विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

NCP (SP) chief Sharad Pawar on Thursday claimed that Maharashtra has fallen into the wrong hands in the past few years and has suffered a decline. He was in the Chinchwad assembly constituency in Pune district to canvass for his party candidate Rahul Kalate, who faces off against BJP's Shankar Jagtap in the November 20 Maharashtra polls

23 तारखेला मतमोजणी.
26 तारखेला विधानसभा मुदत संपतेय. तीन दिवसात मविआ मुख्यमंत्री ठरवतील का?

राष्ट्रपती कशासाठी आहेत? एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे माझे घरटे तुझ्या अंगणात ... म्हणत येतील.

हरियानामधे ३ टक्के मतदान वाढले तर भाजपाची लाट आल्यासारखे झाले होते.
झारखंडमधे किती मतदान वाढले आहे ते बघा आणि ठरवा. हा फरक अजून वाढणार आहे.
सँपल म्हणून 20 मतदार संघ तपासले.
Chatra 3.42
Simaria 4.42
Baharagora 2.22
Ghatsila 5.82
Jamshedpur East 0.07
Jamshedpur West 2.64
Jugsalai 2.98
Potka 4.19
Bhawanathpur 0.74
Garhwa 3.05
Bishunpur 1.06
Gumla 2.08
Sisai 3.26
Barhi 3.03
Barkatha 1.44
Hazaribagh 3.43
Khunti 7.05
Torpa 2.70
Kodarma 3.34
Latehar 2.26
Manika 3.62
मतदान टक्केवारीवरून अंदाज बांधायचं शिकलं पाहिजे असं वाटण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तसं केलं तरच नेतेमंडळी आपल्याला कसे खेळवत असतात हे हळू हळू आपल्या लक्षात यायला लागेल.
चांगली माणसे डोळसपणे निवडणुकांकडे पहायला लागली व त्यात सातत्याने वाढ होत राहीली तर ते भारतासाठी चांगले असेल असे वाटते.

एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे माझे घरटे तुझ्या अंगणात Lol
काळजीवाहू मुम नसतील का नवे सरकार बनेपर्यंत? का मुदत संपल्यावर काळजीवाहू पण अलाऊड नसतं ?

उरलेले मतदार संघ
Lohardaga 2.33
Bishrampur 2.31
Chattarpur -0.78
Daltonganj 2.36
Hussainabad 0.54
Panki -1.06
Barkagaon 2.46
Hatia 2.31
Kanke 1.39
Mandar 4.58
Ranchi 3.21
Tamar 5.57
Ichagarh 2.65
Kharasawan 6.24
Saraikella 4.25
Kolebira 3.94
Simdega 4.17
Chaibasa 3.47
Chakradharpur 3.03
Jagannathpur 4.72
Majhganon 2.72
Manoharpur 2.79
फक्त दोन ठिकाणी मतदान कमी झालेले दिसतंय. पण फरक भरून निघू शकेल एवढंच अंतर आहे.

गुजरातची भरभराट व्हावी यासाठी मोदी ,शहा यांनी महाराष्ट्राचे लचके कसे तोडले आहे ते पहा, 2014 नंतर महाराष्ट्राची खच्चीकरन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

2014 साली मोदी भाजपा सरकार सत्तेत आले.. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींना भरघोस मताने निवडून दिले.. परंतु, गुजराती मोदी शहानी सत्तेत आल्या वर हळू हळू महाराष्ट्राची लचके तोड करायला सुरूवात केली.. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल १६ पेक्षा जास्त प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचा पहिला लचका तोडला

१. आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) : मोदी सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रावर सगळ्यात पहिला घाला घालण्यात आला तो म्हणजे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच IFSC हा केंद्र सरकारचा मुंबईत प्रस्तावित असलेला प्रकल्प गुजरात ला नेण्यात आला.. एक लाख पंचवीस हजार कोटीचा हा अतिभव्य प्रकल्प ज्या मुळे महाराष्ट्रात साधारण पाच लाख रोजगार निर्माण होणार होता..मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय बंदर आहे.. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्यानं काँग्रेस सरकारच्या काळात हे आंतरराष्ट्रिय वित्त केंद्र मुंबईत होणार असं ठरलं होतं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक भूखंड राखून ठेवला होता. पण मोदी सरकारने हे केंद्र गुजरातला नेल.. आणि महाराष्ट्राच्या तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला.. इतकच नाही तर जखमेवर मीठ चोळत महाराष्ट्रात ज्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हे केंद्र होणार होतं तिथे त्या हजारो कोटींच्या बहुमूल्य जागेवर बुलेट ट्रेन च स्टेशन करण्यात आले.. म्हणजे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तर गेलंच आणि वर हजारो कोटींची जागा सुद्धा गेली.. (या बुलेट ट्रेन चा महाराष्ट्राला काहीही फायदा नाही.. मुंबईतून माणसं गुजरातला नेण्यासाठी ही तोट्यातील बुलेट ट्रेन आणली असून त्याचा बहुतांश बोजा हा महाराष्ट्र सरकारवर टाकण्यात आलेला आहे.)

https://www.bbc.com/marathi/india-52516632

महाराष्ट्राचा दुसरा लचका तोडला.

