चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गारदने गार/गारद केलं' वगैरे विनोद करायचा मोह टाळते आहे
>>
बोअर झूम कॉल वर हे वाचून फुटलो
मग खोकला आल्याचं नाटक केलं अन् पाणी पिऊन सावरलं

माईक म्यूट होता म्हणून बरं...

अँकी Lol

केशवकूल,
जो शब्द आपल्याला माहीत नाही तो या ऋन्मेऽऽष ने ऐकला आहे हे पचवणे थोडे जड आहे. आपण सोडूया तो विषय Happy

ही गारद माझ्या मामेभावंडाना सुद्धा पाठ होती. त्यांच्या घरात प्रवेश करताच महाराजांचे भले मोठे चित्र नजरेस पडायचे. जे माझ्याच एका भावाने काढले होते. हे मी आधी सुद्धा एका धाग्यात (बहुधा माझी चित्रकला या धाग्यात) लिहिले आहे. सोशल मीडियावर ज्या रीळ फिरत आहेत त्यात काही फॅड म्हणून असतील पण सगळेच नाही. महाराजांशी तितकीच भावनिक नाळ जोडलेली कैक लोकं मी माझ्या आजूबाजूला पाहिली आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांची थट्टा नको..

१ मी कुणाची थट्टा करत नाहीये,
२ ही ललकारी देणे किंवा राजा दरबारात येतो आहे ह्याची खबर देणे हे रोमन राज्याकार्त्यापासूनची परंपरा आहे.
३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ही ती असणार .
४ प्रश्न असा आहे की त्याला गारद म्हणतात का?
ह ना आपटे , देसाई, पुरंदरे ह्यांच्या लेखनात हा उल्लेख आला आहे का.
महाराजांशी तितकीच भावनिक नाळ जोडलेली कैक लोकं मी माझ्या आजूबाजूला पाहिली आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांची थट्टा नको.>> रेड हेरिंग!

इथे ७० नव्या पोस्ट दिसल्या!
केकू, तुम्ही एकदम १ २ ३ ४ बंद करो ये अत्याचारच केला! Lol रेड हेरिंगवर हल्ली फार लोक बहकत नाही ते एक बरं आहे.
गार्ड - गारदी - गारद हे बसतंय की!
गार्गी पण बसतंय का बघा कोणी. Proud

'गारद' शब्द मलाही माहित्ती नव्हता पण संदर्भामुळे अर्थ कळला . >> +१.

रेड हेरिंगवर हल्ली फार लोक बहकत नाही ते एक बरं आहे. >> लांडगा आला रे झालय रे.

मेहता बॉईज पाहिला. प्रचंड प्रेडीक्टेबल असूनही बघायला चांगला वाटतो. सुरूवातीचे प्रसंग अगदीच साधे साधे आहेत पण जास्त इंपॅक्ट्फूल आहेत. नंतर नेहमीच्या साच्यातून बाहेर पडण्यासाठी थोडे मोठे प्रसंग घुसडले आहेत पण दुर्दैवाने चिकवा वर पडीक लोकांना काय होणार ह्याचा अंदाज येतो Happy बोमन इराणी सकट सगळीच कास्ट रॉक्स. !

चिकवा वर पडीक लोकांना काय होणार ह्याचा अंदाज येतो
एकदम १ २ ३ ४ बंद करो ये अत्याचारच केला!
>>>>> Lol

ओके सर. मी तुमच्यासाठी थोडे संशोधन केले.
कदाचित हा शब्द गारद असा नसून गरड असा असावा .
पहा
गरड
पु. मोठ्याने केलेला आक्रोश. (गो.)
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कदाचित हा शब्द गारद असा नसून गरड असा असावा
>>>>>

मला एखादं शब्द काय कुठून आला आणि कसा अपभ्रंश झाला असावा नसावा यात इंटरेस्ट नाही. मला गारद लहानपणापासून माहित आहे आणि त्याला गारद असे म्हणतात हाच शब्द माहित आहे.

जसे आमच्यात मुलाला झील म्हणतात.
तुम्ही शब्दकोशात शिरलात तर तुम्हाला कदाचित त्याचा अर्थ तळे सापडेल Happy

कदाचित हा शब्द गारद असा नसून गरड असा असावा . >> आता 'द' चा 'ड' केल्याबद्दल डू आयडीरुपी गारदी अंगावर घेण्याची तयारी ठेवा केकू , नाहि तर 'अ‍ॅडमिन मला वाचवा' म्हणायची वेळ येईल

झील
पु. १. मुलगा; झिलगा, झीलो (को.गो.) : ‘तूं नंदाचो झीलो, माकां फडको दी ।’ – भपसं ८. २. एका झाडापासून केलेले, उत्पन्न झालेले दुसरे झाड. ३. (ल.) जवळजवळ नष्ट झालेल्या वंशातील जिवंत मनुष्य, वंशाचा अंकुर. [सं.झला=मुलगी]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
चेडवा म्हनजे मुलगी.
हे भानू शिरधनकर ह्यांच्या पुस्तकात वाचलेले. माझो येकुल्त्यो एक झील.
सर मी पण तुमच्याच गावाचा आहे.

