Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याच कथेवर स्वतंत्र नाटकही आहे
याच कथेवर स्वतंत्र नाटकही आहे बहुधा >>> हो, आणि ते भारी आहे! (नाव सेम आहे)
>>स्टॅनली कप हा पाणी पिण्याचा
>>स्टॅनली कप हा पाणी पिण्याचा कप आहे हे अमितला सांगा. त्यांच्यातिकडे तो हॉकी चा कप आहे. आईस हॉकी. नाहीतर तो उमेश कामत हॉकी खेळतोय असा सीन येण्याची वाट पाहात बसेल.>>
स्टॅनली कप जिंकला की बाहुबली स्टाईल तो डोक्यावर घ्यायची पद्धत आहे. आता उका काय करेल बघू
उका आईस हॉकीचा कप जिंकेल इतकी माझी मुळीच अपेक्षा न्हवती त्यामुळे काल स्टॅनली कप सर्च केला.
काल सापळा चालू केला. अर्धा झाला. सो फार सो गुड! रहस्य काय, मोटिव्ह काय ते सुरुवातीला समजतं. ते सुरुवातीला समजलेलं अर्धावर तरी तसंच आहे. ते अर्थात तसं असणार नाही आहे. त्यामुळे शेवटी काय जो ट्विस्ट देतील तो चांगला असू द्या आणि लेट डाऊन फील न येवो इतकीच प्रार्थना आहे.
अजुन कमेंट सगळा बघुन झाल्यावर. आत्ता तरी आवडलेला आहे.
अरेच्चा ! वाटलं नव्हतं
अरेच्चा ! वाटलं नव्हतं सापळाला ग्राहक असेल. बरं झालं काही लिहीलं नाही. कारण काहीही सांगणे हे स्पॉयलरच असणार आहे.
रहस्यपट खूप प्रेडीक्टेबल झालेत. एक वेळ विनोदी सिनेमा सोपा वाटेल बनवायला. सगळेच धक्के आतापर्यंतच्या आयुष्यात बसून झालेत.
पण यांनी खिळवून ठेवलंय हे नक्की.
>>Submitted by अस्मिता. on 16
>>Submitted by अस्मिता. on 16 April, 2024 - 20:37>>
स्वातीताई, तुम्ही नेहमी
स्वातीताई, तुम्ही नेहमी आवर्जून पोच देता. मनापासून आभार.



पिकु
माझेमन, अर्थात. ती हिन्टच होती.
पुणे ग्रामीण
आचार्य
धमाल पोस्ट.
आत्मपॅम्फ्लेट आणि वाळवी सोडून मी अगदी समजू शकते. मी पण परवा भांडे घासताना 'कर्णपिशाचिणी को कैसे वश करे' बघितले.
स्टॅनली कप कशाचा ज्या सिनेमात
स्टॅनली कप जिंकला की बाहुबली स्टाईल तो डोक्यावर घ्यायची पद्धत आहे. आता उका काय करेल बघू>>>>
स्टॅनली कप कशाचा ज्या सिनेमात 'नवराबायको-करंजीसारण' प्रवचन देतील, त्यांना बक्षीस म्हणून 'सिपी कप' द्यायला हवा. कारण ते मोठेच होत नाहीयेत. 'कुकातकुका' सारखी 'उकातउका' पोस्ट
अस्मिता भांडी घासता घासता
अस्मिता भांडी घासता घासता कसले पिक्चर्स बघतेस
, झाली का ती पिशाच्चीण वश, घासून दिली का भांडी.
सापळा - बं ड ल.
सापळा - बं ड ल.
परवा जुन्या बालगंधर्व
परवा जुन्या बालगंधर्व चित्रपटाचा काही भाग बघितला. या चित्रपटाविषयी बरेच लिहून झाले आहे इथे.
त्यात 'रवी मी हा चंद्र कसा' या गाण्याचा भाग पाहिला. त्यातील खटकलेल्या गोष्टी.
१. मूळ मानापमान नाटकात त्यावेळी नायिका भामिनी गरीब असल्याचे नाटक करीत असते. त्यामुळे या प्रसंगात तिची वेषभूषा अगदी सामान्य, साधी हवी पण यात तर भामिनी भरजरी शालू, अलंकारांनी सजली आहे.
२. नायकाला जोडे देण्याचा प्रसंग बराच पुढे आहे नाटकात. त्याचा या गाण्याशी काही संबंध नाही पण यात गाणे संपता संपता जोडे पुसून देऊ केले आहेत.
