दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोसेस्ड मिठात आयोडीन मिसळले तरी ते प्रोसेस करताना त्यात असलेली अनेक इतर खनिजे आणि शरीरास उपयोगी असणारे इतर घटक नष्ट होतात असं वाचलं आहे. त्यामुळे द्रव पदार्थात खडे मीठ आणि कोरड्या पदार्थात जसे ( पोहे, चिवडा वगैरे ) आयोडिन युक्त बारीक मीठ वापरणे आयडियल व्हावे असे मला वाटते.

दूध आणि दूग्धजन्य पदार्थातील आयोडिन मात्रा शोधुन बघता रोज दोन कप दूध (यात चहातले दूधही मोजता येईल) आणि अर्धा कप दही खाल्ले तर १५० ते १८० मायक्रोग्रॅम्स आयोडिन मिळेल. (दूधाच्या प्रकारावरुन - स्किम्ड, टोन्ड, होल प्रमाण कमी जास्त होत असावे.)
आयोडिनची रोजची किमान मात्रा १५० मायक्रोग्रॅम्स आहे. तेव्हा जर न चुकता वरील प्रमाणे दूध दही यांचे सेवन केले तर आयोडिनची मात्रा पुरेशी असावी, नाही का?
(याशिवाय अंडे, मासे यात आयोडिन असते, पण बहुतेक लोक, रोज / एकदिवसाआड खात नाहीत.)

पण जाड मिठाचे पाकीट चुकून आणले आणि आयोडाइझ्ड मीठ न खाता तेच वापरुन संपवले महिना दोन महिन्त्यात तर तेवढ्याने लगेच थायरॉईड/मेंदुवर दुष्परिणाम अशा समस्या व्हायला नको असे वाटते.

आयोडाईज्ड मीठ सुरु झाल्यापासुन थॉयरॉईड समस्या कमी झाली असा डेटा आहे का? जास्त आयोडिन खाल्ले तरी थायरॉईड समस्या होऊ शकते असेही संशोधन आहे. आपल्याकडे भरपूर मीठ खाल्ले जाते स्वपंपाका व्यतिरीक्त, लोणचे, पापड, बटर वगैरे मधुन. यामुळे जास्त आयोडिन पोटात जात असावे का?

दुसरे असे की जाडे/खडे मीठ आयोडाइज करायला काय प्रोब्लेंम आहे? त्याने काही आधीच असलेले मिनरल्स नष्ट कमी होणार नाहीत. कदाचित त्यांनी आणलेले जाड मीठ आयोडाइज्ड असेल, पाकीटावर बघा.

कॉलींग निवांत पाटील.

जाडे/खडे मीठ आयोडाइज करायला काय प्रोब्लेंम आहे? >> +1
इथे जाड मीठ म्हणजे इ. स. पूर्व काळात दारावर विकायला येणारं अन्प्रो सेसड मीठ हे गृहितक बरोबर आहे याची खात्री आहे का? मला वाटतं ते जाड मीठ ही प्रोसेसड च असू शकेल. हल्ली जाड मीठाचा बोलबाला असल्याने वस्तू विकण्यासाठी केलेली क्लृप्ती.

इथली चर्चा वाचून याबाबत निश्चित माहिती मिळवण्यासाठी म्हणून नेटवर शोधायला गेलो तर विविध संकेतस्थळांवर जाडे मीठ, काळे मीठ, सैंधव मीठ, mineral salt, karkach salt, black salt या व अशा संज्ञांचा सावळा गोंधळ वाचून गोंधळात अधिक भर पडली. अखेर ज्याला आपण इथे जाडे मीठ म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये kosher salt म्हणतात अशी खात्री पटली. त्याबाबत अधिक माहिती जमा करता हा लेख वाचावयास मिळाला. यानुसार दोन्ही मिठांचे महत्व आहे व दोन्हीही आहारात असायला हवीत (की असायला हरकत नाही?) असा निष्कर्ष निघतो:

https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/is-kosher-salt-...

चव सापेक्ष असते. त्यात परत भावना वगैरेची फोडणी पडण्याची शक्यता.
रँडमली इम्पलसिव्हली काही तरी आणावे. हिमालयन, पिंक, कोशर, आणि नेहेमीचं... आणि ममपणाला जागुन आता आणलंच आहे तर संपवूया करुन संपवावे. पॅक्डच आणावे., उगा पोत्यात भरलेलं आणू नये. समुद्रातल्या अशुद्धी पोटात जायची काही इच्छा नाही.

Lol ह.पा...
मलाही तेव्हढाच फरक समजला...

TDR can be purchased and sold; however, FSI cannot be sold in the market.

What is TDR in real estate?
सर्च इंजिन वर शोधायला लागलेला वेळ ७ सेकंद
प्रतिसाद लिहायला लागलेला वेळ ५८ सेकंद

टेलिग्राम इन्स्टॉल करून वापरायला आता व्हेरिफिकेशन कोड लागतो का? या आधी हे अ‍ॅप वापरले होते, तेव्हा असा कोड मागवल्याचे आठवत नाही.

