मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमर्जन्सी च्या बाबतीत माणूस कसा वागेल हे इथं सांगता येत नाही. इथे आपण काहीही लिहू... वेळ आल्यावर काय करतो ते महत्वाचं.
याचा मुलांच्या अभ्यासाशी संबंध नाही.

तर इब्लिस,
मी अनेक मुलं पाहिली आहेत, जी फिजिकली व्हायोलंट असतात. स्पेसिफिकली आजी/आजोबांशी किंवा बेबीसिटिंग करणार्‍यांशी. लाथा मारणे, बुक्क्या मारणे, चावणे बोचकारणे इ. >>>> अशा मुलांना मारण्याचे तुम्ही समर्थन करणार ? मग उलट मारणे हे बरोबर हाच मेसेज जाणार ना त्यांना !!

सक्काळी उठून छातीवर बसून तुमचा शोन्या जेव्हा फाडफाड तोंडात मारून 'बाबा ऊऽट!' करतो, तेव्हा किती गोड अन किती कडू लागतं, ते सांगा पाहू? >>> हो कित्येक वेळ मुले भयंकर अनॉय करतातच !! तिथेच तर पेशन्स चे काम येते !! मारणे सोडून इतर उपाय असतात. प्रत्येक मुलाला वेगळे उपाय लागू पडू शकतात आणि आपल्या मुलाला काय वर्क होतंय ते शोधणे पालकांचे काम.
एकूण , मारले नाही म्हणजे ते "बबडू अशं नको कलू वाले" पालक आणि मार न खाल्लेली मुले डोक्यावर बसणार ही गृहितकं चूक आहेत.

>>न मारताही पनिश करता येतं.
अगदी!

>>जसे १० मिनिटे न बोलणे.
ही शिक्षा मात्र पटत नाही. आपण केलेल्या शिक्षेतूनही पाल्याला काहीतरी चांगलं शिकवावं या उद्देशनं पालक शिक्षा करतात. तेव्हा मुलांनी केलेली कृती आणि शिक्षा यात काहीतरी ताळमेळ असावा असं वाटतं. न बोलून कम्युनिकेशनचं मुख्य चॅनलच बंद करून टाकलं तर शिक्षेचा योग्य परिणाम कसा साधेल? आई-बाबा आपल्याशी बोलत नाहीत म्हणजे आपण चूक केली ही अपराधी भावना येऊन पुन्हा ती चूक करायला नको हे समजेल. पण हीच शिक्षा पालकांनाही पुढे मिळू शकते. जेव्हा तुम्हाला आपल्या मुलाला काय होतंय ते समजून घ्यायचंय, पण तुम्ही लहानपणी त्याला केलेल्या शिक्षेचा अबोला आता तुम्हाला सव्याज परतफेडीत मिळतोय. काय साध्य झालं?

इब्लिस, मूल व्हायलंट वागो किंवा आणखी कसं, त्याला मारणं किंवा तत्सम शिक्षा भारतीय काय जगातल्या कुठल्याही देशात समर्थनीय असू शकत नाही. पण प्रत्येकाला आपलं मत असण्याचा अधिकार आहे. तेव्हा माझं मत तुम्हाला पटवून देण्याचा अट्टहास करणार नाही.

मुलांवर अभ्यासासाठी सक्ती केल्यास परिणाम उलट होऊ शकतो. मारल्यामुळे मुलं अभ्यास करतील, या समजात राहू नये.

आपल्या मुलानं आयआयटीत जावं, या महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या पालकांनी गेले दोन महिने माझा छळ चालवलेला आहे. हा मुलगा बारावीत आहे. हुशार आहे. त्याला भौतिकशास्त्रात संशोधन करायचं आहे. आमच्या प्रयोगशाळेत हा मुलगा दहावीत आणि अकरावीत असताना यायचा. पाठांतर त्याला जमत नाही. परीक्षेत मार्क मिळत नाहीत म्हणून याचे पालक त्याला रागवत असतात. बारावीचा आणि जेईईचा अभ्यास करावा म्हणून मी त्या मुलाला मारलं तरी हरकत नाही, किंबहुना मी त्याला मारावंच म्हणजे तो अभ्यास करेल, असं मला ते सतत सांगत असतात. दिल्लीत राहणार्‍या त्यांच्या कोण्या एका बारावीतल्या भाच्यालाही त्याचे फिजिक्सचे सर होमवर्क केलं नाही की मारतात म्हणे. प्रयोगशाळेत मन लावून काम करणार्‍या, विलक्षण बुद्धिमान प्रश्न विचारणार्‍या त्या मुलाकडे बघून कायम वाईट वाटतं.

