Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इथे आहे. या बाफवर पूर्वी
इथे आहे. या बाफवर पूर्वी चर्चा झाली होती म्हणून माहिती पुन्हा दिली नाही वरती.
https://en.wikipedia.org/wiki/Bechdel_test
स्त्रीप्रधान चित्रपटांत स्त्रियांच्या संवादांत किंवा इन जनरल कथेत फोकस मेल कॅरेक्टर्स वर नसणे हा मुख्य भाग. बॉयफ्रेण्ड, नवरा ई मेल लीड्स वर नसणे.
लिंक बघितली.
लिंक बघितली.

काहितरी खूप अभ्यासपूर्ण दिसले म्हणून वाचले नाही.
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
>>>>>>> टाइप काहीतरी गंभीरपणे
>>>>>>> टाइप काहीतरी गंभीरपणे म्हणतात तो. प्रत्यक्षात त्या वेळेस हे लोकच बनाव रचून लखनौला आपण स्वतः दुबईहून आलो आहोत असे दाखवत आलेले असतात व तेथे स्वतः त्या तारीकच्या फॅमिलीला कसे गंडवायचे याचा प्लॅन करत असतात Happy
हाहाहा छान निरीक्षण फा.
------------
पियू - The Bechdel Test is a way to assess how women are portrayed in media. It asks if a work contains at least two female characters who talk to each other about something other than a man.
सामो interesting !!
सामो interesting !!
धर्माने मुस्लिम असलेले भारतीय
धर्माने मुस्लिम असलेले भारतीय लीड्स आहेत पण कथेत, सीन्स मधे, संवादांत त्यांचे मुस्लिम असणे हे सतत आपल्यावर मारले जात नाही. उलट त्यांच्या सोशल लेव्हलचे इतर भारतीय असतात तसेच त्यांचे प्रश्न, वागणे वगैरे दाखवले आहे - असे पिक्चर्स कमी आहेत. भिंतीवर मक्का की कोणतेतरी चित्र, अधूनमधून नमाज पढताना दाखवणे, अतिरेकी संदर्भ किंवा मग एकदम खानचाचा टाइप दयाळू व्यक्तिमत्त्व यातील कोणतेही स्टीरीओटाइप नसलेले लोक यात आहेत तसे क्वचितच सापडतात.
>>>> टोटली सहमत. असेच थोडेफार मला लैंगिक अल्पसंख्यांक लोकांबाबत वेबसिरीज मधेही असावं असं तीव्रपणे वाटून गेलं होतं, लिहिलेही होते इथे कुठेतरी.
'लाईक अँड सबस्क्राईब' होईल बेक्डल टेस्ट पास आणि हिडन फिगर्सही होईल.
आठवले, म्हणजे वरून श्रीमंत वाटतात पण प्रत्यक्ष कर्जबाजारी, दिखाऊ, 'बडा घर पोकळ वासा' असू शकतात.
लोकांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही >>>
दावते इश्क बघितला होता आधी. १
दावते इश्क बघितला होता आधी. १ टाईम वॉच वाटला. जसा परिणीती & सुशांत चा शुद्ध देसी रोमांस वाटलेला.
परिणीती आवडते. काम छान करते. वेळ वाया गेला असे वाटत नाही.
बब्बन.
राजेश रोशन ह्यांनी बहुतांशी म्युजिक ईंग्लिश धुना/गाणी चोरून बनवले आहे. प्रितम हून जास्त चोरी केलीये
भिंतीवर मक्का की कोणतेतरी
भिंतीवर मक्का की कोणतेतरी चित्र, अधूनमधून नमाज पढताना दाखवणे, अतिरेकी संदर्भ किंवा मग एकदम खानचाचा टाइप दयाळू व्यक्तिमत्त्व यातील कोणतेही स्टीरीओटाइप नसलेले लोक यात आहेत तसे क्वचितच सापडतात.
