Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
(No subject)
उद्देश पांडित्य प्रदर्शनाचा
उद्देश पांडित्य प्रदर्शनाचा नाही, तर चांगल्या/ आवडलेल्या पुस्तकांची/लेखकांची नावं इतरांपर्यंत पोचावीत हा आहे.>>>. बापरे,दांडगे वाचन आहे.
संप्रति - धन्यवाद या
संप्रति - धन्यवाद या माहितीबद्दल. यातली एक दोन नक्कीच वाचून बघायची आहेत. कदाचित आधी गीत चतुर्वेदींचेच एखादे, कारण ती नवीन असावीत. बाकी इतर हिंदी लेखक ऐकून माहीत आहेत. शाळेत एक दोन धडेही असतील त्यांचे. पण पूर्ण पुस्तक कोणाचेच वाचलेले नाही. तुम्ही म्हणताय तसा ह्रिदम जुळला, तर मोठा खजिनाच उघडेल.
नरसिंहावलोकन नाव भारी आहे!
वावे
चार्ल्स व्हिलन यांचे नेकेड
चार्ल्स व्हिलन यांचे नेकेड इकॉनॉमिक्स हे पुस्तक वाचले . अत्यंत सध्या , सोप्या , रंजक भाषेत उदाहरणासहित अर्थशास्त्रातील संकल्पना समजावून सांगितल्या आहेत . अर्थशास्त्रातील क्लिष्टता टाळून लिहिलेले हे पुस्तक आहे . भारताचा उल्लेख बऱ्याच वेळा येतो. विकसनलशील देशांना विकासात येणाऱ्या अडचणींबद्दल सुद्धा लिहिले आहे. अर्थशास्त्र हे आपल्या जीवनाशी, सुख- दुख: यांच्याशी कसे जोडले आहे हे कळते . या पुस्तकाचा मराठीत सुद्धा अनुवाद झाला आहे .
संप्रति यांच्या डोंगरासमोर
संप्रति यांच्या डोंगरासमोर माझा लहानसा दगड
इथे टाकी म्हणजे टॉकी- सिनेमा)
२०२४ मध्ये वाचलेली पुस्तकं
अमलताश - डॉ. सुप्रिया दीक्षित, आत्मचरित्र. उदास केलं या पुस्तकाने. मनातल्या प्रतिमा भंगल्या. मी तितकीशी भाबडी नसूनही.
एक दुर्लभ स्नेह - श्री. ना. पेंडसे, लेखसंग्रह. मस्त पुस्तक, फक्त संपादनाकडे लक्ष द्यायला हवं होतं.
थोरली पाती - ग.दि. माडगूळकर, लेखसंग्रह. छान पुस्तक आहे. यातला 'औंधाचा राजा' हा लेख मला दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. ( बाळ, तू टाकीत जा. - संदर्भासहित स्पष्टीकरण द्या
दुस्तर हा घाट आणि थांग - गौरी देशपांडे, दोन लघुकादंबऱ्या आहेत. जबरदस्त, amazing आहेत. ठरवलं तर व्यक्ती किती मुक्त असू/होऊ शकते, याचं उदाहरण म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा.
Jonathan Livingston Seagull - Richard Bach
)
The little prince - Antoine de Sainte-Exupéry
ही दोन पुस्तकं एका मित्राने वाचायला दिली. दोन्ही खूप आवडली. पहिल्या पुस्तकात एका सीगलची गोष्ट आहे, जो फक्त पोटापाण्यापुरतं उडण्याचं नाकारून अधिकाधिक वेगाने, कौशल्याने उडण्याचा ध्यास धरतो. फार सुंदर पुस्तक आहे.
दुसरंही सुंदर आहे. मनातलं लहान मूल जागं करणारं. ( मला पुलंच्या दिनेशमधला तो भाग आठवला, ज्यात दिनेश कोचाची गाडी करून खोटं खोटं प्राणिसंग्रहालयात जातो आणि प्राण्यांशी गप्पा मारतो. तेव्हा पुलं लिहितात की तो एक क्षण मला सापडल्यासारखा वाटतो आणि मलाही तिथे प्राणी दिसायला लागतात. जगातल्या साऱ्या कलानिर्मितीचे रहस्य मला हाती लागल्यासारखे वाटते, पण तो क्षण मला धरून ठेवता येत नाही.
आता ऑडिओबुक्स.
घाचर घोचर - मस्त आहे. इंग्रजी ऐकलं. मूळ कन्नड, विवेक शानभाग.
