चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळया रंगाची क्रोकरी मस्त सहसा घरात आढळत( काही घेत )नाही पण मला आवडतात डार्क ,ब्लॅक प्लेट्स पांढरे पदार्थ उठून दिसतात.
लाकडी हथ्था वाला आयटम युनिक आहे.
सामो बोल क्युट, रंगीत कुल्लड छान आहेत हे माझ्याकडचे

IMG-20250129-WA0002.jpg

हे चीनीमातीचे आहेत पण मला जे मातीचे मिळतात त्यातून चहा खूप आवडतो मातीचा सुगंध येणारा.

IMG-20250129-WA0001.jpg

हा अजून भेट मिळालेला एक सिरॅमिक मग याला सरकवता येणारे प्लास्टिक लीड आहे आणि खाली डिअट्याचेबल भुश्याचे थोडेसे रबरी (काय म्हणतात ते आठवत नाही )बुड म्हणू ते आहे.

हा एक पोर्सेलिनचा सर्व्हिंग बोल. आईबरोबर सहज चक्कर म्हणून खुर्जाला गेलेलो असताना, यावर्षी मैत्रिणींना दिवाळी गिफ्ट म्हणून असे बोल्स घेतले होते. मग एक घरच्या साठी पण घेतला.
bowl.jpg
घरातल्या कपाटांमध्ये क्रोकरी आणि एकुणच भांडी ठेवायला जागा पुरत नाहीये. (माझ्याकडे खूप क्रोकरी आहे असं काही नाही, स्वयंपाकघर खूप छोटं आहे) नाहीतर खुर्जाला गेल्यावर काय काय घ्यावे असा प्रश्न पडतो.

या धाग्यावर यायचं नाही, सगळ्याच गोष्टी खूप आवडतात आणि मग विकत घ्याव्या वाटतात असं ठरवतेय मी आणि परत चक्कर मारूनच जाते.

या अश्या सहा मगचा सेट ७-८ वर्षांपूर्वी घेतला होता. कपच्या दांड्याच्या खोबणीत अडकवायचे चमचे पण आहेत सोबत. मिल्क मग म्हणतात म्हणे यांना. आम्ही यांचा वापर हिवाळ्यात हॉट चॉकलेट प्यायला, जास्त पाहूणे आले असतील तर कॉफीसाठी आणि कधीकधी सूपसाठी करतो. फोटोत यामध्ये फ्रेन्च ओनियन सूप सर्व्ह केलेलं आहे.
mug.jpg

या माझ्या प्लेट्स with crackled glass glaze.

IMG_20250129_183128_(1080_x_1080_pixel).jpg

जरा जवळून
20250129_221622.jpg

इथे हा इफेक्ट कसा आणतात याची थोडी कल्पना येईल : https://youtu.be/-S4AI48jWOU?si=2KlkxF6lTPjLAJe4

त्या विक्रेत्याकडे केवळ या तीनच उरल्या होत्या म्हणून माझे बरेच पैसे वाचले.

मामी, तुझ्या या प्लेट्स खूपच आवडल्यात मला. एक होर्स हेअर ग्लेझ असलेली पॉटरी किंवा राकु पॉटरी पण असते. मार्बल इफेक्ट दिसतो त्यात. ती कुठे मिळाली तुला तर बघ. भारतात बहूदा मिळत नाही. आणि अर्थात हँडमेड असल्याने, आर्टिस्ट बनवत असल्याने महागही असते.

The glass glaze trio is glamorous. Have you shared them before somewhere on MaBo ?

>>>>>>>त्या विक्रेत्याकडे केवळ या तीनच उरल्या होत्या म्हणून माझे बरेच पैसे वाचले.
मामी काय गं Happy कसली हसतीये
>>>>>>>पॉंडीचेरीला ऑरोबिंदो आश्रमातील एका दुकानातून घेतलेले कोस्टर्स
नेपोलिटान आईसक्रीम वाटतय (पण चॉकलेटच्या जागी पिस्ता) किंवा थ्री-इन-वन. Happy मस्त पेस्टल रंग.

