Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिकेटचा हत्ती मस्त डुलत
क्रिकेटचा हत्ती मस्त डुलत आपल्या राजमार्गाने जातच असतो आणि आकडेवारीला वाटतं आपल्या भुंकण्याला घाबरून तो पळतोय !!! >> भाऊ मस्त लिहिलय !
" डॉन ब्रॅडमनला मी कधी
" डॉन ब्रॅडमनला मी कधी खेळताना पाहिले नाही तर मला त्याच्या 100 एवरेज चे कौतुक नाही. " - ब्रॅडमनचं दुर्दैव, आणखी काय!!
सुदैव म्हणायचेय का तुला ?
सुदैव म्हणायचेय का तुला ?
<<<आवडीचा खेळाडू ठरवणं ही तर
<<<आवडीचा खेळाडू ठरवणं ही तर प्रत्येकाची आत्मनिष्ठ बाब ................................., हा माझा तरी एकमेव निकष आहे,>>
भाऊ, सहमत.
<<<" डॉन ब्रॅडमनला मी कधी खेळताना पाहिले नाही तर मला त्याच्या 100 एवरेज चे कौतुक नाही. ">>
मी तर तेंडुलकर, गांगुली, सेहवाग, कुंबळे, पाँटिंग, इ. ना कधीच खेळताना पाहिले नाही. पण मला कुणाचे कौतुक नाही असे नाही. कारण आता यू ट्यूबवर यांचा खेळ बघताना आनंद होतो.
वृत्तपत्रांच्या डिजिटल
वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्ती मध्येही असे ओडून ताणून बनवलेले विक्रम ढिगाने असतात. त्यांची हेडिंग देण्याची पद्धतही फालतू असते.
मैदानात पाय ठेवताच कोहली मोडणार हा विक्रम,
शर्मा ने मोडला एवढ्या वर्षाचा विक्रम
गिल ने मोडला सचिनचा हा विक्रम.
हा विक्रम करायला जयस्वाल ला कराव्या लागणार एवढ्या धावा.
एकाच सामन्यात बुमराह करणार एवढे विक्रम.
पण शेवटी त्यांचा जॉब असल्यामुळे आणि क्लिक वाढवण्यासाठी असले उद्योग करावे लागत असणार.
फगग
इथे झेल आलाच तरी तो आता घ्यायचा नाहीं ! सलग तीन सामन्यात धांवा शून्य , बळी शून्य व झेल शून्य हा ऑल राऊंडरचा विक्रम तुझ्या नांवावर झल्यातच जमा आहे !!
' भारताचा ' ब ' संघही पाकला
' भारताचा ' ब ' संघही पाकला भारी पडेल ', हे सुनील गावसकरांचे आत्ताचे विधान मला नाहीं आवडले. न्यूझीलंड विरुद्ध आपलीही दाणादाण उडाली होती, तें विसरण्याइतकं नक्कीच जुन नाहीं; एकंदरीतच, हरलेल्या संघावर अशी शेरेबाजी करणं मला तरी खटकतं, भले तो पाकचा का संघ असेना व शेरेबाजी करणारा माझा हिरो असेना !!!
हरलेल्या संघावर अशी शेरेबाजी
हरलेल्या संघावर अशी शेरेबाजी करणं मला तरी खटकतं,>>>>>खरे आहे, आपण आताच ऑस्ट्रेलिया मध्ये हरून आलो आहोत आणि न्यूझीलंड नी तर आपला भारतातच 3--0 असा दारुण पराभव केला आहे
असामी,
असामी,
कोहलीचे शतक होऊ नये म्हणून पांड्याला पुढे पाठवणे हा रोहितचा मास्टरस्ट्रोक या पोस्टला तुम्ही सिक्सर म्हणत अनुमोदन देत असाल तर पांड्या खरेच तसेच करतो हे मान्य केल्यासारखेच झाले. भले आता तुम्ही करू नका.
@ आकडेमोड आणि गणित,
@ आकडेमोड आणि गणित,
नव्वदीच्या दशकात तिरंगी मालिका खूप व्हायच्या. त्यात भारत फायनल नेहमी रडतखडत पोहोचायचा. त्यामुळे शेवटच्या सामान्यआधी किती धावांनी हरवायचे आहे किंवा किती ओवर मध्ये चेस करायचे आहे हे पेपरात यायचे तेव्हाच लोकांना समजायचे. मी त्या आधी स्वतः आकडेमोड करून ते काढायचो. त्यामुळे चाळीतली सगळी मुले हे मला विचारायला यायची.
पावसाने सामना थांबला आणि ओव्हर कमी झाल्यास काय टारगेट हे आता इंटरनेट वर सगळे चुटकी सरशी उपलब्ध झाले आहे. पण जेव्हा ही सोय नव्हती तेव्हा देखील मी ती आकडेमोड करून ठेवायचो. त्याचे फॉर्म्युला सुद्धा माहीत नव्हते पण ज्या सामन्यात असे व्हायचे त्यातील आकडे लिहून ठेवायचे आणि त्यावरून फॉर्म्युला बनवायचो.
बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फायनल पोहोचायला कोण कोणाशी जिंकावे हरावे लागेल याचे अनंत permutation आणि combination बनायचे ते दरवेळी मांडणे हा माझा आवडीचा छंद होता.
आमचे गणिताचे सर म्हणायचे जगातल्या प्रत्येक शास्त्रात, प्रत्येक गोष्टीत गणित आहे.. मग क्रिकेट मध्ये तर ते खचखचून भरले आहेच. जर कोणाला नसेल दिसत तर इट्स ओके. माझी नजर ते शोधतेच. त्यामुळे कुठलेही आकडे दिसले की डोळे लकाकतात.. हे सवयीनेच होते
आकडेवारी क्रिकेटच्या आनंदावर
आकडेवारी क्रिकेटच्या आनंदावर कुरघोडी करते आहे असं मी म्हणतोय, तर तुम्ही मला गणिताचं माहात्म्य व तुमची त्या विषयाची आवड यावर लेक्चर देताय !!
आकडेवारी क्रिकेटच्या आनंदावर
आकडेवारी क्रिकेटच्या आनंदावर कुरघोडी करते आहे असं मी म्हणतोय,
>>>>
तुम्ही एक शक्यता वर्तवत आहात, किंवा असे होऊ नये असे म्हणत आहात.. जे आपल्या जागी योग्यच आहे.
मी स्पेसिफिकली माझ्याबाबत ते होत नसून क्रिकेटचा आनंद त्याने द्विगुणित होतोय असे सांगतोय.
उदाहरणार्थ शेअर मार्केट, गुंतवणूक, बँकिंग हे आकडे मला कधी कळलेच नाहीत. कारण पैश्यात मन कधी गुंतलेच नाही म्हणून तिथले गणित नेहमी परकेच वाटले.
क्रिकेटबाबत मात्र मैदानात जाऊन स्वतः खेळायला, दुसऱ्यांना खेळताना बघायला, नंतर त्यावर चर्चा करायला, अंदाज बांधायला, आकड्यांचे खेळ करायला... सर्व काही आवडते. या सगळ्यांनी आनंद वाढतोच.
पण हे सर्व आवडत असले तरी ड्रीम इलेव्हन नावाचा जुगार खेळायला कधी गेलो नाही. कारण त्यात पैसा येतो आणि त्याचा विचार मनात आला की माझी क्रिकेटची मजा जाते.
आयुष्यात मित्रांमध्ये सुद्धा कधी बेट लावली आहे तर भारत जिंकणार म्हणूनच लावली आहे. म्हणजे जे मनात असते त्यावरच बेट लावतो जेणेकरून दुसरा कुठला विचार मनात शिरकाव करून आपल्या सुख दुःखावर प्रभाव पाडणार नाही.
काल मास्टर्स मॅच पहिली.
काल मास्टर्स मॅच पहिली. पन्नाशीच्या सचिनची कव्हर ड्राइव्ह, पुल आणि हुक शॉट पुन्हा पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कसले अफलातून टायमिंग!
सचिनच्या खेळाची फार चर्चा
सचिनच्या खेळाची फार चर्चा ऐकली आज
व्हॉटसअप ग्रूप वर व्हिडिओ सुद्धा पाहिला..
https://www.instagram.com/reel/DGheW7MINes/?igsh=ZmRraXI3aTFyeDh4
“ सुदैव म्हणायचेय का तुला ?”
“ सुदैव म्हणायचेय का तुला ?” -
भाऊ, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, गावसकरला अश्या अस्थानी कॉमेंट्स करून आपलेही पाय मातीचे असल्याचे दाखवून देण्याची सवय आहे. मला तर कॉमेंट्री करताना त्याने इमाम च्या रन-आऊटवर अकारण इंझमामवर ‘विनोद’ करणंही ज……..रा अकारणच वाटलं होतं.
आजमतुल्ला ओमराझाय... काय कडक
आजमतुल्ला ओमराझाय... काय कडक बॉलिंग टाकली...
मजा आली
अफगाणिस्तान.. Love from India बदाम बदाम बदाम
भारतानंतर हा देश जिंकल्याचा आनंद होतो.
म्हणजे हे तुम्ही आणि असामी
म्हणजे हे तुम्ही आणि असामी यांनी मान्य केले आहे असे समजूया का?
>>
असामी चं अन् माझं मत एकच आहे हे कशावरून ठरवलंस??
माझी २३ तारखेचे २१:३६ ला संपादित पोस्ट पाहा
त्याचा पूर्वार्ध मी अय्यर आऊट झाल्या झाल्या लिहिला होता, अन् उत्तरार्ध पांड्या आऊट झाल्यावर (२१:३६ ला) ॲड केला
असामी,
असामी,
कोहलीचे शतक होऊ नये म्हणून पांड्याला पुढे पाठवणे हा रोहितचा मास्टरस्ट्रोक या पोस्टला तुम्ही सिक्सर म्हणत अनुमोदन देत असाल तर पांड्या खरेच तसेच करतो हे मान्य केल्यासारखेच झाले. भले आता तुम्ही करू नका.
