मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नि पा चांगली पोस्ट.

मी सध्या गावात माझ्या घरातील मुलांना इन्ग्रजी शिकवते. बालवाडी, पहिली, तिसरी व सहावी ह्या इयत्ता आहेत. बस्लवाडी व पहिलीला मी सोडुन दिलेय. त्यांना बरे वाटावे म्हणुन थोडेफार अभ्यास घेते. तिसरी व सहावी या दोघांना शिकवायचे आहे. दोघांचेही इन्ग्रजीचे अज्ञान सारखेच आहे. आठवीतील एक आहे ती nmms असल काहीतरी नाव असलेल्या परिक्षेला बसलीय. तिलाही शिकवयचे. तिचे तसे स्पेश्स्ल क्लास शाळेत होताहेत त्यामुळे ती काळजी नाही. तिला इन्ग्रजी शिकवायचेय.

यांना जी एकात्मिक पुस्तके दिलीत तो सगळा आनंद आहे. शहरातील मुलांची लेवल व यांची लेवल यात जमिन अस्मान इतका फरक आहे. बेसिक मराठी शब्दही कानावर पडलेले नाहीत. वृंदा हे नाव दोघांनाही मराठीत लिहिता येईना.

याना कसे शिकवावे याचे कृपया मार्गदर्शन करा. मी माझ्या वेळचे इन्ग्रजी पुस्तक डालो करुन प्रिंट करुन आणले. काल i m a boy you are a girl शिकताना मजा आली, त्यांना this that here there कळले. आज परत तेच घासुन घेईन.

मुलांना अभ्यास करायचाय. मला जायला उशिर झाला तर लगेच फोन करतात, अजुन का नाही आलिस म्हणुन. त्यांना योग्य मार्गदर्शन हवेय. कृपया मला मदत करा Happy मराठी पुस्तके वाचुन घेणार आहे.

पोस्ट चांगली वाटली त्याबद्दल धन्यवाद.

साधनाजी, मराठी / हिंदी / इंग्रजी सगळ्या भाषा शिकवताना / शिकताना येणाऱ्या अडचणी सारख्या असतात. पहिली म्हणजे शब्दसंग्रह कमी असतो, जोडाक्षर कसे बनते माहित नसते, वाक्य तयार करतानाचे व्याकरण माहित नसते. मला वाटतंय ३री आणि ६वी या दोघांना पहिले हे शिकवून घ्या. नाम , सर्वनाम , विशेषण इत्यादी गोष्टी माहित नसतील तर त्यांना वाक्यं तयार करता येणार नाहीत. एकदा त्यांना अर्थपूर्ण वाक्यं तयार करायला आली तर तुम्ही पुढे काय शिकवणार आहात ते कळेल. नाहीतर तुमची बरीच चिडचिड होईल.

शहरातील मुलांची लेवल व यांची लेवल यात जमिन अस्मान इतका फरक आहे. >>> असं काही नाहीय, शहरातील ५०% पेक्षा जास्त मुलांची हीच परिस्थिती आहे.

जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा असेल तर :
१) पहिले एक प्लॅन तयार करा. त्यात रोज तुम्ही त्यांना किती वेळ शिकवणार आहात आणि नेमके काय शिकवणार आहात ते लिहून काढा. हा आठवड्याचा प्लॅन. मग प्रत्येक आठवड्याला आपण काय ठरवले होते आणि त्यातले काय पूर्ण झाले / अपूर्ण राहिले हे आठवड्याच्या शेवटी लिहून काढा. (प्लॅन आणि कम्प्लिशन मॅप करणे )
२) ४ आठवडे झाले कि फक्त प्लॅन तुम्ही लिहा आणि कम्प्लिशन मुलांना लिहायला सांगा. (भले ते रोजचा रोज लिहूदेत )
३) अजून ४ आठवडे तुम्ही प्लॅन लिहताना कसे लिहत आहेत ते त्यांना समजून सांगून लिहा, जेणेकरून त्यांना त्या पुढचा प्लॅन स्वतः लिहता येईल.
४) जेंव्हा मुले हा विचार करू लागतील कि मला आता काय अभ्यास करायचा आहे आणि तो ते लिहू लागतील , तेंव्हा तुमचे शिकवायचे काम कमी होत जाईल.
५) नन्तर तुमचे काम फक्त सुपरवायझर चे राहील. मुले आपला प्लॅन आपण लिहितील , आणि त्याप्रमाणे स्वतःचे स्वतः टार्गेट कम्प्लिट करतील. याला कुणाला ६ महिने लागतील कुणाला वर्ष लागेल. पण नंतर त्यांना सांगावे लागणार नाही. फक्त शंका समाधान करणे एवढेच काम शिल्लक राहील.
उदाहरणासाठी खाली २ फोटो जोडतोय, अगदी ताजे मागच्या आठवड्यातले.

