मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता - भारी लिहीलं आहे Happy कोठे पाहिला?

तिचंही कुणावरच प्रेम नसतं, कुणाचंच कुणावर प्रेम नसतं. तरीही टॉक्सिक पेट्रियार्कीला शर्करावगुंठीत करून त्याचा 'हम दिल दे चुके सनम' केला आहे >>>
शिवाय तो वाईनही पित असतो हे बघून तो अकस्मात/ सोयीस्करपणे वाईट होतो >>> Lol

मला मराठी चित्रपटांशी फारसं रिलेट होता येत नाहीये, काय बिनसलं आहे माहीत नाही. >>> काही आवडले होते - इतक्यात पाहिलेल्यांपैकी 'वाळवी' - "रिलेट" वगैरे नाही पण बघायला आवडला होता. आत्मपॅम्फ्लेटही.

पण मराठीत तीन कॅटेगरीतील पिक्चर्स मला सहसा आवडत नाहीत असे जाणवले आहे:
- परीक्षणाच्या सुरूवातील भारतातील सामाजिक परिस्थितीवर हातभर इण्ट्रो असते व पिक्चरबद्दल वर्णन बरेच उशीरा येते असे चित्रपट
- पिक्चरमधले एखादे पात्र कथेशी/प्रसंगाशी संबंधित भाष्य करणारे एखादे पुस्तक वाचत असते
- पिक्चरच्या नावापुढे एक आणखी टॅगलाइन असते, सहसा आपल्याला आरसा वगैरे दाखवणारी.

आनंदी गोपाळ बघितला. फार सुंदर सिनेमा आहे. त्यातली रंग माळियेला आणि वाटा वाटा वाटा गं ही दोन्ही गाणी लूप लावतात डोक्यात. रंग माळियेला स्वतंत्र हेडफोनवर ऐकलं तर काय माहौल बनतो! लाजवाब!! त्यातली सनई अगदीच जमून गेली आहे.

या चित्रपटातला कपडेपट ही आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब. दीडशे वर्षांपूर्वी लोक कुठले कपडे परिधान करत होते, त्यांचे रंग कसे होते - ह्याच्याशी जुळणारा कपडेपट आहे. कुठेही कुणाच्या पगडीचा किंवा नऊवारीचा रंग बघून 'हा मॉडर्न युरोपियन रंग तेव्हा कसा काय' असा प्रश्न पडत नाही (हिस्टोरियन रिऍक्टस टू बाजीराव मस्तानी हा प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांचा व्हिडिओ बघितला असल्यामुळे हे लक्षात आलं). शिवाय त्या काळची घरं, गावांची रचना, महाविद्यालयं इत्यादीपैकी काहीच अ‍ॅनॅक्रॉनिक (मराठी शब्द? कालविसंगत?) वाटत नाही.

आत्मपॅम्फ्लेट आणि वाळवी वेगळ्या हाताळणीमुळे आवडले होते.
वाळवी' - "रिलेट" वगैरे नाही>>> 'हिच्यासाठी बायकोला मारलं यानी' अर्थातच रिलेट कसं होईल. Lol
पिक्चरमधले एखादे पात्र कथेशी/प्रसंगाशी संबंधित भाष्य करणारे एखादे पुस्तक वाचत असते
>> पुणे ५२
सहसा आपल्याला आरसा वगैरे दाखवणारी.>>> Lol तिकीट काढून आरसा बघायचा.

'हिच्यासाठी बायकोला मारलं यानी' अर्थातच रिलेट कसं होईल >>> Lol हो लिहीताना हेच डोक्यात आलं आणि टोटल थबकलो होतो Happy

तिकीट काढून आरसा बघायचा. >>> Lol

अस्मिता, मी_अनू >>>धमाल….
फारेण्ड >>> तुमचे क्रायटेरीआ परफेक्ट आहेत. यांत अजून एक जोडा. रिलीजपूर्व प्रसिद्धीमधे आमचा चित्रपट कसा युनिक, वेगळा, भन्नाट आहे असं खंडीभर मुलाखती देत सांगणाऱ्या किंवा आमचा चित्रपट एखाद्या (जनरल पब्लिकला चित्रपट म्हणून गम्य नसलेल्या उदा. मानवी नातेसंबंधातील मुल्यविहीनतेचे प्रतिक इ.) विषयावर सखोल भाष्य करतो असे स्वतःच डिक्लेअर करणाऱ्या टीमचे चित्रपट…

