Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर तू सिरियसली पांड्यावर
मला तर तू सिरियसली पांड्यावर जेलस आहेस असे वाटते. जेंव्हापासून रोहित ला डावलून मुंबई ने पांड्याला कप्तान केलय.....
>>>>>>
असामी,
पांड्याला दुसऱ्यांच्या सेंच्युरी मध्ये टांग अडवतो म्हणून मी नाही तर जग चिडवतेय सध्या..
आणि हो, ते आयपीएल शर्मा पांड्या वाद मी विसरून सुद्धा गेलो जेव्हा आपण शर्माच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकलो आणि पांड्या रडला... तुमच्याच डोक्यातून बहुधा जात नाही.
आयपीएल कप्तानपद कुठे आणि ऑल फॉरमॅट विश्वविजेता भारतीय कप्तान कुठे.. तुम्हीच तर नाही ना रोहीत शर्मावर जेलस
ते रोहीत शर्मावर बॉडी शेमिंग कॉमेंट करणारे तर नक्कीच असतील.
कारण....
आजच्या तारखेला रोहित शर्मा इतिहासातील सर्वाधिक विजयी रेशिया असलेला कर्णधार आहे.
https://www.timesnownews.com/sports/cricket/rohit-sharma-creates-history...
The win over Bangladesh was Rohit's 100th win as captain in international cricket and he became the joint fastest captain along with Ricky Ponting to win 100 matches with a win percentage of over 70
काल पंड्या, कोहली आणि अक्षर
काल पंड्या, कोहली आणि अक्षर पटेलच्या मनात काय चालू होत ते माहिती नाही पण पंड्या आऊट झाल्यावर, सचिनच्या २०० वेळेस अमला ने धोनीचा चौकार अडवून सचिनला स्ट्राईक वर यायला मदत केली त्याच प्रकाराचा आनंद झाला.
पण पंड्या आऊट झाल्यावर..
पण पंड्या आऊट झाल्यावर..
त्याच प्रकाराचा आनंद झाला..
>>>
अगदी, तसा एक मीम सुद्धा पाहिला की पांड्याची विकेट पाकिस्तानपेक्षा जास्त भारतीय क्रिकेट प्रेमींनी सेलिब्रेट केली
सर, त्याच बातमीत पुढे Rohit
सर, त्याच बातमीत पुढे Rohit Sharma also became the second fastest to reach 11000 runs in ODI cricket. Rohit achieved the landmark in his 261st inning while Virat Kohli, the fastest to the landmark, reached the milestone in 222 innings. असंही आहे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष कसं केलंत?
ही माहिती अगदी आयसीसीने सुद्धा त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एक दिवसीय सामन्यांत १४००० धावांचा टप्पा पार केला. याआधी सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनी हा टप्पा पार केला आहे. यासाठी तेंडुलरला ३५० , संगकाराला ३७८ तर कोहलीला २८७ डाव लागले . चेंडू - तेंडुलकर १६२९२ संगकारा १७७८९ कोहली १४९८४. सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे - ५१ शतके.
रोहीत आणि विराट हे दोन लेजंड
रोहीत आणि विराट हे दोन लेजंड आहेत
यांना एकत्रितपणे रोको असे म्हटले जाते.
आणि यावेळी सुद्धा हा चॅम्पियन कप हे दोघे घेऊन येतात बघा
तुमच्याच डोक्यातून बहुधा जात
तुमच्याच डोक्यातून बहुधा जात नाही. >> सर आपण कालच्या मॅच नंतर @असामी असे खास लिहून मला टॅग केले होते हे विनम्रपणे पॉईंट करू इच्छितो. कमीत कमी स्वतःच्या पोस्ट्स ला तरी असे अनाथ करू नका. आता ह्यावर नेहमीचा शब्दछल सुरू होउ दे.
तुला रोहित ला बॉडी शेमिंग करणार्यांशी पंगा घ्यायचा असेल तर माझ्या खांद्यावर बंदूक नको, दोन बाफ कमी उघड, इतरत्र चार वायफळ पोस्ट्स कमी टाक नि इथे त्यांना उद्देशून काय ते लिही. हाय काय नि नाय काय.
