मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निपा तुमच्या लेकाचे आणि तुमचे अभिनंदन.
तुमच्या या प्रवासाबद्दल नक्की लिहा. होमस्कुलिंग वरून शाळेत कधी शिफ्ट झालात, त्यात काही अडचणी आल्या का हे ही लिहा. ( मला आठवतेय त्याप्रमाणे तुम्ही होम स्कुलिंग केले होते ना मुलाचे?)

माझी मुलगी आता 10 वर्षाची आहे, तिला सायन्स अँड इंग्लिश आवडते, पण गणित फार आवडत नाही.

गेले दोन वर्षे घरातूनच शाळा सुरू आहे, त्यामुळे की काय माहित नाही पण ती अभ्यासलाच नवे तर सगळ्याच गोष्टींची टाळाटाळ करते, सकाळी तिला जर उठवले नाही तर दहा -साडे दहा पर्यंत लोळत पडते, परत दात घास ग, दूध पी ग करत मागे लागावे लागते. कशीबशी शाळेला बसते, त्यातही लिहून न घेणे, वह्या पूर्ण न करणे, शाळा सुरू असताना दुसऱ्या टॅब मध्ये इतर फालतू काहीतरी सर्च करत राहणे असे उदयोग करते.

ऑनलाइन शाळेचे दुष्परिणाम आहेत हे. शाळा घरूनच असल्याने बहुतांशी मुलं सुट्ट्या चालू असल्याप्रमाणे वागत आहेत. शक्यतो घरातल्या सगळ्यांचे कामाच्या दिवसांचे एक फिक्स वेळापत्रक असणे, मोठया माणसांनी पण सुट्ट्या असल्याप्रमाणे न वागणे, मुलांना घरी असल्याने खूप रिकामा वेळ मिळतोय तो जाण्यासाठी त्यांना बिझी ठेवणे इ गोष्टी त्यातल्या त्यात उपयोगी ठरतात. हे आमच्या घराच्या अनुभवावरून सांगतेय.

माझा मुलगा ऑनलाइन शाळा सुरू असताना एक शब्द लिहीत नाही. नुसता स्क्रीन कडे बघून ऐकत रहातो किंवा back ground ला गाणी लावून ऐकत बसतो किंवा बऱ्याचदा बॅकग्राऊंड मध्ये discord car चॅटिंग करतो. 13 वर्षाचा आहे तो. होमवर्क असतोच. तो मात्र शक्यतो पूर्ण करतो. कधी कधी शॉर्ट कट करतो ( म्हणजे १५ पैकी don- चार प्रश्न सोडवून सबमिट करतो. त्याला माहिती आहे की हे तपासले जाणार नाही).
आम्हाला आधी त्रास झाला त्याला असे वागताना बघून. मग आठवलं, शाळा असायची तेंव्हा ही तो वर्गात गप्पा मारतो, लिहीत नाही, वह्या पूर्ण नसतात या तक्रारी होत्याच शिक्षकांच्या. फक्त ते आमच्या नजरेआड व्हायचे.

आम्ही केलेले उपाय - तो शाळेत असताना आम्ही टाईम पास करत नाही. कितीही रिकामा वेळ असला तरी. त्याच्या कॉम्प्युटर वर नॉर्टन ३६० आहे. School time मध्ये कोणत्याही इतर वेबसाईट चालत नाहीत. दिवसातल्या इतर वेळी करण्यासाठी त्याला छोटे छोटे टास्क द्यायचा प्रयत्न करतो. तो बिझी असेल तर फोन वर reals बघणे, YouTube videos बघणे करत नाही. व्हिडिओ गेम खेळायला रोज वेळ देतो अर्धा एक तास ऑनलाइन मित्रांबरोबर. आठवड्यातून b१-२ वेळा त्यांचे फन झूम calls असतात. थोडा फरक पडतो या सगळ्यांमुळे.