किंवा मग बळंच आपल्या आयुष्यातल्या छोट्याश्या स्ट्रगलमुळे/दुःखामुळे आपण एखादी (हिंदी/मराठी चित्रपटाच्या मानाने) प्रचंड कॉंप्लिकेटेड कॅनव्हास असलेली भुमिका कशी रिलेट करू शकलो वा निभावली असं मुख्य पात्र सांगत सुटणारे चित्रपट…

कुणाचंच कुणावर प्रेम नसतं.
पडदा फाडून फेकून आपटला असता
>>
Lol

(तळपदेच्या सिनेमाचे ट्रेलर पाहुन वाटलेच होते म्हणा)

अरे हो, थिएटरमध्ये वाळवी आवडला होता.अचाट अतर्क्य असला तरी वेगवान होता.
आनंदी गोपाळ पण चांगला होता.
बहुतेक मी थिएटरमध्ये बघायला चांगले मराठी सिनेमे निवडत नाहीये.नीट ट्रेलर बघून, रिव्ह्यू वाचून जायला हवे.

बाय द वे, ते ‘आम्ला’ नाव वाचूनच पिक्चरची पात्रता (बोलीभाषेतला शब्द मनात वाचण्यास हरकत नाही) कळली. आणि फिश खाऊ घालण्याचा चित्रपटीय सिग्नीफिकन्स काय आहे? आणि ती पळून जाण्याचा प्लान करू शकते पण हॉटेलात जाऊन/स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर करून फिश खाऊ शकत नाही?

अस्मिता

गाणी बरी वाटतात पण नंतर आठवत नाहीत. >> मला अचानक 'ही अनोखी गाठ कोणी बांधली' हे आवडल्यासारखं आठवलं म्हणून शोधून पाहिलं तर ते ममांच्याच पांघरूण सिनेमातलं आहे. आपल्याच सिनेमातल्या गाण्यांच्या नावाने दुसरा सिनेमा काढायचा हा पूर्वापार राजश्रीय-बडजातीय हलकटपणा आहे माने.

आम्ला >> कसलं अ‍ॅसिडिक नाव आहे!

<<तिचंही कुणावरच प्रेम नसतं, कुणाचंच कुणावर प्रेम नसतं.>> <<शिवाय तो वाईनही पित असतो हे बघून तो अकस्मात/ सोयीस्करपणे वाईट होतो व ती नवऱ्याकडे परत येते.>> Lol

विनोदी पद्धतीने सादर केलेले शास्त्रीय वाटावे असे गाणे आणि नृत्य >> गौरीच्या संगीतगुणांना वाव देऊन ममा 'शिशुकौतुक पाहती' होण्यासाठी बहुतेक तिच्या प्रत्येक सिनेमात असलं काहीतरी घालतात. पांघरुणातही (म्हण्जे पांघरूण सिनेमात) ती शास्त्रीय संगीतात निपुण दाखवली आहे म्हणे. शास्त्रीय वाचून मी ते गाणं बघण्याचं पातक केलं आणि अरारा! कायच्या काय आहे ते. तो विनोदी चष्माही दिसला ह्यात.

आपल्याच सिनेमातल्या गाण्यांच्या नावाने दुसरा सिनेमा काढायचा हा पूर्वापार राजश्रीय-बडजातीय हलकटपणा आहे माने.
गौरीच्या संगीतगुणांना वाव देऊन ममा 'शिशुकौतुक पाहती' होण्यासाठी बहुतेक तिच्या प्रत्येक सिनेमात असलं काहीतरी घालतात. पांघरुणातही (म्हण्जे पांघरूण सिनेमात) ती शास्त्रीय संगीतात निपुण दाखवली आहे म्हणे.
>>>>> Lol Lol

अस्मिताचा।प्रतिसाद पटला
एक ठराविक वर्तुळात फिरतोय मराठी सिनेमा
काल की परवा वेलकम होम थोडासा पाहिला तेव्हा हेच जाणवले. छोटा जीव ओढून ताणून चित्रपट कशाला बनवतात काय माहीत.

