माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
grok हा एक विचित्र शब्द आहे.
grok हा एक विचित्र शब्द आहे. एखाद्या विषयाचे पुरः ज्ञान प्राप्त करणे...
लोक सांगतात कि हा "martian" भाषेतला शब्द आहे. Stranger in the Strange Land ह्या विज्ञान कार्हेतून हा शब्द आला आहे. ह्याला यथायोग्य शब्द इंग्लिश भाषेत नाही.
असाच हा एक पोर्तुगीज शब्द.
Soudade हा माझा अत्यंत आवडता शब्द. ह्याला इंग्रजीत प्रतिशब्द नाही.
a constant feeling of absence, the sadness of something that's missing, wistful longing for completeness or wholeness and the yearning for the return of what is now gone,
हुरहूर?
इंग्रजीत भाषांतर न होऊ शकणाऱ्या शब्दांची यादी आपल्याला नेट वर मिळेल.
Soudade साठी wikiचे एक पान आहे!
माझ्या कायम लक्षात राहिला कारण बांद्रा वेस्ट ला एका लोनली चोटूश्या बंगलीचे नाव होते Soudade. रोज नजर रेंगाळत असे तिथे.
Doifode शब्द आवडला.
Soudade शब्द आवडला.
* Soudade >> शब्द छान !
* Soudade >> शब्द छान !
* * *
असाच एक इंग्लिशने स्वीकारलेला जर्मन शब्द आहे : Bildungsroman
(https://www.google.com/search?q=bildungsroman+meaning&sca_esv=ca29aa4f45...)
= लेखकाच्या जडणघडणीच्या वयातील आत्मकथन
Nome
Nome
हे अमेरिकेच्या अलास्का राज्यातील एक शहर आहे. हे नाव कसे पडले याबद्दल काही गृहितके आहेत. त्यापैकी एक रोचक आहे ते असे :
प्राचीन काळी तेथील एका स्थानिकाला जेव्हा एका व्यक्तीने विचारले, की या जागेचे नाव काय आहे. त्यावर तो उत्तरला,
“no me” अर्थात, ‘मला माहित नाही’.
(https://www.etymonline.com/search?q=nome).
इथल्या अति थंड हवामानात eskimo राहतात आणि त्यांनी बांधलेल्या घराला igloo किंवा Nome dome home असेही म्हणतात
रोचक.
रोचक.
)
(हे गृहीतक त्यांच्या "असंबद्ध गप्पां"मधुन आले असावे काय?
शक्य आहे !
शक्य आहे !
संतान
सनातन
या नावाची शरणकुमार लिंबाळे यांची कादंबरी असून तिचा इंग्लिश अनुवाद परमिता सेनगुप्ता यांनी केलेला आहे. सेनगुप्तांच्या मते सनातन या शब्दाचा परिपूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्द इंग्लिशमध्ये नाही. म्हणून त्यांनी इंग्लिश भाषांतराचे नाव सनातन (Sanatan) असेच कायम ठेवले आहे.
whttps://www.penguin.co.in/book/sanatan/
Nome
Nome
सारखाच एक ऐकीव किस्सा/विनोद
कलकत्ता
या शहराजवळ एक फिरंगी एका स्थानिक माणसाला ते शहर कोणते असे बोटं दाखवत विचारतो. त्या माणसाला वाटतं तो त्याच्या काल कापलेल्या गवताकडं बोटं दाखवत हे गवत कधी कापले असं विचारतोय. तो म्हणाला कल काटा फिंरग्याचा समज शहराचे नाव कोलकत्ता
छान शब्द, वाक्प्रचार येतायेत.
*कल काटा >>
*कल काटा >>
हे खूप वर्षांपूर्वी ऐकले होते.
सत्य की दंतकथा ??
>>>सत्य की दंतकथा?>>>
>>>सत्य की दंतकथा?>>>
गुगललं तेव्हा हे हाती आलं.
The name Calcutta is an Anglicized version of the Bengali name Kalikata, which is believed to have multiple origins:
Kalikshetra
The name may come from the Bengali word Kalikshetra, which means "Ground of (the goddess) Kali".
