माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
म्हणजे अन्य पर्याय असताना
म्हणजे अन्य पर्याय असताना देखील एखादा माणूस रूढीप्रमाणेच चाकोरीतून जातो. ( ?)>>>> go with the flow ला चपखल नाही बसत आहे. प्रवाहपतित हे विशेषण आहे आणि Go with the flow ही Phrase आहे त्यामुळे असेल कदाचित.
. . .
अर्थात मूळ इंग्लिशला मराठीत अचूक समांतर असा मलाही विचार करून नाही सुचला.>>> +१००
वारा पाहून पाठ देणे हा
वारा पाहून पाठ देणे हा वाक्र्पचार मी सुचवला होता.
* वारा पाहून पाठ देणे >>>
* वारा पाहून पाठ देणे >>> काही अंशी ठीक आहे पण पूर्ण नाही पटला.
If you go with the flow, you let things happen or let other people tell you what to do, rather than trying to control what happens yourself.
https://www.collinsdictionary.com/dictionary/english/go-with-the-flow#:~...
. . . या मूळ अर्थाशी तुलना करता.
?
वारा पाहून पाठ देणे मध्ये स्वतः घेतलेला ठाम निर्णय असे असावे ना ?
@ srd,सनातन = Eternal,
@ srd,
सनातन = Eternal, perpetual, everlasting; that has ever been, or that will ever be.
मोल्सवर्थ शब्दकोश
Die hard = हट्टी, दुराग्रही (stubbornly resistant)
दोघांच्या अर्थांच्या दिशा भिन्न आहेत असे मला वाटते.
उच्चारणातील (किंवा लेखनातील)
उच्चारणातील (किंवा लेखनातील) अजून एक मजेशीर प्रकार म्हणजे
Freudian slip
एखादा शब्द बोलताना नकळत त्या ऐवजी भलताच शब्द बोलला जातो आणि त्यातून त्या व्यक्तीच्या सुप्त मनातील भावना किंवा इच्छा प्रकट होते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे, एखाद्या पुरुषाच्या तोंडून बायकोला हाक मारताना तिच्या नावाऐवजी अनवधानाने प्रेयसीचे नाव उच्चारले जाणे (आणि बायकांच्या बाबतीत प्रियकराचे नाव) !
Freudian slip
Freudian slip
रोचक, हा शब्द माहीत नव्हता.
नुकत्याच पाहिलेल्या फुलवंती सिनेमात यावर एक प्रसंग आहे.
* फुलवंती >> अच्छा !
* फुलवंती >> अच्छा ! पेशवेकालीन कादंबरीवर आधारित दिसतो आहे चित्रपट.
तीन प्रमुख इंग्लिश
तीन प्रमुख इंग्लिश शब्दकोशांनी आपले 2024चे बहुचर्चित शब्द जाहीर केले आहेत ते असे :
त्यापैकी brain rot वैशिष्ट्यपूर्ण वाटला.
brain rot = ऑनलाईन समाजमाध्यमांमधील आलतूफालतू किंवा हीन दर्जाच्या विषयांमध्ये अडकून पडल्याने मनावर झालेला नकारात्मक परिणाम.
लोकसत्तेने ब्रेनरॉट वर किंवा
लोकसत्तेने ब्रेनरॉट वर किंवा वरून अग्रलेख लिहिला. ब्रेन रॉट हा शब्द इंटरनेट यायच्या आधीपासूनचा आहे. ऑक्सफर्डच्या म्हणण्याप्रमाणे १८५४ साली पहिल्यांदा वापरलेला दिसतो. त्याचा अर्थ society’s tendency to devalue complex ideas, or those that can be interpreted in multiple ways, in favour of simple ones, and sees this as indicative of a general decline in mental and intellectual effort: हा कळायला मला जरा वेळ लागला आणि माझा ही ब्रेन रॉट होतोय का (इंटरनेटचा परिणाम?) अशी शंका आली.
