Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बढिया collectiom अनिन्द्य
बढिया collectiom अनिन्द्य
शेवटच्या फोटोतला हात आणि नेल्स सुद्धा सुरेख
ग्लास तर आहेच, हातही सुंदर
ग्लास तर आहेच, हातही सुंदर आहे
डावा हात आहे ना, सुंदरच असणार
डावा हात आहे ना, सुंदरच असणार
वेल सेड, अनिंद्य
वेल सेड, अनिंद्य
हा बाफ आणि प्रतिसाद वाचून
हा बाफ आणि प्रतिसाद वाचून काही जुने फोटो देण्याचा मोह आवरत नाहीये
१) ही आवडती प्लेट आहे माझी
२) हा बाउल गिफ्ट मिळालेला

३) ही एंट्री इथे चालेल का माहीत नाही पण नैवेद्य दाखवायला हेच पान वापरतो

४) ही अजून एक

५)
6)
7)
हा पूर्ण सेट आणला होता . त्यात चटण्या आणि दही लावून ठेवते .
८)
ह्या प्लेट्सचा पण एक पूर्ण सेट आहे. म्हणजे होता .त्यातल्या काही निजधामास गेल्या
९)
ही प्लेट अतिशय सुरेख आहे.
सगळ्यांचीच क्रोकरी सुरेख आहे.
सगळ्यांचीच क्रोकरी सुरेख आहे.
मामी, तुझी ती प्लेट खूपच आवडली मला.
रमड, ते कप काय क्लास आहेत! हँडमेड पॉटरी खूप आवडते मला.
हा जार विलेपार्ले येथील
हा जार विलेपार्ले येथील प्रदर्शनातून घेतलेला . डिटॉक्स जार म्हणून विक्रीस ठेवण्यात आला होता
थँक्यू अल्पना मलापण आवडते
थँक्यू अल्पना
मलापण आवडते हँडमेड पॉटरी. शिकायची आहे कधीतरी. बकेट लिस्टीत आहे.
या धाग्यावरचे फोटो पाहून चुकून खाऊगल्लीत आले आहे की काय असा भास झाला
@ जाई ते मेसन जार्स (तुमचे
@ जाई
८ नं प्लेटचे Greek Lock वाले डिझाइन फार सुंदर आहे, तो सेट हिट असणार.
ते मेसन जार्स (तुमचे डिटॉक्स जार) माझ्याकडेही आहेत.
काहीच कामाचे नाहीत मला म्हणून pen holders, toothbrush holders, Planters असा वापर सुरु आहे
मेघना, तुमच्या कपाचा घाट आणि
मेघना, तुमच्या कपाचा घाट आणि त्यावरील चित्र खूप सुंदर आहे.
अनिंद्य,
अहाहा! सुंदर कलेक्शन
नाजूक Italian summer theme प्लेट>>> सुंदर, पाहिल्या आहेत अनेकदा.
शूर्पकर्ण आणि Hardworking Blue collar worker pan आवडला.
नाज़ुक से इस जाम में नाज़ुक से फ़साने हैं >>>> वाह
जाई, मस्त कलेक्शन.
१ ५ ६ आणि ८ अतिशय आवडल्या
rmd, तुझे हॅण्ड मेड कप तर फार सुरेखा आहेत. रंग, डिझाईन मस्त.
… चुकून खाऊगल्लीत आले आहे की
… चुकून खाऊगल्लीत आले आहे की काय असा भास झाला…
चालतयं की. नथ नाकानं साजिरवाणी
मला पण आठ नंबर चे डिझाईन
मला पण आठ नंबर चे डिझाईन आवडले जाईचे. माझेमन कडची पण बरीच क्रोकरी आवडली.
पूर्वी मला नाजूक डिझाईन जास्त आवडायचे. आता तसे डिझाईन बघायला आवडते पण घरात वापरायला शक्यतो प्लेन काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची किंवा इतर कोणत्याही रंगाची बोल्ड क्रोकरी जास्त आवडते. मिक्स - मॅच करायला सोपे जाते. आणि नाजूक डिझाईन पेक्षा रस्टिक डिझाईन्स जास्त आवडायला लागलेत.
नाजूक मध्ये जयपूर ब्ल्यू पॉटरी, मोरक्कन डिझाईन्स, चायनीज आणि जापनीज पॉटरी अजूनही आवडते.