@असामी असे खास लिहून मला टॅग
@असामी असे खास लिहून मला टॅग केले होते
>>>>
ते टाईप केले होते ते पांड्या रोहित आयपीएल प्रकरणी नाही तर पांड्या कसे लोकांचे शतक खातो यावर जी आपली चर्चा झाली होती त्यावर लिहिले होते.
पांड्याने लगेच ते सिद्ध केले.
तुला रोहित ला बॉडी शेमिंग
तुला रोहित ला बॉडी शेमिंग करणार्यांशी पंगा घ्यायचा असेल तर माझ्या खांद्यावर बंदूक नको
>>>
छे हो, खांद्याची गरज नाही. मी तर त्यांनाही माफ केले. पण मुळात पंगा वगैरेच नाही घ्यायचा. उलट रोहित रोज नवनवीन विक्रम करतो ते त्यांना सांगायला मजा येते. म्हणून विषय ताणतो. कारण अजून दोन वर्षे तरी रोहितचा जलवा असाच राहणार
ते टाईप केले होते ते पांड्या
ते टाईप केले होते ते पांड्या रोहित आयपीएल प्रकरणी नाही तर पांड्या कसे लोकांचे शतक खातो यावर जी आपली चर्चा झाली होती त्यावर लिहिले होते. >> पुढचे माझे नि तुझे नि सगळे पोस्ट त्यालाच धरून आहे . अस आपल्याला सोयीस्कररित्या साइलो मधे नाहि घ्यायचे सर.
रोहीत आणि विराट हे दोन लेजंड
रोहीत आणि विराट हे दोन लेजंड आहेत
यांना एकत्रितपणे रोको असे म्हटले जाते.
>>
हैला...
हे बहुतेक इथे कुणालाच माहिती नसणार...
कारण अजून दोन वर्षे तरी
कारण अजून दोन वर्षे तरी रोहितचा जलवा असाच राहणार
>>
' जलवा ' बघून टेस्ट टीम मधून नुसता खेळाडू म्हणूनही पुढची मॅच खेळणार का हे ही सांगता येत नाही
दोन वर्षाचं काय घेऊन बसलास
अर्थात आपल्या अगाध निवड समितीला भुलवायाला व्हाईट बॉल गेम ठीक ठाक असला म्हणजे झालं...
' जलवा ' बघून टेस्ट टीम मधून
' जलवा ' बघून टेस्ट टीम मधून नुसता खेळाडू म्हणूनही पुढची मॅच खेळणार का हे ही सांगता येत नाही >> बुमरा ला चॅम्पियन्स ट्रॉफी मधे न खेळवण्याचे कारण त्याला आय्पील नि एंग्लंड टेस्ट सिरीज साठी कप्तान म्हणून फ्रेश ठेवणॅ हे आहे असे बर्याच ठिकाणी वाचले. खरे खोटे देव जाणे !
यजमान दोन सामन्यात
यजमान दोन सामन्यात स्पर्धेबाहेर.
ऋ,
ऋ,
काल विराट ची १०० होऊ नये अन् दोष (आधीच कानफाट्या असलेल्या) पांड्याच्या माथी जावा अशा डबल हेतू नी रोहितनी मुद्दाम पांड्याला अक्षर अन् राहुल च्या आधी पाठवला असावा का? असेल तर हा रोहित चा मास्टर स्ट्रोक म्हणून काउन्ट होईल का?
इथेच सर्व सामने खेळायचे आहेत.
इथेच सर्व सामने खेळायचे आहेत. राहुल गेल्या सामन्यात खेळला. अक्षरला पुढे पाठवून झाले. पांड्याला सराव मिळावा म्हणून त्याला पुढे पाठवले. मी कप्तान असतो तरी मी हेच केले असते.
आणि पांड्याचे नुसते नाव कानफाट्या नाही तर त्याचे काम सुद्धा तसेच आहे.
काल दुसराच बॉल पुढे येऊन, तिसरा उचलून, आल्या आल्या कामाला लागला. काही गरज, काही संबंध, म्हणजे उगाच आपले उगाच..
