दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान / अक्षय किंवा संजय दत्त दिसतात.
दंडाच्या तिसर्‍या स्नायूवरून टायगर श्रॉफ तर नक्की झाला. मागचा जोर बैठकावाला दंड कुणाचा आहे हे शोधायचेय.

नाही,नाही आणि नाही.
क्लुज देते
1. गाण्यात दिसणाऱ्या एका पात्राच्या काकूचा जावई आणि गाण्यात दिसणारा दुसरा मनुष्य हे एका सुपरहिट चित्रपटात असतील असं विधिलिखित आहे.
2. गाण्यात न दिसणाऱ्या एका स्त्री पात्राच्या घराण्यात नृत्य कौशल्य वाढत्या वयानुसार घटत गेलं आहे.

प्यारे मोहन - फरदीन खान - विवेक ओबेरॉय.
फरदीनच्या काकूचा जावई हृतिक विवेकसोबत क्रिश ३ मध्ये होता.
प्यारे मोहनची हिरॉइन ईशा देओल.

हे बरोबर असेल तर गाणं शोधा कोणीतरी.

रणबीरच्या का़काच्या बायकोचा जावई सैफ अली खान अक्षय कुमार सोबत असला कि चित्रपट सुपरहीट होतो.
म्हणजे रणबीर + अक्षय

मृणाल बरोबर.
सर्व टीम वर्क ला आणि अर्थात सर्वात आधी माणसं ओळखल्याबद्दल भरत ला धन्यवाद,
नवं कोडं टाका कोणीही.

धाग्याच्या एडीट मधे जाऊन कव्हर फोटो म्हणून अपलोड केला तर हा फोटो मायबोलीच्या इंडेक्स मधे नावाच्या शेजारी पण दिसेल.
( ऐश्वर्या, सोनाली , अमृता राव, एलियना डिक्रूज , सुनील अनुष्का शेट्टी असे फोटो अपलोड केले तर कोडे सुटो न सुटो , डोळे भरून बघता तरी येईल )
ताक :
हमने कश्मीर मांगा था
आपने चीर के रख दिया

आपलं काय अनु Happy
महेशबाबू, हृतिक रोशन, रणबीर कपूर, आयुष्मान खुराणा, रणवीर सिंग येऊ दे जोडीला. असा अन्याय कर नगा अक्का...!

हेहे,
जो कोलाज चांगला मिळालेला तो लावला.पण इस सजेशन पर भी गौर किया जायेगा!आपल्याकडे पण भरपूर चिकटवण्यासारखी स्थळे आहेत.

महेशबाबू, हृतिक रोशन, रणबीर कपूर, आयुष्मान खुराणा, रणवीर सिंग येऊ दे जोडीला >>> मला राझीमधला विकी कौशल चालेल बरं

दरवेळी नवीन प्रतिसाद आल्याचं दिसलं की मी नवीन कोडं आलं की काय म्हणून धावतपळत येतेय. आता जी वर बाया, माणसं चिकटवलीत ती फायनल! आता खंगरी कोडं येऊ द्या. Proud

पहले आप पहले आप मे बस ना छुट जाय
मीच देतो. हे खरोखरीच सोपे आहे..आधी येऊन गेले असेल तर माफ करा.
या गाण्यातले ड्रेसेस लक्षात असतील, हेअर स्टाईल्स लक्षात असतील तसेच झाकलेल्या चेहर्‍यात चष्मा कुणाचा आहे हे सुद्धा लक्षात असेल इतके ओळखीचे गाणे आहे.

z1.jpg

Pages