३. या चित्रपटातील गाण्यात नायक नायिकेला उद्देशून 'चंद्र' असा उल्लेख करताना दाखवला आहे. मूळ नाटकात नायकाच्या मस्तकावर असलेल्या पगडीला चंद्राची कलाकुसर आहे. नायिका त्याला उद्देशून 'त्या चमकत्या चंद्रामुळे मला आपल्याकडे नजर उचलता येत नाही' अशा अर्थाचे बोलते. आणि मग नायक त्याला उत्तर म्हणून, 'मी सूर्य असताना ही चंद्राची मिजास माझ्यासमोर कशी चालेल' अशा अर्थाचे ते गाणे म्हणतो. इथे पूर्ण अर्थ बदलून टाकला आहे.
बाकी अनेक विरोधाभास आहेत. वरील गोष्टीही, ज्यांनी मानापमान नाटकाची मूळ संहिता वाचली नाही त्यांच्या लक्षात येणार नाहीत.
सापळा - प्राईम व्हिडीओ
सापळा चित्रपटाविषयीची पोस्ट मोठी झाल्याने स्वतंत्र धाग्यावर हलवली आहे.
समीर धर्माधिकारी मराठी असं
समीर धर्माधिकारी मराठी असं काय विचित्र बोलतो? पूर्वी नीट बोलायचा आठवतं. अगदीच कायच्याकाय दिसतो बोलतो आणि उथळ भडक काही तरी अभिनय करतो.
नेहा जोशी बद्दल वादच नाही. सगळ्याच बाबतीत तिने उत्तम केलं आहे. काम दिसणं बॉडी लॅग्वेज तर कमाल दाखवली आहे.
चित्रपट मात्र एकावर एक कायतरी दाखवायचं असा झाला आहे. अर्ध्यापर्यंत मला उत्कंठा होती. मग अगदीच अतर्क्य प्रकार होत गेले. एकतर माणसाला हुषार दाखवा किंवा मद्दाड. नेहेमी हुषार आणि क्लायमॅक्सला मद्दाड ते ही एकाच पिक्चरमध्ये तीनवेळा... हे जरा function at() { [native code] }ई होतं.
घ्या! सकाळी हा नेटिव्ह कोड प्रॉब्लेम सुटलेला. आता परत व्हर्जन बदलली बहुतेक वेमांनी.
युट्युबर आहेत :गच्ची
युट्युबवर आहेत :
गच्ची
सावरिया डॉट कॉम
सावर रे
श्री पार्टनर (वपु)
हम्पी
लेथ जोशी : २ दा पाहिला.
मांजा
हे सर्व पाहिले. आवडले.
या चित्रपटातील गाण्यात नायक
या चित्रपटातील गाण्यात नायक नायिकेला उद्देशून 'चंद्र' असा उल्लेख करताना दाखवला आहे. मूळ नाटकात नायकाच्या मस्तकावर असलेल्या पगडीला चंद्राची कलाकुसर आहे. नायिका त्याला उद्देशून 'त्या चमकत्या चंद्रामुळे मला आपल्याकडे नजर उचलता येत नाही' अशा अर्थाचे बोलते. आणि मग नायक त्याला उत्तर म्हणून, 'मी सूर्य असताना ही चंद्राची मिजास माझ्यासमोर कशी चालेल' अशा अर्थाचे ते गाणे म्हणतो. इथे पूर्ण अर्थ बदलून टाकला आहे.>> ओह! आत्ता मला त्या गाण्याचा अर्थ कळला. मला वाटायचं नायिकेसमोर हा असा का बरं माज करतोय?
या चित्रपटातील गाण्यात नायक
या चित्रपटातील गाण्यात नायक नायिकेला उद्देशून 'चंद्र' असा उल्लेख करताना दाखवला आहे. मूळ नाटकात नायकाच्या मस्तकावर असलेल्या पगडीला चंद्राची कलाकुसर आहे. नायिका त्याला उद्देशून 'त्या चमकत्या चंद्रामुळे मला आपल्याकडे नजर उचलता येत नाही' अशा अर्थाचे बोलते. आणि मग नायक त्याला उत्तर म्हणून, 'मी सूर्य असताना ही चंद्राची मिजास माझ्यासमोर कशी चालेल' अशा अर्थाचे ते गाणे म्हणतो. इथे पूर्ण अर्थ बदलून टाकला आहे.>> ओह! आत्ता मला त्या गाण्याचा अर्थ कळला. मला वाटायचं नायिकेसमोर हा असा का बरं माज करतोय?>>
अगदी अगदी! पण नाटकातील पदांचे शब्द बहुतेक वेळा असे असायचे की त्यातून अर्थ नीट कळायचाच नाही. संगीत आणि गायकीवर निभावून जायचं. याच नाटकातील 'युवतीमना' च्या अर्थावर इथे चर्चा झालेली आठवते.
होय महाराजा थिएटरला बघावा का
होय महाराजा थिएटरला बघावा का ?