२. वेदांता फॅाक्सकॅान - महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत-फॉक्सकॉन हा १ लाख ५४ हजार कोटींचा अतिभव्य प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आहे. या प्रकल्पातून १ लाख पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प उभा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथली जागाही कंपनीने निश्चित केली होती. परंतु वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची मोदींनी भेट घेतली आणि मोदींनी स्वतःच हा प्रकल्प गुजरात मध्ये आल्याचे ट्विट करून जाहीर केले.. अशा प्रकारे मोदी स्वतः गुजरात साठी वरतून केंद्रातून फिल्डींग लावतात.. गुजराती मोदी पंतप्रधान असल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलेला आहे..महाराष्ट्रात या बाबत आरडा ओरडा झाल्यावर मोदींनी वेदांता फॉक्सकॉन' प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ अशी बोळवण केली होती.. प्रत्यक्षात मात्र काहीही दिले नाही..

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/political-pulse/f...

महाराष्ट्राचा तिसरा लचका तोडला.

३. टाटा एअरबस
भारतीय हवाई दलासाठी सी - 295 जातीची मालवाहू विमाने उत्पादित करणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस हा भव्य प्रकल्प नागपूरमधील मिहान परिसरात होणार होता, परंतु आता तो गुजरात बडोदा येथे नेण्यात आला आहे..

https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/cities/mumbai/modi-as...

महाराष्ट्राचा चौथा लचका तोडला..

४. बल्क ड्रग पार्क औषधनिर्मिती कंपन्यांची गुंतवणूक आणण्यासाठी 'बल्क ड्रग पार्क' योजना साठी रायगड जिल्ह्यातली जागा प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, हे ड्रग पार्क्स आता गुजरात ला देण्यात आले आहे. ड्रग्स पार्क साठी केंद्र सरकार राज्याला 1हजार कोटी रूपयांचे अनुदान देणार होते.

https://www.google.com/amp/s/www.deccanherald.com/amp/story/india%252Fma...

महाराष्ट्राचा पाचवा लचका तोडला

५. नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG)
NSG आणि नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी हा प्रकल्प मुंबईजवळ पालघर इथं प्रस्तावित केला गेला होता. सरकारनं तिथं त्यासाठी 305 एकर जागा अधिग्रहितही केली होती. पण केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर या दोन्ही संस्था गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला गेला.

https://www.google.com/amp/s/www.thehindubusinessline.com/news/national/...

महाराष्ट्राचा सहावा लचका तोडला.

६. मुंबई चा हिरे बाजार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील भारत डायमंड बोर्स हे जागतिक दर्जाचं मोठं डायमंड कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये 2,500 कार्यालये आहेत. 2 लाख स्क्वेअर फूट इतकी जागा आहे. त्याचबरोबर एकावेळी या इमारतीत 40 हजार लोक येऊ शकतात. परंतु, हा हिरे बाजार गुजरातला हलविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

https://www.bbc.com/marathi/articles/cjm4kwm823po

महाराष्ट्राचा सातवा लचका तोडला.

७. टेस्ला प्रकल्प - जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला हिने भारतात आपले ऑफिस पुण्यात स्थापन केले होते.. ते भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहेत. परंतु हा प्रकल्प सुद्धा आता गुजरात lला नेण्यात आला आहे..

https://www.indiatoday.in/india/story/revanth-reddy-exclusive-interview-...

आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची जागा आधी बीकेसीत व नंतर पालघरमध्ये प्लॅन केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीने काहीही हालचाल केली नाही. आपल्या नेत्यांच्या लिथार्जीमुळे ते केंद्र गुजरातेत गेले.
मोदी मुम असताना गुजरातेत गिफ्ट सिटीसाठी अग्रेसिव्ह प्रमोशन चालू होते. माझ्या तत्कालीन कंपनीचा सीईओ गुरगाव आणि चेन्नई ऑफिसला भेट द्यायला आलेला तेव्हा त्याला गुजरातच्या अधिकाऱ्यांनी अर्ध्या दिवसात गिफ्ट सिटीची सैर करवली होती. तो फार इम्प्रेस झाला होता. परत आल्यावर आमचे ५वे आणि सगळ्यात मोठे ऑफिस गिफ्ट सिटीत उघडण्यात आले.

