दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिटनेस नसेल तर कृपया जाऊ नका. मी दोनदा जाऊन आलेय, कधीही आणीबाणीची स्थिती उद्भऊन आपल्या फिटनेसचा कस लागु शकतो.>>>+१

सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या जोडप्याला डंपरने जोरदार धडक दिली. त्यातल्या महिलेचा चेंदामेंदा झाला आणि पुरूष खालच्या खंदकात उडून पडला>>>

डंपर हे वाहन भरधाव सोडुन देण्यासाठीच ड्रायवरांच्या हातात देतात हे माझे मत झालेले आहे. सिन्गल रोडवरचे बहुतेक अपघात डंपर मुळे झालेले आहेत.

सकाळी मॉर्निन्ङ वॉकसाठी रस्त्यावरुन चालणार्‍यांची खुप काळजी वाटते. सकाळ असल्यामुळे रस्त्यांवर वाहने नसावीत असे समजुन ते बिनधास्त चालत असतात. छोट्या शहरांमध्ये रस्त्यांवर असे चालणारे खुप दिसतात. मुम्बई पुण्यात आहे तशी छोट्या शहरात बागांमध्ये सकाळी चालण्याची सोय करायला हवी म्हणजे असे रस्त्याण्वर चालण्याची वेळ लोकांवर येणार नाही.

हो मलाही सकाळच्या चालण्याचे (विशेषतः 5.30 ते 6.3०) अतिशय काळजी वाले काम वाटते.मुळात वाहन वाले इतक्या सकाळी कोणी रस्त्यात चालेल या मानसिक तयारीत नसतात.तंद्रीत चालवत असतात.त्यात ट्रक चे ब्रेक, दुरुस्ती, या लोकांच्या झोपा झालेल्या नसणे, धाब्यावर दारू हे फॅक्टर प्रचंड रिस्की बनवतात.

डंपर भरधाव हाकण्याचे एक कारण म्हणजे कमीत कमी वेळात जास्त फेऱ्या मारणे. आणि राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरना सकाळीच फेऱ्या मारणे बहुधा बंधनकारक आहे

डंपरवाल्यांचं समर्थन नाही पण बरीच लोकं डाव्या बाजूने चालण्याची चूक करतात .परवा एक मैं माझ्याबरोबर मॉर्निंग वॉक ला आली आम्ही उजव्या बाजूने चालत होतो तर म्हणाली आपण उलट्या बाजूने चालतोय रस्ता क्रॉस करू.... तिला समजावलं की कसं आपण बरोबर चालतोय ...

नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सगळं होतं. रस्ता ओलांडताना अर्धा रस्ता उजवीकडे पाहून ओलांडावा मग पुढला रस्ता डावीकडे पाहुन. वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने हाकतात आपण उजव्या बाजूने चालावे म्हणजे समोरुन येणारी वाहने दिसतात.

पण आता वाहने तर वाट फुटेल तिथुन चालवतात. ब्रेकचा वापर करणे कमीपणाचे लक्षण समजले जाते.

एक तर तो १८ च्या खलाचा. परत साक्षी पुरव्यामध्ये खाडाखोड, रक्ताचे नमुने परत जरी घेतले असतील तरी वेळ वाया गेला असणार आणि अल्कोहोल चे प्रमाण कमी झालेले असेल. शिक्षा झाली तरी जास्त होईल अस वाटत नाही.

हातात पैसे असले, थोडा मुजोर डोन्ट केअर अटीट्युड असला की काय काय चमत्कार शक्य आहेत याचे poc(proof of concept) बनते आहे ही केस.याच्या पुढे आता 'गाडीत अचानक बिघाड होऊन ब्रेक फेल झाले, वेदांत चा नाईलाज झाला, तरी त्याने स्टीअरिंग फिरवून कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले' ही पायरी असेल.
पैसे खूप असले तरी काहीही करून काहीही परिणाम न होता सुटता येईल हा आत्मविश्वास मोडला पाहिजे. त्याला इतकी प्रसिद्धी दिली तर त्याचा हिरो बनेल आणि बाकी गुंठामंत्री श्रीमंत लहान मुलं त्याला कॉपी करायला बघतील.

काल संध्याकाळी सर्च ऑपरेशन संपलं असं समजलं. गुरुवार ते रविवार चार दिवस नातेवाईक बाहेर उभे होते. सकाळी आलो तेव्हा एक पोलीस गाडी आणि अँब्युलन्स उभी होती. त्या कंपनीच्या जवळच थोडी दूर एक कंपनी आहे तिथे काही झालं असतं किवां भविष्यात काही झालं तर भोपाळ गॅस दुर्घटना पार्ट २ होईल असं म्हणताहेत.त्या कंपनीचा मालक पण इन्स्पेक्शन करत नाही. वरपर्यंत ओळख आहे त्याची. खखोदेजा.