>>> खरंय. मुस्लिमांचं असं स्टिरीओटिपीकल व ख्रिश्चनांचं दयाळू फादर, ऑफिसातली साधारण आईच्या वयाची प्रेमळ पण खडूस म्हातारी, मध्यमवयीन अल्कोहोलिक बाप, फ्रॉकमधे पण सुंदर दिसेल अशी हिरॉईन, पारश्यांचं दिकरा दिकरा करणारा बावाजी नी स्वीव्हलेस ब्लाऊज गुजराती साडी नेसलेली स्त्री हे चित्रण एकेकाळी मस्ट होतं. अपवाद अमोल पालेकर टिना मुनीमचा पिक्चर व पेस्तनजी.
परीणीतीच्या पहिल्या पिक्चरमधे पण तिने नॉर्मल पण लग्नात फसवणुक झालेल्या मुस्लिम मुलीची भुमिका केलीय. अनुष्का व रणवीरचा पिक्चर. नाव आठवत नाहीये.
अरे हल्लीच तीन सिनेमे असे
अरे हल्लीच तीन सिनेमे असे बघितले. मम्मो, सरदारी बेगम, आणि झुबैदा. त्रिधारा म्हणूनच शाम बेनेगल यांनी केले होते. त्यावर वेळ मिळाला की सविस्तर लिहिणार आहे.
मुस्लिम प्रश्न ही थीम आहे, पण त्यात मोअर पर्सनल झालं की मोअर युनिव्हर्सल होतं तसा काहीसा भाग असावा. व्हीजिबली धर्म असला तरी तो अंगावर येत नाही. टिपिकल मव/ उच्च/ रईसी/ जीवन आणि त्यातील कंगोरे दिसत रहातात.
अनुष्का व रणवीरचा पिक्चर. नाव
अनुष्का व रणवीरचा पिक्चर. नाव आठवत नाहीये.
>>>>
लेडीज वर्सेस रिकी बेहेल.. मस्त होता तो
मुस्लिम नाही पंजाबी आहे.
मुस्लिम नाही पंजाबी आहे. 'लेडीज व्हर्सेस रिकी बेहेल' मधे डिंपल नाव असतं तिचं. ती पंजाबीच असावी त्यात. 'इशकजादे' मधे तिची भूमिका मुस्लिम तरुणीची आहे, 'झोया' नाव होते त्यात.
'झुबेदा' बघितला आहे. त्यातलं 'मेहंदी है रचनेवाली' अधुनमधून ऐकते मी. त्यातलं मुस्लिम लग्न बघायला आवडतं पण तपशीलवार दाखवलं नाही. सरदारी बेगम बघितला नाही पण त्यातली 'चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा' ही ठुमरी (?) आवडती आहे.
आमीर खानच्या सुपर
आमीर खानच्या सुपर सिक्रेटस्टार मध्ये एका मुस्लिम बाईला आणि तिच्या मुस्लिम मुलीला त्यांच्या मुस्लिम नवर्या आणि मुस्लिम बापाकडून कशी वागणूक मिळते हे अगदी सहज बिनधास्त आणि उघडपणे दाखवले होते.
आमीर खान स्वतः मुस्लिम असून त्याने हे दाखवले हे विशेष उल्लेखनीय. कारण त्याच आमीर खानला पीके वेळी काही जण उगाच झोडपत होते.
त्या पिक्चरमधील शेवटचा एअरपोर्ट सीन तर कमाल होता.
'इशकजादे' मधे तिची भूमिका
'इशकजादे' मधे तिची भूमिका मुस्लिम तरुणीची आहे, >>> तोच असावा माझेमन म्हणतात तो.
सिक्रेट सुपरस्टार हे एक चांगले उदाहरण आहे अजून. अमित म्हणतो ते तीन मी पाहिलेले नाहीत. #उच्चअभिरूचीनावड
लेडिज व्हर्सेस रिकी बहलही चांगला होता पण त्यात शेवटी तोच दिलदार होतो असा काहीतरी एण्ड होता. त्यापेक्षा त्या मुलींनीच त्यावर कुरघोडी केलेली दाखवली असती तर जास्त आवडला असता. म्हणजे "नॉट विदाउट माय डॉटर" मधे ती तिच्या मुलीसकट कशीबशी निसटते, याउलट त्यावर बेतलेल्या "शक्ती द पॉवर" मधे शेवटी नानाच त्यांना जाऊ देतो. आपल्याकडे लीडला भावखाऊ सीन असायलाच हवा असा हट्ट असतो. राजकुमारचे अॅक्शन युगातले जवळजवळ सगळे व नानाचे बरेच रोल्स तसे होते.