सौ. शशी देवधरचा ट्रेलर बघुन
सौ. शशी देवधरचा ट्रेलर बघुन आवडला होता, पण चित्रपट पाहायचा राहुन गेला. काल अचानक यु ट्युबवर दिसल्यावर लगे हाथ बघुन मोकळी झाले. सस्पेन्स छान टिकवलाय, ट्रेलर पाहुन वाटले त्यापेक्षा चित्रपट वेगळा आहे. अजिन्क्य देव व सई ताम्हणकरने चांगले काम केलेय. कथेचा जीव लहान आहे, साधारण मध्यंतरात एक घटना घडते तिचा उलगडा शेवटी झालाय. एकदा पाहण्यासारखा आहे.
पार्श्वसंगीत रुद्रम मालिकेची आठवण करुन देणारे आहे.
अनुमती पण चांगला आहे.
अनुमती पण चांगला आहे.विक्रम गोखले,सुबोध भावे, सई ताम्हणकर,रीमा लागू यांच्या कामासाठी जरूर पहा.
जुनं फर्निचर कुणीच पाहिला
जुनं फर्निचर कुणीच पाहिला नाही का ? कि खूप मागे आहे ?
मेलोड्रामा आहे. साधारण ८० च्या दशकातला विषय आहे. कोर्टातला अफलातून खटला ही कल्पना ओ माय गॉड वरून घेतल्यासारखी वाटते. विषय वेगळा आहे. पण कोर्टातली धमाल इथे आणता आलेली नाही.
विषय सार्वजनिक आहे असा सिनेमातल्या कथेचा दावा आहे. घरजावई होऊन आई वडलांना विसरणारे अपत्य हा सार्वत्रिक विषय खरंच आहे का ?
कामानिमित्त दूर जावे लागते. आई बाप मुलांची वाट पाहतात. पण एकदम खटला ?
हा विषय पटला तर चित्रपट एंगेजिंग आहे. अन्यथा पाहू नये.
बाईपण भारी देवा वर विंग्रजी
बाईपण भारी देवा वर विंग्रजी द रेझ सिस्टर्स ( लेखक. कॅनडियन टॅामसन हायवे १९८६) च्या कथासूत्राची सावली जाणवली. नवीन काहीतरी जुन्याकडेच जातं.
अनुमती पण चांगला आहे.विक्रम
अनुमती पण चांगला आहे.विक्रम गोखले,सुबोध भावे, सई ताम्हणकर,रीमा लागू यांच्या कामासाठी जरूर पहा.>>>>>>
पाहिला.. वि. गोखलेने एकहाती ओढलाय चित्रपट. उत्तम काम केलेय, त्याची तळमळ, हतबलता पोचते अगदी. चुक कोणाचीही नाही पण परिस्थितीच विलन होऊन उभी राहते तेव्हा सगळेच हतबल होतात. अशी अनुमती द्यायची वेळ कोणावर न येवो.
सांगितल्याबद्दल धन्यवाद देवकी.
दादा कोंडकेंचा राम राम
दादा कोंडकेंचा राम राम गंगाराम चक्क प्राईमवर आहे.
शोलेची स्टोरी वाला म्हणून लावला मग लक्षात आलं तो बहुतेक ह्योच नवरा पाहिजे होता. मध्यंतरी एक क्लिप पाहिली होती. पण संवाद नीट ऐकू येत नाहीत. बहुतेक दादांच्या सिनेमाचं सदोष ध्वनीमुद्रण हे वैशिष्ट्य असावं. कारण कुणी तरी सांगितलं होतं कि ह्योच नवरा पाहीजे चित्रपटाला पब्लीक एव्हढं हसत होतं कि संवाद ऐकूच यायचे नाहीत..
त्यातूनही दादांचे संवाद अजिबात समजत नाहीत.
'मिडीयम स्पायसी' या
'मिडीयम स्पायसी' या चित्रपटाबद्दल माझे दोन आणे
आत्ताच 'मिडीयम स्पायसी' हा मराठी चित्रपट पाहिला.
नीना कुलकर्णी, रवींद्र मंकणी, सई ताम्हनकर, ललित प्रभाकर , अरुंधती नाग, नेहा जोशी या सगळ्यांनी अतिशय
समर्पक अभिनय करून सिनेमा अखंडपणे ताजा ठेवला आहे.
साठीच्या आसपासचे नवरा बायको .. समाजाने घालून दिलेल्या काटेकोर नियमांना शिरसावंद्य मानून संसार आनंदी आणि स्वतःच्या सततच्या आग्रही भूमिकेने पुढे ढकलत नेणारी घरातली स्त्री नीना कुलकर्णी यानी अतिशय सहजपणे उभी केली आहे.