पॉटरी जितकी वापरायला आवडते तितकेच एखादे नाजूक डिझाईन असलेली प्लेट किंवा कप दिसला की हे mosaic मध्ये किती छान दिसेल असा विचार येतो. मला आवडणारी एक ब्राझिलियन आर्टिस्ट ( Solange Pffer नावाची) फक्त क्रोकरी वापरून mosaic करते. मी पण हल्ली मैत्रिणींना सांगून ठेवले आहे, प्लेट/ कप फुटले की न फेकता मला द्या किंवा नको असेल काही तर आधी मला दाखवा, मी वापरेन.
… ब्राझिलियन आर्टिस्ट Solange
… ब्राझिलियन आर्टिस्ट Solange Pffer ….
तिचे insta account बघितले, animal faces आणि clothes, especially silhouette effect खूप सुंदर आहे तिच्या कामात. Doggy faces are too cute.
अहाहा!!! ती नाजूक गुलाबी
अहाहा!!! ती नाजूक गुलाबी फुलांची प्लेट काय सुरेख आहे. मला तशी डिझाइन्स फार आवडतात.
आणि ग्लासेसपेक्षा त्यातले द्रव्य जास्त आवडीचे
@ ऋतुराज, rmd, किल्ली -
@ ऋतुराज, rmd, किल्ली - थँक्यू !
@ माझेमन
गुलाबी प्लेटमधला ऐवज जास्त आवडता आहे, होम मेड पाव+ झणझणीत बटाटावडा. हा हा.
…ग्लासेसपेक्षा त्यातले द्रव्य जास्त आवडीचे….
May god grant us more opportunities to pop champagne corks !!!
मस्त धागा, crockery, फोटोज...
मस्त धागा, crockery, फोटोज....
हा धागा गणेशोत्सव संयोजक असताना का नाही सुचला तुला???? झब्बू साठी चांगला विषय होता की
चांगले विषय आताच फोडू नका,
चांगले विषय आताच फोडू नका, गणेशोत्सवाच्या झब्बू खेळासाठी लिहून ठेवा. - pro tip by अतरंगी
.. चांगले विषय आताच फोडू नका…
.. चांगले विषय आताच फोडू नका…..
हा बाण तर सुटलाय, आता माघार नाही
पॉटरी / चिनी मातीची भांडी हा
पॉटरी / चिनी मातीची भांडी हा अत्यंत जिव्हाळ्याचा / आवडीचा विषय आहे. माझा नवरा मला गमतीने भांडीवाली म्हणतो. नाजुक क्रोकरी पेक्षा पॉटरी जास्त आवडीची आहे. माझ्याकडे खुप कलेक्शन आहे आणि त्याबरोबर अनेक आठवणी सुद्धा.
मला फोटो टाकता येत नाहीत पण प्रयत्न करेन नक्की आणि इथे शेअर पण करीन.
तिचे insta account बघितले,
तिचे insta account बघितले, animal faces आणि clothes, especially silhouette effect खूप सुंदर आहे तिच्या कामात. Doggy faces are too cute.>> हो. पपीज आणि कोंबडी या दोन्हींचे तिचे डिझाईन्स खूप मस्त आहेत.
नाजुक क्रोकरी पेक्षा पॉटरी जास्त आवडीची आहे. माझ्याकडे खुप कलेक्शन आहे आणि त्याबरोबर अनेक आठवणी सुद्धा.>>> नक्की द्या इथे फोटो. हँडमेड पॉटरी फार आवडते. फेअबुक वर एक ग्रूप आहे पॉटरी हेड्स नावाचा, पॉटर्स चा. मी पॉटरी वर्कशॉप करताना तो ग्रूप जोइन केला होता, पॉटरी बद्दल अजून माहिती मिळवायला. एकापेक्षा एक सुरेख पिस असतात तिथे.
…. कलेक्शन आहे आणि त्याबरोबर
…. कलेक्शन आहे आणि त्याबरोबर अनेक आठवणी सुद्धा….
आठवणी असणारच. या निर्जीव वस्तू कलात्मक, आवडीच्या असतील तर त्या हाताळतांना अनोखा सुखवास घडतो. दीर्घकाळ वापर झाल्यास आनंदी आठवणी त्यांना चिकटतात आणि पुढचा वापर अधिकच सुखकारक होतो.
जरूर शेयर करा, आनंद वाटला की वाढतो