* १८५४ साली पहिल्यांदा >>>
* १८५४ साली पहिल्यांदा >>> +१
Thoreau या लेखकाने तो असा वापरला होता :
While England endeavours to cure the potato-rot, will not any endeavour to cure the brain-rot, which prevails so much more widely and fatally ?
https://www.etymonline.com/search?q=brain+rot
हो.
हो.
Blue blood
Blue blood
राजघराण्यातील व्यक्तीसाठी हा शब्दप्रयोग वापरतात. त्यांच्या रक्ताला निळे का म्हटले असावे याचे नक्की कारण माहित नाही परंतु काही अंदाज व्यक्त केले गेले आहेत. त्यातील एक असा आहे :
या घराण्यातील गौरवर्णीय व्यक्ती ऐषोरामी जीवन जगत असते आणि उन्हात राबवण्याचा प्रश्नच नसतो. त्यामुळे तिची त्वचा अगदी स्वच्छ आणि तुकतुकीत राहते. अशा त्वचेतून निळ्या रक्तवाहिन्या (veins) अगदी उठून दिसतात.
https://www.etymonline.com/search?q=blue
नवीन विचारसारणी नुसार
नवीन विचारसारणी नुसार वंशवादी किंवा GENDER वर आधारित शब्द बोलीभाषेतून हद्दपार केले जात आहेत आणि त्या ऐवजी शब्द संपत्तीत नवीन भर पडत आहे. अशा शब्दांची यादी अंतर जालावर उपलब्ध आहे. GENDER NEUTRAL असा गुगलवर शोध केल्यास मिळेल.
पैकी IT शाखेतील काही.
White /Black ही विशेषणे वापरू नयेत असे संकेत आहेत. उदा. White-list च्या ऐवजी Allow List वापरावे.
Master हा नेहमी वापरात येणारा शब्द. Master-Slave ह्या ऐवजी primary secondary.
IT कंपन्यातून अशा प्रकारच्या सुचना स्टाफला दिल्या जात आहेत.
आपण नेहमी वापरतो तो शब्द "वेमा" web master. त्या ऐवजी Web product owner, Web manager, Website managerवापरावे अश्या सुचना आहेत. गंमत म्हणजे वेमा शब्द इथेही फिट बसतो.
ह्या विषयावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे.
https://itconnect.uw.edu/guides-by-topic/identity-diversity-inclusion/in...
बरोबर. चांगला दृष्टिकोन
बरोबर. चांगला दृष्टिकोन
. . .
मात्र अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या वैद्यकीय लेखनामध्ये जेव्हा एखाद्या आजारासंबंधी समग्र माहिती असते तेव्हा
whites , blacks, Hispanic, Ashkenazi Jews. इ.
वंश, वर्ण, भौगोलिक उगम दर्शवणार्या अशा अनेक शब्दांचा हटकून उल्लेख असतो.
शास्त्रीय दृष्टिकोनातून ( कोणत्या आजाराचे प्रमाण कुठल्या वंशात कमी /जास्त आहे हे कळण्यासाठी) त्यांना तो आवश्यक वाटत असावा किंवा बहुसांस्कृतिक देशांची ती गरजही असावी
(No subject)
नवरा बायको ह्या शब्दा ऐवजी
नवरा बायको ह्या शब्दा ऐवजी पार्टनर शब्द वापरावा अशी एक सुचना आहे.
अमेरिकन अध्यक्षाच्या पत्नीला फर्स्ट लेडी म्हणतात. त्या ऐवजी "फर्स्ट पार्टनर" म्हणावे. पचनी पडायला वेळ लागेल.
त्यापेक्षा त्या व्यक्तीला
त्यापेक्षा त्या व्यक्तीला कसले पद बहाल करणे बंद करावे.
नावाने संबोधावे आणि ओळख करून द्यायचीच असेल तर स्पाउज ऑफ दि प्रेसिडेंट ऑफ... अशी करून द्यावी.
तसेच मुला मुलींची नावे जेंडर स्पेसिफिक असतात, ती जेंडर न्यूट्रल कशी करणार?
