माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
धन्यवाद केकु.
धन्यवाद केकु.
मी हा संदर्भ वापरला होता : https://www.etymonline.com/search?q=salary [Lewis & Short]
वरील ब्लॉग लांबलचक असून नजरेखालून घातला. त्यातील हे वाक्य पटले :
"We don’t have the evidence to settle on a single explanation."
धन्स !
एखाद्या व्यक्तीच्या
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल बोलताना ती घटना सौम्य शब्दात सांगण्याची पद्धत जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये आहे. त्यासाठी विविध वाक्प्रचार वापरले जातात. इंग्लिशमध्ये असे अनेक वाक्प्रचार असून त्यापैकी खालील काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत :
* kick the bucket हा वाक्प्रचार कसा उगम पावला असावा यासंबंधी अनेक उपपत्ती आहेत परंतु त्यापैकी निर्विवाद सिद्ध झालेली कोणतीच नाही. तरीसुद्धा बऱ्यापैकी प्रचलित असलेले एक स्पष्टीकरण असे आहे :
आत्महत्या करणारी व्यक्ती त्या कामासाठी उपड्या बादलीचा उपयोग करते आणि खरोखरच बादलीला लाथ मारल्यानंतर कार्यभार उरकतो. सन 1788 मध्ये अशी घटना घडल्यानंतर त्याचे वर्णन या प्रकारे केले गेले होते.
नैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत, मृताच्या पायाशी पवित्र पाण्याने भरलेली बादली आणून ठेवण्यावरून असे म्हटले गेले असावे असाही एक प्रवाद आहे.
https://www.worldwidewords.org/qa-kic1.html
SOS
SOS
संकटात सापडलेल्या जहाजांचा संकट संदेश आहे. जेव्हा संदेशांची देवाण घेवाण करण्यासाठी मोर्स कोड वापरत असत तेव्हा वापरण्यात अत्यंत साधा असा हा कोड आहे. मोर्स कोड प्रमाणे S साठी तीन डॉट आणि O साठी तीन डॅश वापरले जातात.
. . . - - - . . .
SOS च्या आधी CQD असा संदेश प्रचलित होता.
टायटॅनिक ची जेव्हा हिमनगाशी टक्कर झाली तेव्हा आधी CQD आणि शेवटी SOS असे संदेश पाठवण्यात आले. SOS कोड हे त्यावेळी प्रथम वापरात आले.
save our souls or save our ship. SOS आणि CQD come quickly danger असे त्याचे जे लॉंग फॉर्म आहेत ते निव्वळ स्मरण मदत म्हणून आहेतं, त्याला तसा काही अर्थ नाही.
जेव्हा व्हॉइस कम्युनिकेशन शक्य झाले तेव्हा mayday हा संकट संदेश वापरण्यात येऊ लागला.
Mayday is a radio distress call, a phonetic representation of the French m’aidez (help me).
hobosexual
hobosexual
= घरदार नसलेली भटकी व्यक्ती जेव्हा निवाऱ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीजवळ राहते आणि प्रेमसंबंध ठेवते तेव्हा हा शब्द वापरतात.
https://en.wiktionary.org/wiki/hobosexual
(hobo = घरदार नसलेला)
अलीकडे महानगरांमधील घरांचे भाव आवाक्याबाहेर गेलेले असल्यामुळे अनेकांना त्यासाठी असा मार्ग स्वीकारावा लागत आहे :
https://www.indiatoday.in/lifestyle/relationship/story/why-urban-hobosex...
आजच्या लोकसत्तेत विज्ञानविषयक
आजच्या लोकसत्तेत विज्ञानविषयक सदरात पाश्चरायझेशन या प्रक्रियेची माहिती आहे.
त्यात disease = dis + ease = lack of ease हा शब्द पुढे आजार या अर्थी वापरला जाऊ लागला असे म्हटले आहे.
lack of ease हा शब्द आजार या
lack of ease हा शब्द आजार या अर्थी…
अगदी पटेबल आहे 👍
Hobosexual मला नवीन आहे.