हो.

टेलिग्राम हे व्हेरिफिकेशन कोड अधून मधून विचारते. तुम्ही कोड विसरला नाहीत ना, हे तपासण्यासाठी. दर वेळी विचारत नाही.

Screenshot_20241022_130723_Telegram.jpg

तुम्ही कोड विसरला नाहीत ना >> विसरला??? फोन हरवला नाही ना असं असेल. कारण मला तेच कोड पाठवतात. अर्थात टू स्टेप अनेक प्रकारे करता येतं.
व्हॉअ‍ॅला मी कोड सेट केलाय तो मला दर आठवड्याला विचार सांगून ठेवलंय.

जुन्या फोन मध्ये टेलिग्राम वापरलं होतं. नव्या फोनमध्ये इन्स्टॉल करतोय. कसल्या कसल्या परमिशन्स मागितल्या आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस करू म्हणाले. कॉल आला, तो घेऊ नका. आमचं आम्ही करू. पण ट्रु कॉलरने तो नंबर फ्रॉड असल्याचं फ्लॅग केलं, म्हणून मी कट करून अ‍ॅप लगेच अन इन्स्टॉल केलं.

ते हार्टचं चिन्ह म्हणून जो बदाम काढतात, त्याला हार्ट किंवा बदाम का म्हणतात? ते हार्टसारखंही दिसत नाही आणि खायच्या बदामासारखं तर मुळीच दिसत नाही.

पत्त्यांमध्ये त्याला बदाम पान म्हणतात.
आणि इंग्रजीत त्या पानांना हार्ट का म्हणत असतील यावर संशोधन व्हायला हवे.

दोन्हींचा संबंध पत्त्यांशी आहे.

कायमचे घनिष्ट सोबती असलेल्या अस्थमामुळे ताक, दही हे पदार्थ खाता येत नाहीयेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खाता येत नाहीत. उन्हाळ्यात दोन तीन महिने चालतात. अशा वेळी प्रोबायोटिक्स साठी काय खावे? (प्रो की प्री आत्ता लक्षात नाही)
तु नळी वर भाताची कांजी सजेशन लिस्ट मध्ये आली. त्यात दही सुद्धा घातले आहे बऱ्याच व्हिडीओत. ही करण्याची योग्य पद्धत कोणती? मायबोलीवर धागा सापडला नाही या पाककृतीचा. ही थंडीत प्यायली तरी चालते का? की कफकारक आहे. कुणाला माहिती आहे का? धन्यवाद.

अल्पना आणि अमितव यांनी गणेशोत्सवात काही पाककृती दिल्यात. त्या pro/ prebiotic असाव्यात >>> १०००+++

कोंबुचा, तेपाचे, काळ्या गाजराची कांजी ही नावं पटकन आठवली.

प्रीबायोटिक म्हणजे काही फायबर्सचे प्रकार जे गट बॅक्टेरियांचे खाद्य: सफरचंद केळी यांसारखी फळे, काही भाज्या, उकडुन फ्रिजमध्ये आठ तास ठेवुन मग वाटल्यास कोमट, गरम केलेले बटाटे, बटाटे भाजी.

तुम्ही विचारताय ते प्रोबायोटिक असावे बॅक्टेरिया असलेले पदार्थ.
वरच्या यादीत भर: किमची आणि फरमेंटेड ऑलिव्ह्ज सुपर मार्केट मध्ये मिळतात. द्रवामध्ये ठेवलेले हिरवे ऑलिव्ह्ज.

मानव, तुम्ही किती काय काय माहीत करून घेतलंय! आणि सांगताही नेमक्या शब्दांत आणि सोपं करून.
मी हे दोन शब्द विशेषतः गेले वर्षभर इतके वेळा ऐकलेत, तरी त्यांचा नेमका अर्थ माहीत करून घेतला नाही. Gut साठी चांगलं, एवढ्यावरच भागलं.

धन्यवाद भरत, माझेमन, मानव.
ते कोंबुचा, तेपाचे जमणारे नाही मला. काळया किंवा कुठल्याही गाजराची/ बिटाची कांजी प्रकृतीला थंड असते असं अल्पना यांच्या धाग्यात वाचलं. त्यामुळं तो पर्याय ही उपयुक्त नाही. मला तांदळाच्या भाताच्या कांजीच्या पारंपरिक कृतीबद्दलही कुणाला असली माहिती हवी होती.

मानव, तुम्ही किती काय काय माहीत करून घेतलंय! आणि सांगताही नेमक्या शब्दांत आणि सोपं करून. >>> +१
वाचल्यावर तेवढ्यापुरते लक्षात राहते. परत विसरल्या जाते.
किमची कधी बघितली नाही. परंतु मॉल मध्ये ते द्रव पदार्थात तरंगणाऱ्या बाटलीतल्या हिरव्या ऑलिव्ह चकत्या बघितल्या आहेत. ते फरमेंटेड असते किंवा काय असते ते माहित नव्हते. आत्ता समजले. घेऊन बघेन. धन्यवाद माहितीसाठी.

Pages