मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवांत - छान प्रतिसाद

मारुन अभ्यास कधीच घेवू नका त्यातून जो मानसिक धका बसतो त्यामुळे अभ्यास हा केवळ काहीतरी पुर्ण करायचे आहे असाच केला जातो त्यात कधीच आवड निर्माण होऊ शकणार नाही.
छ्डी वाजे छमछम आणि विद्या येई घमघम हा निव्वळ घोकमपट्टीचा भाग आहे. प्रत्यक्षात डोक्यात काही शिरेलच असे नाही.

साधारण ४ ते १० वर्षापर्येंत मुलांना अभ्यासाची गोडी थोड्या उशीरानेच लागते त्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सकारात्मक संवाद अपेक्षित असतो. या वयात मुले कविता किंवा गाणी असे सहज बडबडतात पण घोड पेंड खाते ते लिहायच्या वेळी. त्यात प्रामुख्याने तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे वेळ लागणे, हात दुखणे आणि अभ्यासाच्या
वेळी इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध असणे ही कारणे देता येतील.
मुलांच्या हातात पेन्सिल किंवा पेन बसावा यासाठी मातीची खेळणी करायला देणे , पीठाच्या वस्तू बनविणे असे काही प्रकार करावेत ( हे सर्व शाळांमध्ये होत असले तरी घरी पुन्हा पुन्हा करावे).
बहुतांशी मुलांना जो अभ्यास करायचा आहे तो येत असतो मात्र तेच तेच पुन्हा पुन्हा लिहायचा ते कंटाळा करतात.

उदा तुम्ही त्यांना १,२,३,४ लिहायला सांगितले तर ते आवडीने लिहितील पण फक्त १ हा अंक १० वेळा लिहायला सांगितला तर ते लिहणार नाहीत.

प्रथम त्यांची सायकोलॉजी समजून घ्या
त्यांना खेळणी प्रिय असतील तर खेळणी घेवून अभ्यासाला बसा तुम्हीही ती खेळणी खेळा आणि खेळता खेळता जसे आपण त्यांना घास भरवायचो तसाच अभ्यास घ्या , त्यासाठी तुम्हालाही काही काळ मूल व्हावे लागेल ते व्हा.
शक्य असल्यास त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये त्यांना बसवून अभ्यास करायला सांगा , (इट वर्क )

ज्या दिवशी पुर्ण होमवर्क केला गेला त्या दिवशी आवर्जून मुलांचे कौतूक करा.

उच्चार सुधारण्यासाठी त्याच्याच आवडीची गाणी कविता, प्रार्थना हे मोठ्याने वदवून घ्या . होम वर्क अपुर्ण असणे म्हणजे त्याला येत नाही असे मुळीच नाही जरा आवड निर्माण झाली कि होईल सुरळीत सगळे.

निवांत पाटील आणि किरण कुमार

तुमच्या दोघांच्याही पोस्ट्स आवडल्या. खरोखरच मार्गदर्शक आहेत.

४ ते १० वयोगटाच्या एकाच ठिकाणी बसण्याच्या, एकाग्रतेच्या क्षमतेचाही विचार पालकांनी करावा.

निपा, अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण प्रतिसाद आहे तुमचा.. माझ्या मुलाचे नो/अल्टरनेटिव्ह स्कुलिंग याच पायावर सुरू आहे.. त्या त्या वयाच्या टप्प्यावरच्या बौद्धिक गरजा भागवत भागवत आणि ज्या गोष्टी आम्हाला येत नाहीत त्या आम्हीही शिकत पुढे जाणे चालू आहे. त्यामुळे तुमचा प्रतिसाद अगदी मनापासून पटला.

या अनुषंगाने आणखी लिहीत रहा प्लीज. खुप महत्वाचं आणि प्रत्यक्ष करत असलेलं लिहिताय Happy

निपा पोस्ट आवडली.