खिडक्या अर्ध्या उघड्या - गणेश मतकरी, कथासंग्रह आहे, पण कथांमधली पात्रं एकमेकांशी जोडलेली आहेत.
जाता येता- सुहास शिरवळकर, अजिबात आवडलं नाही.
दस्तावेज मंटो -१ - उर्दू. कथा. अत्यंत प्रभावी. याचे पुढचे भाग ऐकायचे आहेत.
बहुतेक एवढीच वाचली.
@संप्रति१
@संप्रति१
हे तुमचे वाचन कॉम्प्लेक्स देणारे आहे. यातले कित्येक लेखक व विषयकल्पना माहीतही नाहीत. अर्थात हा माबुदो. या पुस्तकांबद्दल कुतूहल निर्माण झालेय. त्याबद्दल धन्यवाद
Jonathan Livingston Seagull - Richard Bach
@वावे >>>> माझ्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचे आहे.
बंगाली लेखक अमिताभ घोष इंग्रजीत लिहितो. काय पुस्तकं असतात. संशोधन आणि पात्र, घटना चोख >>> हो काही इतिहास तर त्याच्यामुळे समजला. उदा. ब्रह्मदेशातूनही भारतिय निर्वासित केले गेले वगैरे. आपली हेलन तिकडूनच आली आहे बहुतेक.
हमरस्ता नाकारताना - सरिता आवाड - हे पुस्तक प्रदर्शित झाले त्यावेळी सरिता आवाड यांचे लेख लोकसत्तामध्ये आले होते. ते वाचून त्यांचे लिखाण काहीसे आक्रस्ताळी असावे असे वाटले होते. त्यामुळे कधी त्या वाटेला गेले नाही. आता परत एकदा ट्राय करेन.
चार्ल्स व्हिलन यांचे नेकेड इकॉनॉमिक्स हे पुस्तक वाचले.
@माबो वाचक >>>मस्त आहे हे पुस्तक. त्याचेच नेकेड मनी पण वाचनीय आहे.आणि बॅलन्स शीटचे बेसिक्स समजून घ्यायचे असतील तर अनिल लांबा यांचे 'रोमांसिन्ग विथ बॅलन्स शीट'.
फ्रीकोनॉमिकस पण चांगले आहे. आणि १९२९ चे अमेरिकेतील ग्रेट डिप्रेशन, अमेरिकेतील फेड्सची निर्मिती, त्यातील जे पी मॉर्गनचा रोल, त्याच सुमारास युरोपची अर्थव्यवस्था व त्यातले प्रॉब्लेम्स, पहिल्या महायुद्धाने झालेली जर्मनीची आर्थिक ढासळण व त्यातून हिटलरचा उदय हे समजून घेण्यासाठी 'द लॉर्ड्स ऑफ द फायनान्स'
आणि कुणाला डेरीव्हेटीव्हस समजून घेण्यात इंटरेस्ट असेल तर खादीर शेख व मुराद चौधरी यांचे Managing Derivative Contracts
गेल्या वर्षात कधीतरी 'पिंजर' वाचले. छोटेखानी पुस्तक आहे पण इतके चित्रदर्शी पुस्तक आहे की चित्रपटासाठी स्क्रीनप्ले लिहायची गरज भासली नसेल.
संप्रतींची यादी वाचून बाब्बो
संप्रतींची यादी वाचून बाब्बो असे झाले, खरे तर हेवाच वाटला.
वावेची यादी पण मस्त!
सध्या माझ्या मनाला कंटेंपरी रोमान्स पलीकडे काहीच सोसत नाहीये, दोन घटका एस्केप.
कुठल्याही टाईपचा रोमान्स
कुठल्याही टाईपचा रोमान्स चालतो. सांगा सांगा काय वाचताय..
माझेमन >>> होय ,
माझेमन >>> होय , फ्रीकोनॉमिक्स मस्त आहे , पहिला भाग वाचला आहे . थोडा मोठा आहे. त्यांचे पॉडकास्ट सुद्धा ऐकतो अधून मधून .
इतर पुस्तके सुचविल्याबद्दल धन्यवाद . वेळ मिळाला कि पाहीन .
>>> बॅलन्स शीटचे बेसिक्स
>>> बॅलन्स शीटचे बेसिक्स समजून घ्यायचे असतील तर अनिल लांबा यांचे 'रोमांसिन्ग विथ बॅलन्स शीट'.>>
बघतो.
Advanced accountancy - R L Gupta and Radhaswami ( text book)हे पुस्तक सर्वच माहिती पुरवते. स्वतः व्यवसाय करणाऱ्यांना उपयोगी ठरेल असे आहे.
