मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ मन दुवीधा मन्स्तीतीत आहे. म्हंगे मला वाटत कि माझ्या मुलीने चं अभ्यास करावा पूर्ण १००% नाही पण निदान ६०% तरी .शाळेतील दिलेला अभ्यास - क्लास वोर्क - सूचना जे मला मिळणे पोस्सिब्ले नसते ते मला शाळेतील इतर मुल्कडून कम्प्लीट करावे लागते . इथे माझे मनन दुखास्ते .

मी काय करू ? कधी कधी भीती वाटते कि माझी मुलगी स्लोव लेर्नेर नाही न ?
ती जड आहे . त्यामुळे तिचे कामे हळू असतात त्यामुळे सकाळपासून ते झोपे पर्यंत तिला सूचन द्याव्या लगतत. मी देते सासू देते पण कधी कधी त्या सूचना माधे कालाच्जी किवा प्रेम नसते , राग तिरस्कार किवा काहीतरी वेगळी फिलिंग येते. त्यावेकी राग येतो पण तिचा केविलवाणा चेहरा पहिला कि मला च प्रश्न पडतो मी चुकते आहे कि मी जास्त अपेक्षाठेवते तिच्या कदुन.

क्रूपया मला मदत करा. माझा नवरा बोलतो कि तुम्हीच तिला वेद करून ठेवाल. मला माझी मुलगी हसरी आणि खेळती हवी आहे

अम्या,
मुलगी किती वर्षांची आहे?सतत सुचना दिल्याने मुले कंटाळतात अणि गोंधळतात. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी तिच्याशी बोलून, निवांत बसून तिच्या दिवसाचे आयोजन करा. त्यात सकाळी उठल्यापासून प्रत्येक अ‍ॅक्टिविटी पूर्ण करायला तिला किती वेळ योग्य आहे ते ठरवा. एकदा रोजची आन्हिके, खाणे, खेळ, अभ्यास, टिवी टाईम इतर विरंगुळा, झोप वगैरे सगळ्याचे आयोजन केले की त्याप्रमाणे तिचे तिला आवरु द्या. या आयोजनात काही वेळ बफर म्हणून ठेवा. म्हणजे मुलाने थोडाफार वेळकाढूपणा केला तरी वेळेचे गणित बिघडत नाही. तसेच घड्याळ १० मिनिटे पुढे ठेवायचे. अ‍ॅक्टिविटीच्या मधे एकदाच वॉर्निंग द्यायची. मुलाने अ‍ॅक्टिविटी नीट पूर्ण केली की शाबासकी द्यायची. जर का वेळेत काम पूर्ण झाले नाही तर तो वेळ टिवी टाईम आणि इतर फन टाइम मधून घ्यायचा. झोपेची आणि उठायची वेळ पक्की ठेवायची. अगदी सुट्टीच्या दिवशी देखील फार तर अर्ध्या तासाची सूट द्यायची. दर आठवड्याला काय चुकले त्याचा आढावा घ्यायचा. सुधारणा होण्यासाठी उपाय मुलालाच सुचवायला सांगायचे. हळू हळू आपल्याला जमते हा आत्मविश्वास आला की मूल आपले आपण कामे पूर्ण करु लागते.
होमवर्क आणि क्लासवर्क किती असतो ? तो का पूर्ण होत नाही त्याचे कारण शोधा. शाळेत शिकवलेले नीट आकलन होत नाही असे असेल तर ते का याचा शोध घ्या. झोप पूर्ण न होणे,फळ्यावरचे नीट न दिसणे, नीट ऐकू न येणे, चित्त स्थीर नसणे वगरे अनेक कारणांनी मुलांना शिकण्यात अडचणी येतात. अभ्यास कच्चा राहिला की मग शाळेत मन रमत नाही, कंटाळा येतो, भीती वाटते. शॉर्ट टर्म सोल्युशन पेक्षा हा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून प्रयत्न करा. तसेच शक्य झाल्यास फॅमिली डॉकशी बोलून, काउंसेलरना भेटून कुठल्याही प्रकारचा लर्निंग प्रॉब्लेम नाहीये ना याची खात्री करा. तसे असेल तर लवकर निदान होणे खूप गरजेचे असते. योग्य वेळेत उपचार सुरु केले तर मुलात लवकर सुधारणा होते. तुम्हाला शुभेच्छा!