लहानपणाची एक आठवण : भूगोलात पहिल्यान्दा भारतिय राज्या.न्च्या आणि नन्तर विविध देशाच्या राजधान्या पाठ करण्याची एक मोठी जबाबदारी होती . जाम गोन्धळ व्हायचा .
मग मी आणि बाबा रात्री जेवण झाल्यावर फिरायला बाहेर पडायचो.रस्त्यातून चालता चालता राजधान्यान्च्या जोड्या जुळवा चालायच . मग देवळासमोर पारावर बसायचो . उजळणी व्हायची . नन्तर झोपेतुन उठवल तरी लक्षात होत.

पुढे पुढे भूमितीची प्रमेय , रसायनशास्त्रातल पिरियोडिक टेबल बरच काही पाठ केलेल असच.

आता माझ्या लेकासोबत ही रस्त्यातून चालता चालता काहीतरी अभ्यास करायची सवय आहे .

( परवा असच , तो माझी " आफ्टर नम्बर आणि बिफोर नम्बर् "ची उजळणी घेत होता. मी चुकीची उत्तरे देत होते , तो पहिल्यान्दा सावकाशिने परत विचारायचा , समजावायचा मग परत चुकले की ओरडायचा , मज्जा येत होती)

मला मदत हवी आहे.
माझी मुलगी (७ .५ वर्श) अभ्यास कर्ते,पण ती फारच इमोशनल आहे.तिला कसे समजावे ?समजुतीच्या गोष्टी सांगायला लागलो की लगेच हिर्मुसली होउन गप्प होते आणि रडायला लागते.
कालचाच प्रसंग... रनींग रेस मधे तीचा नंबर आला नाहि म्हणुन रड्त होती.मी तिला समजावले,नंबर येणे महत्वाचे नाहि,तु प्रयत्न केलास हे महत्वाचे वगैरे वगैरे.....पण ती रडतच राहिली.
यासाठी आणखी काय करावे?

कालचाच प्रसंग... रनींग रेस मधे तीचा नंबर आला नाहि म्हणुन रड्त होती.मी तिला समजावले,नंबर येणे महत्वाचे नाहि,तु प्रयत्न केलास हे महत्वाचे वगैरे वगैरे.....पण ती रडतच राहिली.>>>>> तुमच्या मायेचा /काळजीचा आदर राखूनही मला वाटते की तो जो तिच्या disappointment चा क्षण आहे,त्यावेळी फार न बोलता तिला रडून मोकळे होऊ द्या.न बोलता स्पर्शाद्वारे तुझ्यासोबत मी आहे हा अ‍ॅश्युरन्स द्या.कालांतराने तिचं तिलाच कळत जाईल.

कुतुहल म्हणजे मुलांच्या मानसिक आणि बौद्धीक विकासाशी जूळलेली नाळ आहे. मुलांना खेळणी खेळण्यात जेवढा आनंद असतो तेवढाच त्यांना तोडण्यात सुद्धा असतो, त्या खेळण्यात नेमके काय आहे हे कळावे म्हणून या ना त्या मार्गाने मुले खेळण्याची वाट लावत असतातच.
माझा मुलगा पण अभ्यास करताना फार कंटाळा करतो. त्यामुळे अभ्यास करण्यापुर्वीच आम्ही अभ्यासानंतरचा प्लॅन फिक्स करुन ठेवतो ज्यामध्ये खेळण्यातल्या टँकरला बीळ पाडणे आणि पाईप बसविणे,ट्रकमध्ये माती भरुन वाहून नेणे, स्क्रू ड्रायव्हरने उगाच एखादी वस्तू खोलणे इ , ब-याचदा मला यातले काही येत नाही तू शिकव असे सांगून अभ्यास घ्यावा लागतो.

जयु..
रेसमधील हारसुद्धा मुले मनाला लावून घेतात अशा वेळी थोडा वेळ रडू द्याव मात्र त्यानंतर मुलांना प्रेरणा द्या, हार जीत तो चलती रहेगी , मुक्त मनाने हार स्वीकारणे हे जिंकण्यासारखेच आहे हे पटवून द्या. रेस इतरांशी नाही तर स्वतःशी करायला शिकवा.रोज बडबड करणारी मुले एखाद्या दिवशी कमी बोलली तरी त्यांना बोलते करा. संवादातून त्यांच्या मनावरचा ताण नक्कीच कमी होतो.