Canal
The name may come from the location of the original settlement on the bank of a canal, or khal in Bengali.
Lime and burnt shell
The name may come from the Bengali words kali (lime) and kata (burnt shell), as the area was known for its shell lime production.
Flat area
The name may come from the Bengali word kilkila, which means "flat area".
Job Charnock
The name may come from a misunderstanding between Job Charnock and a farmer. When Charnock asked the farmer the name of the area, the farmer misunderstood and replied "Kal Kaata hoe chhilo", which means "I cut it yesterday". Charnock thought the name was Calcutta.
* kali (lime) and kata (burnt
* kali (lime) and kata (burnt shell) >>>
हे रोचक !
त्या कथेवर खरंच विश्वास
त्या कथेवर खरंच विश्वास ठेवणार?
असंबद्ध गप्पा धागा अवाहता करून "व्युत्पत्तीचा महत्वाचा डिजिटल दस्तऐवज" म्हणुन घोषित करावा मग.
Phrazle (https://solitaired
Phrazle (https://solitaired.com/phrazle) : २
अजून काही अनवट इं. वाक्प्रचार. साधारण अर्थाने जवळ जाणारे मराठी वाक्प्रचार कंसात देतोय. याहून अधिक योग्य सुचल्यास सांगावेत) :
. a fly in the ointment ( दुधात मिठाचा खडा)
. a chip off the old block (खाण तशी माती)
. window dressing (नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा)
. low-hanging fruit (?) ( पण याच्या विरुद्ध आपल्याकडे आहे; उंचावरच्या द्राक्षांसाठी : पदरी नाही पडली, द्राक्षे आंबट झाली)
. go off the deep end (डोक्यात राख घालणे )
सरजी
सरजी
a fly in the ointment ( दुधात मिठाचा खडा) ऐवजी दुधात माशी पडणे जास्त योग्य नाही वाटत का?
कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा वाक्प्रचार आहे.
दुधात मिठाचा खडा >>> https:
दुधात मिठाचा खडा >>> https://www.loksatta.com/lokprabha/marathi-language-5-1041079/#:~:text='%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%BE%20%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87'%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80,%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87.
..
पदरी नाही पडली, द्राक्षे आंबट झाली >>> https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A...
मी "चांदोबा चांदोबा भागलासका"
मी "चांदोबा चांदोबा भागलास का"

याच्या त्या ओळीं संदर्भात बोललो
दुधात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
दुसरे
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
ही ही एक गोष्ट आहे. तुम्ही दिलेला अर्थ बरोबरच आहे. पण वाक्प्रचार म्हणून ते आठवलं.
त्याची उडी द्राक्षाच्या घडा पर्यंत जात नाही म्हणून तो स्वत:ला द्राक्ष आंबट आहेत असे समजावतो.
अच्छा समजले!
अच्छा समजले!

बालगीताची उजळणी पण झाली
चित्रात दाखवलेला पदार्थ
चित्रात दाखवलेला पदार्थ मेक्सिकोचा असून त्याचे नाव enchilada असे मजेशीर आहे.
त्या पदार्थात मक्याच्या रोटीसारख्या आवरणात विविध प्रकारचे मांस, चीज, बीन्स, बटाटा आणि अन्य भाज्या घातलेल्या असतात. तो खाताना जोडीला टोमॅटो आणि मिरचीचा सॉस (chila. .) दिला जातो.
अशा या मालदार खाद्यपदार्थावरून
"The whole enchilada"
हा वाक्प्रचार इंग्लिशमध्ये आलेला आहे. त्याचा एका शब्दात अर्थ म्हणजे ‘साग्रसंगीत’(मेजवानी).
spoonerism
spoonerism
हा एक उच्चारणातील मजेशीर प्रकार आहे. एखादे वाक्य बोलताना त्यातील दोन शब्दांच्या उच्चारांची अंशतः अदलाबदल होते आणि त्यातून काही धमाल वाक्ये तयार होतात.
हा शब्द इंग्लिश धर्मगुरू William Spooner यांच्या नावावरून आलेला आहे. त्यांना तसे बोलायची सवय होती.