सीमा थँक्स
या विषयावर गुग़ळायचं लक्षातच नाही आलं..:)

इब्लीसचा मुद्दा इमर्र्जन्सीचा आहे का ? (माझं चुकत नसल्यास )
स्कूल ऑफ थॉट मान्य नाही असं लिहीलय कि त्यांनी.

ओह तो सॉकेट- खिळा दृष्टान्त का, पण तिथे बोलून नसेल उपयोग तर मारून तरी काय उपयोग ? मूल इमर्जन्सी सिच्युएशन मधे असेल तर तर सेफ्टीच्या दृष्टीने लागणार्‍या स्टेप्स घ्याव्या लागतील ना ! (मुलाला ओढून लांब करणे इ.) मारण्याचे समर्थन नाहीच होऊ शकत !
तसेही या केस मधे खिळा मुलाच्या हाती आला आणि ते सॉकेट प्रोटेक्टेड नव्हते ही तुमचीच चूक तेव्हा स्वतःलाच दोन वाजवा असे मी म्हणेन Happy

>>तसेही या केस मधे खिळा मुलाच्या हाती आला आणि ते सॉकेट प्रोटेक्टेड नव्हते ही तुमचीच चूक तेव्हा स्वतःलाच दोन वाजवा असे मी म्हणेन Lol

मला इब्लीस यांची दुसरी पोस्ट दिसत नव्हती...
पहिल्या पोस्टवरून इमर्जन्सी मधे पालक कसे रिअ‍ॅक्ट होतील... असं त्यांना म्हणायचं असावं असं वाटलेलं. असो.

माझी मुलगी माझ्यावर गेलीय. ती कशी वागणार याचा अंदाज मला असतो. तसंच मला कसं वाईट वाटायचं हे अजून लक्षात आहे. ते टाळतेच. पालकांच्या ( विशेष करून वडिलांच्या ) काय चुका झाल्यात ते अजून लक्षात आहे Lol
(पुन्हा एकदा याचा अभ्यासाशी संबंध नाही).

मुलीला भाषण पण आवडत नाही. ती म्हणाली माझ्या मुलांना मी असली भाषणं देणार नाही ( इयत्ता चौथी ) Lol

>>तसेही या केस मधे खिळा मुलाच्या हाती आला आणि ते सॉकेट प्रोटेक्टेड नव्हते ही तुमचीच चूक तेव्हा स्वतःलाच दोन वाजवा असे मी म्हणेन >> सहमत. अगदी इलेक्ट्रिकल सॉकेट नाही तरी मूल खिळा तोंडातही घालू शकतंच ना? तेव्हा फटका मारून उपयोग होऊ शकेल का?

अगदी इलेक्ट्रिकल सॉकेट नाही तरी मूल खिळा तोंडातही घालू शकतंच ना? तेव्हा फटका मारून उपयोग होऊ शकेल का? >>> ओक्के.

ही एक केस झाली. इमर्जन्सी सांगून येते का ? पुण्यात काही फ्लॅटसना बाल्कनीला ग्रिल नाही. अपु-या उंचीची काच लावून दिली जाते. ग्रील लावलं तर काढायला सांगतात. अनेक गोष्टी पालकांच्याही हाताबाहेर असतात. आणि बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडताना वेगात येणा-या गाड्या. मूल हाताला हिसडा देतं... पालकांनी कुठे कुठे स्वतःला मारून घ्यावं ?

(इब्लीस यांचा मुद्दा मला वाटला तसा नाही हे अलाहिदा. त्याचं स्पष्टीकरण तेच देतील ).

एक खरे सांगू का, ज्या मुलांना अभ्यासाची आवड असते मला तर पहिला त्यांचीच भिती वाटते की हि अ‍ॅबनॉर्मल तर नाहीत ना .. (हलके घ्या हं)

कालचाच किस्सा, ऑफिसमधील एक सहकारी म्हणाला, "माझा पोरगा माझ्यासारखा ईंजिनीअर नाही बनणार तर त्याला बिजनेसमध्ये घुसवावे लागणार नाहीतर राजकारणात टाकावे लागणार."

आता असे का? तर त्याच्या मुलाला अभ्यासाची जराही आवड नाही. सरळ सांगतो. मला नाही आवड आणि टिवल्याबावल्या सुरू.

यावर माझ्या सहकार्‍याची कूल प्रतिक्रिया, आता नाहीच त्याला आवड तर काय करणार, मारणार का त्याला?

सध्या तो विचार करतोय, मोठ्या शाळेचा खर्चा करण्यापेक्षा मुलाला साध्याश्याच शाळेत घालून ते पैसे साठवून त्याला बिजनेसला भांडवल मिळेल हे बघावे.

