्याला दाखवले की कांबळीच्या कारकिर्दीतील ज्या १७ सामन्यात त्याचा एवरेज ५४ होता.. त्याच १७ सामन्यात सचिनचा एव्हरेज ७३ होता
आता सचिनची महानता सिद्ध करायला याची गरज नव्हती...
पण मजा येते असे करायला
*....पण मजा येते असे करायला *
*....पण मजा येते असे करायला * - जर कुणी केवळ आकडेवारीच्या आधारे कांबळीला सचिनपेक्षा सरस म्हटलं , तर आकडेवारीनेच ते खोटं पाडणं मजेशीर व योग्यच आहे. पण कुणी शैलीदार , आक्रमक व धडाकेबाज फटकेबाजीत कांबळीला सरस म्हटलं, तर तें खोडून काढायला आकडेवारी निरुपयोगीच ठरते ना ! क्रिकेट इतकं वैविध्यपूर्ण, इतकं लहरी व बेभरवशाचं, इतकं जीवनस्पर्शी व मुख्य म्हणजे इतकं आत्मनिष्ठ ( उदा., आकडेवारीने मॅथ्यू हेडनला हिमालयाएवढा ग्रेट फलंदाज ठरवलं, तरीही त्याची फलंदाजी बघायला मी रस्ता ओलांडून पण जाणार नाहीं ) आहे की तें पूर्णपणे आकडेवारीत सामावणं अशक्यच आहे !
हा माझा टोकाचा हेकेखोरपणा आहे, असं वाटणं गैर नाहीं !
भाऊ.. अतिशय वस्तुनिष्ठ..
भाऊ.. अतिशय वस्तुनिष्ठ..
मला वाटते की बोलायला कोणी
मला वाटते की बोलायला कोणी काहीही बोलू शकतं त्यामुळे आपण विनाकारण याची त्याची तोंडं बंद करण्यात आपली एनर्जी फुकट घालवू नये. कोणी बोलला सचिनपेक्षा अमुक तमुक सरस तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावे. जर मुद्दामून येऊन कानात सांगायला लागला तर दोन कानाखाली पेटवाव्यात पण आकडेवारी शोधा वैगरे एव्हडी मेहनत करू नये.
रच्याकने सचिन अजून फुल्ल
रच्याकने सचिन अजून फुल्ल फॉर्मात आहे. काल ३२ बॉल मध्ये ६४ आणि मागच्या आठवड्यात ३५ एक मारल्या होत्या. हायलाईट्स मध्ये अजूनही फूटवर्क आणि टायमिंग सॉल्लिड दिसतेय.
<<भाऊ, सिक्सर...>>
<<भाऊ, सिक्सर...>>
अशीच व्यंगचित्रे येउ द्या. कूणाला क्रिक्र्टमधील आकडेवारी आवडते तर मला फक्त तुमची व्यंगचित्रे.
आज एक इंटरेस्टींग बातमी वाचली
आज एक इंटरेस्टींग बातमी वाचली. अग्नी चोप्रा यु एस मधून खेळणार म्हणे. त्याच्या दणकेबाज रणजी पर्फॉर्मन्स चा काहीच उपयोग झाला नाही ( अ किंवा ब संघात पण उचलला गेला नाही) म्हणून हा निर्णय घेतला. तो प्लेट लीगमधून खेळत होता हे मन्य करूनही त्याने काढलेले रन्स अफाट लेव्हलचे होते. किमान ब संघात तरी आणायला हरकत नसावी असे वाटले. करूण नायर बद्दल पण असेच म्हणता येईल का आता ? मधल्या फ्लॅट पॅच नंतर कायापालट झाल्यासारखा खेळलाय गेले वर्ष.
India played its all 9 league
India played its all 9 league matches at 9 different venues and they travelled the most in 23 World Cup but the Indian team didn't complain about that.
Pakistan played 3 matches in Hyderabad and played 9 matches in 5 venues. It's not that they had to travel for 4-5 hours for each game. Yet, they couldn't clear the group stage.
Even when teams go to England, the only travel they have is road transport which is more tiring than air travel.
In the last 3 ICC tournaments, India has played 23 games and lost only 1.Don't be a cry baby. Just accept the fact that we can't compete with India's level.
The truth is simple. Greatness doesn’t seek excuses, it seeks excellence. Improve your cricket and beat them on the Ground. There's no other way around.
आपण किती ही चांगल क्रिकेट
आपण किती ही चांगल क्रिकेट खेळत असू आणि आपला सध्याचा कॅप्टन हा विश्वातला एक नंबरचा जरी असला तरीही ह्या सिरीज मध्ये आपल्याला advantage आहेच. हे मान्य करायलाच पाहिजे. आपण फायनल जिंकलो तर अजून जास्त टीका होणार.