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती >>>
काहितरी खूप अभ्यासपूर्ण दिसले म्हणून वाचले नाही. Lol
>> अभ्यासपूर्ण भाग मीही वाचलेला नाही. पण वरती सामोंनी थोडक्यात सांगितले आहे तितकाच गाभा मला माहीत आहे
पंजाबी आहे >>> नाही गं.
पंजाबी आहे >>> नाही गं. मुस्लिमच. लखनौची, चिकनकारी का लेसचं काम करणारं कुटुंब असतं, विधवा असते ती. आणि रणवीरवर इंप्रेस होऊन तिचे सासरे तिच्या दुसऱ्या लग्नाची स्वप्नं बघत असतात.
लेडीज व. रिकी बहलच.
राजेश रोशनचे संगीत मला आवडते.
राजेश रोशनचे संगीत मला आवडते. एक सिग्नेचर आहे त्यांच्या गाण्यात. माहीत नसले तरी ओळखता येते. इतर गाण्यांवरून त्यांनी गाणी बेतली असतीलही - बहुतांश संगीतकारांनी ते केलेले आहे. पण अस्सल देशी वाटणारी त्यांची काही गाणी अप्रतिम आहेत. "जुली" मधले "ये राते नयी पुरानी" किंवा "सांचा नाम तेरा" (हे माझे ऑटाफे), "याराना" मधले छू कर मेरे मनको, "काला पत्थर" मधले एक रास्ता है जिंदगी, "लूटमार" मधले जब छाये मेरा जादू हे सुद्धा ऑटाफे, "इन्कार" मधले मुंगळा, "पापा कहते है" मधले "प्यार मे होता है क्या जादू" किंवा "घरसे निकलते ही", "मि. नटवरलाल" मधले परदेसिया व मेरे पास आओ मेरे दोस्तो, "आखिर क्यों" मधले एक अंधेरा लाख सितारे - ही बहुतांश सहज आठवलेली.
त्यांची काही गाणी अप्रतिम
त्यांची काही गाणी अप्रतिम आहेत. "जुली" मधले "ये राते नयी पुरानी" किंवा "सांचा नाम तेरा" (हे माझे ऑटाफे), "याराना" मधले छू कर मेरे मनको
>>> १९९९९++
जब कोई बात बिगड जाए, तुम से बढकर दुनिया मे, कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे, का करू सजनी, पल भर मे से क्या हो गया, बाहों मे तेरी मस्ती के घेरे पण माझी आवडीची
आपल्याकडे लीडला भावखाऊ सीन
आपल्याकडे लीडला भावखाऊ सीन असायलाच हवा असा हट्ट असतो.>> मेल लीड्ला!!
फिमेल लिड ही सकल्पना फारशी नाहिच आहे म्हणा..त्यामुळे लिड इज मेल लिड हे अध्यारुतच!!
बॉयफ्रेण्ड, नवरा ई मेल लीड्स
बॉयफ्रेण्ड, नवरा ई मेल लीड्स वर नसणे.
>>> हे `बॉयफ्रेण्ड, नवरा email लीड्स वर नसणे' - असं वाचलं गेलं आणि चेहेर्यावर स्क्रीन सेव्हर आला.
फा, 'विमानात बघणेबल' ही आणखी एक कॅटेगरी?
नाही गं. मुस्लिमच. लखनौची,
नाही गं. मुस्लिमच. लखनौची, चिकनकारी का लेसचं काम करणारं कुटुंब असतं, विधवा असते ती. आणि रणवीरवर इंप्रेस होऊन तिचे सासरे तिच्या दुसऱ्या लग्नाची स्वप्नं बघत असतात.
लेडीज व. रिकी बहलच.