Hobo bags माहिती होत्या, त्यांचा टिपिकल slouchy आकार सध्या महिलावर्गात ट्रेंडिंग आहे.
५०० माइल्स' (https://www
५०० माइल्स' (https://www.youtube.com/watch?v=B_K6z3HiRAs) गाणे ऐकून कढ का येतो ते कळलेले नव्हते. एवढेच माहीत होते की इट इज अ रेलरोडर्स लॅमेंट म्हणजे शोक आहे. रेलरोडर्स कोण वगैरे प्रश्न पडले नव्हते. परंतु आज, प्राईमवरती 'रायडिंग द रेल्स' नावची डॉक्युमेन्टरी पाहीली आणि लक्षात आले. अमेरिकन इतिहासाच्या एका विशिष्ठ काळाविषयीचे ते गाणे आहे. जागतिक मंदीच्या विळख्यामध्ये भरडल्या गेलेल्या लोकांविषयी विशेषत: अनेक कुमारवयीन मुलांना जगाव्या लागलेल्या भटक्या आयुष्याविषयी ते गाणे आहे. मंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या कामधंदे गेले आणि या काळात लोकांनी आपापल्या मुलांना 'तुम्ही तुमचे पोट भरा आता म्हणुन' घराबाहेर काढले तर काही मुलेमुली ही साहसी वृत्तीतून बाहेर पडली. ही मुले भटकी झाली. मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांबरोबर अमेरीकेत राज्ये फिरत. मिळेल ते काम करुन पोट भरत. अचानक सुस्थितीमधुन, हलाखीत पडलेल्या या मुला-मुलींना आयुष्याचे भयंकर चटके बसुन अकाली प्रौढ होत. भूकेमुळे खपाटीला गेली पोट, विषण्ण एकटेपण, उद्याच्या अन्नाची ना शाश्वती ना भविष्यकाळावरती विश्वास. अजुनही अनेक जणांच्या डोळ्यात् ते दिवस आठवले की अश्रू येतात. हा जो काळ आहे, हे जे 'होमलेस बॉइज', 'होमलेस बोहेमिअन' त्यातुन होबोस असे या मुलामुलींना म्हटले गेले.
https://www.collectorsweekly.com/articles/dont-call-them-bums-the-unsun…
या काळाविषयी काही गाणी खाली -
https://www.youtube.com/playlist?list=PLo4u5b2-l-fDDNsETGCjTzcNKNTs9VF0k
* Hobo bags
* Hobo bags
* 'होमलेस बॉइज', 'होमलेस बोहेमिअन' त्यातुन होबोस असे या मुलामुलींना म्हटले गेले.
>>>> समर्पक पूरक माहिती !
धन्यवाद
disease = dis + ease = lack
disease = dis + ease = lack of ease>>> अगदी समर्पक.
hobosexual
= घरदार नसलेली भटकी व्यक्ती जेव्हा निवाऱ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीजवळ राहते आणि प्रेमसंबंध ठेवते तेव्हा हा शब्द वापरतात.>>>>>> फक्त निवाऱ्यासाठी शारीरिक संबंध?
Hobo bags>>>>> यांना असे नाव का पडले असावे?
* फक्त निवाऱ्यासाठी शारीरिक
* फक्त निवाऱ्यासाठी शारीरिक संबंध?
>>> होय आणि आर्थिक गरज. (https://www.urbandictionary.com/define.php?term=Hobosexual)
या संकल्पनेचा सर्व इतिहास व सद्यस्थिती इथे आहे : https://www.narcissisticabuserehab.com/hobosexual/#2e80e199-5a88-48bf-b4...
आता त्यातून होणारे गैरप्रकार हा देखील एक कटकटीचा विषय झालेला आहे.
* Hobo bags>>>>> यांना असे
* Hobo bags>>>>> यांना असे नाव का पडले असावे?

>>> कारण त्यांचे भटक्या लोकांच्या खांद्यावरील पिशव्यांशी साम्य आहे म्हणून
धन्यवाद कुमार सर:)
धन्यवाद कुमार सर
gossip
gossip
(God + sibb)
याचा मूळ अर्थ आणि पुढील अर्थबदलाचा प्रवास फारच रोचक :
https://www.etymonline.com/word/gossip
charisma
charisma
हा इंग्लिश शब्द kharisma या मूळ या ग्रीक शब्दावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ divine gift.
