दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मदत हवी आहे मायबोलीकरानकडुन , Carpel Tunnel Syndrome बद्दल माहिती हवी आह. एका जवळ्च्या नातेवाइकाला surgery चा सल्ला दिला आहे. दुखण बर्‍यापैकी आणि बरेच दिवस चालु आहे, EMG आणि CT Scan झालय , Ortho ला दाखवलय आणि त्याने surgery चा सल्ला दिलाय. Surgery तील संभाव्य धोके , surgery नंतर काहि त्रास ह्याचा कोणाला काही अनुभव आहे का? surgery नंतर पुन्हा दुखण चालु व्हायची कीती शक्यता असु शकते ?
सल्यांबद्दल आगाउ धन्यवाद !!!

माझा फोन बदलला आहे. नविन फोनवर मायबोली अ‍ॅप डाऊनलोड करायला गेले तर गुगल प्ले स्टोर मधे अ‍ॅप सापडत नाहीये. अ‍ॅप कुठे शोधावे?

"अ‍ॅप कुठे शोधावे? "

गूगलने अँड्रॉईड ११ व त्या आधीच्या प्रणालींवर चालणारी ॲप्स स्टोर मधून काढून टाकली आहेत.

मायबोली ॲपचे शेवटचे अद्यतन २०१८ ला झाले होते. ती apk फाईल तुमच्या व्यक्तिगत ओळखीच्या माबो सदस्याकडून घ्यावी असं सुचवेन.

काही वेबसाईटस वरुनही ही apk फाईल डाऊनलोड करता येते. पण अशी apk file, ही Malware,trojan,virus free आहे का ते पडताळून मगच इंस्टॉल करावी.

मायबोली अ‍ॅप डाऊनलोड करायला गेले तर गुगल प्ले स्टोर मधे अ‍ॅप सापडत नाहीये. अ‍ॅप कुठे शोधावे?>> हाच प्रश्न पडला होता. आता कुणीतरी एपीके माबोकर शोधायला हवा.
धन्यवाद, सुनील.

मायबोली प्रशासन अधिकृत रित्या ते apk आपल्या साईट वर उपलब्ध करून मदत पुस्तिकेत तशी नोंद करणार असेल तर भविष्यात इतरांना अशी अडचण आल्यास त्याचा उपयोग होईल.

परवा रचना रानडेंच्या पॉड्कास्ट मधे ऐकले की कोणत्या ही बॅन्केत म्हणजे नॅशनलाईज्ड मधे सुद्धा फक्त पाच लाख एवढीच रक्क्म इन्शुअर्ड असते. हे खरे असेल तर अनेक खाती उघडावी लागतील. जास्त खाती उघड्ण्यावरही बंधन असते का?

जास्त खाती उघड्ण्यावरही बंधन असते का?>>
नाही. ( एकाच बँकेच्या दुसऱ्या शाखेत उघडल्यास इन्शुरन्स कव्हरेज अशी सगळी खाती मिळुन ५ लाखच असेल, तेव्हा वेग वेगळ्या बँकेत अकाउंट काढावे आणि त्या बँकेने DICGC इन्शुरन्स कव्हरेज घेतले आहे ना याची खात्री करावी.)
काही गोष्टी विचारात घ्या.
प्रत्येक अकाउंटला किमान शिल्लक ठेवावी लागेल.
प्रत्येक अकाउंटचा डेबिट कार्डचा खर्च किती बघावे.
आयकर परतावा वेळी सगळ्या खात्यांचे हिशेब करणे.

DICGC ची पाच लाख रुपये रक्कम २००८ च्या आधीपासून आहे. इन्फ्लेशन किती वाढले झाले, त्यानुसार रक्कमही वाढवायला हवी.

RBI च्या वेबसाईट वर FAQs मधे वेगवेगळे प्रसंग दिलेले आहेत. एकाच बँकेत joint account अ, ब आणि ब, अ असेल तर दोन वेगळी खाती धरले जातील.
https://www.rbi.org.in/commonman/english/Scripts/FAQs.aspx?Id=272

या पाच लाखांत व्याजाची रक्कम देखील समाविष्ट आहे Sad . पैसे गुंतवतांनाच total matured amount पाच लाखापेक्षा जास्त जाणार नाही याची काळजी घ्यायची.

<< DICGC इनशुरन्स सर्व नॅशनलाईज्ड बॅन्का घेतच असतील ना >>

----- सर्व राष्ट्रीयीकृत बँका . RBI च्या साईट वरुन,

"
1. Which banks are insured by the DICGC?

Commercial Banks : All commercial banks including branches of foreign banks functioning in India, local area banks and regional rural banks are insured by the DICGC.

Cooperative Banks : All State, Central and Primary cooperative banks, also called urban cooperative banks, functioning in States / Union Territories which have amended the local Cooperative Societies Act empowering the Reserve Bank of India (RBI) to order the Registrar of Cooperative Societies of the State / Union Territory to wind up a cooperative bank or to supersede its committee of management and requiring the Registrar not to take any action regarding winding up, amalgamation or reconstruction of a co-operative bank without prior sanction in writing from the RBI are covered under the Deposit Insurance Scheme. At present all co-operative banks are covered by the DICGC.