१८०० आणि १४०० पानांचे दोन
१८०० आणि १४०० पानांचे दोन खंड आहेत त्याचे. टी वाय बी कॉमला आणि मग व्यावसायिक परीक्षांना वापरलंय. गुंतवणुकदार म्हणून किंवा सामान्यज्ञान म्हणून बॅलन्स शीट वाचणार्यांना ते कशाला हवं?
वावे,
वावे,
अमलताश - डॉ. सुप्रिया दीक्षित, आत्मचरित्र. उदास केलं या पुस्तकाने. मनातल्या प्रतिमा भंगल्या>>
या पुस्तकानं बऱ्याच जणाचं 'असं' झालेलंय
The little prince - Antoine de Sainte-Exupéry
हे पुस्तक क्लासिक आहे. याचा संदर्भ मला निखिलेश चित्रे च्या 'गॉगल लावलेला घोडा' या संग्रहात मिळालेला, तेव्हा वाचलेलं.
परग्रहवासी-लहान मुलाच्या, नजरेतून मानवजातीच्या कॉंट्रॅडिक्शन्स वर अतिशय मार्मिक निरीक्षणं आहेत. हसूही फुटतं, आणि अंतर्मुखही व्हायला होतं.
सुरूवातीला हे पुस्तक लहान मुलांचं आहे म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं.. पुढे मग जगभरात त्याची मौलिकता लक्षात आली. बऱ्याच लेखकांकडून या पुस्तकाचा आदरानं उल्लेख झालेला वाचला आहे.
फक्त पन्नासेक पानांची कादंबरीही एवढी अभिजात असू शकते, कमाल!! ई- पुस्तकालयच्या खालील लिंकवर वर मराठी पीडीएफ आहे त्याची.:-
https://epustakalay.com/book/187916-the-little-prince-by-marathi-mitra-l...
'औंधाचा राजा' हा धडा आमच्यावेळीही दहावीच्या पुस्तकात होता. आणखी काही वाक्यं आठवतात. "आता काही आम्ही राजा राहिलो नाही. पण बाप आहोत. मुलांनी भेटावंसं वाटतं"
"आमच्या संस्थानात सुदाम्याची भूमिका करायला एकही मुलगा सापडू नये, असं वाटतं"
हा औंधाचा राजा सोन्यासारखा माणूस होता. माणदेशातल्या जुन्या पिढीतली लोकं अजूनही आठवणी काढतात.
गौरी देशपांडे +१
माझेमन,
तुमचे वाचन कॉम्प्लेक्स देणारे आहे>> कसचं कसचं
<<हमरस्ता नाकारताना - सरिता आवाड - हे पुस्तक प्रदर्शित झाले त्यावेळी सरिता आवाड यांचे लेख लोकसत्तामध्ये आले होते. ते वाचून त्यांचे लिखाण काहीसे आक्रस्ताळी असावे असे वाटले होते. >>
मी काही लोकसत्तेतले लेख वाचले नाहीत. हे आत्मचरित्र वाचलं. याच्या संपादन प्रक्रियेदरम्यान माजगावकरांनी सरिता आवाडना लिहिलेलं एक घडीव पत्र 'पत्र आणि मैत्र' या पुस्तकात वाचलेलं. त्यामुळे कुतूहल निर्माण झालेलं. मग लायब्ररीतून आणून वाचलं. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे नंतर स्त्री लेखिकेकडून आलेलं, हे आत्मचरित्र सगळ्यात जास्त आवडलं.! हे असं सोप्या सरळ भाषेत आणि स्वच्छ मनाने स्वतःच्या जगण्याचा धांडोळा घेता येणं, ही काही लहानसहान गोष्ट नाही, असं वाटलं.
'टॉलस्टॉय एक माणूस' या ऐश्वर्यसंपन्न पुस्तकाच्या लेखिका सुमतीबाई देवस्थळी, या सरिता आवाड यांच्या आई. 'हमरस्ता..' मधून मला 'टॉलस्टॉय' च्या लिखाणादरम्यान सुमतीबाईंनी जो अभ्यासाचा-कष्टाचा जो पहाड उचललाय, तो कळला. आणखीही बऱ्याच रोचक गोष्टी आहेत त्यात. पण तूर्तास असो.
गुंतवणुकदार म्हणून किंवा
गुंतवणुकदार म्हणून किंवा सामान्यज्ञान म्हणून बॅलन्स शीट वाचणार्यांना ते कशाला हवं?....