महाराष्ट्राचा आठवा लचका तोडला.

८. सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प : आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित होता. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला नेण्यात आला आहे...

https://marathi.indiatimes.com/maharashtra/sindhudurg/india-first-submar...

महाराष्ट्राचा नऊवा लचका तोडला.

९. मोदी सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं आहे.

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/government-weighs-s...

महाराष्ट्राचा दहावा लचका तोडला.

१०. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं शिप रेकिंगचं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचा आकरावा लचका तोडला.

११. महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता.. परंतु मोदी सरकार द्वारे आता तो रद्द करण्यात आला असून.. त्या प्रकल्पाचे तुकडे करुन तो प्रकल्प महाराष्ट्र बाहेर नेण्याची योजना आहे..

वैद्यकीय उपकरण पार्क (Medical Device Park) आणि सौर ऊर्जा उपकरणे पार्क (Solar Energy Equipment Park) हे दोन प्रकल्प, रेल्वेचा प्रकल्प, संरक्षण खात्याचेही दोन प्रकल्प, दीपक फर्टिलायझर, दीपक नायट्रेट, गॅलक्सी, केलॉग्ज, नूर फूड्स, व्हीव्हीएफ, उल्का सीफूड्स यासारख्या खाजगी कंपन्यांचे नवीन विस्तार प्रकल्प गुजरातला नेण्यात आले आहेत..

म्हणुन लोक लोकांची क्वालिटी बदलण्याची धडपड करतात किंवा तीच राहु द्यावी याची धडपड करतात.
(बदलण्यामध्ये कमी/जास्त करणे दोन्हीही आले.)

खरे तर कोणीही जिंकले तरी काही फरक नाही . महाविकास आघाडी जिंकली तरी भाजप त्यांना टिकू देणार नाही . खोके किंवा इतर काही ना काही मार्ग काढून सरकार पडणारच.
महाराष्ट्रावर अन्याय करून गुजरातला नेलेले प्रकल्प वगैरे सर्व भाजप समर्थकांना माहित आहे व मनातून पटतेही. पण तरीही त्यांना गुजरातच्या अंमलाखाली राहण्यात गैर वाटत नसावे .

इथे डोंबिवलीत ह्या भागात राहिला आल्यावर मला कमळ निशाणीवर शिक्का मारताच आला नाहीये. आम्ही के डी एम सी च्या शहरी भागात राहून कल्याण ग्रामीण मध्ये आम्हाला टाकून दिलंय. पूर्वी डोंबिवलीत दुसरीकडे आणि नालासोपारा इथे रहाताना कमळावर शिक्का मारायला मिळायचा. आता कित्येक वर्ष धनुष्यबाण असतो. मागे इथे इंजिन निवडून आलेलं. आता कोण येतं पहाणे इंटरेस्टिंग असेल. प्रॉपर डोंबिवलीत किंवा डोंबिवलीतल्या कल्याण ग्रामीण मध्ये ध बा आणि इंजिन यात सामना होईल असं वाटतंय. काही भागात विशेषतः कल्याण जवळ मशालीला वोटिंग होईल असं वाटतंय. बाकी लोकसभेला मशालीने बरीच टक्कर दिलेली ध बा ला. एरवी तीन चार लाखाने निवडून येणारे आमचे खासदार लाख दीड लाखाने आले.

लाडकी बहीण योजनेची गेल्या १० दिवसांत वारेमाप जाहीरात करुन आता भाजपाने पुन्हा हिंदू-मुसलमान मुद्यावर प्रचाराचा रोख मागील १-२ दिवसांत का वळवलेला दिसतोयं?? महायुतीच्या इतर घटक पक्षांचे ठिक आहे, पण भाजपा कधिही, काहीही उगाच करत नाही.....जे कुणी क्लोजली ही निवडणूक फॉलो करत आहेत ते काही प्रकाश टाकू शकतात का??

काळजीवाहू मुख्यमंत्री त्या विधानसभेपुरता असतो. नव्या विधानसभेच्या अस्तित्वात येण्या आधी नवा मुख्यमंत्री ठरावा लागतो.
नाहीतर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते. कदाचित सभापती निवडून काम चालू शकेल, खात्री नाही.

Pages