मानव तुम्ही आशय समजून घ्या.
मानव तुम्ही आशय समजून घ्या. सर्व जग नपुसक लिंगी करावे ही त्या मागची कल्पना नाहीये. ज्या शब्दामागे एखाद्या बद्दल हेटाळनीची भावना, त्यांना कमी प्रतीचे लेखणे त्यांच्या कुवती बद्दल शंका व्यक्त करणे असा अर्थ निघतो अशा शब्दांबद्दल आक्षेप आहे. म्हणून "म्याड" ह्या शब्दाला देखील मनो वैद्न्यानिकाचा आक्षेप आहे.
वर मी master शब्दा विषयी लिहिले आहे पण M,A. M. Sc. ह्या बद्दल कोणाचा आक्षेप नाही. कारण त्यातील master शब्द एक्सपर्ट ह्या अर्थी वापरला गेला आहे.
मानव +1
मानव +1
* * *
लिंगनिरपेक्ष नामांचा मुद्दा एका मर्यादेपर्यंत चांगला आहे. उदाहरणार्थ, man hours ऐवजी work hours हे सयुक्तिक.
परंतु,
हा मुद्दा फार ताणला जाऊ नये. अखेर man याचा मूलभूत आणि वैश्विक अर्थ आहे मानवजात (human being). प्रत्येक ठिकाणी त्याचे उच्चाटन करायचं म्हटले तर mankind, manslaughter या शब्दांचे काय करायचे ?
गोंधळ वाढेल.
. . .

रच्याकने ..
मानव पृथ्वीकर हे नाव पूर्णपणे लिंगनिरपेक्ष आहेच की !
* सर्व जग नपुसकलिंगी करावे ही
* सर्व जग नपुसकलिंगी करावे ही त्या मागची कल्पना नाहीये >>>> +111
पटेश
* * *
तसेच मराठी पदवाचक/स्थितीवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे करायची की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे ( संदर्भ : प्राध्यापक द दि पुंडे यांचे ' भयंकर सुंदर मराठी भाषा' हे पुस्तक.
पूर्वीची चर्चा : https://www.maayboli.com/node/84791?page=4
मी गांभीर्यानेच लिहिले आहे,
केशवकूल, मी गांभीर्यानेच लिहिले आहे, दोन्ही मुद्द्यांबाबत.
जर काही लोकांची यादी आहे त्यात त्यांच्या सर्व पात्रतांचा उल्लेख आहे. त्यातून काही निवडायचे आहेत. तर निवड करणारे जेंडर बायस्ड असतील तर नावे पुरेशी आहेत.
त्यासाठी प्रत्येक ठिकाणी रोल नंबर्स वापरणे शक्य नसेल.
मायबोलीवर असते तसे प्रत्यक्षात वापरायचे नाव (टोपण नाव) जेंडर न्युट्रल वापरणे हा एक उपाय होऊ, असे काही उपाय म्हणतो आहे.
मानव + १
मानव + १
निवड करणाऱ्याने लिंगनिरपेक्ष
निवड करणाऱ्याने लिंगनिरपेक्ष निवड करावी यासाठी ते नाही. तो निवड करताना त्या व्यक्तीला पाहीलच ना?
पदनामे लिंगनिरपेक्ष असावीत असा विचार आहे. आपल्याकडे राष्ट्रपती या पदनामामुळे चर्चा झालीच.
वरील चर्चेच्या अनुषंगाने
वरील चर्चेच्या अनुषंगाने कार्पोरेट जगातील "blue eyed boy" ही संज्ञा आठवली. कृबु ला ह्याचा अर्थ विचारता खालील माहिती मिळाली.
A "blue-eyed boy" is a idiomatic expression that refers to a person, usually a man, who is favored or preferred by someone in a position of authority or influence. This person is often given special treatment, privileges, or opportunities.
The phrase is thought to have originated from the idea that blue eyes were considered rare and attractive, making the person with blue eyes stand out as special or favored.