शाब्दिक संघर्ष टाळण्याच्या हेतूने मितभाषी वृत्ती ठेवून स्वतःची स्पष्ट आणि भक्कम भूमिका घेणारा प्रोफेसर असलेला नवरा आपल्या उत्तम देहबोलीतून आणि नसलेल्या मूक आणि कमीत कमी शब्दांच्या संवादातून रवींद्र मंडळींनी उत्तम साकारला आहे . एक नवरा पिता बंधू या सर्व भूमिका अचूकपणे जगत राहणारा हा नवरा खरोखरच सुंदर आहे.
लेखक आणि दिग्दर्शकांनी या मनुष्याचे त्याच्या मुलाशी असलेले वडील- मुलगा पेक्षाही मित्र हे नातं खूप छान प्रसंगांमध्ये उभे केले आहे.
कुटुंबातल्या विविध पातळीवर असलेल्या प्रत्येकाचे त्याच्या पार्टनरशी असलेले नाते; या नात्यांचा एकमेकांच्या नातेसंबंधांवर पडणारा ताण आणि तो हलका करून घेण्यासाठी चाललेली प्रत्येकाची धडपड चित्रपटात उत्तमपणे साकारली आहे.
कलेची आसक्ती असलेल्या किंवा स्वतः कलाकारच असलेल्या व्यक्तींची ह्या नाते बंधनांमुळे फरपट होऊ नये म्हणून समाजाला अमान्य असलेला मार्ग अंगीकारणे विचार करायला लावते .
एक उत्तम टीमवर्क जमून आलेला चित्रपट, निश्चित पहावा असा!
रिव्ह्यूबद्दल धन्यवाद, पशुपत.
रिव्ह्यूबद्दल धन्यवाद, पशुपत. बघेन कदाचित हा पिक्चर.
'मिडीयम स्पायसी' या
चुकून दोनदा छापले गेले म्हणून संपादित करत आहे
उत्तम ओळख पशुपत.
उत्तम ओळख पशुपत.
पशुपत, नोटेड.
पशुपत, नोटेड.
काल आयपीटीव्हीवर स्वरगंधर्व
काल आयपीटीव्हीवर स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमा पाहिला. छान आहे.
सुनील बर्वेनी चांगलं काम केलंय म्हणता येईल. गाणी एक से एक आहेत ऐकायला. एवढा स्ट्रगल केलाय त्यांनी हेही माहित नव्हतं.
अर्थात तेव्हाच्या काळी एका गायकाला किती सन्मान आणि काम (ज्यावर गुजराण होईल) मिळत असेल. पण खडतर जीवन होतं खरं.
किशोर कुमार, मोहोम्मद रफी म्हणून घेतलेले कलाकार सुमार वाटले (अर्थात ते एकेका सीनपुरताच आहेत)
जगाच्या पाठीवर पुस्तक पण मिळालं तर वाचायचं आहे.
'जगाच्या पाठीवर' हे त्यांचे
'जगाच्या पाठीवर' हे त्यांचे अर्धवट राहिलेले आत्मवृत्त झपाटल्या अवस्थेत वाचले होते..
अतिशय चित्रमय विलक्षण जीवनानुभव... ध्येयासाठी अपरिमित कष्ट~आपेष्टा अंगीकारत अथक कार्यरत असलेला; यशापयश~ सुख दुःख ~यापलिकडे पोहोचलेला अतृप्त गंधर्व...
चित्रपटात 'reading between lines' आणि एकूणच वाचकाच्या मनुष्य चक्षुसमोर वाचकाच्या विचारशैलीतले किंवा चित्रमय कल्पकतेतून उमटणारे प्रत्यक्ष चलत् चित्र उभे करण्याची मुभा नसते .. ती बाजूला पडते... आणिक वाचनासारखा परिणाम चित्रपट साधू शकत नाही.. हे माझे ठाम मत आहे त्यामुळे चित्रपट बघणे टाळले..
खन्ग्री बालक जुनं फर्निचर हा
खन्ग्री बालक जुनं फर्निचर हा सिनेमा मला आवडला. काही गोष्टी अचाट आणि अतर्क्य आहेत. जसं कि एका बाईला ८ महिने घरात लपवून ठेवणे. आणि मुलगा आला तर आपल्याच घरात फिरत नाही? लगेच बापावर विश्वास ठेवतो कि ती गेली म्हणून? उपेंद्र लिमयेची ओव्हर acting सुद्धा खटकली मला.
बाकी मराठी सिनेमाचा दर्जा दिवसेंदिवस खालावतच चालला आहे.
दक्षिणा, आईलाही आवडला.
दक्षिणा, आईलाही आवडला.
मला ऊन पाऊसपासून सुरू असलेली तीच थीम पुन्हा रिमिक्स केल्यासारखी वाटली. ममांचं दिग्दर्शन सफाईदार असतं. त्यामुळे बघणेबल असतो सिनेमा.
Pages