मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांघरूणमधले साहवेना अनुराग गाणे पाहिले. नुसतं ऐकलं असतं तर छान वाटलं असतं. पारच निळावंती करून टाकलंय तिला. आणि कायच्च्या काय डान्स. जरा तरी काळाला शोभेल असा दाखवा. किमान १०० वर्षांपूर्वी कीर्तनकाराशी लग्न झालेल्या बाईचा दिवाणखान्यात आणि पावसात डान्स?

सगळेच Rofl

अस्मिता तर महान आहेस! काय काय बघतेस आणि काय काय लक्षात राहतं तुला... सलाम!

सगळेच महान आहेत Lol

राजापूरची गंगा अतिमहान कमेंट, ती दर तीन वर्षांनी प्रकट होतेना.

2012 साली कोकणात देवगडला गेलेले फॅमिलीसह, तेव्हा मोठे दिर म्हणाले, राजापूरची गंगा आलीय, मुंबईला जाताना on the way राजापूरला जाऊन पुढे जा, माझ्या आईला फार आनंद झाला, आम्ही गेलेलो सगळे तिथे, मस्त वाटलं.

सापळा पाहिला. म्हणजे या नावाचा सिनेमा.
मराठीत हिचकॉक प्रमाणे मेंदू गिरमिटने पोखरणारे रहस्यपट बनत नाहीत ही सल असल्याने बनवला असावा. (तसा प्रेडिक्टेबलच आहे. सुरूवातीच्या पाच मिनिटात कोण मरणार आहे हे लक्षात येतं पण कसं मरणार हे खेळवत ठेवलंय). रोस्ट साठी पर्फेक्ट मटेरिअल आहे. हे काम कुशल कारागिरांकडे पास करत आहे.

लांजेकर मंडळींची नावे पाहून भीतीच वाटली होती कि रहस्य पटात सुद्धा कधीही एखादे पात्र तलवार घेऊन हर हर महादेव अशी आरोळी देईल. (भिंतीवर तलवार आहेच). नेहा जोशीचा अभिनय नेहमीच आवडतो. बाकि नंतर.

आयपीटीव्ही वर अलिबाबा चाळीस चोर बघितला ! ठीक ठीकच आहे. विबासं हे चूक की बरोबर या फंदात मी न पडता एक मुव्ही म्हणून पाहिला. पण तो ना धड कॉमेडी जमलाय ना सिरीअस.. मला एवढा काही आवडला नाही. हल्ली मराठीतलं फार काही आवडणं माझ्यासाठी दुर्मिळ गोष्ट झाली आहे Wink बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे, सिरीज आवडल्या आहेत.

तर.. एवढे नावाजलेले कलाकार घेऊन वायाच घालवलंय सगळ्यांना. मराठीत नावाजलेले म्हणजे फक्त जास्त मुव्हीमधे दिसलेले असं म्हणावंसं वाटतं आता. त्याचा परफॉर्मन्स शी काही संबंध नाही.

चाळीशी ओलांडलेल्या एका मित्र मैत्रीण ग्रुपमधला एक जण एक गोष्ट /थिअरी टेस्ट करण्यासाठी काहीतरी क्लुप्ती लढवतो. सगळे त्याला बळी पडतात रादर त्यामुळे त्यांच्यात चाललेली प्रकरणं उघडकीस येतात., नंतर पश्चात्ताप वगैरे आपलाच जोडीदार बरा वगैरे वगैरे, एवढीच स्टोरीलाईन.
काही काही पंचेस चांगले असले तरी अक्खा सिनेमा बघायला बोर वाटला. नुसता गोंधळात गोंधळ आहे. सगळ्यांनाच एकमेकांबद्दल फिलिंग्स आहेत असं वाटत राहतं अरे ती काय खिरापत आहे का अशी वाटायला?
आनंद इंगळे ला सगळ्यात पीळ मारायचं काम आहे. त्याच्या "चुंबन" थेअर्‍या म्हणजे कमालीचे कंटाळवाणे डायलॉग आहेत.
मधुरा वेलणकर काहीतरी सिड्युसिंग, गुढ वागण्याचा प्रयत्न करत राहते.
उमेश कामतचा वरणभात लूक अजिबात स्पोर्टसपर्सनचा वगैरे वाटला नाही (ज्यावर मुली भाळतात) उगीच एक ओला नॅपकिन गळ्यात टाकून, रॅकेट दोन चार वेळा फिरवून, स्टॅनली वॉटर बॉटल मधून पाणी पित दाखवला की हा भारी खेळाडू! हे आपल्या मराठी सिरियलीतल्या प्रेझेंटेशन, ऑफिस ऑफिस खेळण्यासरखंच आहे.
श्रूती मराठे सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करत तोंडाचे चंबू करत, अगंबाई अरेच्चा म्हणत वेळ मारून नेते. स्वतः टाईमपास करत असताना नवर्‍याने दोन शब्द सुनावले तर भसाभसा रडून वाईट वाटून घेते.
सुबोध भावेचं एक तिसरंच स्टेशन लागलेलं असतं. पूर्ण्पणे बल्ल्या झालेला नवरा आहे तो, त्याच्यामते. त्याचा चिडका बिब्बा रोल सजनी शिंदे पासून कंटीन्यू.
मुक्ता बर्वे ला कुत्र्याला हातात धरायचा रोल छान दिलाय.
अ तुल परचुरे इमाने इतबारे जे काम दिलंय ते निभवायचा प्रयत्न करतो.
शेवटी एक फुसका बार आपटून पिक्चर संपतो. हुश्श!