जो पर्यंत कायदा पाळण्यात नाही तर तो मोडण्यात किंवा वाकवण्यात आपण ( ह्यात सगळेच आले. .. गरीब श्रीमंत , पुढारी जनता, लहान थोर ) धन्यता मानतोय, तो पुरुषार्थ समजला जातोय तो पर्यंत हे असेच चालणार .. जो पर्यंत हे आपल्याला प्रत्येकाला स्वतःला आतून वाटत नाही तो पर्यंत कोणताही कायदा किंवा कोणताही पुढारी हे बदलू शकणार नाही. ह्या चर्चा कोरड्याच रहाणार.
गोष्ट अगदी साधी, मामुली आहे पण वाहनं नसली, रस्ता सूनसान असला तर आपल्यातील किती जण इमाने इतबारे रेड सिग्नल ला फॉलो करतात की दडपून काही होत नाहीये म्हणून पुढे जातात ? ह्याचा स्वतः च विचार करा.

बोकलत, आम्हाला टीव्हीवर पाहवत नाही आणि तुम्ही रोज पहात असाल समजू शकतो तुमची अवस्था.
अनु नोकरी बदलणं हा काही उपाय नाही ना. ह्या आठवड्यात ह्याच बातम्या ऐकायला येत होत्या. घाटकोपर, पुणे डोंबिवली, राजकोट, दिल्ली अशी कुठली जागा आहे का जिथे काही अघटीत घडणारच नाही.
ममो, तू म्हणतेय ते खरंय ... पुण्यातील केसमध्ये किती संस्था बरबटलेल्या आहेत ते समोर येतंय तेच इतर घटनांमध्ये ही असणारच..
मुल्य शिक्षण पुस्तकात बघायला मिळणार प्रत्यक्षात नाहीच...

उपाय तर नाहीच.पण डोंबिवली, पालघर midc मध्ये अनेक छोट्या कंपनी आहेत.ज्यांना बॉयलर मेंटेनन्स परवडत नाहीत किंवा प्रॉफिट वाढवायला ते मुद्दाम लक्ष घालत नाहीत.बॉयलर अतिशय जुने किंवा सेकंडहॅण्ड असतात.अश्या घटना वर्षातून किमान 4 वाचायला मिळतात.जिथे आपण मोठ्या स्केलवर बदल घडवू शकत नाही, अपघातापासून स्वतःला संरक्षित ठेवू शकत नाही तिथे परिस्थितीपासून दूर जाणे याशिवाय काय करणार?
(गेमिंग झोन, पब या जागा आपण फायर एक्झिट तपासून मग जाणे न जाणे निर्णय घेऊ शकतो.रोजच्या नोकरीच्या जागेचे काय करणार?)

@ मंजूताई+१११
@mi_anu घर जवळ, प्रवास सोईस्कर, कामाचा जास्त ताप नाही यामुळे हि नोकरी सोडावीशी वाटत नाही. हि नोकरी सोडली तर ट्रेनचा प्रवास नशिबी येईल.

बोकलत, स्फोट झाला त्या ठिकाणापासून ५-७ मिनीटांवर माझ्या आई-वडिलांचं घर आहे. स्फोट झाला तेव्हा आमची बिल्डिंग हादरली. तुम्ही वरच्या पोस्टमध्ये लिहीलंत त्या कंपनीचं नाव सांगू शकता कां?

भोपाळ गॅस दुर्घटनेसारखं झालं तर डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरालाच धोका आहे.

आडो बापरे.

बोकलत काळजी घ्या.

अनु स्फोट रिऍक्टरचा झाला, बॉयलर न्यूज चॅनेल सांगत होते पण ते खरं नाही. नंतर खुलासा झाला, एका माबो करानी हे लगेच सांगितलेलं w a वर की स्फोट कसला झालाय. त्यांचं एकदम बरोबर होते.

अर्थात स्फोट कुठलाही वाईट्च.

अर्थात

@आउटडोअर्स हि ऐकीव माहिती आहे खरं खोटं माहित नाही त्यामुळे नाव नाही लिहिलं पण जिथे हा ब्लास्ट झालं तिथेच आहे एक लेन सोडुन ५०० मीटरच्या आत.

Pages