निवांत पाटील, किरण कुमार, सगळे प्रतिसाद आवडले.

आमच्याकडे ही असेच खूप प्रश्न विचारले जातात. स्वत:च बरेच प्रयोग करून पाहाणे सुरू असते. कोणाताही नवा शब्द ऐकण्यात आला की त्याचा अर्थ विचारला जातो, सोबत तो मला वेगवेगळ्या वाक्यात वापरून दाखवा ही पण मागणी असते. हा नवा शब्द कुठे ऐकलास इथून सुरवात केली की तो आम्हाला प्रसंग सांगतो. त्यामुळे शब्दाचा अर्थ सांगायला खूप सोपे जाते.

आई बाबांना सगळेच माहीत असते हा गैरसमज पण नाही त्यामुळे जे आम्हाला पण माहित नसते त्याची एकत्रित शोधमोहीम राबवली जाते.

रेसमधील हारसुद्धा मुले मनाला लावून घेतात अशा वेळी थोडा वेळ रडू द्याव मात्र त्यानंतर मुलांना प्रेरणा द्या, हार जीत तो चलती रहेगी , मुक्त मनाने हार स्वीकारणे हे जिंकण्यासारखेच आहे हे पटवून द्या. >>

आमचा प्रॉब्लेम :
सापशिडी खेळतानाही आई पुढे गेली की फार अपमान होतो .

असच एक्दा आमच्या दोघांच जाम भांडण झालं .
तुझी ब्लु आणि माझी ग्रीन अस अगोदरच ठरलेलं. मग मग माझी सोंगटी पुढे गेली तेन्व्हा चिरंजीवानी " ती माझी आणि ही तुझी अशी अदलाबदली करू " अशी ऑफर दिली .
मी म्हटलं , " तू चिटींग करतोयस , मी खेळणार नाही "
" पण मग तु पूढे जाशील मी हरेन "
" चालेल , हरलं तर काय झाल? आपण परत खेळू , तु जिंकतोस का बघू "
मग ही रडारड

मी पण हट्टाला पेटले , त्याला हर प्रकारे समजावून पाहिल , पण रड चालूच .
नवरा आणखी वैतागला
" खेळू दे ना त्याला त्याच्या मनासारख , काय बिघडल? "

माझ्यामते प्रश्न तत्वाचा होता.
एकदा सवय लागली की खेळात मॅन्युपलेशन्स करता येतात,आणि काही करून जिंकायचच , हार पचवायची नाही अशी वृत्ती बनेल .

मी फार विचार करते का ? या सगळ्या गोश्टी मुलांना कशा शिकवायच्या ?

स्वस्ति हाच प्रॉब्लेम माझ्या आणी मुलीच्या बाबतीत झालाय.:अरेरे: याला कारण एकच. माझा भाचा वहिनीच्या माहेरी गेला की तिथे तो लहान म्हणून कौतुकाने सारखे जिन्कु द्यायचे. इकडे पुण्यात आला की सोसायटीतली मुले कशी सारखी जिन्कु देतील? खेळातही हार-जीत असतेच की. लहानपणापासुन मुलाना ना ऐकण्याची सवय लागली नाही तर पुढे कठिण होते.

हे मुलीच्या बाबतीत व्हायला नको म्हणून मी तिला चिटीन्ग करु नकोस म्हणून सान्गत होते, तर आई म्हणाली की ती रडण्यापेक्षा जिन्कु देत तिला. कठिण होऊन बसते हे मग.

स्वतः जिंकण्याइतकाच आनंद दुसर्‍याला जिंकू देण्यातही असतो हे पण मूलांना कळायला पाहिजे. अश्या कथा चित्रपट मूलांना दाखवायला हव्यात. मला नीट आठवत असेल तर झोला बड ने ऑलिंपिक मधे असे काहितरी केले होते.

कुठल्याही क्रीडास्पर्धेआधी जी शपथ दिली जाते ती शिकवावी. व्यावसायिक क्रिडास्पर्धात खेळ संपल्यावर खेळाडू~
एकमेकांना कसे अभिवादन करतात ते दाखवावे ( WWF नव्हे )

प्रतिसाद उडत उडत वाचले. पण खूपच उपयुक्त धागा आहे. सर्वांनी चांगली माहीती शेअर केली आहे. बघेन आता काळजीपूर्वक.