<<<<<<<
ती तिसरी. त्या तिघीजणी मिळून त्याला धडा शिकवायचं ठरवतात. पैकी परिणीती दिल्लीतली लाडाकोडात वाढलेली मुलगी डिंपल आहे जीचा जिम इन्स्ट्रक्टर कम बॉयफ्रेंड बनून तो पैसे लुबाडतो. दुसरी ती सायरा.. लखनौवाली. ती अदिती शर्मा नावाची हिरोईन आहे कुणीतरी. तिसरी दिपांनीता शर्मा.. जिला हुसैनचे फेक पेंटिंग विकतो तो.
दुसरी ती सायरा.. लखनौवाली…
दुसरी ती सायरा.. लखनौवाली…
अरे हो. परीणीती पंजाबी होती. बरोबर. मग इश्जादेसोबत कन्फ्युज झाले मी.
फारेण्ड - >सन्गीतकार रोशन
फारेण्ड - >सन्गीतकार रोशन यान्ची अनेक गाणी ऐकली आणि आवडली पण ही रोशन यानी सन्गीत दिले आहे हे नव्हते माहित. >>> बब्बन - हे समजले नाही. रोशन व राजेश रोशन व्यतिरिक्त आणखी कोणी संगीत दिले आहे का?>
बब्बन यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांना त्या गाण्यांचे संगीतकार रोशन आहेत हे आधी माहीत नव्हतं. ती वेबसिरीज पाहिल्यावर कळले.
या घराण्याने रोशन हे नाव लावायला सुरुवात केली ते राकेश आणि राजेश रोशनचे वडील रोशनलाल नागरथ. ना तो कारवाँ की तलाश है, निगाहें मिलाने को जी चाहता है, लागा चुनरी पे दाग, जो वादा किया वो निभाना पडेगा , खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, रहें ना रहें हम - महका करेंगे..... ही न शोधता पटकन आठवलेली गाणी.
फा सहज आठवलेली गाणी किती तरी
फा सहज आठवलेली गाणी किती तरी (बरीच) आणि मस्त आहेत. ह्यालाच अभ्यास म्हणतात. राजेश रोशन म्हणताच ही गाणी आठवली.
मला फार फार तर ए आर रहमान्/आर डी ह्यांची आठवतील. बाकी गूगल.
लेडिज व्हर्सेस रिकी बहलही चांगला होता पण त्यात शेवटी तोच दिलदार होतो असा काहीतरी एण्ड होता. त्यापेक्षा त्या मुलींनीच त्यावर कुरघोडी केलेली दाखवली असती तर जास्त आवडला असता.>>> अगदी अगदी.. आणि अनुष्का त्याला सोडते (त्याचं मन बसलेलं असताना) असा शेवट असायला हवा होता, त्याने ही बाकीच्या ३ मुलींसोबत असंच केलेलं असतं.
आमीर खान स्वतः मुस्लिम असून त्याने हे दाखवले हे विशेष उल्लेखनीय>>> दाखवलं म्हणजे? अभिनेता/प्रोड्युसर आहे तो. कथालेखक्/दिग्दर्शक नाही. हिरो स्वतः कथा लिहितो & समाजाला आदर्श घालून देतो, असं लोकांना वाटतं की काय
>>> महिलाप्रधान पिक्चर्स करता
>>> महिलाप्रधान पिक्चर्स करता जशी बेख्डेल टेस्ट आहे तशी लीड कॅरेक्टर्स मुस्लिम असलेल्या पिक्चर्सकरता एक असायला हवी. म्हणजे धर्माने मुस्लिम असलेले भारतीय लीड्स आहेत पण कथेत, सीन्स मधे, संवादांत त्यांचे मुस्लिम असणे हे सतत आपल्यावर मारले जात नाही.
यात ३ इडियट्सही येईल - एक मित्र मुस्लिम आहे, पण त्याचं मुस्लिम असणं 'वापरलेलं' नाही. (except to show the situation is the same regardless of religion).
'गली बॉय'मध्येही तो मुस्लिम घरातलाच आहे - पण ती कथा खर्या रॅपरवर आधारित होती.
दावत-ए-इश्क मलाही वन टाइम वॉच म्हणून आवडला होता.
