Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जयदेव पंचवाघ लोकसत्ता सदर न
जयदेव पंचवाघ लोकसत्ता सदर न चुकता वाचायचे.
वैद्यकीय क्षेत्रातली विविध स्कॅनिंग मशीन्स, त्यांचे शोध कसे लागले वगैरे माहिती मस्त होती. त्याआधारे वैद्यकीय क्षेत्राची वाटचाल, वेळोवेळचे वादविवाद, त्यातून संशोधन, तंत्रज्ञान पुढे जात राहणं वगैरे चांगलं सांगितलं होतं.
स्टोरीटेलिंग म्हणून खूप काही ग्रेट नव्हते ते लेख, मात्र ती माहितीच अभिनव होती त्यामुळे वाचायला मजा यायची.
प्रोजेक्ट हेल मेरी बाय अँडी
प्रोजेक्ट हेल मेरी बाय अँडी वियर
हि एक वैज्ञानिक (साय-फाय जौनरची) कादंबरी आहे. पृथ्वीवर एक संकट येते आणि सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. (तो धोका काय आहे व टाळतो का, हे स्पॉईलर होईल म्हणून देत नाही.) कथा दोन काळामध्ये व दोन ठिकाणी घडते. पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी आहे. त्यामुळे संवादी वाटते व वाचायला मजा येते. भाषा सोपी व ओघवती आहे. अवघड शब्द जवळपास नाहीत. वाक्ये छोटी व सुटसुटीत आहेत. प्रकरणांची लांबी मर्यादित आहे. त्यामुळे वाचन सुलभ होते. भौतिकशास्त्राचे आवड व माहिती असेल तर वाचायला आणखीन मजा येते. पण माहिती नसेल तर आस्वादात कमतरता येईल असे मला तरी वाटत नाही. जवळपास सर्व ठिकाणी सोप्या शब्दात स्पष्टीकरण दिले आहे. विज्ञान कथा कादंबऱ्या आवडणाऱ्यांसाठी हे एक चांगले पुस्तक आहे.
घाचर घोचर (मूळ कन्नड लेखक-
घाचर घोचर (मूळ कन्नड लेखक- विवेक शानभाग, इंग्रजी अनुवाद- श्रीनाथ पेरूर, स्टोरीटेलवर अभिवाचन- दर्पण मेहता)
(ललिता-प्रीतिने या पुस्तकाबद्दल मागे एकदा लिहिलं होतं.)
छोटंसं, पण गाजलेलं पुस्तक आहे. प्रथम पुरुषी निवेदन आहे. मला या पुस्तकाचे तीन ठळक भाग जाणवले- पहिला म्हणजे कॉफी हाऊसबद्दलचा, दुसरा निवेदकाच्या कुटुंबाबद्दलचा (आई, वडील, बहीण, काका) आणि तिसरा त्याच्या आणि त्याच्या बायकोमधल्या नात्याचा.
कमी उत्पन्नात काटकसरीने राहून जगणारं एक कुटुंब. अचानक त्यांच्यावर एक आपत्ती येते, पण ती इष्टापत्ती ठरते आणि ते अचानक श्रीमंत होतात. परिस्थितीत झालेला हा अचानक बदल त्या कुटुंबाला पचत नाही, असंच म्हणावं लागेल. पूर्वीचे दिवस खूप मागे पडून जातात, ते कष्टाचे दिवस आता नाहीत, याचं सुख असलं तरी त्याबरोबरच अजूनही काही चांगलं मागे पडून जातं.
जेव्हा दोन व्यक्तींचं लग्न होतं, तेव्हा ते दोघे एकमेकांना किती कमी ओळखत असतात! आपल्या नवऱ्याच्या किंवा बायकोच्या एखाद्या कृतीमागे, एखाद्या वाक्यामागे, विचारामागे खूप गुंतागुंतीचा इतिहास असू शकतो याची जाणीव चटकन आपल्याला होतेच असं नाही.
एखाद्या अनोळखी व्यक्तीला, जरी तो आपला जोडीदार असला तरी संपूर्णपणे समजून घेणं हे खूप कठीण आहे, हे आपल्याला हे पुस्तक वाचताना (ऐकताना) तीव्रतेने जाणवतं.