मराठी पिक्चर वाल्याच मेजर काहितरी गण्डलय अस बर्‍याच सिनेमामधुन दिसत आहे...कथेचा जिव अत्यत छोटा असणे आणी मग सिरियलिसारख बादलिभर पाणी ओतुन" प्या आता हा रस्सा" हे चालू आहे! कॉमेडी करु का सिरियस हा गोन्धळ तर सगळ्यात जास्त बेक्कार..
फक्त ट्रेलर(च) बरे असतात.
इथे खुप कौतुक झालेला वाळवी मला खुप ओव्हर हाइप वाटला...त्यात काय विनोदी आहे अस कित्येक सिच्युएशनला वाटुन गेल..."य "वेळा बघितलेला हेराफेरी,गोलमाल्,मालामाल आजही बघितला तरी हसु येत.

अंजली Lol

मला उमेश, मुक्ता आवडतात पण प्रोमो बघूनच पिक्चर काही खास नसेल असं वाटलं त्यामुळे बघणार नाहीच.

मुक्ता बर्वे ला कुत्र्याला हातात धरायचा रोल छान दिलाय >>>
उगीच एक ओला नॅपकिन गळ्यात टाकून, रॅकेट दोन चार वेळा फिरवून, स्टॅनली वॉटर बॉटल मधून पाणी पित दाखवला की हा भारी खेळाडू >>> Lol

याच कथेवर स्वतंत्र नाटकही आहे बहुधा. बाय द वे नावाचा पिक्चरशी काही संबंध आहे का?

सापळा बघायला हवा. तो शब्द मी बातम्यांतच जास्त वाचला आहे. "पोलिस निरीक्षक (पुणे ग्रामीण) अमुक अमुक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला..." वगैरे.

कुठे बघितलात? >>> प्राईमवर.

मुक्ता बर्वे ला कुत्र्याला हातात धरायचा रोल छान दिलाय >>> Lol

पोलिस निरीक्षक (पुणे ग्रामीण) अमुक अमुक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला >>> Lol

आचार्य,
सापळा आणि भयभीत मी यादीत टाकून ठेवले होते पण काहीच माहिती नसल्याने होल्डवर होते. बरे झाले लिहिलेत.

अंजली, मस्त लिहिले आहेस. Lol

स्टॅनली कप हे हायड्रोफ्लास्कचं 'अफोर्डेबल अल्टरनेटिव' आहे, त्यामुळे उमेश कामत हा जॉन अब्राहमचं 'तेच-ते' समजतेय. दिग्दर्शक आदित्य इंगळे लिहिले होते, तो मुलगा वगैरे आहे का आनंद यांचा? मी ट्रेलर बघितलं होतं, साधारण अंदाज आला होता. चावटचावट म्हणून 'चुंबनथेरीत' अडकलेला मराठी सिनेमा किती चावट असणार, उगा आशा दाखवतात आणि शेवटी आपापल्याच नवऱ्याबायकोकडे परत जातात. त्यात अजून वपुंचं 'नवराबायको-करंजीसारण' सदृश्य प्रवचन देतात. 'लफडी नकोत बाबा प्रवचन आवर' झाले आहे.