बाकी असे खानचाचा/प्रेमळ
बाकी असे खानचाचा/प्रेमळ प्रीस्ट/फणस मिसेस डिसोझा टाइप स्टीरिओटाइप्स अमेरिकन टीव्ही/मूव्हीजमध्येही दिसतात. 'वाइज अफ्रिकन अमेरिकन एल्डरली बाई' किंवा 'वाइज आणि मितभाषी नेटिव्ह अमेरिकन'.

'आपण वाइज नाही' यावर अमेरिकनांचा गाढ विश्वास असावा अशी मला शंका येते कधीकधी.
गली बॉय चालेल का?
गली बॉय चालेल का?
'रोशन्स' सिरीज पाहिली. अब्बा
'रोशन्स' सिरीज पाहिली. अब्बा रोशन आपले ऑल टाइम फेव्हरिट आहेतच. आशाने 'निगाहें मिलाने को' एवढं एक गाणं गाऊन रिटायरमेन्ट घेतली असती तरी तिचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंदलं गेलं असतं असं मला जेन्युइनली वाटतं इतकं ते गाणं आवडतं!
बाकी चित्रलेखा, बहु बेगम, बरसात की रात वगैरे वगैरे लिस्ट एन्डलेस आहे!
बाकी रोशन्सबद्दल बघतानाही छान वाटलं - मुखवट्यामागचा माणूस दिसावा तसं वाटलं. राकेश रोशन स्वतःला अपयशी अॅक्टर समजतो हे ऐकून उलट मला एक सूक्ष्म धक्काच बसला. खूप चढावउतार पाहिलेत या(ही) कुटुंबाने!
नेफ्लि वर २ बघणेबल कॅटेगरीतले
नेफ्लि वर २ बघणेबल कॅटेगरीतले सिनेमे पाहिले - म्हणजे फ्रायडे नाइट, फार डोके चालवायचा मूड नसताना करमणूक म्हणून बघणेबल
बॅक टु अॅक्शन - कॅमरून दियाझ आणि जेमी फॉक्स. रिटायर्ड आणि आयडेन्टिटी लपवून सामान्य लाइफ जगणार्या स्पाय कपल ला मुले टीनेज झाल्यावर अचानक एका कारणाने बॅक टु अॅक्शन परतावे लागते - ट्रेलर पाहिला की अंदाज येईल . पण टिपी आहे बघायला.
The Unbearable Weight of Massive Talent - निकोलस केज आणि गॉट मधला ओबेरिन, पेड्रो पास्काल. निकोलस केज यात "निकोलस केज" च आहे. करियर मधे स्टन्ट सिनेमे केलेला, स्वप्रेमात असलेला, पण आता नवे सिनेमे , अजून पैसे मिळवणे अवघड असलेल्या फेज मधला. त्यात त्याला एकाश्रीमंत फॅन च्या बड्डे साठी स्पेन ला जाण्याचे पेड आमंत्रण मिळते. मात्र तिथे पोहोचल्यावर अचानक सी आयए त्याला कॉन्टॅक्ट करून किडनॅपिंग आणि इल्लिगल आर्म्स डीलिंग संदर्भात त्याला त्याच्या होस्ट वर स्पायिंग करायला भाग पाडते. पण निक सिनेमातला हिरो असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तेवढा स्विफ्ट आणि स्मार्ट नाही. त्यातून होणार्या गमती, पेड्रो सोबत होणारी अनलाइकली फ्रेन्डशिप असा एकूण प्लॉट आहे. फार ग्रेट असा नाही पण लाइट एन्टरटेनमेन्ट म्हणून चांगला आहे.
मागावर ज्या गाठी पडतात त्याने
मागावर ज्या गाठी पडतात त्याने सुंदर नक्षीचे कापड बनते तर काही गाठींनी गळफास लागून जीवही जातो. या दोन गाठींच्या मध्ये अनेक प्रकारच्या गाठी असतात - काही देखण्या तर काही जाड भरड. प्रत्येक नाते ही अशाच गाठींनी बनलेले असते. काही नात्यात तलम आठवणींच्या गाठी जास्त असतात तर काही नात्यांत ठसठसणार्या.