धनि
Sorry.
शिवाजी म्हणतो ही चर्चा थांबवा.
थांबवली.

धूमधाम मलाही आवडला. मस्त टाईमपास आहे. त्यातले तिचे मारामारी करणारे, शिवीगाळ करणारे पात्र आवडले. कारण ते उगाच नसून सर्व्हायव्हल स्किल वाटले. तिचा मोनोलॉगही आवडला, अजूनही तसेच वातावरण आहे आपल्याकडे. 'फाफडा गाय' स्ट्रिपिंग करेपर्यंत लेमच वाटला होता, पण नंतर 'नॉट बॅड' वाटले. अर्थात तो त्या कॅरेक्टरचा ग्राफच होता आणि तसाच वाढत जाणं अपेक्षित असावं. पायातल्या काचा काढायचा सीनही आवडला. त्याच्याकडेही वेगळी आणि इमोशनल सपोर्ट देणारी सर्वायव्हल स्किल्स आहेत असे दाखवलेय असं मला तरी बघताना वाटलं. प्रतिक बब्बर जो फेक एक्स बॉयफ्रेंडच वाटला तर हा घाबरट आहे पण किमान फेक नाही असे वाटले. मामाजी मात्र पूर्ण वेळ लटकत राहून इतके कंफर्टेबल कसे हा प्रश्न पडला. Happy

छान पोस्ट अस्मिता Happy
तिचा मोनोलॉगही आवडला, अजूनही तसेच वातावरण आहे आपल्याकडे >>> करेक्ट, तूमाखमै Happy

मस्त आहे धूमधाम. फुल टाइमपास. यामी तर आवडतेच पण प्रतीकचा रोलही मस्त आहे.

अहमदाबादमधली मारामारी त्याने "अहिंसा रोड"वर केलेली असणे, गाडी टो केल्यावर तेथे हे बाहेर पडतात, तेव्हा तो टो करणारा माणूस निर्विकारपणे फाइन भरा म्हणून यांच्या अवस्थेची दखलही न घेता निघून जातो तो सीन, तिकडे लिहिलेली सीआयडीबद्दलची कॉमेण्ट, "रिश्ते मे...", बारटेंडर यामीला नावाने ओळखतो ते व त्या मेल स्ट्रिपरची यामी ही नेहमीची कस्टमर आहे हे समजल्यावरची प्रतीकची रिअ‍ॅक्शन - हे खास नोटेबल.

कुत्र्यावरून अनेकांना रॉसची रिंग आठवली असेल Happy

सीआयडी बद्दलची माझी पोस्ट इकडे आणते Happy -

या सिनेमातले सीआयडी सोनीच्या सीआयडीवाल्यांशी साधर्म्य राखून आहेत. त्यांच्यासारखेच ते कोणाकडेही गेल्यागेल्या आपली ओळख देत नाहीत. तसंच आपल्या गाडीबाहेर एक ट्रक पार्क झालाय हे त्यांना कळतही नाही कारण सगळे गाडीतच असतात, बाहेर कोणीही लक्ष ठेवून नसतं वगैरे

खास नोटेबल. >>> या कॅटेगरीत त्यांच्या सुहागरातला लावलेलं प्रचंड पकाऊ गाणं पण अ‍ॅड करते Lol तेच गाणं शेवटी पण वापरलं आहे

मेल स्ट्रिपरची यामी ही नेहमीची कस्टमर आहे हे समजल्यावरची प्रतीकची रिअ‍ॅक्शन
>>> Lol हो. ती म्हणते अजूनही तीन मैत्रिणींची लग्नं राहिली आहेत, तुलाच बोलवणार बॅचलरेट पार्टीला. तेव्हा तर 'सीमांत पूजन' कट करून 'आधे इधर-आधे उधर' अशा दोन पार्ट्या होऊ शकतात असे वाटले. तसेही गळाभेट घेऊन कुणीकुणाला लक्षातही ठेवत नाही. Happy

रमड, सीआयडी Lol

ते गाणं मला वाटलं काहीतरी हाय क्लास क्लासिकल असेल Happy

तेव्हा तर 'सीमांत पूजन' कट करून 'आधे इधर-आधे उधर' अशा दोन पार्ट्या होऊ शकतात असे वाटले >>> Lol

Pages