WhatsApp Image 2024-09-22 at 8.31.39 PM.jpeg

प्लॅन
WhatsApp Image 2024-09-28 at 8.10.14 PM.jpeg

आठवड्याचा रिपोर्ट

Weekly Report 23-09-24 to 27-09-24 (A).pdf (663.67 KB)

वाचनाची सवय लावायची असेल तर, एकदम साधे /सिम्पल गोष्टींचे पुस्तक आणा. त्यातील फक्त ३ पाने वाचून यायला सांगा. त्यावर दुसऱ्या दिवशी चर्चा करा, चर्चा म्हणजे त्यांना बोलते करणे. त्यातला सारांश त्यांना सांगता आला पाहिजे ( जशी आपण एखाद्या चित्रपटाची कथा आपण बघून आल्यावर सांगतो तशी. ) थोडे दिवस झाल्यावर त्यांना सारांश व्यवस्थित सांगता येईल ( वाचतानाच हे लोक सारांश मॅडमला काय सांगायचा हे लक्षात ठेवायला सुरवात करतील.) मग हळूहळू त्यांना तो सारांश लिहायला सांगायचा. त्यांच्या शब्दात. एखादा महिना झाला कि ३ पानात एक पान वाढवत न्यायचं. परत एक महिन्यांनी अजून एक पान. हे तिन्ही भाषेसाठी करायचं.

निपा, उत्तम पोस्ट. आणि हो तुमचे हस्ताक्षर पण सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे अथ पासून इतिपर्यंत तेच वळण आहे (यालाच एकटाकी म्हणतात ना?)

तुमचे संधींच्या उपलब्धीबद्दलचे मत पटले. पण आजच्या पालकांनी पण त्या संधी समजून घेतल्या पाहिजेत. सोशल मिडिआ इन्फ्लूएन्सर, फूड ब्लॉगर अशा सारखे जॉब्सही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात हे आजच्या मुलांना माहित असते पण त्यांच्या पालकांना ते पटवून घेणे जड जाते.

तुमचे हस्ताक्षर पण सुंदर आहे >>> नाही हो नाही , पहिले ३ पेजेस आहेत ते माझे अक्षर , बाकी वरचे रिपोर्ट आहेत ते जे तयारी करून घेत आहेत त्यांचे आहेत.

निपा, मस्त पोस्ट आहेत.
प्लॅन करणे आणि तो लिहुन ठेवणे हे मला पण फार आवडले आहे. मुलं शाळेतून आल्यावर त्यांनी थोडा ( अर्धा तास, लय मागणं नाही) अभ्यास करावा असं मला वाटतं. शाळेत इथे काही अभ्यास देत नाहीत. बरेचदा ती घायकुतीला आलेली असतात, मग मी काही मजेचं इन्वेंट करुन ते होई पर्यंत कसोटी लागते. त्यापेक्षा ढोबळ प्लॅन तयार असेल आणि तो त्यांना ही माहित असेल तर एक्सपेक्टेशन सेट झाल्याने बाबा मुद्दाम जास्त अभ्यास करुन घेतो, त्याला कमी आणि मला जास्त का?, या सारख्या अतीमहत्त्वाच्या मुद्द्यांवरची रोजची चर्चा थांबण्याची शक्यता निर्माण होईल.
शिवाय हे करायचं आहे माहित असलं की त्यावेळी मी कामात असेन तरी कदाचित पोरंच आपलं आपलं जे जमेल ते करुन टाकतील अशी आशा ठेवायला ही जागा आहे.
वरचे स्कॅन्ड पेपरही छान आहेत. तुमच्या सगळ्याच पोस्टशी सहमत आहे.