कल्की आणि दिप्ती यांचे मायलेकीचे नाते ठसठसणार्या गाठींनी बनलेले आहे. त्यातली एक गाठ आहे ती गोल्डफीशची. मुलीला कुत्रा हवा असताना आई तिला गोल्ड्फिश आणून देते. एक दिवस लेक शाळेतून घरी येते तर तो मासा आईने टॉयलेट्मध्ये फेकलेला असतो आणि लेकीसमोर ती त्याल फ्लश करून टाकते. कधी न उकलू शकणारी नीरगाठ आईच्या शेवटच्या दिवसांत उकलली जाते.
डीमेंशिया आणि एकुणच वार्धक्याची उदास छटा सिनेमा गहीरी करून दाखवतो. गोल्डफिश जसा आपल्या भोवतालच्या पाणी आणि बोल यांनी बनलेल्या भिंगातून जगाकडे बघत असतो तसाच प्रत्येक जीव त्याला येणार्या अनुभवातूनच जगाकडे बघत असतो - हे पण छान उलगडून दाखवले आहे.
काही प्रतिकं पण सुंदर वापरली आहेत - एक लक्षात राहिलेले प्रतिक म्हणजे बॉबी अनामिकाला देतो ते पान. झाडावरून गळून पडलेले ते पान सुकलं आहे. पण आपला आकार अजूनही टिकवून आहे, सुकलं असलं तरी हिरवं आहे. डीमेंशिया झालेली साधना अगदी तशीच आहे.
इथपर्यंत सगळे मनोहर सांगितले.. आता तरीही वाला भाग
१. नक्की काय सांगायचं आहे सिनेमाला तेच कळलं नाही (त्यामुळे सिनेमा कलात्मक आहे यात वाद नाही)
२. नक्की असं काय होतं की अॅना आईला केअर होम मध्ये ठेवण्याचा निर्णय बदलते? हे न कळल्यामुळे शेवट निरर्थक वाटतो.
३. सिनेमात ठिगळं लावल्यासारखी अनेक पात्र येत जात राहतात. त्यांचे सिनेमात नक्की काय काम हेच कळत नाही. त्या शिष्याचे पात्र मात्र अगदी थोड्यावेळाकरता येऊन बरेच काही सांगून जाते.
४. चित्रपटात प्रामुख्याने विस्कळीत आठवणी आहेत. डीमेंशिया पेशंट हे मध्यवर्ती पात्र असल्यामुळे त्या विस्कळीत असणे अपेक्षीत आहे. पण त्या विस्कळीत आठवणींमुळे चित्रपट विस्कळीत व्हायला नको होता. (तो कसा विस्कळीत होऊ देउ नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'अस्तु')
५. चित्रपटासारख्या दृकश्राव्य माध्यमात, पडद्यावर काहीही न दाखवता नुसते संवाद ऐकवणे दिग्दर्शनातली प्रचंड मोठी चुक वाटली. आणि त्या संवादामागचे कारणही कळले नाही. आधी वाटले की अॅना आपल्या वडिलांशी संवाद साधताना पडदा ब्लँक केला आहे कारण वडिल हयात नाहीत. पण मग इतरही वेळेला पडदा ब्लँक होत राह्तो.
तर असा थोडासा आवडलेला आणि बराचसा न आवडलेला 'गोल्डफिश'. भारतात प्राइमवर आहे. अस्मिता, तुला ३०% धन्यवाद!
माधव, 30% वेलकम.
माधव, 30% वेलकम.
छान लिहिले आहे. तो नॅरेशनचा भाग मला कल्कीचा स्वसंवाद वाटला, तिच्याच मनाशी केलेला. विस्कळीत आहे ह्याच्याशी सहमत. रजत कपूर 'तिला आता शेवटपर्यंत तिच्याच घरात राहू दे' म्हणतो, ते ऐकून आईला होम केअर मधे न ठेवण्याचा निर्णय घेते असे वाटले. किंवा 'उर्वरित' आईसोबत आहे तो वेळ घालवून तिला माणूस म्हणून जाणून घेऊ असे काहीसे.