सो, कित्येक मुलांना आवड असते अभ्यासाची तर कित्येकांना नसते. काहींना आवड असते मात्र हुशारी नसल्याने कितीही अभ्यास केला तरी मार्क्स जेमतेमच. पण काही हुशारीच्या जीवावर आयुष्यात सरस बनतातच.

मॅरेथोन धावायला आता तर कुठे त्याने सुरुवात केलीय, जाऊद्या त्याला आपल्या वेगाने. फक्त योग्य ती दिशा द्यायची काळजी घ्या आणि सुस्तावणार नाही एवढेच बघा. बाकी मारणे तर सोडा, साधे त्रागा करूनही काही हशील होणार नाही.

वरील कित्येक प्रतिसाद सरस आणि त्यांच्याशी सहमत !

>>ही एक केस झाली. इमर्जन्सी सांगून येते का ? पुण्यात काही फ्लॅटसना बाल्कनीला ग्रिल नाही. अपु-या उंचीची काच लावून दिली जाते. ग्रील लावलं तर काढायला सांगतात. अनेक गोष्टी पालकांच्याही हाताबाहेर असतात. आणि बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडताना वेगात येणा-या गाड्या. मूल हाताला हिसडा देतं... पालकांनी कुठे कुठे स्वतःला मारून घ्यावं ?>> बरोबर. आपल्याला स्वतःला मारून घेऊन उपयोग नाही पण मुलांनाही मारून होईल का?

अहो जासूस, तुम्ही म्हणताय असं मी म्हणत नाहीये. मारणं वर्सेस बोलणं ह्या मुद्द्यावर चालू आहे म्हणून ते उदा. दिलं इतकंच.

Tyaacha concentration hot nasawe. Te honyasathi abhyaas jastit jast interesting kasa hoil he bagah.. ek nishchit timetable kara. Amuk welela khel.amuk welela abhyaas etc. Abhyaas wela short spans madhe divide kara- reading, understanding n then anwering verbally or writing.
Bharamsath patience thewa. Tution madh je kaam tutor karnar te tumhi nahi karu shakat ka??
gruhpath niyamit kela ki ajun kahi wegala abhyaas karawa lagnar nahi!

पण हीच शिक्षा पालकांनाही पुढे मिळू शकते. जेव्हा तुम्हाला आपल्या मुलाला काय होतंय ते समजून घ्यायचंय, पण तुम्ही लहानपणी त्याला केलेल्या शिक्षेचा अबोला आता तुम्हाला सव्याज परतफेडीत मिळतोय. >> ओके. असलं नको.. चुकलं उदाहरण. सध्या मुलाला काय पद्धतीने समजवावं याचे विविध उपाय चाललेत. अबोला टिकत नाही, आणि मला हसायला येतं फार वेळ गंभीर राहता येत नाही म्हणून नवरा-बायको मध्ये पुढचा वाद असं चालू झालंय. मोस्टली मुल पालकांचे लक्ष आकर्षित करायला चेष्टा करतं, हे आता पर्यंत लक्षात आलय.

सक्काळी उठून छातीवर बसून तुमचा शोन्या जेव्हा फाडफाड तोंडात मारून 'बाबा ऊऽट!' करतो, तेव्हा किती गोड अन किती कडू लागतं, ते सांगा पाहू? >>> हे तोंडात मारून सोडलं तर दर शनिवार-रविवार घडतं. ते कडू वाटत नाही, त्याची परतफेड सोमवार ते शुक्रवार सव्याज करतो. Proud

बेसिकलि मुलांना हे समजवुन्न देता यावं की जे काही आई बाबा सांगत आहेत त्याने आपलं चांगल होणार आहे. हे होण्यासाठी परस्परांबद्दल विश्वास हवा. आई बबा संवादात एक्वाक्यता हवी अन मुलां बरोबर मनमोकळा संवाद हवा.

सही अ‍ॅटिट्युड अमितव.
माझा एक मित्र नेहमी म्हणतो, पेशन्स, क्रिएटिविटी, अ‍ॅफेक्शन, कंट्रोल, रिस्पेक्ट आणि फन ह्या सगळ्यांचं गोड मिक्स्चरच असायला हवं आपलं मुलांप्रति वागणं म्हणजे. आपलं वागणं आपणच ताडून बघायचं, मुलं थोडीच सांगायला येणार आहेत तू ईथे चुकला आणि तिथे बरोबर होता म्हणून.