भाषे बद्दल फक्त एकच गोष्ट करायची. आपण मुलांना रोज अर्धा/ एक तास पुस्तक वाचुन दाखवायचं. कधी आपल्या आवडीचं, कधी त्यांच्या. जाडजुड पुस्तकांची सिरीज वगैरे सापडली तर काही महिन्यांची निश्चिंती होते. गोष्टीची मजा घेणे हा भर. उगा सगळ्या शब्दांचे अर्थ वगैरे विचारुन चोथा चाखायचा नाही. त्यांनी विचारलं, आपल्याला काही सांगावसं वाटलं तर थांबायला हरकत नाही. १३ वर्षाच्या मुलगा त्याने हजार वेळा वाचलेलं पुस्तक जेव्हा मला परत वाचयला सांगतो, आणि तू बारक्याला वाचुन दाखवतोस आज मला दाखव सांगतो तेव्हा माझा आनंद गगनात मावत नसतो. Happy

>>१३ वर्षाच्या मुलगा त्याने हजार वेळा वाचलेलं पुस्तक जेव्हा मला परत वाचयला सांगतो, आणि तू बारक्याला वाचुन दाखवतोस आज मला दाखव सांगतो तेव्हा माझा आनंद गगनात मावत नसतो.>> है शाब्बास!

निपा,
प्लॅन करणे आणि त्यात मुलांचा सहभाग हे फार आवडले. भाची नुकतीच १० वर्षांची झाली. तिच्यासाठी हे उपयोगी ठरेल.

धन्यवाद लोक्स _/\_ , इथले सगळे प्रतिसाद एकत्र करून नवीन धाग्यात नेत आहे.

भाषे बद्दल फक्त एकच गोष्ट करायची. आपण मुलांना रोज अर्धा/ एक तास पुस्तक वाचुन दाखवायचं. >>>> +१००

शेवटी त्याच्या हातात एक नवीन पुस्तक देऊन , हे वाचून मला त्यात काय सांगितलं आहे ते सांग या स्टेशन ला गाडी आली पाहिजे. Happy

इन्फ्लूएन्सर, फूड ब्लॉगर अशा सारखे जॉब्सही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात हे आजच्या मुलांना माहित असते पण त्यांच्या पालकांना ते पटवून घेणे जड जाते.>>> त्याला पण एक कारण आहे. तुम्ही लिहलेल्या गोष्टींमधून येणारे उत्पन्न हे तात्कालिक आहे, आणि पालकांच्या विचार करण्याची पद्धत जुनी आहे. युट्युबर हे प्रोफेशन पैसे मिळवण्यासाठी अजून किती चालेल हे कोणाला माहित नाही , यातील लोक नव्या सिस्टिम ला अपडेट झाले तर ठीक नाहीतर ते खूपच अडचणीत येतील / उत्पन्न शून्य पण होऊ शकेल. हल्ली जुन्या धोपटमार्गाच्या प्रोफेशन ला पण हे लागू आहे , पण त्यात उत्पन्न शून्य व्हायची शक्यता कमी आहे. पालक कदाचित त्यामुळे चिंतेत असतील. ( असे मला वाटते, बाकी नवी पिढी आपल्या विचार करायच्या क्षमतेच्या पण पुढे आहे.)

आपल्याकडे अद्यापही उत्पन्न हे कायमस्वरुपी असावं ही अपेक्षा आहे. पण मुलांना आता जेवढे हवे तितकेच कमवा आणि ते ठरवलेल्या गोष्टींवर खर्च करुन झाले की परत कमवायला लागा ह्या प्रकाराचे आकर्षण वाटायला लागले आहे. जशे ट्रेंड्स येतील तसे जॉब्स निर्माण होतील. आपल्याकडची लोकसंख्या कदाचित एक अडथळा होऊ शकतो अशा पद्धतीत.