स्वातीही लिहिणार आहे असं म्हटली आहे. बघू.
>>> मागावर ज्या गाठी पडतात
>>> मागावर ज्या गाठी पडतात त्याने सुंदर नक्षीचे कापड बनते तर काही गाठींनी गळफास लागून जीवही जातो. या दोन गाठींच्या मध्ये अनेक प्रकारच्या गाठी असतात
वा!
*** स्पॉइलर्स स्पॉइलर्स ***
'मेमरी लाइक अ गोल्डफिश' हा वाक्प्रचार ऐकला होता, आणि अस्मिताने म्हटल्यानुसार तो संदर्भ असावाच सिनेमाच्या नावाला. पण सिनेमातला तो खरा गोल्डफिशही या नात्यातल्या गुंतागुंतींच्या ताण्याबाण्यांचं प्रतीकच ठरतो असं वाटतं.
तो घरात येतो तो लेकीला खरंतर हवा असलेला कुत्रा घेणं परवडत नाही म्हणून, तिला 'त्यातल्या त्यात' आनंद द्यायला, आणि तिच्यासमोर फ्लश केला जातो तो तिला हेतुतः दु:ख द्यायला! लेकीलाही तो मुळात कधीच आवडलेला नसतोच, तरीही ते दु:ख मात्र नेमकं डसतं! कारण वडील गेल्यावर डोळे मिटून विसंबावं असं नातं आईचंच असायला हवं होतं (हाही लेकीचा 'दुसरा नकोसा ऑप्शन' त्या गोल्डफिशसारखाच!), पण ते तसं नाही याची चरचरीत जाणीव तिला होते म्हणून! त्यातही फ्लश केला तेव्हा गोल्डफिश मेलेलाच होता बहुधा, पण डागणी खरी होती! ती अजून ठसठसते!
आपण आपल्या जन्मदात्यांकडे 'माणूस' म्हणून कधी बघायला लागतो? पूर्णपणे तसं बघू शकतो का? त्यांच्या चुकांसाठी त्यांना क्षमा करू शकू इतक्या पूर्णपणे? त्यांचे त्यांचे म्हणून काही उद्वेग, काही अपेक्षाभंग, काही टोचण्याही असतील त्या समजून घेऊ शकू इतक्या पूर्णपणे? त्यांच्या भावविश्वाच्या एखाद्या देखण्या कोपर्यात आपण परके आहोत हे स्वीकारू शकू इतक्या पूर्णपणे?
आपली आई ही 'आपली आई' असण्याव्यतिरिक्त किती काय काय होती! तिच्या एका रेकॉर्डिंगवरून माग काढत तिच्याकडे गाणं शिकायला आलेल्या मुलाला जी दिसते ती प्रतिभावंत बाई कोण होती? चाळीस पाउंड मिळतील म्हणून थंडीवार्यातही रेकॉर्डिंग करायला जात होती ती बाई कोण होती? जोडीदार गेल्यावर दागिने विकून, प्रसंगी उधारउसनवार घेऊन घर चालवणारी बाई कोण होती? शेजारणीने नर्सिंगचं प्रशिक्षण कुठल्या परिस्थितीत घेतलं हे सांगताना जीव तुटणारी बाई कोण होती? आणि आज ती शेजारीण तुला सोबतीला येईल असं सांगितल्यावर 'मी बोलते आहे का गं हल्ली तिच्याशी?' असं विचारते आहे ती बाई कोण आहे?
जे रोल रिव्हर्सल पुढे कधीतरी झालं असतंच, ते आईच्या डिमेन्शियामुळे आजच ओढवलं आहे. आता आई ती हट्टी, मनस्वी, तिच्या भल्यासाठी सांगितलेल्या गोष्टीसुद्धा न ऐकणारी मुलगी झाली आहे. आणि आपण ही एक नकोशी जबाबदारी आपल्या परीने निभावायचा प्रयत्न करणारी तिची आई झालो आहोत!