बिलकुल आवडले नाही
बिलकुल आवडले नाही>> तुला
बिलकुल आवडले नाही>> तुला आवडले नाही तर बिग डील ! त्याला रोहित नि गंभीर सांगतात ते तो करतो. त्यांच्या विरुद्ध गेला असेल तर केले असते त्यांनी ड्रॉप त्याला. तो मेन टूर्नामेंटला हवाच हे गंभीर नि रोहित दोघांनीही वारंवार सांगितले आहे ह्यातच तुझ्यापेक्षा त्यांना त्याची किम्मत अधिक वाटते हे उघड होतेय.
हा रोहित चा मास्टर स्ट्रोक म्हणून काउन्ट होईल का? >> अँकी हा सिक्सर होता !
तुला आवडले नाही तर बिग डील !
तुला आवडले नाही तर बिग डील ! त्याला रोहित नि गंभीर सांगतात ते तो करतो.
>>>
अरे मी माझे मत सांगितले.
असा विचार करता तुमच्या मताला तरी कुठे रोहित आणि गंभीर किंमत देतात.
इथे कोणी कितीही रोहितची बॉडी शेमिंग केली आणि तो कितीही कोणाचा नावडता असला तरी भारताचा कर्णधार तोच आहे आणि तोच राहणार !
अरेच्या.. पाॅल ऑक्टोपसची आठवण
अरेच्या.. पाॅल ऑक्टोपसची आठवण झाली..
भारत पाक सामन्यातील विक्रम
भारत पाक सामन्यातील विक्रम
दर सामन्यात एखादा होतो
*भारत पाक सामन्यातील विक्रम
*भारत पाक सामन्यातील विक्रम दर सामन्यात एखादा होतो* - आकडेवारी पिंजत बसलो तर दर षटकाला पण एखादा विक्रम शोधून काढता येईल, असंच मला आता वाटायला लागलं आहे !! क्रिकेटचा हत्ती मस्त डुलत आपल्या राजमार्गाने जातच असतो आणि आकडेवारीला वाटतं आपल्या भुंकण्याला घाबरून तो पळतोय !!!
हो. हल्ली संगणक क्रांती मुळे
हो. हल्ली संगणक क्रांती मुळे सगळे रेकॉर्ड चटचट उपलब्ध होतात..
त्यात रोहीत विराट कारकिर्दीच्या अश्या टप्प्यावर आहेत जिथे जणू एखादा विक्रम तोडायलाच मैदानात उतरतात..
एक मात्र आहे.. एकदिवसीयची कमी झालेली संख्या पाहता यात ज्या विक्रमांना जास्त सामने खेळणे गरजेचे असतील असे विक्रम जे आता घडतील ते कदाचित पुन्हा कधी तुटणार नाहीत.
*हल्ली संगणक क्रांती मुळे
*हल्ली संगणक क्रांती मुळे सगळे रेकॉर्ड चटचट उपलब्ध होतात..* - पण म्हणून आपण त्यात किती गुंतून राहायचं, हा मूलभूत प्रश्न आहे. फलंदाजाने कोणत्या परिस्थितीत, कसल्या दर्जाच्या गोलंदाजी विरुद्ध, संघात फलंदाजी त्याच्यावर किती विसंबून होती इ इ महत्त्वाच्या घटकांची कांहीही दखल न घेणाऱ्या आकडेवारीवरून दोन खेळाडूंची तुलना कां करावी ? ढोबळ मानाने एखादा खेळाडू कोणत्या खेळाडूंच्या रांगेत बसतो, हे ठरवण्यापुरतंच आकडेवारीला महत्त्व द्यावं , हे माझं मत. आणि, आवडीचा खेळाडू ठरवणं ही तर प्रत्येकाची आत्मनिष्ठ बाब आहे व त्यात आकडेवारीने तर लुडबुड करूच नये !! ज्याचा खेळ उत्कटतेने पहावसा वाटतो, पाहताना आनंद मिळतो व क्रिकेटवरचं प्रेम वृध्दिंगत होतं, हा माझा तरी एकमेव निकष आहे, खेळाडूंची महानता जोखण्याचा !!