माझे दोन पैसे: तात्कालिक इ.आहेच पण त्याकडे पोर्टेबल स्किल म्हणून केलं तर ठीक. ते वाटतं तितकं सोपं ही नाही, दीर्घकाळ करायचं असेल तर त्यात खूप श्रम आहेत. आणि मग त्यात बरेच स्किल मिळतील. त्यात अशाश्वतता फार आहे, त्यामुळे त्याकडे स्किल म्हणून बघून कोणी केलं तर चांगलं. ते गोल म्हणून करू नये. बट अगेन आयेम मिलेनियल.

छान चर्चा चालू आहे.
शाळेतले शिक्षण आणि कमाई हे एकमेकात मिक्स करू नये असे वाटते. मूल अभ्यासात हुशार आणि वेल अबोव एवरेज असेल तर गोष्ट वेगळी. पण इतर सर्वांनी मुलातील वेगळे स्किलसेट ओळखणे, ते चाचपणे, त्याला प्रोत्साहन देणे हे कायम करत राहायला हवे. त्यातही मुलाची आवड काय आहे हे सर्वात महत्त्वाचे. एखाद्या अभ्यासात एवरेज मुलात ते तसे काही आढळले नाही तरच त्याला अभ्यासात झोकून देण्याचा विचार करावा. अन्यथा शिक्षणावर इतका वेळ पैसा खर्च केल्यावर आयुष्यात पुढे जाऊन त्या मुलांना काही वेगळे करावेसे वाटले तर त्यांची ती हिंमत सुद्धा होणार नाही.

छान चर्चा चालू आहे.
शाळेतले शिक्षण आणि कमाई हे एकमेकात मिक्स करू नये असे वाटते. मूल अभ्यासात हुशार आणि वेल अबोव एवरेज असेल तर गोष्ट वेगळी. पण इतर सर्वांनी मुलातील वेगळे स्किलसेट ओळखणे, ते चाचपणे, त्याला प्रोत्साहन देणे हे कायम करत राहायला हवे. त्यातही मुलाची आवड काय आहे हे सर्वात महत्त्वाचे. एखाद्या अभ्यासात एवरेज मुलात ते तसे काही आढळले नाही तरच त्याला अभ्यासात झोकून देण्याचा विचार करावा असे वाटते. अन्यथा ठराविक शिक्षणावर इतका वेळ पैसा खर्च केल्यावर आयुष्यात पुढे जाऊन त्या मुलांना काही वेगळे करावेसे वाटले तर त्यांची ती हिंमत सुद्धा होणार नाही.

शाळेतले शिक्षण आणि कमाई हे एकमेकात मिक्स करू नये असे वाटते>>>>>

शाळेतले शिक्षण सुरु झाले ते कमाई करण्यासाठीच. या शिक्षणपद्तीने तेव्हाची प्रचलीत गुरुकुल पद्धत मोडीत काढली ज्यात मुल्यशिक्षणही दिले जात असे. दिवसेदिवस कमाईचे आकर्षण वाढत गेले आणि त्यामुळे त्या प्रकारचे शिक्षणही उपलब्ध होत गेले. मुल्य शिक्षणाची मागणी घसरत गेली, त्याचे परिणाम आज दिसताहेत. शक्य असेल तर तुमच्या मुलांवर प्रयोग करुन पाहा. फक्त १० वीत गेल्यावर अचानक ट्रॅक बदलु नका. खुप पालक असे करतात. त्यानण्तर मुलाचा सगळ्यातलाच इन्टरेस्ट संपतो.

शाळेतले शिक्षण आणि कमाई हे एकमेकात मिक्स करू नये असे वाटते> ह्या २ गोष्टींचा परस्पर संबध गहिरा आहे. त्या मिक्स होणं सहाजिक आहे.. आवडीनुसार प्रोफेशन निवडायची मुभा मुलाला असायला (च) हवी असं मला वाटतं.