अकाऊंटींगचा एक महत्त्वाचा भाग बॅलन्स शीट बरोबर. पण बुक कीपिंग अधिक स्थानिक, देशाचे नियम पाळून केलेले अकाऊंट म्हणजेच accrual system accounting. त्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला दिलेली माहितीच फार उपयोगी आहे.
फार माहितीपूर्ण पोस्ट्स आहेत
फार माहितीपूर्ण पोस्ट्स आहेत वरती सर्वांच्या. नेकेड इकॉनॉमिक्स वाचायला हवे. फ्रीकॉनॉमिक्स थोडेफार "ऐकले" आहे. मला मधे कामाकरता कंपन्या फायनान्स, लॉजिस्टिक्स व सेल्स शी संबंधित अॅनेलिसीस काय व कसा करतात याची माहिती हवी होती. तेव्हा मी एक पुस्तक वाचले होते व त्यातून बेसिक माहिती मस्त मिळाली होती. लेखक बहुधा सेठ गोडिन नाव होते. लक्षात नाही. या लेखकाची बरीच पुस्तके लोकप्रिय आहेत पण मी इतर वाचलेली नाहीत.
सरिता आवाड कोण? एरव्ही कधी नाव ऐकलेले नाही.
संप्रति, तुमचे वाचन दांडगे
संप्रति, तुमचे वाचन दांडगे आहे.
वावे, घाचर घोचर बद्दल मेघना भुस्कुटे च्या वॉल वर वाचले होते . कथानायिकेचा संशयास्पद मृत्यू असा शेवट आहे ना ? कोविड मध्ये वाचले होते .
अमलताश बद्दल सहमत . विशेषत इंदिरा संत यांच्या बाबतीतले लिखाण वाचून .
खिडक्या अर्ध्या उघड्या - गणेश मतकरी, कथासंग्रह आहे, पण कथांमधली पात्रं एकमेकांशी जोडलेली आहेत.>>>> + 2
विप्लवा - अरुण साधू
विप्लवा - अरुण साधू
विश्वजीत फर्नांडिस आर्मीतून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त होऊन केरळात एका निसर्गरम्य जंगल फेसिंग ठिकाणी घर बांधून बायको बरोबर रहात आहेत. निवृत्ती घेतली असली तरी सैनिकांच्या कल्याणकारी कामांत मदत करण्याची सवय आहेच. एका सकाळी जंगलाची रपेट करताना जंगलातील एक गवताळ कुरण त्यांना गायब झाल्यासारखं वाटतं. त्याच दिवशी गणित आणि मूलभूत विज्ञानात संशोधन करणारा परीक्षित भस्मे त्यांना भेटायला, त्यांची मुलाखत घ्यायला आलेला असतो आणि जगातील विविध देश एकमेकांवर कुरघोडी करण्यात आणि अणू युद्धाची धमकी देण्यात मग्न असतात.
तो गवताळ पट्टा असा कसा नाहीसा झाला, हा म्हातारचळ तर नाही? अशा शंका घेऊन परिक्षीत स्पेस टाईम फोल्डिंग असल्याची शंका व्यक्त करतो. पण हे पृथ्वीवर असं अचानक कसं होऊ शकेल?
पुस्तकात फार जास्त योगायोग आहेत (या बद्दल लेखक प्रस्तावनेत लिहितो, पण त्याहूनही जास्त आहेत, तर ते असो) लूप होल्स आहेत, सोयीस्कर घटना घडतात, अचाट प्रकार ही होतात. पण ठळक मजकूर, अनुमान हे आपल्या पर्यंत पोहोचवायचे आहे ते पोहोचते. उत्कंठा टिकवून ठेवते.
१०० पानी पुस्तक आहे त्यामुळे अगदी फार नाही आवडलं तरी फार वेळ गुंतवला न्हवता त्यामुळे लिमिटेड मजा आली.
संप्रतिंची लिस्ट आवडली. आणि
संप्रतिंची लिस्ट आवडली. आणि हिंदी वाचन कसे develope करायचे त्याबद्दल लिहीलेलं फार आवडलं. हिंदीवाचनाच्या वाट्याला शालेय पाठ्यपुस्तकं वगळता मी कधीही गेलेली नाही... पण एकदम हिंदीवाचनाशी दोस्ती कराविशी वाटू लागली.
Naked economics and Frokonomics I & II - मस्त आहेत. Frekonomics माझी आवडती पुस्तकं आहेत, कारण साधी सोप्पी आणि interesting आहेत!