>>
रोहित नी एक मतप्रवाह आपल्या वैयक्तिक इमेज बिल्डिंग साठी वापरून घेतला हा तुला मास्टर स्ट्रोक वाटतो का नाही इतका साधा प्रश्न होता...
असामीचं मत वेगळं असलं तर त्यानी काय फरक पडतो?
कोहलीचे शतक होऊ नये म्हणून
कोहलीचे शतक होऊ नये म्हणून पांड्याला पुढे पाठवणे हा रोहितचा मास्टरस्ट्रोक या पोस्टला तुम्ही सिक्सर म्हणत अनुमोदन देत असाल तर पांड्या खरेच तसेच करतो हे मान्य केल्यासारखेच झाले >> तुझ्या मेंदूचा स्पेसीमन जतन करून ठेवायला हवा.
हरलेल्या संघावर अशी शेरेबाजी करणं मला तरी खटकतं, >> भाऊ पोस्ट नि पोस्ट मधल्या विचारालाही अनुमोदन. तो शेरा अकारण हिणकस वाटला.
अफगाणिस्तानने एवढा सुंदर विजय
अफगाणिस्तानने एवढा सुंदर विजय मिळवला तरी लोकं अजून रोहीत शर्मा मध्येच अडकले आहेत.
ब्रँड व्हॅल्यू !
आजची झादरानची १७७ धावांची खेळी आणि द्विशतकाची आलेली संधी पाहता रोहितची आठवण आमच्या ग्रूपवर सुद्धा बरेच जणांना झाली.
एकाच पोस्ट मधे "अफगाणिस्तानने
एकाच पोस्ट मधे "अफगाणिस्तानने एवढा सुंदर विजय मिळवला तरी लोकं अजून रोहीत शर्मा मध्येच अडकले आहेत." नि मग "द्विशतकाची आलेली संधी पाहता रोहितची आठवण आमच्या ग्रूपवर सुद्धा बरेच जणांना झाली." हे निर्विकारपणे लिहिणे हे मानले पाहिजे पण जोक अजिबातच जमला नाही सर.
लोक रोहीत शर्मा मध्ये अडकले
लोक रोहीत शर्मा मध्ये अडकले आहात याचे मला कौतुक आणि अभिमान आहे.
आता एक सांघिक पराक्रम दाखवतो
शर्माच्या कप्तानीत केलेला...
अजून रोहीत शर्मा मध्येच अडकले
अजून रोहीत शर्मा मध्येच अडकले आहेत.
ब्रँड व्हॅल्यू !
>>
तू वेड पांघरून पेडगाव ला जाणं, प्रश्नाला फाटे फोडण ही शर्मा ची ब्रँड व्हॅल्यू नाही रे...
* अजून रोहीत शर्मा मध्येच
* अजून रोहीत शर्मा मध्येच अडकले आहेत.* -
आठवण तर कशामुळेही येते ; आठवण येणं म्हणजे अडकणंच असतं असं नाहीं -
माझ्या हातात लाटणं दिसलं की असे घाबरता कां ? लगेच त्या रोहितसारखी फटकेबाजी मी सुरू करणार असं वाटतं की काय !!
रोहित पी आर आणि खेळ दोन्ही
भाऊ
रोहित पी आर आणि खेळ दोन्ही बाबतीत सरस आहे.
पण पी आर आहे म्हणून त्याची कामगिरी नाकारण्यात अर्थ नाही इतके मान्य केले की जगातले अर्धे प्रश्न सुटले.
Submitted by भाऊ नमसकर on 27
Submitted by भाऊ नमसकर on 27 February, 2025 - 13:33 >>>> भाऊ, सिक्सर !!!! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'सिक्सर' या शब्दामुळेही मला फक्त आणि फक्त रोहीतच आठवतोय.....काय
सरससर्रास पीआर आहे पठ्ठ्याचा....मानलं बुवा....निदान माझ्यासाठी तरी जगातले किमान पाव प्रश्न सुटले... 🤣गेल्या तीन आयसीसी स्पर्धात
गेल्या तीन आयसीसी स्पर्धात आपण शर्माच्या कप्तानीत काय धुमाकूळ घातला आहे बघा.
२१ सामने २० विजय
याचे कौतुक आनंद आणि अभिमान आहे
मला हल्ली (खरं तर आधीपासूनच)
मला हल्ली (खरं तर आधीपासूनच) राऊत साहेब आठवतात.
ज्यांच्या बाजूने बोलतात त्यांचाच वीट आणवतात..
अब्बा हार्मोनियम खाते थे....
अब्बा हार्मोनियम खाते थे.....अबे साले!!!!! ......
....माफ करना...
फ्ट
अहो, लोकांना काय काय आठवतंय तें बघितलत तर तुम्हाला आठवण्याचा प्रॉब्लेम झालाय ही देवाची कृपाच म्हणाल !

Pages