आशूची पेशन्स वाढेपर्यंत काय? चांगल्या शिक्शा कोणत्या? ही पोस्ट वाचली.
बर्‍याच प्रयत्नांती सध्या ते जमू लागलं आहे आणि यशस्वी होतंय असं वाटतंय. Wink
अगदी परवाचाच प्रसंग. लेकीला अगदी घसा फाडून बोलायची सवय लागली होती. प्रत्येकवेळी तिच्या आवाजापेक्षा खालच्या पट्टीतला आवाज काढून 'हळू बोल' असं सांगून फरक पडत नव्हता. एक दिवस तिने साधीशीच गोष्ट पण आवाजच्या अगदी वरच्या पट्टीत सांगितल्यावरही मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा तिला राग आला आणि ती रागारागाने खूप जोरात मला काहीतरी बोलली. त्यानंतरही शांतपणे तिच्या बाजूला बसून तिला अभ्यास पूर्ण करायला लावला. अभ्यास झाल्यावर अगदी शांतपणे तिला सांगितलं की आता बाथरूममधे जा, दार बंद कर, कडी लाव आणि तुला जितक्या जोरात ओरडता येतं तितक्या जोरात 'आऽऽऽऽ' अशी ओरड. इतक्या जोरात ओरडायचं की तुझा घसा दुखायला लागला पाहिजे आणि बाहएर बसलेल्या आमचे कान फाटले पाहिजेत.
ती आधी अविश्वासाने मग अगदी बिचारा चेहरा करून माझ्याकडे बघत बसली आणि नंतर गुपचुप स्वतःचं सगळं आवरून झोपायला आली. त्या दिवसापासून आवाजाची पट्टी खाली आली.

पण मी अजिबात मारत नाही असं अजिबात नाही. वेळप्रसंगी एखादा धपाटा घालावाच लागतो.

माझी मुलगी सध्या JK मधे आहे आणि तिला छोटी लिपी चालु आहे
शाळा सकाळी ८-११
माझे ओफीस सकाळी ११.३० ते ८.३० त्या मु ळे
१> वेळ थोडा असल्याने अभ्यास घेताना त्रास होतो
२> मला कधी उशीर झाल्यामुळे अभ्यास होत नाही
३> बाबा लवकर आला तर आभ्यासाला सु ट्टी होते [बाबा अभ्यास जास्तीत जास्त १० मी घेतो]
४> माझा वैतागलेला मुड असतो [त्याचा परीणाम वैता गतच अभ्यास घेणे
कधी कधी ओर डणे - मार णे मग रडारड त्यामुळे दुसर्या दिवशी guilt ये णे [दिवस भर पोर गी बरोबर नसते अन आल्यावर मारामारी आरडाओरडा रडारड

खुप confuse झालेय मी

आमच्याकडे कारणेच खूप असतात. वात आलाय. काही जणान्ची मुले कशी शहाण्यासारखी अभ्यास करतात ते बघुन टेन्शन येते. आमचेच ध्यान हुशार असुन असा वात का आणते देव जाणे. रागावुन, बोलुन सगळे झालेय. पण अभ्यासाची गोडीच नाही.:अरेरे:

प्रीभू का मागे लागते आहेस तिच्या एवढुशी तर आहे ती. तू हुषार आहेस तुझी मुलगीही असणारच. काय बिघडतं ह्या एवढ्या लहान मुलांनी लेखनाचा अभ्यास नाही केला तर हसत खेळत गप्पा मारत तोंडी करून घे की तिचा मूड असेल तेव्हा

मुलांना अभ्यासाची गोडी नाही असं नसतच मुळी. मुलांना लिहिण्याचा कंटाळा असतो. साहजिक नाहीये का ते? केवढेसे त्यांचे हात केवढुशी त्यांची बोटं आणि किती वेळ जातो एवढं सगळं लिहिण्यात. प्लीज मुलांसारखा विचार करून बघा ना. शिवाय मला येतय ना मग काय लिहायला लावता सारखं असाही विचार येतो त्यांच्या मनात.

मुलांना शाळेने गृहपाठ दिला असेल आणी तो जर करवून घ्यायचा असेल तर काहीतरी नवीन पद्धत शोधायला हवी. जसे की एवढा अभ्यास संपला की आपण एकत्र पुस्तक वाचूया किंवा चित्र रंगवू किंवा गाणं म्हणू किंवा नाचू... पण एकत्र. अशी लाच दिली की मुलं आनंदाने थोडासा वेळ लिखाण करतातलवकर लेटेस्ट स्वानुभव. आणि त्यानंतरची अ‍ॅक्टिव्हिटि हा आपल्यालाही स्ट्रेस बस्टर असतो आणि आपण मुलांसोबत वेळ काढला म्हणून मुलंही आनंदी.

मंजूडी, तुझी आयडिया आवडली

सकाळच्या शाळेला जाताना वेळेवर उठणे आणि व्यवस्थित खाऊन वेळेत शाळेला जाणे ह्यासाठी काही टिप्स कुठे लिहिल्या आहेत का? प्लीज मला सांगा. माझा पेशन्स तिथे तुटतो.