आज आपण आहोत त्याच वयाची असेल की ती वडील गेले तेव्हा. आत्ता आपल्याला आहे तशीच चणचण तिलाही होती पैशाची, शिवाय आपण होतो पदरात! मैत्रिणीच्या पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल आपण सहज बोलतो. आईची ती फेज कधी गेलीच नाही बहुधा म्हणून हसतो, पण खरंच ती फेज तिनं कशी निभावली असेल? तिचा अयशस्वी संसार तिने कसा ओढला असेल? आपल्या 'हुशार' पीएच्डी नवरा आणि मुलीच्या जगात आपण उपर्या आहोत हे कळल्यानंतरही? आपल्या जगात तेही तितकेच उपरे आहेत हे जाणवल्यावरही? मुलीला संगीत सोडाच, तिची भाषासुद्धा जुजबीसुद्धा येत नाही! इतकं अंतर!
एका बोलाचालीत लेक रागाच्या भरात 'मी सांगते लोकांना मी अडॉप्टेड आहे म्हणून!' असं बोलून जाते. आणि त्यावर चिडण्या-रडण्याऐवजी आई 'अगं मीही तेच सांगते एकेकदा' म्हणून एकदम हसत सुटते. ते पाहून लेकीलाही हसू फुटतं. आपापल्या वैतागातही एक दुवा, एक बंध जाणवतो दोघींना आणि मळभ हटायला लागतं.
शेवटी आई 'मी ना, एकदा माझ्या मुलीची प्रॅम बागेत ठेवून लांब चालत गेले होते, परत येणारच नव्हते' असं सांगते तेव्हा मग लेकीला राग येत नाही. ती नाही का तेच करायला निघालेली असते!
ही खरंतर युनिवर्सल गोष्ट, पण तिला स्थलांतराची आणखी एक किनार आहे. त्यांच्या स्ट्रीटवर आईसारखे आणखीही 'फर्स्ट जनरेशन इन्डियन्स' आहेत. एकमेकांना धरून आहेत. भाडं मागेपुढे झालं तरी तिची परिस्थिती समजून तिला हाकलून न देणारे लॅन्डलॉर्ड आहेत. तिची कार कोण चालवतंय यावर शेजारच्या कोणा काकांचं लक्ष आहे. जुगाड करून स्मोक डिटेक्टर दुरुस्त करणारे, कोविडच्या काळात घरपोच ग्रोसरीज देणारे, हाक मारताच धावून येणारे शेजारी आहेत. तिला कसा चहा आवडतो ते माहीत असणारे रैना अंकल आहेत.
आई आता लेकीला ओळखत नाही. ती या सगळ्याच ओळखी विसरत चालली आहे. तरीही लेकीचा हात धरून 'पण आहे हे छान आहे गं' म्हणते!
खुद्द अनामिकादेखील बाहेरच्या जगात अॅना आहे - इथे मिकू होती. विसरूनच गेली होती मिकूला! आता तिलाही मिकू सापडली आहे. आता तिला इथला गाशा गुंडाळायची घाई नाही वाटत. कारण आता हे घर आहे.
***
मी या सिनेमाचं नावदेखील ऐकलं नव्हतं - रेकोबद्दल अनेक धन्यवाद!
सिनेमात संगीताचा फार सुंदर वापर केला आहे - त्याबद्दल अमित कदाचित जास्त चांगलं लिहू शकेल. पण एक 'पैरो में पहना के बिछिया, लूट लियो' अशी काहीतरी (नीट शब्द आठवत नाहीत आत्ता) चीज आहे. ती त्या नकोशा लग्नबंधात अडकून परदेशी येऊन पडलेल्या आईचीच कैफियत वाटते!
दीप्ती नवल आणि कल्की (हो हो, केक्लां!) यांच्या अभिनयाबद्दल नव्याने निराळं काही सांगायची आवश्यकता नाहीच. बाकी कलाकारही जमून गेलेत.
(जाता जाता : मराठी चित्रपटांना बजेट नसतं हे एक नेहमीचं रडगाणं नुकतंच 'अमलताश'च्या वेळीही ऐकलं. याही सिनेमाचं बजेट फार नसावं - मोजके कलाकार, एक घर, एक स्ट्रीट इतक्यातच घडणारी गोष्ट आहे. पण डेप्थ!!)
Pages