चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक्यू अनिंद्य. तुमचेही सगळे फोटो सुरेख आहेत. लिट्टी चोखाचा आज बघितला. Happy
कुमार सरांची टेराकोटा बॉटल, ऋतुराज यांची मुख्य चित्रातली नॉस्टॅल्जिक बरणी,किल्लीचे मग, अल्पनाचा सर्व्हिंग ट्रे, मामींची लोकरीच्या फुलांची प्लेट सिमरनचे फालुदा जार्स, माझेमनची बारक्या फुलांची प्लेट व पास्त्याच्या प्लेटचा रंग, मेघनाचा पक्षीमग, अनिंद्यची बटाटा वडा प्लेट आणि माचो मॅन, rmd चे लांब कानाचे तपकिरी मग, जाईच्या तीन नक्षीदार प्लेट्स हे विशेष आवडले. Happy

@अस्मिता, पोस्ट पाहून ती तुझीच असेल असं वाटलं होतं. तुझीच निघाली Happy
लाल बॉर्डरच्या प्लेटला सेम पिंच.

मस्त क्रॉकरी आणि पदार्थाचे फोटोज् हि जाई आणि अस्मिता . दाल बाटी एकदम 5स्टार हॉटेल मधल्या सारखी वाटते ,आकाराने आणि प्रेझेंटेशनेही.

@ अस्मिता.

bowl ला अख्खे मराठी जगत “बाउल” असे लिहित असतांना “बोल” असे योग्य लिहिणाऱ्या दुर्मिळ लोकांपैकी तुम्ही आहात हे नोंदवून ठेवतोय या ठिकाणी. Happy

# Notes For posterity

Happy धन्यवाद. अमेरिकन उच्चार आहे, शिवाय बाऊल म्हटले की बाऊल मुव्हमेंट्स आठवते. Proud त्याकारणाने टाळते.

.. एकदम 5स्टार हॉटेल मधल्या सारखी वाटते..

हॉटेल्सच्या दाराच्या नॉबवर लटकवण्याचे “do not disturb” वगैरे साइन याच शेप चे असतात 😀

रस्त्यावरच्या छोट्या temporary shop मधून घेतली होती. प्लेटची किंमत ₹ ३०० नक्त.

हो Happy

अनिंद्य, तुमची दाल-बाटी / लिट्टी-चोखा चौकडी प्लेट आवडली. एकदम 5 Star.
rmd, कप आणि रंग भयंकर आवडला. त्याहून ते कोस्टर.
अस्मिता, आता खजिना उघडला वाटते. मस्त आहे कलेक्शन.
त्यातले १, ६, ९, १०, ११ विशेष आवडले.
९ कपाची नक्षी छान. ११ तर जबरदस्त आहे. असा सेट घ्यायचा आहे.
'बोल मंद हळवासा' >>>> Lol

आपली सारखी प्लेट रोजच्या वापरातील आहे माझी >>> माझी पण Happy

rmd, कप आणि रंग भयंकर आवडला. त्याहून ते कोस्टर >>> Happy थँक्यू ऋतुराज

धाग्यावर शंभर प्रतिसाद झाले, तोंड गोड करा. चॉकलेट मूस, शॉटग्लासेस मधे.

883ad7ec-0b9d-4fec-9064-f7ec3cb815d3_0.jpeg

Macho man is here with four ballerinas. Lol

रच्याकने, मी शॉटग्लासेस चॉकलेट मूस, जामुन शॉट्स, कॉफी शॉट्स, gooseberry shots उर्फ़ आवळ्याचा रस असे सर्व सर्व करायला वापरतो. Very versatile.

मस्त अनिंद्य.

Macho man is here with four ballerinas.>>>> Lol

मोनिषा बेटा, gooseberry shots बोलो प्लीज.
आवळ्याचा रस इज टू मिडल क्लास>>>>> Lol

… आवळ्याचा रस इज टू मिडल क्लास….

चुकले माझे.

“Delightful gooseberry shots with chunks of freshly diced young ginger knobs, sprinkled with rare pink salt sourced from the Himalayas. An age old Ayurveda -endorsed immunity booster drink especially crafted by the Bartender for the tropical winters असे हवे ते Lol

भा री धागा!
उत्तम खाद्यपदार्थांमुळे क्रॉकरीचे नीट दर्शन होत नाहीये मात्र. पण सर्व फोटो मस्त.

राक्षसी हास्य कप
IMG-20240322-WA0002.jpg
पिटुकला कप.. गोड आहे हा ६ चा सेट
IMG-20240224-WA0006.jpg
रेनबो कप IMG-20240206-WA0002.jpg

अस्मिता >>> मठ्ठ्याचा ग्लास, गुलाबवाला मग आणि मेक्सिकन कालवणाची डिश आवडली.

किल्ली तो रेनबो कप पण मला सौदामिनी कप वाटतोय…

माझ्याकडे दोन शॉट ग्लासेस आहेत ज्याचा काय वापर करावा कळत नाही. बहुतेक टर्किश कॉफी चालेल. उद्या फोटो टाकते.

छान आहे धागा बराच जुना आहे. काही फोटो दिसत नाहीत जे आहेत ते सुंदर आहेत. पण तो धागा सगळ्या भांड्याचा म्हणजे लाकडी धातू मातीच्या अश्या सगळ्याचा ,तोही अजून चालू राहायला हवा धातूची मस्त भांडी टाकण्यासाठी. गणेशोत्सवा चा धागा बंद करणे कंपल्सरी असते का ! परत चालू करता येईल का

त्या धाग्यावर ची रूनी आणि मिनोती नी स्वतः: बनवलेली पॉटरी मस्त आहे. डॅफो नी रंगवलेले पण. डॅफो नी पण टेराकोटा मध्ये प्रयोग केले होते पूर्वी. मनु चे पण पॉटरी प्रयोग आहेत तिथे. Miss all these talented members.
हा धागा सुरू झाल्यापासून मला रूनी आणि मिनोती ची आठवण येत होती. रूनी ची पॉटरी नंतर बघितली नाही. मिनोती च्या कामाचे फोटो इन्स्टा आणि फेसबूक वर बघायला मिळतात. कधीतरी एखादा पीस घ्यायचाय तिचा.

Pages