सुनिधीला यावर्षी पासून लिखाण चालू झालंय. आधी त्या स्लीपिंग लाईन वगैरे भानगडी आहेत. मागे एकदा क्रॉसवर्डमधून तिचयसाठी एक वर्कबूक टाईप पुस्तक आणलंहोतं त्यात कुत्र्याला घरात नेऊन सोडा वगैरे चित्रं आहेत आणी ते डॉट्स जोडत जायचे आहेत. ते तिला फार आवडतं. आम्ही रोज त्या वर्कबूकातलं एक एक पान सोडवतो (खोडरबर वापरून ते फान फाटेपर्यंत)

होमवर्क वहीचे एक पान भरेल इतकाच असा शाळेचाच नियम आहे, त्यामुळे होमवर्कचे टेन्शन येत नाही. होमवर्क केला नसेल तर बाई वर्गात बसून लिहून घेते. पन्निशमेंट वगैरे काही नाही.

प्रितिभूषण,
माझाही मुलगा आत्ता JK त आहे.. मलाही घरी होमवर्क (त्याच्या शाळेत ह्याला प्रॅक्टिसवर्क म्हणतात) करून घेताना हेच जाणवतं की त्यांचा एका वेळेस दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा एका जागेवर बसण्याची इच्छा नसते. एखादी गाडी बाजूला असते.. मधेच फिरून येतो घरात.. मी हे बघून स्वतःला आठवून बघितलं.. ह्या वयात दोन चार वह्या आणि पुस्तके घेऊन मी कधीच शाळेत गेले नव्हते.. आणि वही पुस्तकाशी अभ्यासासाठी म्हणून ओळख पहिलीत गेल्यावरच झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे अयोग्य वाटते. दोन तीन पानं लिहायची असतील तर एक दीड पानात तो उठतो उरलेलं नंतर करतो म्हणतो आणे थोड्या वेळाने करतोही.. मी नोकरी करत नसल्याने कदाचित माझ्यासाठी सोपं असेल तुझ्यापेक्षा पण तरीही तिला थोडा ब्रेक घेउदे.. तू लेकीच्या कलाने घेऊन बघ म्हणजे कदाचित जरा तुला कठीण गेलं तरी ती तुझं ऐकेल.. Happy
आणि वेल, तुझंही बरोबर आहे.. अ‍ॅक्टिविटी प्रकरण खूप उपयोगी पडतं..:)

प्रीभू का मागे लागते आहेस तिच्या एवढुशी तर आहे ती. तू हुषार आहेस तुझी मुलगीही असणारच. काय बिघडतं ह्या एवढ्या लहान मुलांनी लेखनाचा अभ्यास नाही केला तर हसत खेळत गप्पा मारत तोंडी करून घे की तिचा मूड असेल तेव्हा

>> अगं ती एक आठवडा मागे आहे म्हणुन आणि दोघी मिळुन भिंती वर अभ्यास करतो तो वेगळाच
माझे घर आता गिरगीटाच झाल यं

आणि आज काल माझा पेशन्स तुटतो सारखा

सकाळच्या शाळेला जाताना वेळेवर उठणे आणि व्यवस्थित खाऊन वेळेत शाळेला जाणे ह्यासाठी काही टिप्स कुठे
>>
१>मला पण हवे आहे हे
२>रोज ६.३०ल तीला उठवायला नको वाटते Sad

प्रीभू,
अभ्यास ऑफिसमधून आल्यावर घेत असाल तर तो पर्यंत मूल कंटाळलेलेच असणार ना. एवड्या लहान मुलांची खरे तर ही झोपायची वेळ. मोठी माणसेही ऑफिसमधून थकून आलेली-त्यांचाही पेशन्स संपलेला. दुपारी मुलीची नॅप झाल्यावर ३- ४ च्या सुमारास डेकेअरमधे किंवा घरी जे कुणी सांभाळते त्यांच्या देखरेखीखाली अभ्यास पूर्ण करणे शक्य आहे का ते पहा. तुम्ही घरी येण्याआधी अभ्यास पूर्ण करायची सवय सुरुवातीपासून लावलीत तर नंतर त्रास कमी होईल. कारण हा अभ्यास वाढत जाणार आहे. संध्याकाळी घरी आल्यावर अभ्यास करुन घेण्यापेक्षा तुम्ही घरी आल्यावर फक्त होमवर्क चेक करत गप्पा मारायच्या असे रुटिन ठेवले तर बरे.