सिमरन धन्यवाद.

>>>>>>>५ वर्षांपूर्वी मैत्रिणीकडून रिटर्न गिफ़्ट म्हणून आलाय.
अनिंद्य अगदी युनिक पिस आहे. मस्त आहे.

अल्पना, तो काळा बोल गोंडस आहे.

>>>>>>>>हा अजून भेट मिळालेला एक सिरॅमिक मग याला सरकवता येणारे प्लास्टिक लीड आहे आणि खाली डिअट्याचेबल भुश्याचे थोडेसे रबरी (काय म्हणतात ते आठवत नाही )बुड म्हणू ते आहे.
होय लिड लावले की कॉफी गरम रहाते.

अनिंद्य,
तुमचा Green Hearts चखना सर्वर जबरदस्त आहे. Excellent choice. रंगही वेगळाच.
किवी प्लेट पण सुंदर.
सिमरन, मातीचे कुल्हड मस्त.
अल्पना,
तुमचा तो काळा पोर्सेलिनचा सर्व्हिंग बोल भारी आहे.
असाच एक YFL च्या संज्योत कीर कडे आहे. मनात भरलाय तो बोल!
मामी,
प्लेट्स with crackled glass glaze are super awesome!!
Amazing collection.....

The glass glaze trio is glamorous. Have you shared them before somewhere on MaBo ? >>> याच धाग्यावर सुरवातीला एक फोटो टाकला होता. आता जरा व्यवस्थित काढून टाकले.

किवी आणि प्लेट दोन्ही छान दिसतायत.

ही “फुलांचा सडा” वाल्या आधीच्या प्लेटची सावत्र बहीण. टेकिंग द सडा टू नेक्स्ट लेवल ; कारण हिच्या अंगभर ती नीळी फुले आहेत Lol

A little over the top for my choice.

3129dbba-0283-451f-95ef-60f55c0b62cb.jpeg

निळी-पांढरी परंपरा चालूच....
ही सर्विंग प्लेट नीट बघा. कोपरे फोल्ड केले आहेत. गोलाकार प्लेट अशा स्टाईलनं गोलसर-चौरस केली आहे. क्यूट ना? तिचा एक टवका उडाल्यामुळे जास्त वापरली जात नाही पण जपून ठेवलीय.

IMG_20250130_211157_(1080_x_1080_pixel).jpg

अनिंद्य, फळांचा सडा पडल्यावर फुलांचा दिसावा कसा? Proud प्लेट्स चांगल्या आहेत.

मामे, काय एकसे एक वस्तू आहेत तुझ्याकडे!

फुले … आपलं फळे का पडती शेजारी.. आपलं प्लेटवरी Lol

रमड, अनुमोदन. मामी आणि अल्पना serious collectors दिसताहेत.

धन्यवाद रमड आणि इतर सगळेच for appreciating. या निमित्ताने माझ्याही लक्षात येतंय की मी बराच सिरॅमिक खजिना जमवलाय.

अनिंद्य
ती किवी आधीच्या प्लेट मधली आहे का?
फळे का पडती शेजारी.. Lol
मामी, जबरी कलेक्षण आहे हो तुमच्याकडे.
माझ्याकडे अजून असेल निळ पांढरं..... बघतो

….. माझ्याकडे अजून असेल निळ पांढरं.....

काढा निळा पांढरा ख़ज़ाना तुमचा.

नभ निळे रात निळी प्लेटाही निळ्या … होउद्या Lol

>>>>>>>>नभ निळे रात निळी प्लेटाही निळ्या … होउद्या Lol
हे सर्व कसे सुचते?
मी नेहमी 'सेन्स ऑफ ह्युमर' चे टुल्स गोळा करत बसते पण आचरणात आणायला काही जमत नाही Lol
वोह अंगमेही होना पडता है शायद Happy

Pages