हो हे सगळी मुलं करत आहेत.टीचर दुसऱ्या मुलांना प्रश्न विचारत असताना दुसऱ्या बाजूला गुगल गेम्स खेळणे, गाणी ऐकणे वगैरे.
मोठी मुलं लेक्चर गुगल मीट वर चालू असेल तर समांतर झूम मीटिंग काढून गॉसिपिंग चाट करत असतात.(हे सर्व प्रत्यक्ष बघून माहीत आहे.)आई बाबा घरात असल्यास त्यांनी वर्गात काय चालू आहे, आपल्याला कोणी ओरडलं हे ऐकू नये म्हणून इयरफोन्स लावणे इत्यादी.आणि ही त्यातल्या त्यात सभ्य मुलं करत असलेले उद्योग. अजून कौशल्य असलेले महारथी तर विचारायलाच नको Happy
त्यामुळं आता सर्वाना आपल्या सद्सद्विवेक बुद्धी वर सोडून असं करण्याचे फायदे तोटे समजावून शांत राहणे इतकंच होतं.

फक्त त्यांचे एकंदर मल्टी टास्क करून त्याने आपला फायदा होईल ही श्रध्दा बाळगणे, एकाच वेळी इतक्या गोष्टी करणे की शेवटी आपण काय करतो हे स्वतःलाच थांबून आठवावे लागणे हे सर्व पाहून मला या चिमुकल्यांमध्ये भावी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स दिसतात(पदर नाकाला लावून गहिवरुन हुंदका)

अल्पना , अनु ,सुह्रुद --- पदर नाकाला लावून गहिवरुन हुन्दका .
घरी रोजच्या रोज वाद होतात हल्ली . गेल्या वर्श्री निदान अभ्यास नाही केला तर चित्रकला , हस्तकला काहीतरी करत होता , हल्ली तर ते ही पूर्ण करत नाही . स्वतःहून अभ्यासाला बसला तर थोड्या वेळाने गेम वगैरे काहीतरी चालू होतं .
आता टीनेजर होतोय त्यामुळे टॅन्ट्रम्स फार वाढलेत . दंडेलशाही वापरता येत नाही .
समजावून समजावून किती समजावणार असं झालयं .
मुलांची २ वर्ष वाया गेल्यासारखी वाटतायेत .

ती अगदी आमचे पेशन्स चेक करते, अगदी दहा वेळा सांगाव्या लागतात गोष्टी, दोन वर्षपूर्वी पर्यंत लेक कशाला तरी घाबरून( शिक्षक, कमी मार्क्स, नाचक्की) तरी वेळेत अभ्यास करायची, अक्षर छान काढायचइ, हिरीरीने इतर सर्व गोष्टी करायची पण आता कीती चिअर अप केले तरी ते तेवढ्या पुरतेच होते.
बोलून, समजावून , ओरडून, कधीतरी फटका देऊनही काही उपयोग नाही, उलट आता वाद घालते सतत.
काहीही खाऊ द्या, सतत किरकिर असते. एक पोळी खायला 1 तास लावते. कोणताही पदार्थ केला तरी नाराजीच.
मस्त वेळापत्रक करते, सगळे छान लिहून काढते, पन कधीच पाळत नाही. अभ्यासाची नाहीच पण हल्ली गोष्टीचीही पुस्तके वाचत नाही. व्यायाम नको, अभ्यास नको, खाऊ नको, अंघोळ नको. असे सगळे चालू असते.

आमच्या घरी याचंच जरा सौम्य व्हर्जन चालू आहे. वय आठ चालू, दुसरीत आहे. इअर फोन मी देत नाही. मोठा स्पीकर मोबाईलशी जोडून देते. मी किचनमध्ये असले तरी साधारण काय शिकवतायत ते समजतं. होमवर्क मी घेते. फोटो येतात गृपवर.

पण सकाळी उठणं, दात घासणं, व्यायाम, आंघोळ-वेणी-आवरून घेणं, ब्रेकफास्ट वेळेवर करणं म्हणजे रणांगण. आता सोमवारी पाठवणार आहे शाळेत, बघू. म्हणजे तिची आणि आमची इच्छा आहे. शाळा १५ डिसेंबर ला सुरू झाली. हिला खूप सर्दी खोकला होता म्हणून पाठवलं नाही. आता ओमिक्रॉन पार्श्र्वभूमीवर काय होईल माहिती नाही.