माझा मुलगा ईयत्ता ६ वी ईग्लिश मिडियम मधे शिकतो. आम्हि त्याला क्लासला पाठवत नाहि, आणि त्यालाच जायच नाहि आहे क्लासला.
English चा अभ्यास करायला कंटाळा करतो , आम्ही सोबत असल्यावर अभ्यास कतो,, पण जेवढ्यास तेवढे.
ईंग्लीश चा अभ्यास कसा करून घ्यावा. आवड निर्माण होण्यासाठी काय करता येईल.
बाकिच्या विषयामध्ये concept clear असेल तर आवडीने करतो .

मला सांगाल का, अभ्यास कसा करवून घेऊ, स्वःताहून आवडीने अभ्यास करायची त्याला गोडी कशी लागेल.

धन्यवाद

Hi,
माझा मुलगा junior kg सध्या...
त्याचा play group सुरू होता तेव्हा usa jaun आलो १ वर्ष.... आता परत आलो तर सगळेच जड जातंय त्याच....लिहिता वाचता येत नाही...शिकवते तर बसत नाही...कसे करू....teachers study घ्या घरी म्हणतात....पण खूप अवघड जातय...

युट्यूब वर alphablocks आणि numberblocks चे एपिसोड आहेत. रोज दाखवा. मुलांचे jolly phonics म्हणून वीडियो आहेत ते दाखवा. एकदा phonics आले की reading येते.
शक्य असेल तर लहान मुलांची लायब्ररी लावा. त्यात bruno,pepper ची पुस्तके आणा आणि तुम्ही रोज वाचून दाखवा. Amazon वर सुद्धा विकत घेता येतात.

शक्यतो English cartoon (हिंदी डब केलेले नाही) बघू द्या. Peppa pig, Paw patrol, PJ masks. आपोआप english उच्चार शिकतात.

या धाग्यात मागे लिहलेले प्रतिसाद लिहीत असताना माझा मुलगा ५-६ वी मध्ये असेल. आताच त्याची १२ वी झाली. JEE MAINS ला ९७.८ आणि MHTCET ला ९९.५ पर्सेन्टाइल मिळाले. मुंबई ला ICT मध्ये BChemEngg ऍडमिशन मिळाली. आय आय टी साठी प्रयत्न सुरु होते, पण तिकडे नाही मिळाली. (याची एक मोठी वेगळी गोष्ट आहे. )

६ वी ते १० वी पर्यन्त त्याचा सेल्फ लर्निग खूपच छान झालं. १० वी मध्ये NTSE मध्ये I स्टेज मध्ये निवड झाली. II स्टेज मध्ये पण निवड झाली. हि एक माझ्या दृष्टीने मोठी अचिव्हमेन्ट होती. खूपच आनन्द झाला होता मला. १० वी ला त्याला ९६.६ % मार्क्स मिळाले. तालुक्यात त्याचा पहिला नंबर आला होता. ( ९ वी पर्यंत त्याचा कधी नंबर वगैरे आला नव्हता). ८ वी ला स्कॉलरशिप ला पण सिलेक्शन झाले होते. गणिताच्या प्राविण्य आणि प्रज्ञा या परीक्षेत पण त्याचे सिलेक्शन झाले होते.

याचे शिक्षण म्हणजे आमचा एक मोठा R & D होता. याच धाग्यावर अगोदर लिहिल्याप्रमाणे आमची पद्धत इवोल्व होत गेली.

आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि शुभेच्छा मुळे एक महत्वाचा टप्पा चांगल्या रीतीने पार पडला.

याची एक भली मोठी गोष्ट वेगळ्या धाग्यात लिहायचे प्लॅनिंग करतोय. त्या साठी या धाग्यातील माझे प्रतिसाद पण तिकडे कॉपी पेस्ट करेन.
धन्यवाद .

अभिनंदन.
तुमचा हा प्रवास नक्की लिहा नवीन लेखात.उत्सुकता आहे.

Pages