कुकातकुका..... खेळाडू स्क्वर्टी बॉटल मधुन पाणी पितात ना? ते ही १० डॉलरच्या प्लास्टिकच्या? मेटल बॉटल मधुन खेळाडू पाणी पितात का खरंच? ते असं स्ट्रॉने ओढत बसणं इज सो च्युगी! स्क्वर्टी बॉटल इज ड्रिप! Wink
(पुणे ग्रामीण) >> याला स्पेशल Lol

पण काहीच माहिती नसल्याने होल्डवर होते. बरे झाले लिहिलेत. >> मला सध्या कुठलाही सिनेमा झेपत नाही असे माझ्याच लक्षात आले आहे. पूर्वी डोकं बाजूला काढून ठेवून एण्जॉय करायला जमत होतं. आता तशी काही निकड भासत नाही Happy

त्यामुळं आपण ऑड वन औट आहोत असे वाटून कधी कधी एखादा चित्रपट आवडून घ्यायचा प्रयत्न करतो तर नेमकं मायबोलीवर पिसं काढलेली असतात. ( उदाहरण लक्षात नाही). आणि एखादा नाहीच आवडला म्हणून खरं खरं लिहावं तर इथे सर्वांना आवडलेला असतो (उदा. वाळवी, आत्मपॅम्फ्लेट) Lol
बहुतेक मायबोलीमुळे चित्रपटाची आवड अशी झाली आहे कि समजत असलेल्या कुठल्याही भाषेतला चित्रपट झेपतच नाही. यातून वाचलेले सिनेमे म्हणजे ज्या भाषांचा इनर्शिया ऑफसेंटर आहे त्या भाषेतले सिनेमे. उदा इंग्रजी , हिब्रू, ताझिकिस्तानी, मॅन्डरिन्,
दॉइश, सोमाली, आफ्रिकाना, झेक इत्यादी. समजले नाहीत तर ते भारी वाटणे हे अद्याप कायम आहे. समजल्यावर मग नोलानचे सिनेमे पण सामान्य वाटू लागतात.

अफोर्डेबल अल्टरनेटिव' आहे, त्यामुळे उमेश कामत हा जॉन अब्राहमचं 'तेच-ते'>>>
गरीबांचा अमिताभ, गरीबांचा मिथुन तसा उमेश कामत हा ममवचा जॉन अब्राहम म्हणायंचय का तुला?

वपुंचं 'नवराबायको-करंजीसारण' सदृश्य प्रवचन देतात.
>>>> Lol

नोलनला कशाला टपली >>> समजला तर . टेनेट न समजल्याने भारी वाटलेल्यांपैकी मी पण आहे.

गरीबांचा मिथुन तसा उमेश कामत हा ममवचा जॉन अब्राहम >> Lol

समीर धर्माधिकारी गरीबांचा मिलिंद सोमण असावा (किंवा उलटे)

गरीबांचा मिथुन तसा उमेश कामत हा ममवचा जॉन अब्राहम >>> Lol

उगा आशा दाखवतात आणि शेवटी आपापल्याच नवऱ्याबायकोकडे परत जातात. त्यात अजून वपुंचं 'नवराबायको-करंजीसारण' सदृश्य प्रवचन देतात. 'लफडी नकोत बाबा प्रवचन आवर' झाले आहे. >>> Lol

स्टॅनली कप हा पाणी पिण्याचा कप आहे हे अमितला सांगा. त्यांच्यातिकडे तो हॉकी चा कप आहे. आईस हॉकी. नाहीतर तो उमेश कामत हॉकी खेळतोय असा सीन येण्याची वाट पाहात बसेल.

मला मराठी चित्रपटांशी फारसं रिलेट होता येत नाहीये, काय बिनसलं आहे माहीत नाही. फारच उच्चभ्रू उगाच उसासे टाकत गुंतागुंतीचा आभास निर्माण करणारी पण प्रत्यक्ष साडीवर सुरकुती सुद्धा नसलेली पात्रं असतात (उदा. मृणाल कुलकर्णी) नाही तर एकदमच उथळ, सवंग, उगाच चीप विनोद व अंगविक्षेप करणारी, तेचतेच बोलणारी तरी..! (उदा. प्रथमेश परब) ------ अगदी परफेक्ट लिहिलं आहे हे. . हे relate झालं.. Happy खरंच मराठी पिक्चर कुठे कमी पडतात काळात नाही.. बरेच actors चांगली कामं करतात, मेहनती आहेत.. पण scripts काही काही अगदीच आवडत नाहीत..

Pages