मला वाटलं माझ्याच घरात आहे कथा , माझाही मुलगा सहावीत आहे पण सिरियसनेस नाही अजीबात घाबरत तर अजीबात नाही,उलट उत्तर देणं सुरू आहे काय करावं आपणं पालक म्हणून कमी पडतोय असं वाटायला लागलंय

आता मी नवीन पर्याय शोधला आहे. एका कोर्सला मी रजिस्टर केलं आहे. फोनवर असाईनमेंट्स यायला सुरुवात झाली आहे.‌तू तुझा अभ्यास कर, शेजारी बसून मी माझ्या असाईनमेंट्स करते ही मात्रा लागू पडते आहे. उलट, "आई, आज दोन पेजेस तरी पूर्ण करायचीच. त्याशिवाय मोबाईल नाही. आणि मी पण बसते आणि होमवर्क पूर्ण करते. मग दोघी मिळून गप्पा मारू (किंवा इतर काही) " असं झालंय Proud

एक प्रश्न - ओनलाईन शिक्षणात अभ्यास - नंतर स्वत: करायचा देतात का? (पूर्वीचा गृहपाठ/होमवर्क ) त्यात किती वेळ जातो?

आमच्याकडे धाकटा 2 वर्षाचा, पूर्ण वेळ नोकरी, 3 वयस्कर लोक, नवरा यांनी मला ग्रासून टाकले आहे.
तिला पुरेसा वेळ देता येत नाही याचे गिल्ट तर आहेच पण हुशार मुलगी वाया चालली आहे, हे पण येते आहे.
युट्युब वर इतके फडतूस व्हिडीओ बघते आणि त्याची बोलण्याची नक्कल घरी करते, ओह बॉय, जीजस, इतर टिपिकल शब्द ऐकले की आज्जी आबा यांना किल्ली बसते हे तिला कळलंय आता ती अजूनच जास्त करते.
बाबा ज्यावेळा घरून काम करतो तेंव्हा माझ्यासोबत अभ्यास कर, हे म्हणतो पण ती एक ओळ सुद्धा सलग लिहीत नाही, त्यामुळे नवऱ्याचेही काम होत नाही.
हॅरी पॉटर चे पहिली दोन पुस्तके तिला मागच्या वर्षी दिली होती, ती अगणित वेला वाचून झाली पण त्याचे सार लक्षात घेत नाही. फक्त भाषा लक्षात येते.
अभ्यास झाला का असे विचारले तर चक्क थापा मारते, वही चेक केली की अर्धवट असते, काही झालेलं असते, कधी काहीच झालेले नसते.

Srd - अभ्यास खरेतर 30 ते 40 मिनिटे इतकाच असतो पण ती त्याला बसायलाच 2 तास लावते मग सुरू करते. आणि तोवर, जेवायची, खेळायची, झोपायची वेळ होते मग परत सगळे बंद.

माझ्या मुलीला असतो होमवर्क. शिवाय शाळेत शिकवलेल्या फळ्यावर लिहिलेल्या कामाचं क्लासवर्क असतं लिहायला. सगळ्या विषयांचं असतं. लिहायला पुरेशी मुदत असते.

आमच्या मुलांच्या आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे या सगळ्यातून सुटल्यासारखं वाटत आहे.

जेव्हा ऑनलाइन शाळा होती तेव्हा मोठा मुलगा बऱ्यापैकी सिन्सिअरली करायचा. लॅपटॉपवर बघून होमवर्क करतानाही त्याची मजल फार फार तर गूगल कॅलेंडरवर काही तरी टास्क वगैरे टाकून ठेवणं एवढीच होती. पण त्याच्या वर्गातली मुलंपण हे एकीकडे हँगआऊटवर एकमेकांशी गप्पा मारणं वगैरे करायची असं तो सांगायचा. टीचर रागावल्या होत्या.