वेल,
झोपेचे आणि रात्रीच्या जेवणाचे गणित व्यवस्थित जमले तर सकाळचे रुटिन नीट वेळकाढूपणा न करता होते. जोडीला सकाळच्या वेळात टिवी बंद हे कटाक्षाने पाळायचे. मुलांची झोप पुरी झाली नसेल तर सकाळी उत्साह नसतो. रात्री जेवण उशीरा झाले असेल तर ब्रेकफास्टला टंगळमंगळ चालते. त्यामुळे सकाळी किती वाजता उठणे अपेक्षित आहे, ब्रेकफास्ट किती वाजता त्याप्रमाणे कमित कमी १० तासाचे अंतर ठेऊन संध्याकाळचे जेवण आणि बेडटाईम ठेवायचा. तसेच शाळेला उशीर होइल म्हणून सकाळी पाठीशी लागायचे नाही. २-३ दिवस उशीर होईल ही शक्यता गृहित धरुन त्याप्रमाणे बॅकअप प्लॅन बनवायचा. शाळेची उशीरा आल्याबद्दलची शिक्षा भोगू द्यावी. हवे तर आधी शाळेत त्याबद्दल बोलून ठेवायचे टिचरशी. होते काय की मुलाला उशीर होईल म्हणून मोठी माणसे धडपडतात , मुलाच्या पाठीशी लागतात आणि वेळेत सगळे आटपून शाळेत जाण्याची जबाबदारी आपली आहे हे मुलापर्यंत पोहोचतच नाही. मुलाच्या वर्तनाचे नैसर्गिक परीणाम मुलाला माफक प्रमाणात अनुभवायला लागले की वर्तन सुधारते. आमच्याकडे हा उपाय करुन, एका ग्रेडिंग पिरीयडला ऑनर रोलवर पाणी सोडले. परत कधी त्रास झाला नाही. मी लेकाला शांतपणे सांगायची स्कूलबस गेली म्हणून. Happy

जोडीला सकाळच्या वेळात टिवी बंद हे कटाक्षाने पाळायचे >>> भला मोठ्ठा +१.

आमच्याकडे सकाळी शाळेची तयारी पूर्ण होइपर्यंत टीवी बंद. एकदा का शूज वगैरे घालून (वेळ असला तर बिंदी, गजरा वगैरे नाटकं संपली) की मग व्हॅन येईपर्यंत टीव्ही. (पण तो जेमतेम पाचेक मिनीटंच Proud ) दुपारी शाळेतून आल्यावर जेवताना नो टीव्ही. संध्याकाळी झोपून उठल्यावर आम्ही सायकल खेळून येतो. ते आल्यावर तासभर टीव्ही. मग नंतर मम्मापप्पाचे "शिरेल" त्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नसतो. म्हणजे दिव्साभरातून एक तासभर टीव्ही तिला बघता येतो. तितकंच.

शिवाय स्वतःच्या हातानं खाणं, स्वतःचा डबा नेऊन दप्तरामध्ये ठेवणं, वॉटरबॅग भरून घेणं ही कामं आम्ही तिच्याकडे आऊटसोर्स केलेली आहेत.

सकाळच्या शाळेला जाताना वेळेवर उठणे आणि व्यवस्थित खाऊन वेळेत शाळेला जाणे ह्यासाठी काही टिप्स कुठे लिहिल्या आहेत का? प्लीज मला सांगा. माझा पेशन्स तिथे तुटतो >>

गेल्या वर्शीच्या सुरुवातीला (ज्यु.केजी) आमचा सकाळचा कार्यक्रम असायचा :

उठायचे ,ब्रश करायचा,,दूध , बिस्किट खायचे ,आंघोळ करायची ,तयारी करायची,शाळेला निघायचे.

खरतर , ३० मि. पेक्शा जास्त वेळ लागायला नको .
पण ८ वाजता निघायचे म्ह्णून मी लेकाला ७ वाजल्यापासून उठवायचे.
बाबापूता करून साहेब उठले की खिडकीतल्या कावळे चिमण्या , गाड्या बघत दूध पिण चालायचं. ते काम १५ मि. आपटेल याची खात्री नाही. मग पटापट तयारी करून धावतपळत बस पकडायला जायचं.

एक्दा वैतागून मैत्रिणिशी बोलत होते , तीने सुचवल आणि कामांचा क्रम बदलला.आता :
आता उठायच्या अगोदरच बाथरूम्मध्ये उभे करते . मग आंघोळ करायची , ब्रश करायचा , दूध-बिस्किट , तयारी करून वेळेच्या १०-१५ मि. अगोदर च तयार असतो . आणि थोड उशीरा उठलं तरी चालत.

पण हल्ली त्याला आंघोळ घालायच काम त्याच्या डॅडीचं असल्यामुळे, ते वेळेवर करून घेण्यात माझा पेशन्स संपतो Wink

मी लहान असताना सकाळी ७-१० वाजताची पहिली बेल असायची तरीही मी तोंडात ब्रश घेउन ६-४५ पर्यन्त कीचनच्या दारात बसलेले असायचे ते आठवले .

शिवाय स्वतःच्या हातानं खाणं, स्वतःचा डबा नेऊन दप्तरामध्ये ठेवणं, वॉटरबॅग भरून घेणं ही कामं आम्ही तिच्याकडे आऊटसोर्स केलेली आहेत.>>>>भले शाब्बास नन्दिनी तुला, सुनिधीला आणी तिच्या बाबाना पण.:स्मित:

वेल नन्तर लिहीन.

