दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रावरून मला वाटलं माशीच्या नवर्‍याला मासा म्हणतात.
>>>> मला वाटायचं की फक्त सिरीअलमधल्या खडूस आणि कर्मठ ज्येना स्त्रियांना मासा म्हणतात.

मासा = काना.
सोडवा हे कोडं

माझे मन तुम्ही भारतीय पेहरावात (देवनागरी) आला आहात का? कि वेगळ्याच आहात?

ती पाहताच बाला, खेळ खल्लास झाला
गाणं ओळखण्यासाठी या धाग्याच्या इतिहासातला खूपच सोपा आणि सुस्पष्ट क्ल्यू.

images (4).jpeg

हा धागा वाचयचो नाही, कारण काहीच समजायचं नाही. पण आता मुद्दाम क्लू वाचायला आलो. Lol निराशा झाली नाही.

क्लु4
नायकाचे करीयर छोट्या पडद्यावरून चालू झाले
क्लु5
नायिकेचा जीवनसाथी सिनेसृष्टीत नाही.

यस यस
केस संजय दत्त चे असले म्हणून काय
संजय दत्त चा चेहरा इतका रुंद होता का कधी?
आणि कृती श्रद्धा झानवी बिनवी येण्यापूर्वी त्या जनरेशन मध्ये असे खांदे फक्त उर्मिला किंवा करिश्मा चे.

लहान असताना गावी गेल्यावर ओसरीवर सगळे झोपले कि शेजारची एक काकू गप्पा मारायला यायची. तिला आग्रह झाला कि कोडी घालायची.
ती काही सुटायचीच नाहीत. तिने उकल केल्यावर सगळे ठसका लागेपर्यंत हसत रहायचे.

इथे आलं कि त्या कोड्यांचा आनंद मिळतो. Happy

काकू...नही!!!
(कानावर हात ठेवून लांब लांब किंचाळत पळत सुटलेली इमोजी Happy )

गावी आजूबाजूला सगळेच चुलत चुलत चुलत काका आणि काकूच असतात.
आम्ही लहान असताना काकू तरूणच होती. Happy

हा अस्ला काही प्रकार आहे हे पण माहित नव्हतं. पण दंडावरून उर्मिला ओळखली मी याबद्दल मला उत्तेजनार्थ कायतरी बक्षिस पाहिजे.

आम्ही लहान असताना काकू तरूणच होती Lol

उर्मिला ओळखलीस त्याबद्दल पैठणी दुपट्टा, माझेमन.
श्रद्धा कडे आता पोतं भर पैठण्या झाल्यात,ती पडदे,कार कव्हर आणि तंबोरा गवसणी शिवत असेल इथे बक्षीस मिळालेल्या पैठण्यांची.

दुपट्टा चालेल. आपण श्रद्धाकडून अधूनमधून पैठण्या भाड्याने घेऊ.
IMG_7686.jpeg
आता हे नवं गाणं घ्या.
क्लू
1. या हिरॉइनचं पिक्चरमधल्या हिरोच्या वडीलांशी नातं आहे.
2. पिक्चरच्या २ हिरोंचं एकमेकांशी लांबचं नातं आहे.
3. पिक्चरमधल्या एका हिरोची नात सोशल मिडीआवर ट्रेंडींग असते.

Pages