पुढे हा शब्द हिंदी व मराठी दोघांनीही स्वीकारलेला आहे आणि त्यात किंचित अर्थविस्तार होत गेला आहे :
(उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)
केंब्रिजच्या online शब्दकोशात
केंब्रिजच्या online शब्दकोशात नुकतेच दाखल झालेले ताजे ताजे हे तीन शब्द :
tradwife = पारंपरिक गृहिणी
delulu = स्वप्नाळू आशावादी व्यक्ती
skibidi = मुळात अर्थहीन शब्द, परंतु तो ‘cool’, ‘bad’ अशा अनेक अर्थांनी वापरला जातो.
https://dictionary.cambridge.org/dictionary/english/skibidi
वरील तीनही शब्द ऑनलाइन चर्चा माध्यमांतून लोकप्रिय झाल्याने शब्दकोशात घेतले गेलेत.
tradwife म्हणजे नुसती
tradwife म्हणजे नुसती पारंपरिक गृहिणी नव्हे. A tradwife, short for traditional wife, is a woman who embraces and promotes traditional gender roles within marriage, often focusing on homemaking, childcare, and submitting to her husband's authority. This lifestyle is frequently shared and promoted through social media platforms, where tradwives showcase idealized versions of domestic life
या एक प्रकारच्या सोशल इन्फ्ल्युएन्सर. त्यातून त्या पैसेही कमावत असणार.
भर कदाचित पारंपरिक असण्यापेक्षा आम्ही कशा पारंपरिक हे दाखवण्यावर अधिक.
अच्छा !
अच्छा !
tweenager
tweenager
= 'tween + teenager असा तो शब्द तयार झाला आहे.
साधारण आठ ते बारा वर्षाच्या मुलांसाठी- विशेषतः मुलींसाठी- तो वापरला जातो.
बीबीसी टीव्हीवरील कार्यक्रमामुळे तो प्रचारात आला.
भर कदाचित पारंपरिक
भर कदाचित पारंपरिक असण्यापेक्षा आम्ही कशा पारंपरिक हे दाखवण्यावर अधिक.
>>> टेक्सासमधे हे मागासलेपण जरा जास्तच आहे. मी लोकल रेडिओ वर ऐकलेले - दोन मैत्रिणीपैकी एक ट्रॅड वाईफ व एक घटस्फोटीत. जी एकटी आहे तिला घर बदलायला मदत हवी होती. कारण नवऱ्याच्या घरातून बाहेर पडायचे होते. अशा प्रसंगात बालमैत्रिणीनी नवरा घरी असतो, त्याला वाढायचे असते, तो थकून येतो. त्याला गरमागरम स्वयंपाक आवडतो, मलाही त्याने बाहेरून मागवलेलं पटत नाही. तू जर असं वागली असतीस तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती - अशा अर्थाचे उद्गार काढले. मी अवाक ! दुसरी म्हणाली "My friend doesn't have a mind of her own !" हे अमेरिकेतील शहर, रेडिओ वरील forgive and forget नावाचे काहीतरी लाईव्ह कॉल करणारे FM वरील कार्यक्रम.
Delulu is the solulu नावाचा पण वाक्प्रचार आहे. Delusion is the solution ! अज्ञानात सुख आहे अशा अर्थाने साधारण.
*Delulu >>> मस्तच ! आवडला.
*Delulu

>>> मस्तच ! आवडला.
oater
oater
= पाश्चात्य संकल्पनेवर बेतलेला चित्रपट किंवा टीव्ही-कार्यक्रम.
हा बोलीभाषेतील शब्द असून त्याचा उगम मजेशीर आहे. पाश्चात्य चित्रपटांमध्ये घोड्यांच्या चित्रीकरणाला मोठे महत्त्व असते. oats हे घोड्यांचे खाद्य. त्यावरून त्या चित्रपट प्रकाराला असे नाव पडले.
Pages