स्वाती२ शी सहमत.
सकाळी लवकर उठायचं असेल तर उठण्याच्या वेळे आधी ८ तास रात्री झोपायची आणि त्याआधी २-३ तास जेवणाची वेळ ठेवायची. आम्ही रात्रीचं जेवण ७ पर्यंत उरकायचा प्रयत्न करतो आणि रात्री १० ला मुलाला झोपवतो. सकाळी ६ ला उठून ७ ला घर सोडायला लागतं. सकाळी घाई होत असेल तर अंघोळ रात्रीच करूनच झोपायचं पण सकाळी दूध आणि नाश्ता करायचा. मुलांना गोष्टी स्वतः करायची हौस असते, ती पूर्णपणे पुरवायची.
दूध पिणे, खाणे, संडास, हात धुणे, कपडे घालणे, बूट घालणे, जेवायची तयारी (ताटं घेणे इ.)करणे, जेवल्यानंतर आवरायला मदत करणे, खेळण्यांचा पसारा आवरणे, कपड्याच्या घड्या करणे, केर काढायला मदत, डबा-पाण्याची बाटली आपली आपण घेऊन जाणे इ. कामे २ किंवा कमी वर्षापासून मुलं करू शकतात. आपण लक्ष ठेवायचं पण त्या बरोबरीने आपली कामे करत रहायची. मुलं थोडा गोंधळ करतातच पण आपण केल्याचा फार उत्साह असतो. आपली कामं थोडी कमी होतात हळूहळू.
असं केलं तर दुष्परिणाम शनिवार/ रविवारी मुलं सकाळी लवकर उठतात, आणि आपल्याला उठवतात. आपण शुक्रवारी रात्री मस्त मनाप्रमाणे टीव्ही/ मुव्ही/ पुस्तक किंवा आणि काही करून उशिरा झोपलेलो असतो. तेव्हा मात्र एकाला तरी न-रागावता उठता आलं पाहिजे. Happy

अरे वा वा बर्‍याच पोस्ट्स आल्या. वाचतोय. जाता जाता एक सिडींग Wink
मुलाच्या मागे टीव्ही बघ टीव्ही बघ अशी भुन्भुन करावी लागत नाही ना? मग अभ्यास कर अभ्यास कर / जेव जेव / खा खा / आवर आवर अशी का करावी लागते.?

काही जणान्ची मुले कशी शहाण्यासारखी अभ्यास करतात ते बघुन टेन्शन येते. >>> प्लिज काहि झाले तरी कंप्यारिझन करु नका.

मागच्या रविवारी कोणत्यातरी पुरवणीमध्ये एक लेख वाचनात आला. त्यात एक महत्वाचे वाक्य होते. 'हल्लीच्या शाळांमधील शारिरिक शिक्षेऐवजीच्या मानसिक शिक्षा जास्त धोकादयक आहेत. लेख शोधुन लिंक टाकतो.

निपा अहो कम्पॅरीझन करायची अजीबात ईच्छा नाहीये.:अरेरे: पण एका जागी अजीबात बसत नाही आणी लिहीण्याचा जाम कन्टाळा. थोड्या आमच्या पण चूका आहेत हे मान्य आहे मला. पण सतत कर ग कर ग असे मागे लागावे तेव्हा एक छोटा पॅरा लिहुन होतो.

पहिल्या पाचात ये अशी सक्ती कधीच करत नाही आणी करणार पण नाही. पण अभ्यासाची सवय नाही लागली तर पुढचा काळ कठिण आहे.

रश्मी, मुलगी कितवीत आहे ? ५ आणि त्या पुढील वयाच्या मुलांना योग्य पर्याय आणि जोडीला त्याचे परीणाम असे सातत्याने द्यावे.
अभ्यासाची वेळ आणि किती वेळ सलग अभ्यास करणार ते बोलून ठरवायचे. समजा १५ मिनिटांचे सलग चंक्स अणि मधे ५ मिनिटे ब्रेक. सुरुवातीला १० मिनिटांचे होमवर्क देताना १५ मिनिटात पूर्ण होइल असे धरायचे. १५ मिनिटाच्या आत काम संपले तर उरलेला वेळ ब्रेक मधे अ‍ॅड होणार हे सांगायचे . काय अपेक्षित आहे त्याची सुचना देऊन बाजूला व्हायचे. आपले काही काम एकीकडे करायचे. लक्ष ठेवायचे पण कर गं म्हणून सांगत बसायचे नाही. १० मिनिटांनी एक नजर टाकायची. ५ मिनिटे राहिली आहेत म्हणून वॉर्निंग द्यायची एकदाच. मग चेक करायचे. काम पूर्ण झाले तर कौतुक. काम पूर्ण झाले नसेल तर कमी शब्दात नाराजी व्यक्त करुन ब्रेक द्यायचा. पुन्हा अभ्यास सुरु. असे करत काम पुर्ण करुन घ्यायचे. अभ्यासासाठी जेवढा अतिरिक्त वेळ घेतला तेवढा वेळ विकएंडच्या टिवी टाईम वगैरे मधून घालवायचा. त्याबद्दल आधीच एकदाच सांगून ठेवायचे. सुधारणा होईल त्याप्रमाणे कौतुक, विकएंडला छोटीशी सरप्राईज ट्रीट द्यायची. हळू हळू मुलांना जमायला लागते. आपल्याला जमतेय लक्षात आले की त्यांचे त्यांनाच छान वाटते.