लेखनाची शैली मला अतिशय आवडली. सविस्तर, पण शब्दबंबाळ नसलेली, नेमक्या शब्दांमधली वर्णनं आहेत.
घाचर घोचर म्हणजे सोडवण्याच्या पलीकडे गेलेला गुंता. हा शब्द या पुस्तकातच निर्माण झालेला आहे. पुस्तकाचा शेवट पुस्तकाच्या नावाला साजेसाच आहे.
एकंदरीत पुस्तक खूप आवडलं! मी काही काळापूर्वी मूळ कन्नड पुस्तक ऐकण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच समजेना. आता पुन्हा एकदा ऐकून बघणार आहे.
'खिडक्या अर्ध्या उघड्या' -
'खिडक्या अर्ध्या उघड्या' - गणेश मतकरी
मी हे पुस्तक स्टोरीटेलवर ऐकलं. तसं म्हटलं तर कथासंग्रह आहे, पण सगळ्या कथा, कथांमधली पात्रं एकमेकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडलेली आहेत. हा एक वेगळाच प्रयोग आहे. निदान मी तरी असं कुठलं पुस्तक आत्तापर्यंत वाचलं नव्हतं.
सानिका, निरंजन आणि अनंत ऊर्फ अंत्या या तीन आर्किटेक्ट्सची कंपनी, एस.एन.ए. ही या सर्व कथांना जोडते असं म्हणायला हरकत नाही. सानिका, तिचा लिव्ह-इन पार्टनर सुश्रुत, त्यांचा कुत्रा आपल्या मांजराला त्रास देतो म्हणून तक्रार करणाऱ्या जोशी काकू, अंत्याचा मुलगा रोहन, त्याची मैत्रीण सौम्या, तिची बहीण रीधिमा, तिचे मित्र रमाकांत आणि हर्ष, निरंजन, त्याची असिस्टंट नीता, सानिकाची दुरावलेली मैत्रीण स्वरूपा, असे अनेक कोन या सगळ्या कथांमधून समोर येतात.
सगळी पात्रं एकमेकांना जोडली तर एक जाळं (नेटवर्क) तयार होईल. तरीही ही कादंबरी नाही, कारण एकच एक गोष्ट अशी सांगता येणार नाही. तसं म्हटलं तर एस.एन.ए. ही फर्म आणि त्यात घडलेल्या घडामोडी हे एक सूत्र आहे, पण सगळ्याच पात्रांवर काही ते परिणाम करत नाही.
प्रत्येक पात्राचा स्वभाव, जगाकडे बघण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ती ती पात्रं त्या त्या कथेत ताकदीने उभी राहतात, आपण आधीच्या कथेत दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडे बघितलं असलं तरीही.
गणेश मतकरींची लेखनाची शैली मस्त आहे. मला आवडली. मी यापूर्वी दिवाळी अंकात त्यांच्या कथा वाचल्या आहेत बहुतेक. ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी केलेली ठिकाणांची, दृश्यांची वर्णनं अस्सल वाटतात.
या कथांमध्ये असलेल्या स्त्री पात्रांना अजिबात टिपिकल बनवलेलं नाही, ही एक विशेष आवडलेली बाब आहे.
अभिवाचन विविध कलाकारांनी केलं आहे. विक्रम गायकवाड आणि शर्वाणी पिल्ले ही दोन नावं ओळखीची होती. अभिवाचन तसं चांगलं आहे, पण मी जमलं तर हे पुस्तक वाचणारही आहे. 'ऐकणं' जरा अपुरंच वाटलं.
खिडक्या अर्ध्या उघड्या' -
खिडक्या अर्ध्या उघड्या' - गणेश मतकरी>>> हे वाचायला आवडलं होतं. गणेश मतकरींचे लिखाण आवडायला लागलं आहे.
ते फेसबूक वर पुस्तकांबद्दल लिहितात, त्या त्यांच्या पोस्ट खूप आवडतात.
खिडक्या अर्ध्या उघड्या' -
खिडक्या अर्ध्या उघड्या' - गणेश मतकरी>>> हे वाचायला आवडलं होतं....+१.
घाचर घोचर इंग्रजी वाचलेलं आणि
घाचर घोचर इंग्रजी वाचलेलं आणि आवडलेलं.
खिडक्या अर्ध्या उघड्या मला
खिडक्या अर्ध्या उघड्या मला फार आवडलं होतं.