वाळवी, आत्मपामफलेट, नाळ-2
हे गेल्या वर्षभरात आवडलेले मराठी चित्रपट.. तिन्ही थिएटरमध्ये पाहिले हा यावर्षी घेतलेला उत्तम निर्णय.
बाईपण भारी देवा सुद्धा चांगला बनवला होता.
तसेही मराठीत कुठल्या वर्षी एकाच वर्षात सात आठ चांगले चित्रपट बनले होते.. मला तरी आठवत नाही.. कित्येक बंडल चित्रपट यायचे आणि जायचे, आपल्या कानावर नाव सुद्धा नसायचे. आता कानावर नाव येऊ लागल्याने आपल्याला ते बंडल चित्रपट समजत आहेत म्हणून जाणवत आहेत.

आपल्याच सिनेमातल्या गाण्यांच्या नावाने दुसरा सिनेमा काढायचा हा पूर्वापार राजश्रीय-बडजातीय हलकटपणा आहे माने.
>>
आता एक्सेल वाले करतात हा हलकटपणा
जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो, जी ले जरा (हा कॅन्सल झाला, पण इरादा तर होताच ना)

हा पूर्वापार राजश्रीय-बडजातीय हलकटपणा आहे माने.
>>> गुड वन. Lol मलाही ते गाणं आठवलं होतं.
ममा 'शिशुकौतुक पाहती' >>> Lol

ममानी काहीही केलं तरी मला आवडत नाही असं साधारण रेकॉर्ड आहे. 'काकस्पर्श' पण आवडला नव्हता. खूप उच्च दाखवण्याचा सोस कृत्रिम वाटतो त्यांचा ! त्यापेक्षा 'दे धक्का' वगैरे बरे वाटले होते.

ममानी काहीही केलं तरी मला आवडत नाही असं साधारण रेकॉर्ड आहे.
>>
+१
काही ही करताना मी लई भारी असा एक आव असतो
कांटे मधला हकला ठीक होता (क्रेडिट संजय गुप्ता ला), आणि अस्तित्व (पण तो तब्बू मुळे)

मराठीत शोले चा रीमेक केला तर मेहबूबा मेहबूबा च्या जागी बैठकीची लावणी किंवा शास्त्रीय संगीताची पंगत दाखवतील.

Happy शास्त्रीय संगीतावरील गाण्यात इतके हातवारे करतात मी त्यावरून ओळखते हे 'शास्त्रीय' आहे. Upper body cardio जणू ...! उभे राहिले तर नाचही 'निघेल' त्यातून. Lol

'पडोसन' सिनेमात सुनील दत्त कसा मेहमूदच्या हातवाऱ्यांना घाबरून मागेमागे जातो. नंतर फाजील आत्मविश्वास येऊन एवढा पुढे जातो की किशोर कुमारला दोरीचा फास टाकून पुन्हा मागे ओढावे लागते. माझा फेवरेट सीन आहे.

गाणं बघितलं आचार्य. Lol

Upper body cardio >> Lol भारी होईल ही कोरिओग्राफी .
पडोसन धमालच आहे.
हे वरचं गाणं ज्यातलं आहे तो हर्‍या नार्‍या झिंदाबाद बहुतेक भारतातली पहिली हॉरर कॉमेडी आहे.

राम नगरकर - निळू फुले ( गाणं ऐका)
>>>>
मी फक्त मुखडा ऐकला होता. आणि मला ते 'कशी नखऱ्यात चालतेय हिरणी' वाटायचे.

मी एक मराठी शॉर्ट फिल्म बघितली कालच. " रविवार सकाळ - सतिश आळेकर, आरोह वेलणकर , . छान कामं आहेत सगळ्यांची. या फिल्म बद्दल कोणी लिहीलं होतं का आधी? बघा नक्की

Pages