फक्त १० वीत गेल्यावर अचानक ट्रॅक बदलु नका.
>>>>>>

मी मागेही एका धाग्यावर लिहिले होते,
1) दहावी, बारावी, फायनल इयर वगैरे महत्त्वाचे वर्ष म्हणून मुलांवरील प्रेशर वाढवणे मला पटत नाही. आपण दर वर्षी जे शिकतो ते आपले ज्ञान वाढवायला इक्वली महत्त्वाचे असते.
2) परीक्षा जवळ येताच अचानक लाईफ स्टाईल चेंज करा. खेळायला जायचे कमी करा, आपल्या आवडीनुसार जे इतर क्लास लावले असतील ते बंद करा, पिक्चर बघणे बंद करा, आजारी पडलो तर या भीतीने एखादी आईसक्रीम खाणेही काही दिवस थांबवा.. वगैरे कुठलेही बदल मला व्यक्तीशा पटत नाही. आमच्याकडे तरी निदान ते फॉलो होत नाही. भले अभ्यास झाला नसला तरी सोडले आहे पोरांना त्यांच्या रूटीन नुसार खेळायला. हे बोलून की जर अभ्यास झाला नसेल तर तो आधीच करायला हवा होता ही आपली चूक झाली आहे. पुढच्यावेळी सुधारूया.

परीक्षा चालू असताना, मुलांसोबत खेळणे, फिरणे, आईसक्रीम खानेच नाही तर पावसात भिजणे ते अगदी मातीच्या चिखलात लोळणे या सर्वांचे फोटो व्हिडिओ आहेत माझ्याकडे पण मी हे कोणाला सजेस्ट करणार नाही. कारण हे चुकीचे सुद्धा असू शकेल. किंवा यात काही सुधारणेची गरज असेल. फक्त विषय निघाला आहे तर एक मत एक दृष्टीकोन मांडला आहे. आणि तसेही प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते.

तुम्ही लिहलेल्या गोष्टींमधून येणारे उत्पन्न हे तात्कालिक आहे, आणि पालकांच्या विचार करण्याची पद्धत जुनी आहे. >>> तात्कालिकतेचे कारण तितकेसे खरे नाही. यातल्या बहुतेक मुलांचे पालक संगणक क्षेत्रातले आहेत आणि झपाट्याने होणारे बदल संगणक क्षेत्राइतके दुसार्‍या कुठल्या क्षेत्राने क्वचीतच अनुभवले असतील. इथे आज चलतीत असलेली टेक्नोलॉजी पुढच्या वर्षी रसातळाला गेलेली असते. त्यामुळे त्या पालकांना तात्कालिकतेची पूर्ण जाणीव आहे.

विचार करण्याची जुनी पद्धत हे बर्‍याच अंशी खरे कारण आहे - पण तसे पीढ्यांतर कायमच असणार.

पण पालकांचा मुद्दा हा असतो की ज्या शिक्षणाकरता तुम्ही आणि आम्हीही इतकी मेहनत घेतली ते सोडून तुम्ही हा अगदी भीन्न मार्ग का निवडता आहात? आणि मुलांचा मुद्दा असतो की हे काम आम्हाला आवडते आणि यात पैसाही चांगला आहे तर आम्ही ते का करू नये? दोन्ही पक्ष आपापल्या जागी बरोबरच आहेत.

मग प्रॉब्लेम कुठे आहे? माझ्या मते आजच्या शिक्षणपद्धतीत. आजची शिक्षणपद्धती मुलांचा कल ओळखत नाही आणि पालकांनी जरी तो ओळखला तरी त्या गुणांकरता लागणारे शिक्षण आज फारसे उपलब्ध नाही - असे शिक्षण ज्यांनी त्या गुणांचा विकास होईल आणि त्या क्षेत्रात अर्थार्जन कसे करायचे याचेही शिक्षण मुलांना मिळेल.