खिडक्या अर्ध्या उघड्या मला
खिडक्या अर्ध्या उघड्या मला फार आवडलं होतं. <<<>>>>> मलापण. त्यांचं अजून एक पुस्तक वाचलं आहे, नाव आठवत नाहीये, बघायला हवं.
वावे, दोन्ही परिचय आवडले.
वावे, दोन्ही परिचय आवडले.
खिडक्या अर्ध्या उघड्या - आवडतं पुस्तक. मी दोनवेळा वाचलंय. या कथा आधी अनुभव अंकात दर महिन्याला एक अशा प्रकाशित झाल्या. तेव्हा मी अनुभवची वर्गणीदार होते. दर महिन्याला अंक आला की आधी या कथेचं पान उघडलं जायचं. (म्हणजे तसं एकूण तीन वेळा मी हे पुस्तक वाचलंय.
)
गणेश मतकरींचे कथासंग्रह आवडतात - इन्स्टॉलेशन्स, बटरफ्लाय इफेक्ट - हे दोन माझ्याकडे आहेत. दोन्ही छान आहेत.
आणखी एक आहे, आत्ता नाव आठवेना.
बटरफ्लाय इफेक्ट ... हे
बटरफ्लाय इफेक्ट ... हे पुस्तकही छान आहे.
बटरफ्लाय इफेक्ट वाचलंय. ते पण
बटरफ्लाय इफेक्ट वाचलंय. ते पण आवडलं होते. इन्स्टॉलेशन्स वाचलं नाही अजून.
ललिता-प्रीति
ललिता-प्रीति
बघते आता त्यांची बाकीची पुस्तकं.
गणेश मतकरींचे कथासंग्रह
गणेश मतकरींचे कथासंग्रह आवडतात - इन्स्टॉलेशन्स, बटरफ्लाय इफेक्ट - हे दोन माझ्याकडे आहेत. दोन्ही छान आहेत.
आणखी एक आहे, आत्ता नाव आठवेना. >> शेल्फी का ?
Button Button. Uncanny
Button Button. Uncanny Stories.
Richard Matheson.
ह्या पुस्तकातील “Button Button.” ही कथा वाचण्याचा योग आला. ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक लिहीतो “ह्या कथेची कल्पना मला माझ्या पत्नीकडून मिळाली. ती मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना वर्गात एका प्रयोगाची चर्चा झाली. समजा तुम्हाला जर कोणी आवाहन केले कि न्यू यॉर्कच्या ब्रॉडवे वरून तुम्ही नग्न अवस्थेत चालत गेलात तर जगात शांतता नांदेल. तुम्ही हे आव्हान स्वीकाराल?”
“बटन बटन” ह्या कथेचा थोडक्यात गोषवारा असा आहे. मिस्टर आणि मिसेस लेविस ह्याना एक पार्सल पोस्टाने येते. पार्सलचया आत काचेच्या घुमटात एक पुश बटन असते. आणि एका लिफाफ्यात संदेश असतो.
“मिस्टर स्टेवार्ड रात्री आठ वाजता आपल्याला भेटतील.”
रात्री खरच त्याना भेटायला एक माणूस- मिस्टर स्टेवार्ड- येतो. लेविस दांपत्या त्याला सेल्समन समजतात आणि त्याला हाकलायचा प्रयत्न करतात.
पण तो त्याना मोहात पाडेल अशी ऑफर देतो. ऑफर अशी असते कि त्यांनी ते बटन दाबले की जगात कुठेतरी एका माणसाचा मृत्यू होईल. त्यांना माहित नसलेल्या कुणा एका अज्ञात व्यक्तीचा. त्याच्या बदल्यात त्यांना ५०००० डॉलर्स मिळतील.
त्यावरून नवरा बायकोंमध्ये वाद होतात. पत्नीचे म्हणणे असते कि बटन दाबावे. नाही तरी जगात कित्येक लोक मरत आहेत. आपण बटन दाबले नाही तरी मृत्यू व्हायचे काही थांबणार नाहीये. ज्यांचा मृत्यू होईल त्याची नि आपली ना ओळख ना देख. जगात भुकेले, रोगराईने ग्रस्त, दुर्दैवी जीव आहेत. मरेल त्यातला एक. सुटेल बिचारा.”