Example sentences:
- "He's the boss's blue-eyed boy, always getting promoted and praised."
- "The new employee is the manager's blue-eyed boy, getting all the best projects."
<नवीन विचारसारणी नुसार
<नवीन विचारसारणी नुसार वंशवादी किंवा GENDER वर आधारित शब्द बोलीभाषेतून हद्दपार केले जात आहेत > याबद्दल. शब्द हद्दपार करू नयेत. वंशभेद आणि लिंगभेद चूक. म्हणून तसा अर्थ जिथे लागत असेल तिथे ते बदलावेत. त्या शब्दांचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा. पण जिथे ते शब्द अन्य अर्थाने वापरले जातात, तिथे त्यांना हात लावावा का?
आपल्याकडे महिला राष्ट्रपतीपदी निवडली गेल्यावर भाषेसंबंधी काही प्रश्न निर्माण झाले. अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष निवडून आली, तर तिथेही होतील. तिचा सहचर फर्स्ट जंटलमन असेल का?
काही देशांत सर्वोच्च पदांवरील व्यक्ती समगामी ( gay / lesbian) आहेत / होत्या. त्यामुळे पार्टनर हा शब्द वापरणं उचित ठरेल.
स्पाउस नको कारण त्यांचं लग्न झालेलंच असेल , असं नाही. स्पाउस म्हणजे नवरा किंवा बायको. न्युझीलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांचं लग्न २०२४ मध्ये झालं. त्यांना २०१८ मध्ये मूल झालं. त्यांचा नवरा हा गेले दशकभर त्यांचा जोडीदार आहे.
आणि तो फक्त त्याच जोडप्यांपुरता वापरण्या ऐवजी सरसकट वापरला , तरच समाजाने त्या संबंधांना सामान्य म्हणून स्वीकारलं असं म्हणता येईल. तसंच या व्यक्तींच्या लैंगिक कलाने, मॅरिटल स्टेटसने त्यांच्या कामात फरक पडायला नको, त्यामुळे ते वेगळे दाखवायचीही गरज नाही.
* "blue eyed >>> छान !
* "blue eyed >>> छान !
आणि
तिरळ्या व्यक्तीसाठी goggle-eyed हा शब्द इथे वाचायला मिळाला
gogelen = "to roll (the eyes) about"
https://www.etymonline.com/word/goggle-eyed
The term "blue-eyed boy" is
The term "blue-eyed boy" is believed to have originated in the early 20th century, with its first recorded use in a novel by P.G. Wodehouse in 1924. It refers to a person, often a young male, who is favored or treated specially by someone in authority, and it is commonly used in a derogatory sense to indicate favoritism.
* commonly used in a
* commonly used in a derogatory sense to indicate favoritism.
>> म्हणजे,
बगल-बच्चा + हस्तक + चमचा
या सगळ्या शब्दांचे मिश्रण म्हणता येईल का ?
एक शंका.
>>>>>अमेरिकन अध्यक्षाच्या
>>>>>अमेरिकन अध्यक्षाच्या पत्नीला फर्स्ट लेडी म्हणतात. त्या ऐवजी "फर्स्ट पार्टनर" म्हणावे.
उत्तम कल्पना.
-holic (= व्यसनी) हा
-holic (= व्यसनी) हा बोलीभाषेतील प्रत्यय आहे.
या प्रकारचे alcoholic & workaholic हे दोन शब्द बहुपरिचित आहेत. ( अलिकडे त्यात videoholic, pornoholic इ. ची पण भर पडलेली आहे).
Workaholism चा अतिरेक करणाऱ्या मोठ्या अधिकार पदावरील व्यक्तीसाठी एक अनधिकृत शब्द उद्योग जगतात येऊ पाहत आहे आणि तो आहे -
Workaholigarch = आपल्या हाताखालील लोकांनी मरेस्तोवर काम करावे अशी अपेक्षा करणारा खडूस छळकूट बॉस !
Pages