अमलताश मागे वाचलंय. आता फार आठवत नाहीये..आवडलेलं एवढं आठवतंय. घरी आहे, त्यामुळे परत एकदा चाळेन आता..मला आत्मकथनं आवडतात.
गेल्या वर्षभरात वाचलेली
गेल्या वर्षभरात वाचलेली पुस्तकं
कादंबरी :
बारोमास : सदानंद देशमुख (खूप आवडलं)
Serious Men : Manu Joseph (ठीकठाक वाटलं)
शोध : मुरलीधर खैरनार (ठीकठाक वाटलं)
Shuggie Bain : Douglas Stuart (खूप आवडलं)
That Long Silence : Shashi Deshpande (महान बोअर झालं)
The Guardians : John Grisham (आवडलं)
आत्मकथन :
Educated : Tara Westover (खूप आवडलं)
रिपोर्ताज :
मोइ कुन? आमी कुन? : मेघना ढोके (आवडलं)
Bottle of Lies : Katherin Eban (आवडलं)
Self Help :
The Psychology of money : Morgan Housel (खूप आवडलं)
कथासंग्रह :
शारदा संगीत : प्रकाश नारायण संत (खूप आवडलं)
वनवास : प्रकाश नारायण संत (खूप आवडलं)
संप्रति, माझेमन
संप्रति, माझेमन
मी जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगलचा हिंदी अनुवाद वाचला. चांगला आहे, पण मूळ इंग्रजी पुस्तक जसं भिडलं, तसा तो अनुवाद नाही भिडला.
संप्रति, मी अशा absrract प्रकारच्या पुस्तकांच्या अनुवादाबद्दल साशंक आहे
जाई, घाचर घोचरमध्ये शेवटी तिचा प्रत्यक्ष मृत्यू झालाय की नाही हेही संदिग्ध आहे.
वरच्या मी वाचलेल्या
वरच्या मी वाचलेल्या पुस्तकांच्या यादीत ' हीरो ऑफ कुमाऊं' लिहायचं राहिलं होतं. डफ हार्ट-डेव्हिस या लेखकाने लिहिलेलं हे जिम कॉर्बेटचं चरित्र आहे.
सुरुवातीला मला ते आवडलं वाचायला. पण मग कॉर्बेटच्याच पुस्तकांमधली पानंच्या पानं कॉपी केलेली आहेत याचा कंटाळा आला.
जिम कॉर्बेटची पुस्तकं वाचली असतील तर आपोआपच त्याची 'व्यक्ती' म्हणून ओळख आपल्याला होते. पण एक तर ही सगळी पुस्तकं त्याने आयुष्यात खूप उशिरा लिहिलेली आहेत आणि या पुस्तकांमध्ये वर्णन केलेले बहुतांशी प्रसंग, घटना या त्याच्या तरुण आणि प्रौढ वयातल्या आहेत. त्यामुळे पुस्तकांमधून घडणारं त्याचं दर्शन हे एका विकसित किंवा प्रगल्भ व्यक्तीचं दर्शन आहे. पण जिम कॉर्बेटसारखं थोर व्यक्तिमत्त्व मुळात घडलं कसं, हे त्यातून फारसं समजत नाही. त्या दृष्टीने हे चरित्र वाचण्याची मला उत्सुकता होती. शिवाय भारतावर आणि भारतातल्या सर्वसामान्य माणसावर प्रेम असूनही जिम आणि त्याची बहीण मॅगी यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सोडून जावंसं का वाटलं असेल याचंही मला आश्चर्य वाटायचं. त्यांना भारतात राहणं असुरक्षित वाटत होतं का? या चरित्रातून जरा सविस्तर समजेल अशा अपेक्षेने मी ते वाचायला घेतलं. माझ्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाल्या असं म्हणावं लागेल.