नवऱ्याच्यामते बटन दाबणे म्हणजे खून करण्या सारखे आहे, अनैतिक आहे. तो ह्याला राजी नसतो.
खर तर त्यांना पैशाची गरज नसते. पण जेव्हा संधी चालून येते तेव्हा त्या स्त्रीला पैशाचे मोल पटते. त्यांची अपुरी स्पप्ने साकार करण्याची संधी आयती समोर आली असते.
शेवटी नवरा कामावर गेला असताना ती बटन दाबते. काय झाले? काही नाही. सो सिम्पल!
थोड्या वेळात तिला हॉस्पिटल मधून फोन येतो. मिस्टर लेविस ट्रेन च्या अपघातात मरण पावले असतात. ते ऐकून ती सरभैर होते. दुःखाने बेदीपिशी होते.
यथावकाश तिच्या खात्यात विम्याचे ५०००० डॉलर्स क्रेडिट झाले असतात.
नंतर जेव्हा मिस्टर स्टीवर्ड चा फोन येतो तेव्हा ती रागावून त्याला विचारते, “पण तुम्ही तर सांगितलं होतं कि कुणा अपरीचिताचा...”
मिस्टर स्टीवर्ड शांतपणे तिला विचारतो, “My dear lady, do you really think you knew your husband?"
तुम्हाला ही कथा नेटवर मिळेल अवश्य वाचा.
आता पूर्ण कथा संग्रह मिळवून वाचतो. काही खास मिळाले तर इथे लिहीन.
'कोणीतरी मरेल' लिहिलंत
'कोणीतरी मरेल' लिहिलंत तेव्हाच शंकेची पाल चुकचुकलेली. पण छान असेल कथा.
हे पुस्तक नाही दिसते पण ऑफ बीट, आणि त्याच्या स्टोरीजच्या कलेक्शनचं पुस्तक दिसतंय लायब्ररीत ते होल्ड वर ठेवलंय. वाचतो.
अमितव
अमितव
कथेचा गाभा असा आहे कि माणूस कुठल्या मर्यादे पर्यंत मुल्यांची जपवणूक करेल.? ही कथा "twilight Zone" TV सिरीअल (कदाचित सिझन २) मध्ये आहे असे वाचले आहे, कुठल्या तरी OTTवर निश्चित मिळेल.
अजून एक सिफारिश.
"Ray Bradbury Theatre" ही TV सीरिअल पहा. यू ट्यूब वर आहे. प्रत्येक एपिसोड अत्यंत बघणीय आहे.
'बटण बटण' कथेचा परिचय आवडला
'बटन बटन' कथेचा परिचय आवडला केकू. मागे तुमच्याच एका कथेमुळे Ray Bradbury ची एक कथा वाचली होती.
आभार. ती Pedestrian असणार. ती
आभार. ती Pedestrian असणार. ती मी अस्मिताला रेकमेंड केली होती.
हो, मलाच रेकमेंड केली होती.
हो, मलाच रेकमेंड केली होती. छान होती.
बटण बटण सारखी पण किंचित वेगळी
बटण बटण सारखी पण किंचित वेगळी, एक हिंदी कथा दूरदर्शनवर बघितलेली. त्यात शेखर कपूर आणि रिमा लागू होते. त्यात मात्र अपरीचित कोणीतरी मरतो. नंतर ते मशीन दुसरा कोणीतरी वापरणारच जगात कुठेना कुठे, जो शेखर कपूरला हे मशीन देतो तो म्हणतो की दुसऱ्या कोणीतरी बटण दाबले की उद्या एखादवेळेस तुझ्या जवळचे कोणीतरीही मरु शकतं, ती तुझी बायकोही असू शकेल. साधारण आठवतंय असं.
धर्मानंद कोसंबी यांचं 'निवेदन
धर्मानंद कोसंबी यांचं 'निवेदन' हे आत्मवृत्त वाचलं. आवडलं.
१८७६ साली गोव्यातल्या एका मराठी कुटुंबात कोसंबी जन्मले. लहानपणी बुद्धचरित्राची एक छोटेखानी पुस्तक वाचनात आलं आणि त्यांचं कुतुहल जागं झालं. त्यांनी ठरवलं की पाली भाषा आणि बौद्ध तत्वज्ञानाचं ज्ञान मिळवायचं. ते जिवितकार्य म्हणून स्वीकारलं.! एकविसाव्या वर्षी घर सोडलं. आणि पायपीट चालू केली.