धाकटा ( इयत्ता तिसरी) मात्र महाउद्योगी. शिकवण्याकडे फारसं लक्ष नाहीच, उलट माझं लक्ष नसेल तेव्हा यूट्यूबवर काही तरी व्हिडिओ उघडणं, इअरफोन्स नसतील तर म्यूटवर ते बघणं, इअरफोन्स असतील तर काय मज्जाच..एकदोनदा त्याने अमेझॉनची साईट उघडून कुठलंसं खेळणं शोधलं होतं! व्याप झाला होता आम्हाला. कधी एकदा ऑफलाईन शाळा सुरू होते असं झालं होतं. आता निदान शाळेत जरा तरी काही डोक्यात शिरत असेल असं वाटतं.

निपा, तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन! तुमच्या या प्रवासाबद्दल वाचायला आवडेल. मुलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

गेली दोन वर्षे कोविडमुळे सगळेच विस्कळीत झाले आहे , थोडे मार्गी लागत आहे असे वाटत असताना पुन्हा व्हायरसचा नवा अवतार-अजून एक लाट हे असे किती काळ असणार आहे माहित नाही. या सगळ्याचा मुलांवरही ताण येतच असणार ना? त्या ताणापासून दूर जाण्यासाठीची पळवाट म्हणून टिवी, इंटरनेट अशा सहज उपलब्ध गोष्टींत रमणे वाढते. मुलं आव आणतात पण आतुन ती देखील घाबरलेली आहेत. शाळा जरी ऑनलाईन सुरु असल्या तरी हे ऑनलाईन शिकायचे-शिकवायचे तंत्र सर्वांनाच जमेल असे नाही. बहुतेक शिक्षकांसाठीही हा प्रकार नवा आहे, नोकरी करायची तर नाईलाजाने जमवून घेणे असे त्यांचेही झाले आहेच. अशा परीस्थितीत ऑनलाईन शिकताना कंटाळा येवून मुलांचे काहीतरी उद्योग चालतात. त्यात ज्या उपकरणाच्या मदतीने शिकणे सुरु आहे तिथेच एका क्लिकवर मनोरंजनही आहे, मोह झाला नाही तरच नवल. ऑनलाईन शिकताना इतर कुठे भरकटायचा मोह होवू नये म्हणून त्यांच्याशी बोलून, त्यांना विश्वासात घेवून वेबसाईट ब्लॉकर लावायचे. आपण हे का करणार आहोत हे स्पष्ट सांगायचे. त्याच बरोबर जालावर भटकणे, टिव्ही बघणे, मित्रांशी गप्पा-झूम कॉल यासाठी वेगळा वेळ ठरवून द्यायचा. प्रत्यक्ष शाळेत होणार्‍या मित्रांशी गप्पा, मधल्या सुट्टीत खेळणे, एकत्र डबा खात गॉसिपिंग, नुसताच एकमेकांचा सहवास वगैरे या लहान मुलांसाठी फार महत्वाचे असलेले सगळे अचानक संपून गेलेय. हेही एक प्रकारचे गमावणेच आहे आणि मुलांसाठी ते दु:खद आहे. मुलांकडून अभ्यासाची अपेक्षा करताना त्यांनी जे गमावले आहे ते समजून घेवून त्याबद्दल त्यांना बोलते केल्यास , सहानुभुती व्यक्त केल्यास फरक पडतो. आपण सगळेच कठीण परीस्थितीत आहोत, तुम्ही लकी आहात, ऑनलाईन का होईना तुम्हाला शिकता येत आहे. कितीतरी मुलांना ही देखील संधी नाही, ती मागे पडत आहेत असे सांगून समजूत काढायची. अभ्यास महत्वाचा आहेच पण आईबाबा आपल्या टीममधे आहेत हा विश्वास अधिक महत्वाचा. तो असेल तर बाकी सगळे आपोआप सोपे होते.

हो नक्कीच.
तसं मजेशीर आहे. मुलं कॉल्स, मीटिंग मध्ये प्रोफेशनल झाल्याने छान पण वाटतं.

आता 1 ली ते 8 वी ऑफलाईन शाळा बंद आहेत(आजपासून आमची चालू होणार होती.)
9 वी ते 12 वी च्या चालू आहेत.

Pages