शाळेतले शिक्षण आणि कमाई हे एकमेकात मिक्स करू नये असे वाटते. >>> हे अशक्य आहे. माणूसच नाही तर प्रत्येक सजीवात नवीन जन्माला आलेला जीव शिक्षण घेतो ते जगात टिकून राहण्याकरता आणि उदरनिर्वाहाकरताच. सभ्य आणि सर्वसाधारण माणसांत उदरभरणाकरता कमाई आवश्यक असते इतकेच. वयाच्या २०-२१ व्या वर्षी (हे आधीच खूप जास्त वय आहे इतर प्राण्यांच्या तुलनेत) स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग?

माधव पोस्ट आवडली.
>> यातल्या बहुतेक मुलांचे पालक संगणक क्षेत्रातले आहेत आणि झपाट्याने होणारे बदल संगणक क्षेत्राइतके दुसार्‍या कुठल्या क्षेत्राने क्वचीतच अनुभवले असतील. >> हे खरे आहे माधव, पण या पालकांना आणि त्यांच्या प्रभावाने आपल्या पिढीतल्या आणि कदाचित जेन झी सुद्धा मायोपिक मुलांना 'हे हे' शिकलो त्याचा काय उपयोग झाला असं म्हणून खाल्लेल्या ताटात xxxx सवय आहे. मराठी शिकलो, इतिहास शिकलो, संस्कृत शिकलो, कविता शिकलो, शरीरशास्त्र शिकलो, त्रिकोणमिती शिकलो, जगाचा भूगोल शिकलो, जागतिक महायुद्धे शिकलो, लिमिट्स, पॉलिनॉमिअल, मेट्रिक्स .... हे कितीही ताणतात आणि म्हणतात याचा काय उपयोग झाला? कसा विचार करायचा, तार्किक मुद्दे कसे मांडायचे, तर्कशुद्ध विचार कसा करायचा, प्रश्न कसे सोडवायचे ही सगळी 'स्किल्स' तुम्हाला शिकवत होते. जी स्किल्स पोर्टेबल आहेत. कुतुहल शिकवत होते, जगाचं भान शिकवत होते, हे जग कसं चालतं शिकवत होते, मानवी भाव भावना शिकवत होते, एखादी गोष्ट कंटाळवाणी असेल तरी ती करत रहाण्यात पर्झव्हिअरंस, सातत्य शिकवत होते. तुम्ही काही शिकलाच नाहीत. बरं तेव्हा नाही आता घोडे झाल्यावर ही 'तेव्हा शिक्षक चांगले न्हवते' आणि 'शिक्षणपद्धती गुरुकुल न्हवती' आणि 'इंग्रजांनी घोळ घातला' असले खडे फोडायचे. अरे मडक्यात अक्कल नावाची चीज भरायला तुम्ही काही करणार आहात का नाही?

संगणक श्रेत्रात झपाट्याने बदल होतात असं म्हणतात खरं. मी याच क्षेत्रात १५-२० वर्षे तरी आहे. पण काहीच बदललेले नाही. अजुनही प्रॉब्लेम सॉल्विंग, लॉजिकल थिंकिंग, डिबगिंग, कोडिंग, बग फिक्सिंग हे... जे पहिल्या जॉब मध्ये करत होतो तेच करतो. भाषा बदलली असेल, इंटरफेस बदलले असतील, प्रोसेसर बदलले असतील पण माझं शाळेत शिकवलेलं आणि नंतर कष्टाने आत्मसात केलेलं स्किल्स हे' प्रॉब्लेम सॉल्विंग' होतं. शाळेत शिकलेले इंटिग्रेशन आणि मॅक्सवेलची समिकरणं प्रत्यक्ष वापरली नाहीत तरी ती शिकल्याने मला खूप फायदा झाला. शाळेतल्या शिक्षणाचा आणि कमाईचा संबंध असतोच. तो नाही हे अ‍ॅबसर्ड आहे.

सध्याची परिस्थिती बघता शिक्षण व कमाईचा संबंध आहेच.