बौध्दज्ञान गोळा करीत पुणे, इंदौर, काशी, गया, लुंबिनी, नेपाळ, मंडाले, रंगून, ब्रह्मदेश, तिबेट, श्रीलंका अशी उभीआडवी भटकंती केली. हा सव्वाशे वर्षांपूर्वीचा प्रवास.! प्रवासाची साधनंही नव्हती. पैसे तर अजिबातच नव्हते. कफल्लक अवस्थेत दहाएक वर्षं भिख्खू होऊन भटकंती करत राहिले. विपरीत परिस्थितींमुळे, प्रसंगांमुळे मन मोडून पडू दिलं नाही. घेतला वसा टाकला नाही. त्यापायी ज्या हालअपेष्टा, अपमान, शरीराची हेळसांड भोगली, तपसाधना केली, ते वाचताना जाणवतं की हे सामान्य माणसाच्या कुवतीबाहेरचं काम आहे. ज्ञानलालसा खरी चेतलेली असेल तर त्यासाठी एखादा माणूस काय काय करू शकतो, याचं धर्मानंद कोसंबी हे उत्तम उदाहरण आहेत.
कालांतराने ते बौद्धधर्म आणि पाली भाषेचे प्रकांड पंडित म्हणून नावारूपाला आले. मिळवलेलं संचित स्वतःपुरतं न ठेवता वाटायला सुरुवात केली. देशी विदेशी व्याख्यानं दिली. संदर्भग्रंथ लिहिले. कलकत्ता विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, पुण्यात फर्ग्युसनमध्ये, आणि हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. विद्यापीठांतून, ज्ञानक्षेत्रांतून, अकादमिक वर्तुळांतून लुप्त झालेली पाली भाषा पुनरुज्जीवित करण्याचं बरंचसं श्रेय त्यांच्याकडे जातं. पुढं ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले.
एवढा मोठा विद्वान माणूस, पण लिहिण्यात अहंता, दंभ जाणवत नाही. सगळ्याच मोठ्या माणसांच्या ठायी असणारा हा एक विलोभनीय गुण, यांच्या चारित्र्यातही दिसून येतो.
संप्रति१
संप्रति१
ह्या सहृदय परीचया बद्दल आभार!
आता थोडी गंमत.
शाळेच्या शेवटच्या वर्षी D D कोसंबी ह्यांची पुस्तके वाचली होती. त्यात कोसांबींनी हनुमान टेकडी ते चतुःशृंगी ह्या डोंगरांच्या रांगेवर अश्म युगातील मानव रहात होते, तिथे त्यांची दगडी हत्यारे सापडतात. असे काहीतरी लिहिले होते. त्या वेळी मी एका नातेवाईकाच्या कृपेने डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाला भेट दिली होती. आणि लगेच ठरवले कि मोठा झालो तर ह्या विषयातला तज्ज्ञ तद्न्य व्हायचे. तिथेच पाषाण युगातली हत्त्यारे ठेवली होती. वर ते पुस्तक. एकदम भारावून गेलो. आणि मोहीमेवर निघालो. हनुमान टेकडी, फर्गसन हिल, चतुःशृंगी इत्यादी पालथी घातली आणि हत्त्यारे काबीज करून श्री म श्री माटे (प्रसिद्ध लेखक श्री. म. माटे ह्यांचे सुपुत्र) पुरातत्वतज्ञ ह्याना अभिमानाने दाखवली. ते स्वभावाने चांगले होते. ते एवढेच म्हणाले कि खूप अभ्यास करावा लागेल.
तेव्हा पासून प्रत्येक दगड हे शस्त्र नसते हे तत्व मनावर बिंबले. असो.
तेव्हापासून D D कोसंबी हे प्रचंड व्यक्तिमत्व मनात ठसले, एक माणूस किती विषयांचा तज्ञ असावा? संख्या शास्त्र, गणित, पाली भाषा, पुरातत्व विज्ञान, जेनेटीक्स, फिलोलोजी(?) बौद्ध धर्म...
यथावकाश उलगडा झाला. D D कोसंबी ह्या दोन व्यक्ति होत्या. वडील धर्मानंद दामोदर कोसंबी आणि सुपुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी! प्रत्येकाची कार्यक्षेत्रे भिन्न होती.