आणि पांड्याचे नुसते नाव
आणि पांड्याचे नुसते नाव कानफाट्या नाही तर त्याचे काम सुद्धा तसेच आहे.
>>
म्हणूनच त्याला वर पाठवून दोष त्याच्या माथी जाईल अन् आपण नामानिराळे राहू, शिवाय तो आऊट गेल्यावर कोहलीला आता तू सिक्सर मार वगैरे सांगितलं अन् त्या प्रयत्नात जास्ती रिस्क येऊन तो आऊट झाला तर परत चूक त्याची. फॅन्स च्या नजरेत आपण यारोंके यार
कोहली नी संयम ठेवल्याने मिशन साध्य नाही झालं
पण ईमेज बिल्डिंग तर झालं ना...
हा मास्टर स्ट्रोक नाही???
अँकी हा सिक्सर होता !
अँकी हा सिक्सर होता !
>>
धन्यवाद...
पण ऋ जसा सिनेमात फक्त शाखा वर फोकस ठेऊन बाकी सीन्स लक्ष देऊन बघत नाही तसंच इथे ही पार्शल रीडिंग करतो... त्यामुळे परत संत्र सोलायला लागलं...
म्हणूनच त्याला वर पाठवून दोष
म्हणूनच त्याला वर पाठवून दोष त्याच्या माथी जाईल अन्
>>>>
तुमच्या या मुद्द्यामागचे गृहितक हेच आहे की पांड्या खरेच तसा करतो.
म्हणजे हे तुम्ही आणि असामी यांनी मान्य केले आहे असे समजूया का?
मग पुढे बोलतो...
भाऊ आकडे हे बरेच काही बोलतात
भाऊ आकडे हे बरेच काही बोलतात आणि बरेच काही लपवतात.. यात दोन्ही बाजू असतात आणि मला वाटते हे प्रत्येकाला ठाऊक आहेच.
पण आकड्यांचे खेळ मजा सुद्धा देतात... मला तरी नक्कीच देतात कारण गणित हा माझा आवडीचा विषय आहे..
आणि मी आकड्यांना किती महत्त्व देतो म्हणाल तर मी मागेच इथे म्हणालो होतो की मी सर्वकालिक महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मानतो. डॉन ब्रॅडमनला मी कधी खेळताना पाहिले नाही तर मला त्याच्या 100 एवरेज चे कौतुक नाही. आणि यावरून ब्रॅडमनला खेळताना न पाहिलेल्या काहींनी यावर माझ्याशी वाद सुद्धा घालून झाला आहे.
*कारण गणित हा माझा आवडीचा
*कारण गणित हा माझा आवडीचा विषय आहे..* क्रिकेटच्या अकडेवारीशी संबंध नाहीं पटत ! ( मग, शतकापेक्षा शून्य अधिक, निदान तितकेच तरी, प्रिय असायला हवे तुम्हाला !!
)
म्हणजे हे तुम्ही आणि असामी
म्हणजे हे तुम्ही आणि असामी यांनी मान्य केले आहे असे समजूया का? >> सर अँकी नि मी डु आयडी घेऊन वावरत नसल्यामूळे आम्ही आपापली मते स्वतंत्रपणे ठरवतो नि नमूद करतो. आपल्या व्हर्बल डायरीयामधे ह्या झुल्लक गोष्टींची नोंद घ्यावी हि नम्र विनंती.
"मला तरी नक्कीच देतात कारण
"मला तरी नक्कीच देतात कारण गणित हा माझा आवडीचा विषय आहे.." नि " डॉन ब्रॅडमनला मी कधी खेळताना पाहिले नाही तर मला त्याच्या 100 एवरेज चे कौतुक नाही. " हे एकाच पोस्ट मधे निर्विकारमधे लिहिताना आपण किती हास्यास्पद ठरतो ह्याचा विचार कधी तरी सरांच्या मनात येईल अशी भाबडी आशा बाळगूया का ?
Pages