कॉर्बेट कुटुंबाचा इतिहास, जिमचं लहानपण, त्याची भावंडांशी असलेली जवळीक याबद्दलचा भाग सुरुवातीला आहे. जंगलाची आवड जिमला त्याच्या (सावत्र) मोठ्या भावामुळे लागली. वय वर्षे दहाचा असताना जिम कॉर्बेटने पहिला बिबट्या मारला. तो बिबट्या मारण्यासाठी जंगलात गेला नव्हता, पण बिबट्या आपल्या दिशेने धावत येऊन झेप घेत आहे हे पाहिल्यावर त्याने त्याच्यावर गोळी झाडली. त्यामुळे बिबट्या जखमी झाला. नंतर त्याच्या मागावर जाऊन त्याने त्याला मारलं. ही गोष्ट जवळजवळ १४० वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा आणि त्यानंतरही कित्येक वर्षे 'शिकार' हा खेळाचा, म्हणजे 'स्पोर्ट'चा प्रकार होता. इतक्या लहान वयात जिमकडे बंदूक होती याचं आपल्याला आश्चर्य वाटतं, पण तसं होतं खरं. तो काळ कसा होता, याची कल्पना यायला याच पुस्तकात दिलेलं (आणि मी नंतर गूगल करून खात्री केलेलं) उदाहरण सांगते. सर्गुजा या संस्थानाच्या राजाने ११०० ते १७०० वाघ मारले होते. ( पुस्तकात ११५७ असा आकडा आहे, विकीपिडियावर १७१० आहे!) त्याने २००० बिबटेही मारले होते आणि भारतातून चित्ता नाहीसा करण्याच्या कामातही त्याने चांगलाच हातभार लावला होता!
१९११ साली पाचवा जॉर्ज बादशहा भारतात आलेला असताना त्याने आणि त्याच्याबरोबरच्या लोकांनी मिळून ३९ वाघ, १८ गेंडे आणि ४ अस्वलं मारली होती. तात्पर्य, तो काळ हा असा होता.
१९०७ साली, चंपावतची नरभक्षक वाघीण ही जिम कॉर्बेटची नरभक्षकाची पहिली शिकार. या वाघिणीने नेपाळमध्ये २०० आणि कुमाऊंमधे २३४ माणसांचे बळी घेतले होते. यानंतर कॉर्बेटने अनेक नरभक्षकांची शिकार केली. या पुस्तकात या सगळ्या शिकारींचं कॉर्बेटच्या पुस्तकातलं आणि काही स्वतंत्रही, असं वर्णन आहे. 'ठाक' च्या नरभक्षक वाघिणीची शिकार ही जिम कॉर्बेटने केलेली नरभक्षकाची शेवटची शिकार, १९३८ सालची. त्यानंतर १९४५ साली त्याने वाघाची शेवटची शिकार केली. हा नरभक्षक नव्हता, पण तो शेतकऱ्यांच्या गायबैलांची प्रमाणाबाहेर शिकार करत होता आणि त्याला जंगलाच्या आतल्या भागात हाकलून देण्याचे कॉर्बेटचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते.
साधारणपणे याच सुमारास त्याचं ' मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊं' हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि प्रचंड यशस्वी झालं. आजही हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे. अनेक भारतीय आणि युरोपियन भाषांमध्ये त्याची भाषांतरंही झाली आहेत. नंतरचं 'द मॅन-ईटर ऑफ रुद्रप्रयाग' हे पुस्तकही अत्यंत यशस्वी झालं.
भारताच्या प्रस्तावित फाळणीमुळे होणाऱ्या दंगलींमुळे जिम कॉर्बेट अस्वस्थ होता. त्याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या एका अधिकाऱ्याला लिहिलेल्या एका पत्रात त्याचं वाक्य आहे- The India that you and I loved has been sacrificed on the altars of ambition and greed and has gone for ever.
जिम कॉर्बेटची अशी काही पत्रं वाचायला फार आवडली.
एकंदरीत, अपेक्षेइतकं जरी हे पुस्तक आवडलं नसलं, तरी जिम कॉर्बेटविषयीच्या मला वाटणाऱ्या आदरात भर पडली असं मी म्हणेन.
मी मागच्या वर्षात खालील
मी मागच्या वर्षात खालील पुस्तके वाचली:
१. मनसमझावन : संग्राम गायकवाड : अजिबात न आवडलेले पुस्तक. संपादनाची गरज खूप जाणवते. कृत्रिम भाषा. प्रयोग म्हणून प्रयोग. काही ठिकाणी माझी असह्य चिडचिड झाली.
२. समग्र श्रीनिवास विनायक कुलकर्णी : मी खूप वेळ घेतला आयुष्यात कुलकर्णी वाचायला. आता खूप भारून जायला झाले नाही. १४ - १५ वर्षांपूर्वी वाचले असते तर कदाचित खूप खोलवर प्रभाव पडला असता. आता काही गोष्टी खटकल्या. विशेषत: मी माझ्या लहान भावाच्या मृत्यूवर आयुष्यात एकही शब्द लिहिला नसता. माझे तेवढे धाडस झाले नसते. मला आवडले नाही ते.