ब्राझिलियन आर्टिस्ट Solange
ब्राझिलियन आर्टिस्ट Solange Pffer >>>>> भारीच. कुत्रा आणि कोंबडा मोसेक भारी आहेत.
अल्पना, तुम्ही मागे मोसेक आणि नेम प्लेट टाकली होती कुठेतरी बहुतेक.
आभा,
माझ्याकडे खुप कलेक्शन आहे आणि त्याबरोबर अनेक आठवणी सुद्धा.>>>> नक्की टाका फोटो आणि त्यावर लिहा.
जरूर शेयर करा, आनंद वाटला की वाढतो>>>>> 😇
झब्बू साठी चांगला विषय होता की>>>>> खरंच की.
अल्पना, तुम्ही लिहा इथे हँडमेड पॉटरी अनुभवाबद्दल.
ईडल्या पाहू की क्रॉकरी? भयानक
ईडल्या पाहू की क्रॉकरी? भयानक मस्त दिसतायत त्या ईडल्या.
रूटीन पेक्षा थोडी वेगळी : ही
रूटीन पेक्षा थोडी वेगळी : ही दाल-बाटी / लिट्टी-चोखा प्लेट.
Portion Control म्हणून कुणीही एकावेळी ४ पेक्षा जास्त बाटी मागू-खाऊ नये यासाठी केलेली चतुर योजना. 😉
ते डावे शेजारी मिक्स अँड म्याच केले आहेत, सेट नाही हा.
मस्त धागा! मूळ फोटो आहे तसेच
मस्त धागा! मूळ फोटो आहे तसेच एक भांडे लहानपणी होते आमच्याकडे. दह्याकरता वापरले जायचे. साधारण अशीच २-३ होती. लोणच्याच्या बरण्याही होत्या. अजूनही असतील कदाचित. पुण्याला गेलो की चेक करायला पाहिजे. ही चिनीमातीची भांडी म्हणजे खरोखरच चिनी माती असते की दुसरेच काही?
किल्लीची पोस्ट मी चहाच्या पारदर्शक कपामुळे नाव पाहायच्या आधीच ओळखली. सिमरन यांच्या पोस्ट मधला तो फालुदावाला फोटो खतरनाक सुंदर आहे पण त्यात तो फालुदाच जास्त सुंदर आहे असे वाटते. ऋतुराजचा टेराकोटाचा जग, ऋन्मेषचा "कार्स" थीम वाला ट्रे व चॉपस्टिक्स मस्त आहेत - लहान मुलांचे फेवरिट असतील.
डिटॉक्स जार व सौदामिनी कप - नावे समजली नाहीत.
रमड ने तो बशांची बटणे दाबल्याशिवाय कप उचलता येणार नाही असे वाटते तो फोटो टाकलेला दिसत नाही अजून.
बशांची बटणे दाबल्याशिवाय कप
बशांची बटणे दाबल्याशिवाय कप >>> तो काही घरातला कप नाही माझ्या. आंतरजालीय आहे
माझ्याकडच्या कपाचा फोटो हा बघ -
सौदामिनी कप - नावे समजली
सौदामिनी कप - नावे समजली नाहीत >>> फा, जा आधी 'माझा पती करोडपती ' सिनेमा पाहून ये
१.
१. आमचे चाट भांडार-

२.माझ्याकडे शुभ्र कोरल क्रॉकरीच रोजच्या वापरात असते.
३.
४. मठ्ठा-
५.
६.

गणेशोत्सवात भाग घेताना ही करी- सूप मिरवण्यासाठी हा 'बोल मंद हळवासा' आणला होता. नंबर आला नाही काही पण बोल छान आहे.
७. हॉट चॉकलेट विथ मार्शमेलोज - हॉट चॉकलेट पावडरी सोबत फुकट आलेले दोन मग होते. एक घरी आणताना पिशवीतच फुटला.

८.हे फुटून गेले ग्लासेस - बेरी स्मूदी
९. रोजच्या वापरातील मग-

१०. मलाही लक्षात नाही हे बोल कुठून आले आहे. त्यात कोजागिरीची बासुंदी/ रबडी नैवेद्य.

११. मेक्सिकन कालवण -

फा, जा आधी 'माझा पती करोडपती
फा, जा आधी 'माझा पती करोडपती ' सिनेमा पाहून ये >>>
… शुभ्र कोरल क्रॉकरीच
… शुभ्र कोरल क्रॉकरीच रोजच्या वापरात असते….
Perfect !
You saved the best for the last. The blue one is a beauty 😍
Pages