संप्रति, परिचय आवडला.
संप्रति, परिचय आवडला. कोसंबींच्या मुलांपैकी कोणाचा तरी उल्लेख अन्य एका व्यक्तीवरच्या लेखात वाचल्याचं आठवतं. दोघांचीही नावं आठवत नाहीत.
संप्रति१
संप्रति१
ह्या सहृदय परीचया बद्दल आभार! >> १०००+
संप्रति आणि केशवकूल
संप्रति आणि केशवकूल माहितीसाठी धन्यवाद
नुकत्याच पुण्यात झालेल्या
नुकत्याच पुण्यात झालेल्या ब्राईट्सच्या सम्मेलनात दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यातल्या तर्किष्टचे मुखपृष्ट, अनुक्रमणिका आणि इतर काही डिटेल्स येथे देतो आहे. पुस्तकात माझ्या एका भाषणावर आधारीत लेख आहे: 'ग्रहताऱ्यांची उपासना कशाला करायची?' पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे इतरांचे सुंदर लेख - कदाचित तुमच्या विचारांना चॅलेंज करणारे, पण त्याच वेळी तुम्हाला विचार करण्यास उद्युक्त करणारे - वाचायला मिळतील. येथे मिळेल जरूर वाचा.


धन्यवाद अश्चिग. बघतो.
धन्यवाद अश्चिग. बघतो.
थँक्यू अश्चिग. चेक करते.
थँक्यू अश्चिग. चेक करते.
By the Time You Read This, I
By the Time You Read This, I'll Be Dead - Julie Anne Peters

डिलन टीन-एजर आहे, आणि ती आतून पूर्णपणे उन्मळुन पडली आहे. दोन वेळा असफल आत्महत्येचा प्रयत्न करुन झाल्यावर या खेपेला हा निर्णय तडीस न्यायचाच अशा निश्चयाने ती अशा 'पूर्णत्त्वास' नेलेल्यांची साईट डब्लूडब्लूडब्लू. थ्रू-द-लाईट.कॉम वर खातं उघडून ती रोजची रोजनिशी लिहू लागते. उतरत्या भाजणीने २८ पासून १ आणि मग शून्य दिवसांपर्यंत.
त्यासाईटवर ती तिच्या बुली झालेल्या भूतकाळाबद्दल लिहिते अगदी बालवाडीपासूनचे कातर अनुभव लिहिते. तटस्थपणे. कुठे न उघडलेल्या जखमा लिहिते. त्याला वाचक कोणी नसतातच कारण सगळेच आपापली आपली वादळं घेऊन आलेले असतात. तिच्या स्थूलपणाबद्दल, आई बाबांबद्दल, शाळेतल्या, कँंप मधल्या एकेक अनुभवांबद्दल लिहिते. त्यातच आपल्याला समजते की डिलनला बोलता येत नाहीये. का? त्याचा ही उलगडा होतो.
दोन आत्महत्या प्रयत्नांमुळे ती २४ तास वॉच वर असते. शाळेतून घरी येताना तिचे आई/ बाबा येईपर्यंत ती शाळेबाहेरच्या बागेतल्या बाकावर बसून पुस्तक वाचत त्यांची वाट बघत असते. त्याच बाकावर सँटाना नावाचा मुलगा ही बसतो. रोजच बसतो. ती तुझ्यात रस नाही हे सँटानाला आधी पासून क्लिअर करते, पण सँटाना सोडायला तयार नसतो, आणि डिलनच्या मनाची कवाडं आता कधीच न उघडण्यसाठी बंद झालेली असतात.
बुलींगचा मुलांच्या मनावर काय आणि कसा परिणाम होतो आणि ते कसं मुलांना कड्याच्या टोकावर आणून सोडतं हे फार कमी शब्दांत लेखिकेने दाखवलं आहे. पुस्तक वाचकांचा आदर ठेवून अनुभव पचायला हलके, किंवा समजायला सोपे करत नाही. पुस्तक संपलं तरी मनातली रुंजी संपत नाही.
१६ वर्षांखालील मुलांना वाचायला द्यायचं असेल तर तुम्ही आधी वाचा असं सांगेन. मला आवडलं.
Pages