चमन आमचे चिरंजीव वय वर्षे साडेचार सांगतात.
'तुम मुझपर चिल्लायी मुझे अच्छा नही लगा. छोटे बच्चोंके साथ ऐसे नही बात करते' किंवा सरळ 'ये कोई तरिका नहीहै'
किंवा त्याच्या छोट्या बहिणीला मजेत डोळे वटारून दाखवले तर लग्गेच म्हणतो 'वो कितनी छोटी है, ऐसा मत करो, डर जायेगी'
Wink

अभ्यास करून घेताना रोज महाभारत; तिसरे-चौथे-पाचवे महायुद्ध होते, त्यामुळे मुलाला अभ्यासाची नावड 'लागून' त्याच्या मेंदूची दारेखिडक्या बंद होतात हे लक्षात आल्यावर केवळ अभ्यासासाठी मुलांना शिकवणीला पाठवल्याचे व दुसर्‍या अपत्याच्या अभ्यासाला बोटही न लावल्याचे उदाहरण पाहिले आहे. आता अभ्यासाच्या कारणावरून त्या घरातील जागतिक शांततेला तडे जात नाहीत.

@ सायो
मुलांना मारण्याबद्दल म्हणाल तर मी लिहीलय वर. त्याचं समर्थन नाही होऊ शकत. .

आपलं लहानपण आठवून मुलांशी वागणं ठेवलं तर ब-याच गोष्टी सोप्या होतात. पालकांनी केलेल्या चुका मुलांच्या मनात घर करून राहतात. अढी राहते. पुढे त्यांना मुलं झाल्यावर पालकांची भूमिका कळून येते. भारतात तर मुलं डोक्यावर बसतील फाजील लाड केले तर असं सांगणारे अनेक जण असतात. ग्रामीण भागात जास्तच.

मुलांना मारण्यापेक्षाही मुलांसमोर पालकांचं आपसातलं वागणं त्यांच्यावर परिणाम करतं. त्यांच्यात प्रेम असेल तर मुलं सुरक्षित महसूस करतात. त्यांच्यात कुरकूर, भांडणं असतील तर मुलांवर वाईट परिणाम होतो. असो.

अभ्यास घेताना पालकांनी काय करावं यावरून वळण लागलंय... पण त्यात सुरुवातीच्या पोस्ट्स वाहून गेल्या Sad

माझ्या पोस्ट्स नीट वाचल्या का? की नुसतंच' मुलांना मारहाण करावी, असं इब्लिस म्हणतोय' असं ठरवून घेतलंय स्वतःशीच?

आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं ते नाही लिहिलंत तुम्ही साती. Happy

सगळीच मुले खरोखर काहीनाकाही गिफ्ट घेऊन येतात. प्रॉडिजी जरा मोठा शब्दं झाला आणि हाय intelligence quotient असलेली बरीचशी मुले जरा वयात आल्यानंरच त्यांचे गुण दिसतात पण चांगला emotional quotient असणारी मुले, त्यांच्या वागण्या बोलण्यातून लहान वयापासूनच त्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू असतो. आणि त्यांची समज कधी कधी आपल्याला अवाक् करून सोडते.

मस्त चर्चा. माझी भाचेकंपनी माझी अतिशय लाडकी आहेत. पण त्यांच्या आयांमध्ये पेशन्स नाही. बाबा सतत फिरतीवर. त्यामुळे सतत सगळं एकटीने करून त्याही वैतागतात. मुलांसाठी आपण नोकरी न करता घरी बसलो पण यांचे गुण बघा! पूर्ण वेळ त्याच्यासाठी अवेलेबल असूनही जर अभ्यास धड करत नसतील तर काय उपयोग? असे विचित्र फ्रस्टेशन येते आणि शेवट मारण्यात होतो. मी स्वत: हे पाहिले तेव्हा सहन न होऊन नंतर कितीतरी वेळ रडू येत होतं तो प्रसंग आठवून. भयंकर. पेशन्स वाढेपर्यंत काय? चांगल्या शिक्शा कोणत्या?

मी अजूनही टीन आहे अनुभव इथे सगळ्यात ताजा असावा . Wink
माझ्यासाठी वृत्तपत्र वाचायला मिळणे / घरातल्या भिंतीवर ball खेळायला मिळणे हे मोठे incentive होते .
आणि लहानपणापासून ( म्हणजे अगदी २-३ वर्षांची असल्यापासून ) आजोबा अभ्यास करत असतील तर ते मज्जा करत आहेत असेच सांगितले गेले त्यामुळे अभ्यास हि मज्जा आहे असेच वाटत असे . ( अजुनही बर्याचदा वाटते ! )
शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ झाला की व्यायामशाळेत जायला मिळत असे . रात्री व्यवस्थित अभ्यास केला की चेसचा गेम खेळायला मिळत असे . त्या वयात तरी It worked very well !
सुदैवाने मार कधी बसलाच नाही .
आई चिडली कि कधीतरी बोलत नसे पण त्या अबोल्याच्या काळात एखादे पत्र लिहून त्यात माझे वागणे कसे चुकीचे होते ते समजावत असे . स्वतः ची लाज वाटून मग अपोआप नीट वागले जाई ! Happy

Pages