छान चालली आहे चर्चा. मला ह्यातला काही अनुभव नाही पण इंटरनेटवर ह्या विषयावरच्या अनेक टिप्स आहेत. उदा.
http://www.greatschools.org/students/homework-help/341-tips-to-support-w...

असंच वाचलेलं एक वाक्य आठवलं,
So often, children are punished for being human. Children are not allowed to have grumpy moods, bad attitudes, disrespectful tones, or bad days; yet we adults have them all the time. None of us are perfect, and we must stop holding children to a higher standard of perfection than we can attain ourselves.

स्वाती२ प्रतीसाद उशिरा दिल्याबद्दल सॉरी. कामात हा बाफ मागे कधी पडला ते कळलेच नाही.

मुलगी दुसरीत आहे. तिच्यावर जास्त ओझे टाकत नाही, पण रोज निदान अर्धा ते दिड तास अभ्यास ( गृहपाठासकट) करावा अशी ईच्छा आहे. मुले एका जागी बसत नाहीत हे मान्य आहे, पण निदान थोडा तरी अभ्यास रोज झाला तर ताण येणार नाही.

तुझा सल्ला नक्कीच अमलात आणेन.:स्मित: कारण आधी कर कर म्हणून मी मागे लागत होते.

या धाग्यावरील चर्चा आवडली.
स्वाती२ आणि निवांत पाटील यांच्या पोस्ट्स आवडल्या. पटल्या.

धन्यवाद.....
बरे झाले धागा वर आला. यावर अजुन बरेच लिहायचे राहिलेय.

प्रत्येक इयत्तेचा जो ठराविक अभ्यासक्रम ठरवुन दिला आहे त्याचा काहितरी योग्य पॅटर्न आहे जो अतिशय तज्ञ लोकांनी बसुन चर्चा करुन ठरवला आहे. तर त्या त्या विषयाच्या अभ्यासाचा मुलाला नक्कि काय उपयोग होणार आहे याची त्याच्याशी चर्चा केली तर खुप फायदा होतो.

उदा. गणित. बेरीज वजाबाकि गुणाकार भागाकार--- बाजारात गेल्यावर हे आपल्याला येत नसेल तर आपण बाजार करु शकणार नाही/ हिशोब करु शकणार नाही इथेपासुन ते % डिस्काउंट नफा-तोटा, गरजे पुरते पाढे ( ३० पर्यंत), गाडीत डिझेल भरल्यानंतर अ‍ॅव्हरेज काढणे, किमी चे रिडींग बघणे, वेग-वेळ- अंतर याचे रिलेशन सांगणे आणि त्यातुन अ‍ॅक्सलरेशनचा (त्वरण) कंसेप्ट सांगणे इथे पर्यंत. लसावि मसावि का काढतो त्याचा नेमका उपयोग कुठे होतो, व्याज त्याचे कॅल्क्युलेशन त्याचा कंसेप्ट, गुणाकार त्यातुन घातांक, वर्गमुळ , घनमुळ मग एरिया कॅलक्युलेशन (घराचा, पॅसेजचा), व्हॉल्युम कॅल्क्युलेशन ( बादलीत पाणी किती मावते ते उंच पाण्याच्या टाकित किती मावेल इत्यादी इत्यादी) जेथे जेथे वेळ मिळेल प्रवासात याची चर्चा करणे जेणे करुन मुलाला आपण अभ्यास करतो याचा उपयोग कुठेतरी होतोय हे रिलेट झाले पाहिजे. आणि हे सगळे शिकवत बसण्यापेक्षा याचे फक्त सिडींग करणे जेणे करुन पुस्तक, नेट यावरुन तो त्याला हवी असलेली माहिती मिळवु शकेल, त्याउप्पर नाही जमले तरे आपण त्याच्या जागी असतो असे इमॅजिन करुन कसे शोधलो असतो ( आता आपण मोठे आहोत आणि आपले ग्रास्पिंग त्याच्या पेक्षा जास्त आहे हे कंसिडर करुन) याचा डेमो देणे आणि मग परत सिडींग केले होते त्याबद्दल चर्चा करणे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे कि अशा गोष्टी मुलांना विचार करायला प्रोत्साहित करतात.