“ अग्नी चोप्रा यु एस मधून
“ अग्नी चोप्रा यु एस मधून खेळणार” - मी पण वाचलं पण तो यू. एस. सिटिझन असल्यामुळे MLC खेळणार (इंडियाला रिप्रेझेंट नाही करता येणार) असं काहीतरी कारण होतं असं वाटतं. परत एकदा बघायला हवं.
करूण नायरच्या बाबतीत मात्र असं वाटलं कि he’s peaking little too late. अर्थात संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं तर करियरचं fairytale ending होईल.
रोहित जिंकला काय किंवा सँटनर
रोहित जिंकला काय किंवा सँटनर जिंकला काय दोन्ही आपल्या मुंबई इंडियन्सचेच. विन विन सिच्युएशन आहे. आनंद आहेच.
आज फायनल .. फायनल .... फायनल
आज फायनल .. फायनल .... फायनल !!
१४ टॉस हरल्यावर १५ वा टॉस जिंकायची प्रॉबेबिलिटी ९९.९९९% असते. त्यामुळे आज टॉस आपणच जिंकणार. पहिली फलंदाजी बघायला तयार राहा..
>>>रोहित जिंकला काय किंवा
>>>रोहित जिंकला काय किंवा सँटनर जिंकला काय
पुढच्या पंधरा एक दिवसात हे दोघेही पांड्याच्या कॅप्टनशिप खाली खेळणार आहेत. 😀
फायनलमध्ये फायनली कोण जिंकणार
फायनलमध्ये फायनली कोण जिंकणार हे फायनली आज कोणत्या संघातला कोण कोण स्पर्धेतला आपला सर्वोत्तम खेळ फायनली खेळतात, यावर मुख्यत्वे अवलंबून असेल. टॉस, प्रेक्षक पाठींबा, खेळपट्टीची स्थिती इ इ सर्व दुय्यम . तरी पण भारताला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!
नाही जरी आज दिवस तुझा,
नाही जरी आज दिवस तुझा,
आम्हास कसली खंत नाही.
गर्जुनी जा असा, कळू दे जगतास या,
हा तुझा अंत नाही.
#rohit
टॉस 14 वा असो की 15 वा..
टॉस 14 वा असो की 15 वा..
टॉसला शर्मा असला की सध्या प्रॉबेबिलिटी 0.000% असते..
न्यूझीलेंड फलंदाजी
* १४ टॉस हरल्यावर १५ वा टॉस
* १४ टॉस हरल्यावर १५ वा टॉस जिंकायची प्रॉबेबिलिटी ९९.९९९% असते. * *टॉसला शर्मा असला की सध्या प्रॉबेबिलिटी 0.000% असते..* - आकडेवारी क्रिकेट ठरवत नाही, क्रिकेट आकडेवारी बनवतं !!!
१४ टॉस हरल्यावर १५ वा टॉस
१४ टॉस हरल्यावर १५ वा टॉस जिंकायची प्रॉबेबिलिटी ९९.९९९% असते.>>>>>> मला वाटते की सलग एक वेळेस 15 वेळ toss केल्यास 15 ही toss हरण्याची probability असेल, तुम्ही 1 वर्षात 15 वेळ टॉस केल्यावर हे लागू नसेल
सा मा
सा मा
तो विनोद होता.
टॉस probability 50% असते प्रत्येक नवीन टॉसला
काय गलथान फिल्डिंग चालू आहे..
काय गलथान फिल्डिंग चालू आहे...
83 -३ !!!
83 -३ !!!
रवींद्र व विल्यमसन बाद, गोलंदाज - कुलदीप !!!
251-७ ( 50 ( ओव्हर्स ) !
251-७ ( 50 ( ओव्हर्स ) !
स्कोअर आपल्या अवाक्यातला असला तरीही न्युझीलंड आपल्याला लढायला लावणार, सहजासहजी मॅच हरणार नाहीत ! चांगली सुरुवात खूप महत्त्वाची !
251-७ ( 50 ( ओव्हर्स ) !>>>>
251-७ ( 50 ( ओव्हर्स ) !>>>> क्रिकेट विश्वात फायनल्स स्ट्रॅटेजिकली खेळायची नॅक फक्त ऑस्ट्रेलियन संघात सातत्याने दिसते...त्यांच्यात ( त्यांच्या सर्वकालिक संघात) बायडिफॉल्ट तो ऑरा दिसतो....हे न्युझीलंड, साऊथ आफ्रिका, इंग्लंड वगैरे देश त्याबाबतीत चुन्नू-मून्नूच राहिलेत नेहमी....त्यांची हाईप फक्त सेमीज पर्यंतच टिकते.
सामना हरायच्या मार्गावर आलोय.
सामना हरायच्या मार्गावर आलोय. जास्त मनाला लावून घेऊ नका. ही फक्त एक सिरीज आहे जी फारशी मोठी नाही.
आपण शेवटच्या 5 षटकात 50 धावा
आपण शेवटच्या 5 षटकात 50 धावा दिल्या, त्याच भारी पडणार आहेत
Pages