मला वाटते की ती चुकीची आहे. पण मी ती बदलू शकत नाही. जर मुलामधे कला, क्रिडा, व्यवसाय क्षेत्रात काहीतरी करायची ईच्छा व कुवत असेल तर शालेय शिक्षण फार काही फायद्याचे नाही. पण माझ्यासारखे काही असतात त्यांना कशातच विशेष गती नसते, त्यांच्यासारख्यांसाठी शिक्षण व नोकरी हा एक सन्माननीय आयुष्य जगण्याचा चांगला मार्ग आहे.

शालेय शिक्षणाचा मुळ फायदा आपल्याला माहीतच नसलेल्या विषयांची तोंडओळख करून घेणे, मग आपल्याला त्यातला एखादा विषय आवडल्यास त्यात झोकून देणे किंवा मग ज्या विषयाला/शिक्षणाला मार्केट मधे डिमांड आहे ते घेणे, असा मला वाटतो.

बाकी सध्याची शाळांची अवस्था फारच बिकट आहे. मुल्य शिक्षण, सर्वांगिण विकास वगैरे फक्त शो पुरते आहे. ते आपणच
करून घ्यायचे.

परीक्षा जवळ येताच अचानक लाईफ स्टाईल चेंज करा. खेळायला जायचे कमी करा, आपल्या आवडीनुसार जे इतर क्लास लावले असतील ते बंद करा, पिक्चर बघणे बंद करा, आजारी पडलो तर या भीतीने एखादी आईसक्रीम खाणेही काही दिवस थांबवा.. >>>>+१

यात फक्त मी त्यांना ice cream वगैरे पासून लांब ठेवतो. मोठ्या मुलाचे दोन वेळा पेपर बुडाले आहेत. परिक्षेच्या ऐनवेळी अभ्यास करायला बसवणे मलापण पटत नाही.

प्रिय पालक Exam सुरू होत असून त्या दृष्टिकोणातून मुलाच्या अभ्यासाची नियोजनबद्ध मांडणी करून एक proper प्लॅन तयार करून घ्या. कारण आपल्या मुलांची क्षमता,अभ्यासाची पद्धत, अभ्यासाची वेळ ,खेळण्याची वेळ, अभ्यास करून घेण्यासाठी द्यावे लागणारे प्रोत्साहन याचे ज्ञान फक्त आईलाच असते. मुलांच्या डोक्यावर Exam ओझे टाकू नका, तसेच सारखे सारखे त्यांना Exam च्या नावाखाली टॉर्चर पण करू नका. अभ्यास सहज , प्रेमाने अभ्यासाचे महत्व समजून देत करून घ्यायचा असतो. फक्त ज्ञानार्जन करतांना आळस करून चालणार नाही. अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतः धनम्। अधनस्य कुतो मित्रम्, अमित्रस्य कुतः सुखम् ॥ बाकी तुम्ही सुज्ञ आहात. 1)अभ्यासाची मांडणी करून घेण्याची पद्धत ही सोप्या कडून अवघड अशी असावी. 2)जे मुलांना येत नाही अवघड जात असेल त्यावर उगीच अती भर देत जे येते त्याकडे दुर्लक्ष करू नका ( येत नाही ते कळवा किंवा त्यासाठी ठराविक वेळ reserve करा) 3) मुलांना appreciate करत सराव करून घ्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवा 4) घरातील वातावरण प्रसन्न व अभ्यासासाठी पोषक ठेवा 5) mob TV पासून मुलांना तसेच स्वतः सुद्धा दूर ठेवा म्हणजे सर्व साध्य होईल. Best luck for Semester 1
(ओम च्या शाळेतून आलाय हा msg, गृप वर )

किल्ली, त्या मेसेजमधले बहुतेक मुद्दे पटले. फक्त हे सगळं आईलाच येतं म्हणत तिच्या गळ्यात घातलंय ते खटकलं.

निवांत पाटील, तुमच्या पोस्ट्स आवडल्या.