इथे सुरवात झाली कि मग त्याची व्याप्ती वाढत जाते. आणि हा विचार अभ्यासक्रमाच्या (सो कॉल्ड पोर्शन) थोडा बाहेर जातो. उदा. मग पृथ्वीचे आकारमान / वस्तुमान कसे काढले असेल?. एखाद्या बिल्डींगचे वजन काढता येइल का? विहिरीत किती पाणी असेल लिटर मध्ये सांगता येइल का? असे प्रश्न जनरेट व्हायला सुरवात होतील. प्रश्न पडायला सुरवात झाली कि ओळखायचे कि तो त्या विषयात इन्व्हॉल्व व्हायला सुरवात झालिय. आणि त्याला पडणार्‍या प्रश्नांची रेडीमेड उत्तरे देण्यापेक्षा ती शोधायला मदत करणे / उत्तर शोधताना काय विचार केला पाहिजे ( थॉट प्रोसेस) शिकवणे. बस्स. बाकि काहीच करायला लागत नाही.

या गोष्टी अभ्यासाचे स्वरुप टोटल बदलवुन टाकतात. ( यात परीक्षा, गुण / मार्क्स / ग्रेड / नंबर कितवा / आणि किती वेळ अभ्यास या गोष्टींचा कंप्लिट अभाव आहे )

सायन्सः प्रत्येक गोष्टीला असे का होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. अबसोल्युट सगळ्यांना. खुप कमी लोक तो प्रश्न विचारायचे धाडस करतात. सायन्स हा विभागच यावर अवलंबुन आहे. याचा अभ्यास मुले खुप लहानपणापासुन करतात.

इथे थोडेसे अवांतर होइल पण दोन प्रसंग लिहतो. माझ्या मुलाला (वय वर्षे २.५) घेउन एकदा मी रेल्वेने कोकणात जात होतो. त्याने मला एक प्रश्न विचारला. पप्पा ट्रेन बोगद्यातुन जाताना, पुलावरुन जाताना नेहमीपेक्षा वेगळा आवाज का येतो. दुसरा प्रसंग (वय वर्षे ६) पप्पा मी अंघोळ करताना पाण्याने भरलेल्या तांब्यात हात बुडवला तर पाणी बाहेर पडते. आणि रोजच मी करुन बघ्तो रोज ते बाहेर पडते.

माझ्या मते हे प्रश्न पडणारा हा काही जगात एकटाच नाही. सगळ्या (१०० %) लहान मुलांना हे प्रश्न पडतातच पडतात. समस्या आहे तो प्रश्न विचारला जाण्याचा. मी शाळेत असताना मला बरेच प्रश्न पडायचे आणि मी ते विचारायचो. सगळ्या प्रश्नांना उत्तर बाकि एकच असायचे. परिक्षेला हे प्रश्न येत नाहित आणि बर्‍याच वेळा जबरदस्त टाँट ज्यामुळे सगळी मुले हसायची. (याला सन्माननीय अपवाद देखिल होते ज्यांच्यामुळे आज चांगले दिवस पहात आहे). पण लहानपणापासुन माझ्याबाबतीत या हसण्याचा काहीच परिणाम झाला नाही. पण याला बळी पडणारे हजारो विद्यार्थी मी बघितलेत. म्हणजे मी प्रश्न विचारला - सरांनी टाँट मारला- मुले मुली (हे महत्वाचे) हसले- बाकिच्या मुलांमधील कोणाच्याच मनात प्रश्न आला तरी ते विचारायचे धाडस राहिले नाही. इथे वाचताना कदाचित राइचा पर्वत केल्यासारखे वाटेल पण आज देखिल हिच भयानक वस्तुस्थिती आहे.

तर मुळ मुद्द्याकडे वळु Wink

त्या त्या इयत्तेतील अभ्यासक्रमानुसार (असे असायलाच पाहिजे असे नाही) आपल्या दैनंदिन वापरात जी काही उपकरणे / साधने आहेत ती कशी काम करतात, त्या मागचे सायन्स काय आहे, ते तसेच का होते, नेमका कोणत्या वैज्ञानिक परिणामाचा वापर त्यामध्ये केला आहे इत्यादी गोष्टींची चर्चा करणे. एखाद दुसरे उपकरण झाले कि मग त्याचे त्याला तिसर्‍याच उपकरणाच्या मागे लावुन दिलात तर मग त्याला तशी विचार कराय्ची दिशा मिळेल. अगदी बटन दाबले कि लाईट का लागतो, बल्बचा उजेड वेगळा का पडतो, ट्युबलाईट आणि सिएफेल काय फरक आहे, इस्त्री गरम कशी होते / का होते, फॅन कसा फिरतो त्याचा स्पिड कसा कमी जास्त होतो डोअर बेल कशी काम करते इत्यादी. आता ५ वर्षाच्या मुलाने प्रश्न विचारला किंवा ७ वर्षाच्या मुलाने प्रश्न विचारला तर सुरवातीला त्याला समजेल असे उत्तर देणे किंवा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी प्रिरिक्विसाईट्स प्रथम सांगणे मग उत्तर शोधण्यास मदत करणे अशी सुरवात करता येइल. मी वरच्या एक प्रतिसादात लिहले आहे तसे पहिल्यांदा लापशी / पेज / मिक्सरम्धुन मग घास चावुन अश्या बेबी स्टेप्स घेउन सुरवात करावी लागेल. हे आहे खडतर. पण एकदा तुम्ही गाडी थोडी फार ढकलुन सुरु करुन दिलीत आणि त्याला माहिती सोर्स (पुस्तके / नेट / एक्सपर्ट्स) उपलब्ध करुन दिलीत झाले. तुमचे अभ्यास घ्यायचे काम झाले.