३. खोल खोल दुष्काळ डोळे: प्रदीप कोकरे : बुलशिट. आता बस झाले यार. काय तेच तेच लिहीत बसणार. साठीपासून तेच चालले आहे च्यायला.
४. कल्पना दुधाळ यांच्या काही कविता: काही कविता अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. काही खूप काळजीपूर्वक लिहिल्या आहेत. पण एकंदरीत मराठीतली माझी सगळ्यात आवडती समकालीन कवयित्री. कवी कवी लोकांच्या घोळक्यात बऱ्याच ऐक्टिव असतात त्या. फेसबुकचा चांगला वापर करतात. तेवढे मला खटकते. भांडवल केल्यासारखं वाटते. पण कविता अस्सल कधीतरी येतेच अशा संवदेनशीळ माणसाला. त्याववेळेस इतर बाबी इग्नोर कराव्या लागतात.
दुर्दैवाने माझे मराठी वाचन ठप्प झाले आहे. यावर्षी एकही दिवाळी अंक वाचला नाही. काहीही मिस आउट केले असे वाटले नाही. हे काय होते आहे? लिहिणारे लोक वाढले आहेत पण माझ्याजवळ काहीच कसे येत नाही?
मी प्रचंड सिनिकल झालो आहे. एकंदरीत मराठी साहित्यव्यवहार इतका निराशाजनक आहे की बास.
१. जिम कॉर्बेटचा मी'पणा फार
१. जिम कॉर्बेटचा मी'पणा फार जाणवतो. तसा केनेथ ॲण्डरसनचा नसतो.
२. >>>मराठी साहित्यव्यवहार इतका निराशाजनक >>> काही विशेष अनुभव घेऊन मग लिहावे लागते. तर ते नाही आणि नुसतेच खरडणे असते. या बाबतीत शांता शेळके यांचं उदाहरण. समुद्राशी संबंध आलेला नव्हता तरी नंतर विशेष अभ्यास करून भारी कोळी गीतं लिहिली .
Srd >> छे, हो! जिम कॉर्बेटचा
Srd >> छे, हो! जिम कॉर्बेटचा 'मी'पणा मला तरी कुठे खटकला नाही आत्तापर्यंत. केनेथ अँडरसनचं एक पुस्तक वाचायला सुरुवात केली होती पण मला त्या गोष्टी चक्क रचलेल्या वाटायला लागल्या. मग ठेवून दिलं ते पुस्तक बाजूला.
जिम कॉर्बेटचा 'मी'पणा मला तरी
जिम कॉर्बेटचा 'मी'पणा मला तरी कुठे खटकला नाही ....... +१.
अर्थात ही सारी पुस्तके शालेय जीवनात वाचली होती.
मला काही पटला नाही जिम
मला काही पटला नाही जिम कार्पेट.
वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहून
वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहून ठेवायचे हा संकल्प २०२४मध्येही पाळला गेला नाही - तेव्हा ती एक कन्सिस्टन्सी आहे.
मनसमझावन मला आवडले.
विनय सितापतीने हाफ लायन नावाने नरसिंह रावांवर लिहिलेल्या पुस्तकाचा नरसीह्वायन हा अनुवाद आहे. हाफ लायन ही मी वाचलेल्या राजकीय चरित्रांमध्ये माझ्या पसंतीत पहिल्या क्रमांकावर आहे. २०१८/१९ मध्ये त्याबद्दल लिहिल्याचे आठवते.
Yellowface - by R. F. Kuang खूप आवडले.
A History of Burning जनिका ओझा - गुजरातेतून वेठबिगार मजूर म्हणून केनिया/उगांडाला नेलेल्या मजुर मुलापासून सुरु होवून ४-५ पिढ्यांनंतर कॅनडात संपणारी कादंबरी/कुलवृत्तांत. भारतीय गुलाम/वेठबिगाराची 'रुट्स' म्हणता येईल. किंवा हाउस ऑफ मि. बिस्वास सारखी आफ्रिकेतल्या पार्श्वभुमीवरची. रुट्स सारखी नाट्यमयता आहे, काळ/संदर्भ अर्थातच वेगळे. हाउस ऑफ मि बिस्वासची साहित्यिक उंची नाही.
When Breath Becomes Air हे मृत्युच्या प्रवासाचे पुस्तक वाचले - तरल आहे.
Station Eleven by Mandel, Emily St. John - बरे आहे, बरेच धागे लेखिकेला बांधता आले नाहीत शेवटी नीट. तरी लेखकांची कल्पनाशक्ति मला नेहेमीच स्मितित करते. सुचते कसे लिहायला पूर्ण काल्पनिक हे एक कोडेच आहे.