याची काही मजेशीर उदाहरणे :
१. It is now customary to kiss the bride >>>
It is now kisstomary to cuss the bride.
२. Sunday brunch >>> Brunday sunch
३. master plan >>> plaster man
spoonerism>>> रोचक
spoonerism>>> रोचक
अनिंद्य यांच्या टीचन किप्स
… to cuss the bride…..
… to cuss the bride…..
No, cuss words should be prohibited in the church
मी आहे spoonerism ग्रस्त, लहानपणापासून !
त्यामुळे सिरियस बोलणे चालले असतांना मधेच खूप
मजेदार प्रसंग निर्माण होतात. त्या धर्मगुरूंशी आणि टिचन किप्सशी रिलेट करू शकतोय
दरवाजा बंद करा हे “बरवाजा दंद करा” नेहेमीचेच
झुपारची दोप,
कोफ्याचे सव्हर
सुलाब गाबण
असे काहीही अचानक तोंडातून निघणे आणि त्यानंतर होणारा हास्यविस्फोट ठरलेला.
बरं एका बालमित्राचा सेम इश्यू. तो त्याचा फोटो दाखवतांना म्हणाला - मेरा ये फोटो अच्छा आया है पर गू मोरा नहीं निकला
* टीचन किप्स, सुलाब गाबण >>>
* टीचन किप्स, सुलाब गाबण >>> लईच भारी !!
..
" कच्ची पपई पक्की पपई" असे भरभर म्हणताना अनेकांचा तसा प्रकार होतो.
>> रोचक
>> रोचक
अनिंद्य यांच्या टीचन किप्स> +१
भारीच.
उच्चारताना होणारा वरील घोटाळा
उच्चारताना होणारा वरील घोटाळा समजण्यासारखा आहे. परंतु अनेक वेळा लिहिताना देखील असे काही मजेशीर घोटाळे होतात आणि त्यातून कधीकधी अर्थाचा अनर्थ देखील होतो.
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. संगणकपूर्व युगात अशी सर्व टिपणे हातानेच लिहावी लागत. कामाचा व्याप आणि ताण खूप असतो. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. अशा असंख्य लेखन घोटाळ्यांचे संकलन देखील झालेले आहे. त्यातील एकच उदाहरण देतो.
मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते :
Both pupils are equal in size and reactive to light.
एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !!
पण ही चूक पुढील राऊंडवर
पण ही चूक पुढील राऊंडवर येणाऱ्या डॉक्टरला लगेच समजेल. खरा घोटाळा तेव्हा होईल, जेव्हा ती चूक ओळखता येणार नाही.
पण ही चूक पुढील राऊंडवर
पण ही चूक पुढील राऊंडवर येणाऱ्या डॉक्टरला लगेच समजेल. खरा खोटाळा तेव्हा होईल, जेव्हा ती चूक ओळखता येणार नाही.
बरोबर. ते लक्षात येतंच.
बरोबर. ते लक्षात येतंच.
लिहिताना अनवधानाने काय चुका झाल्या होत्या याचे ते संकलन आहे.
go with the flow - प्रवाहपतीत
go with the flow - प्रवाहपतीत, चाकोरीबद्ध?>>>>
प्रवाहपतीत - ही पर्याय नसलेली स्थिती आहे
go with the flow - या मध्ये दुसरा पर्याय नाहीच हे गरजेचे नाही.
* प्रवाहपतीत - ही पर्याय
* प्रवाहपतीत - ही पर्याय नसलेली स्थिती आहे
>>> का बरे ?
प्रवाहपतित = प्रवाहांत पडलेला; प्रवाहाप्रमाणें जाणारा; परिस्थितीप्रमाणें वागणारा; गतानुगतिक.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%...)
म्हणजे अन्य पर्याय असताना देखील एखादा माणूस रूढीप्रमाणेच चाकोरीतून जातो. ( ?)
. . .
अर्थात मूळ इंग्लिशला मराठीत अचूक समांतर असा मलाही विचार करून नाही सुचला.
Die hardम्हणजे सनातन?
Die hardम्हणजे सनातन?
Pages