वर लिहलेल्या सगळ्याचे सार "विचार करायला शिकवणे" हेच आहे.

आता सगळ्यात महत्वाचे मुद्दे : हे सगळ कधी करायच? कसं करायच? मलाच माहित नाही फ्रिझ कसा काम करतो ते? आम्ही दोघे कॉमर्सचे आहोत / आर्टस्चे आहोत / हि माहिती कुठे मिळेल? मुले हे सगळे धंदे करायला लागली तर अभ्यास कधी करणार? आणि या सगळ्याचा परिक्षेत काय उपयोग होणार? हे सगळे थेरॉटीकल आहे, प्रॅक्टीकली इंपॉसिबल आहे. इत्यादी इत्यादी.

हे सगळे मुद्दे / किंवा यातले काही मुद्दे बर्‍याच लोकांना बरोबर वाटतात म्हणुनच खुप कमी मुलांना आज प्रश्न पडतात, ज्यांना पडतात त्यातले खुप कमी मुले तो विचारतात, आणि दुर्दैव म्हणजे विचारलेल्या खुप म्हणजे खुप कमी प्रश्नांना उत्तरे मिळतात.

आता तुम्ही हे वाचत आहात म्हणजे नेटला तुम्हाला अ‍ॅक्सेस आहे. बस्स और क्या चाहिये. सायन्सची का? कसे? शोध कसे लागले? वैज्ञानिकांच्या गोष्टी अशी चांगली पुस्तके विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

गरज आहे ती फक्त आपल्या निर्धाराची.

( वर लिहलेला सगळा स्वानुभव आहे. प्रत्येक मुलाची विषयवार आवड निवड वेगवेगळी असते. एखाद्याला हेच पोटँशिअल इतिहास / भुगोल / भाषा / कला यांत असु शकते.)
या बद्दल पुढच्या प्रतिसादात लिहतो.
धन्यवाद. हुश्य...

धन्यवाद. वरचा प्रतिसाद मला जरा विस्कळीत झाल्यासारखा वाटतोय. आशय तोच आहे जो सांगायचा आहे. पण त्याचा फ्लो नंतर सुधारतो.

आणि वरच्या बेबी स्टेप्स संपत आल्या कि मग एक वेळ अशी येते कि त्या मुलाला ' मी तुला शिकवतो' किंवा ' शाळेत तुला हे शिकवतील' 'क्लासमध्ये तुला हे शिकवतील' हा कन्सेप्टच रहात नाही. पाठ्यपुस्तके वाचणे / समजवुन घेणे / त्यातुन काय शिकणे अपेक्षित आहे हे कळणे या गोष्टी मुलांकडुन आपोआप घडु लागतात.

इव्हॅल्युएअशनः या सगळ्याचा परिपाक म्हणजे परिक्षेत येणार्‍या प्रश्नांची योग्य उत्तरे काय असावीत हे त्याचे त्याला कळते, आउट ऑफ सिलॅबस काहि असण्याचा प्रश्नच येत नाही, ऑप्शनला टाकणे हा प्रकार रहात नाही. त्यामुळे परिक्षेत चांगलेच गुण मिळतातच. स्पर्धा परिक्षेतही चांगले यश मिळते. आणि यात मारुन मुटकुन काही प्रकार रहात नाही.

माझ्या मुलाच्या बाबतीत वर दिलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या काम करताहेत. खान अ‍ॅकॅडमीचा त्याला प्रचंड उपयोग झाला. त्याचे व्हीडीओ बघितले जात नाहित.

आता फक्त मराठी / हिंदी व्याकरणाचा बराच भाग आणि संस्कृत ही संपुर्ण भाषा या गोष्टी बाकि आहेत. यात सिडींग करायला आम्ही कमी पडतोय म्हणुन या विषयांच्या तज्ञ लोकांच्या शोधात आहे.

अजुन एक, वर लिहलय ही आयडीयल पध्दत आहे असे मुळीच नाही. आमच्या विचार मंथनातुन इव्हॉल्व्ह झालेली आहे. अगोदर असेच कराय्चे असे ठरवले नव्हते. हे सुध्दा हळु हळु इव्हॉल्व्ह होत जाइल. या पेक्षा चांगल्या पध्दती असु शकतील / असणार. प्रत्येक पध्दत प्रत्येकाला लागु होइलच असे नाही. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व (अगदी पालकाचे आणि त्यांच्याच मुलाचे) वेगळे असते.

शेवटी एव्हरीबडी शुड बी हॅपी.... पालक आणि मुले....

Pages