पॉल एर्डिशचे मॅन व्हू लव्ड नंबर्स हे पुन्हा येता जाता वाचले.
थ्री बॉडी प्रोब्लेम - पहिले पुस्तक वाचले. पहिले स्लो होते पण हळुहळु चांगली पकड घेतली. आता उरलेली ३ वाचेन या सिरिज मधली.
क्रिस अकोशचे मसाला लॅब. फेसबुकवर या माणसाचे शॉर्ट्स बघून उत्सुकता चाळवली. हे मस्ट म्हणजे मस्ट रिड आहे.
दूर तेथे दूर तेव्हा / सर्प - भारत सासण्यांची दीर्घकथा/लघु कादंबरी खूप वर्षांनी पुन्हा वाचली. तितकीच आवडली.
खोतांचे उभयान्वयी अव्यय. हे अतरंगी आहे.
मनसमझावन, करुणापटो वगैरे संप्रति (पाचपाटलांच्या) कृपेने.
गंगा आये कहाँ से : गुलजार - एका दिग्दर्शकाचा प्रवास -- ठिक ठाक आहे. खूप ग्रेट नाही. पण टाकाउही नाही. काही सिनेमे पुन्हा पाहून त्यातली सौंदर्यस्थळे अनुभवता आली. खरे तर गुलझार यांच्या मर्यादा आधी लक्षात आल्या नव्हत्या त्याच अधिक दिसल्या. एकदा वाचायला नक्कीच चांगले.
हाकामारी, काळजुगारी वगैरे हृशिकेश गुप्तेची पुस्तके. माझ्या प्रांतातली पुस्तके नाहीत - त्यामुळे फार भावली नाहीत.
बाकी चिप वॉर, अॅटॉमिक हॅबिट, एलॉन मस्क (इसॅकसनचे) वगैरे वगैरे आहेतच.
२०२५ मध्ये वाचलेल्या पुस्तकांचे टिपण - किमान यादी तरी ठेवायची आहे.
खरतर मला ह्यावर्षी वाचन
खरतर मला ह्यावर्षी वाचन वाढवायचं होतं. सुरुवात बरी झाली होती पण नंतर पुन्हा बंद झालं.
वाचलेल्या पुस्तकांमध्ये रंगनाथ पाठारे लिखित 'सातपाटील कुलवृत्तांत', प्रणव सखदेव लिखित 'काळे करडे स्ट्रोक्स', इथे उत्तर अमेरिकेत प्रकाशित होणार्या 'एकता' मासिकातल्या संकलित कथांचे संग्रह 'विलासिनी' (२ भाग) आणि थोडे फार दिवाळी अंक इतकच. बाकी डोमेल ते कारगिल, अॅलिस्टर कुकचं आत्मचरित्र, मुराकामीचा एक कथा संग्रह हे सगळं अर्धवट वाचून झालं. आता पूर्ण करायचं आहे. शिवाय न वाचलेली बरीच पुस्तकं घरात आहेत ती पण वाचायची आहेत. (रात्रीचं टिव्ही बघणं बंद केलं पाहिजे म्हणजे वाचून होईल!)
संप्रति ह्यांनी लिहिलेली यादी
संप्रति ह्यांनी लिहिलेली यादी भारी आहे !!! हिंदी पुस्तक वाचून बघायचा मोह होतो आहे. तुम्ही हिंदी तसेच बाकी पुस्तकांबद्दलही अजून लिहित रहा.
(एव्हडी तगडी यादी असूनही पोस्टीत आत्मप्रौढी अजिबात जाणवत नाहीये हे फार आवडलं!)
वावे, ललिता ह्यांच्या याद्याही मस्त.
रिपोर्ताज म्हणजे काय ? (पुस्तकाच्या प्रकाराच्या संदर्भात विचारतो आहे).
कॉर्बेटबद्दल वावेशी सहमत. मी जेव्हडं वाचलय त्यात मी पणा जाणवला नाही कधी.
रिपोर्ताज म्हणजे वृत्तांत??
रिपोर्ताज म्हणजे वृत्तांत?? वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्यासाठी लिहिलेले लेख किंवा त्या शैलीतले पुस्तक.
मिलिंद बोकिलांचे समुद्रापारचे समाज हे यात येईल माझ्या मते (किंवा त्यांची इतरही पुस्तके).
अरुंधती रॉय यांचे वॉकिंग वुइथ कॉम्रेड्स हे पटकन आठवले.
Pages