मुलांच्या अभ्यास पद्धती वरून मला अजून १ प्रश्न पडला आहे. एखादे मुल परीक्षेच्या वेळेस ताण येउन तो ताण रिलिज करण्या साठी आदळआपट करत असेल, घरच्यांवर राग काढत असेल तर काय करावे? अभ्यास स्वतःहून केला जातोय, बाकी त्रास नाही पण खाणे पिणे आवडीचे(अनहेलदी) च हवे, टीव्ही आवाज मोठा करणे, उलट बोलणे, न ऐकणे हा ट्रेंड - पॅटर्न परीक्षा काळातच निरीक्षणात आलाय.
युट्युब चे रील बघून मुलांची फोकस क्षमता (?)/ धैर्य कमी होत चालले आहे का? १५-२० सेकंदांचे रील्स असतात, लगेच स्विच फोकस टू अदर..

युट्युब चे रील बघून मुलांची फोकस क्षमता (?)/ धैर्य कमी होत चालले आहे का? १५-२० सेकंदांचे रील्स असतात, लगेच स्विच फोकस टू अदर..>>>>>

माझा गेलाय फोकस, मुलांचे काय घेऊन बसलात..

वरदाचा माळरानी तृणाचा लेख वाचायचा आहे पण इतका लांब लेख बघुन सतत पुढे ढकलला जातोय.. विषय माझा लाडका आहे तरी वाचु शकत नाही…. मुलांचे काय होणार..

<>>>>>युट्युब चे रील बघून मुलांची फोकस क्षमता (?)/ धैर्य कमी होत चालले आहे का? १५-२० सेकंदांचे रील्स असतात, लगेच स्विच फोकस टू अदर..>>>>

हे माझे पण होत आहे. आता लक्षात आल्यावर त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करते आहे. शॉर्ट्स, रिल्स बघणे शक्यतो टाळते. त्या ऐवजी जास्त लांबीच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स/ मुलाखती असे बघते. दिवसांत जास्तीत जास्त १.५ तास.

प्रिय पालक असे म्हणत सुरु केलेले निवेदन दुसर्‍याच वाक्यातफक्त आईलाच आलेले बघून धन्य झाले. परीक्षेचा ताण देवू नका म्हणताना इतक्या लहान मुलांसाठी परीक्षा ठेवण्याची गरजच काय? प्रत्येक मुलाला काय कितपत जमतय, कुठे कमतरता आहे हे वर्गातल्या आणि घरी दिलेल्या सरावाच्या पेपर्स वरुन कळते की!

आशू२९,
स्ट्रेस आहे तर अनहेल्दी खाणे होणार. आता या सेमिस्टरची परीक्षा पार पडू दे. मात्र नंतर सावकाशीने बसुन ताण येतोय तर तो का आहे, अस्थानी तर नाही ना या बद्दल बोलावे. मुळातच ताण कमी व्हावा म्हणून काय करणे शक्य आहे ते बघावे. डीप ब्रिदिंग करुन मन शांत करायला शिकवावे. परीक्षेच्या काळात ताणापोटी जे कळत-नकळत चुकीचे वर्तन होते त्या बद्दल बोलून त्यातून फार काही साध्य होत नाही हे समजावून सांगावे. परीक्षेच्या काळात काय केल्यास ताण कमी राहील याबद्दल विचार करणे, चर्चा होवू दे. काय वर्क होईल ते मुलांनाच अजमावून बघू द्यावे. बरेचदा मुलं स्वतःच स्वतःला धारेवर धरतात तसे होत नाही ना हे बघावे.

धन्यवाद स्वाती२, आचरणात आणायचा प्रयत्न करू Happy
हे खूप महत्वाचे आहे.. माझ्या मते, अभ्यासाहून महत्वाचे चांगले आचरण आहे.

मनिम्याऊ माझं पण तसंच होत होतं..आता जेवताना सोबत नसेल तर रील ऐवजी अर्ध्या तासाचे साराभाई एपिसोड्स बघते..सध्या क्राईम वॉच सिरीज पण कमी केलेय बघणे जरा.. नकळत मनावर ताण & नैराश्यं येते..

Pages