Primary cooperative societies are not insured by the DICGC.

शंका असल्यास त्या त्या बँकेत विचारायचेच.

मायबोली ॲपचे शेवटचे अद्यतन २०१८ ला झाले होते. ती apk फाईल तुमच्या व्यक्तिगत ओळखीच्या माबो सदस्याकडून घ्यावी असं सुचवेन. >>> कशी घ्यायची? त्या माबो सदस्याने ती कुठे शोधायची?

"कशी घ्यायची? त्या माबो सदस्याने ती कुठे शोधायची?"

Apk देणार्‍याला थोडा(!) खटाटोप आहे.

प्ले स्टोर वर apk extractor app आहे. ते डाऊनलोड करावं लागेल देणार्‍या
माबोकराला. ही प्ले स्टोर लिंक*

Apk extractor इंस्टॉल केल्या नंतर देणार्‍याच्या फोन मधील इंस्टॉल केलेल्या मायबोली ॲपची Apk फाईल Extract करुन निवडलेल्या फोल्डर मधे सेव्ह करता येते. तिथून कुणाशीही शेअर करता येते.

* हेच ॲप वापरले पाहिजे असं नाही.या प्रकारची अनेक ॲप्स प्ले स्टोअर वर आहेत. रेटिंग्ज आणि कॉमेंट्स बघून दुसरेही ॲप वापरले तरी चालते.

माझ्याकडे ही Apk आहे. ती मी VirusTotal या साईट वरुन स्कॅन केलेली आहे. जर कुणाला हवी असेल तर विपु करा.

Apk इतर कुठल्याही सिक्युरिटी सॉफ्टवेअर मधून चेक करून मगच इंस्टॉल करा अगदी माझ्याकडून घेतली तरी.

⭕️ ता.क. कुणीतरी जाहिरातींचा उल्लेख केला आहे. सध्या तरी एकही जाहिरात माबो ॲपवर दिसत नाही.

लोकसत्ताच्या लोकरंग की चतुरंग पुरवणीन जेष्ठांच्या लग्न/लिव्ह इन संकल्पनेवर प्रसिध्द समाजसेविका/लेखिकेच सदर यायचं … लिंक प्लीज

लोकसत्ताच्या लोकरंग की चतुरंग पुरवणीन जेष्ठांच्या लग्न/लिव्ह इन संकल्पनेवर प्रसिध्द समाजसेविका/लेखिकेच सदर यायचं … लिंक प्लीज

लोकसत्ताच्या लोकरंग की चतुरंग पुरवणीन जेष्ठांच्या लग्न/लिव्ह इन संकल्पनेवर प्रसिध्द समाजसेविका/लेखिकेच सदर यायचं>>>>>>>सरिता आवाड चतुरंग मध्ये "ज्येष्ठांचे लिव्ह इन" नावाने सादर लिहायच्या.

https://www.loksatta.com/chaturang/jyesthanche-live-in-author-sarita-ava...

ह्या विषयी कोणाला काही माहिती आहे का? जर धाग चुकला असेल तर योग्य धाग सुचवा , मी तिथे हलवेन हा प्रश्न..

"एक मदत हवी आहे मायबोलीकरानकडुन , Carpel Tunnel Syndrome बद्दल माहिती हवी आह. एका जवळ्च्या नातेवाइकाला surgery चा सल्ला दिला आहे. दुखण बर्‍यापैकी आणि बरेच दिवस चालु आहे, EMG आणि CT Scan झालय , Ortho ला दाखवलय आणि त्याने surgery चा सल्ला दिलाय. Surgery तील संभाव्य धोके , surgery नंतर काहि त्रास ह्याचा कोणाला काही अनुभव आहे का? surgery नंतर पुन्हा दुखण चालु व्हायची कीती शक्यता असु शकते ?
सल्यांबद्दल आगाउ धन्यवाद !!!"

माझ्या एका जवळच्या व्यक्तीला Carpel Tunnel Syndrome चा त्रास झाला होता.
सुरुवातीला नीट निदान झाले नाही. तळहातावर स्टिरॉइड इंजेक्षने वगैरे घेतली. पण फायदा झाला नाही. नंतर तर हाताने काहीही उचलता येत नव्हते. शेवटी डॉक्टर बदलल्यावर निदान झाले. आणि सर्जरी केली. त्याचे काय धोके वगैरे डॉकटर ने सांगितले असतील पण मला माहित नाही.
त्यानंतर हा त्रास पूर्ण गेला. आता सुमारे १५+ वर्ष झाली असतील, त्या व्यक्तीला हाताचा त्रास नाहीये. बारीक काम वगैरे देखील करू शकते.

चांगले डॉकटर असतील आणि निदान योग्य असेल तर तुम्हाला देखील फायदा होईल. शुभेच्छा.

फक्त स्वतच्या वाचनाकरिताच असलेला आणि खोलीतील इतर मेंबरांना (बच्चे कंपनीची झोप मोड होणार नाही असा) त्रास होंणार नाही असा नाइटलॅम्प असतो का ? असल्यास ऑनलाइन / ऑफलाइन कुठे मिळेल ?

bookmark light मिळतो amazon वर.. वापरला आहे..पुस्तकाला लावून वाचता येते..

Pages