मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसांपूर्वी " आईच्या गावात मराठी बोल.." बघि तला.
इतका असह्य आहे.

ओमी वैद्य च बोलणं चतुर मध्ये चांगलं वाटलं.

पण इथे अख्खा सिनेमा भर तो तसाच बोट राहतो. अगदी कंटाळा आला.

अमेरिकेतला मराठी मुलगा भारतात जातो, आणि काही कारणाने मराठी मुलीशी लग्न करायचं ठरवतो अशी काहीशी कथा आहे.

पटकथा लेखिका बे एरिया तील आहे... त्यामुळे इकडे त्याचा काही मराठी ग्रुप्स वर बराच बोलबाला झाला. इतक्या बंडल सिनेमाचं केवळ ओळखी तील असल्यामुळे लोक तोंड फाटेस्तोवर कौतुक करतायत.. काय बोलणार?

आनंदी गोपाळ बघितला. ....
या चित्रपटातला कपडेपट ही आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब. शिवाय त्या काळची घरं, गावांची रचना, महाविद्यालयं इत्यादीपैकी काहीच अ‍ॅनॅक्रॉनिक (मराठी शब्द? कालविसंगत?) वाटत नाही. >>
ह. पा.. हे बघा:
https://www.lokmat.com/manthan/anandi-gopal-biopic-real-story-first-lady...
आणि या पानावरचा चिनूक्स यांचा प्रतिसाद. https://www.maayboli.com/node/69078?page=5
आनंदी गोपाळची लक्तरे काढली आहेत ( तीच लायकी आहे)

आईशप्पथ!!! लिंकांबद्दल आभार. थोडक्यात, काय वाट्टेल ते दाखवलं आहे सिनेमात. मी अर्ध/अज्ञानात सुखी होतो. आपला आनंद क्षणभंगूर असतो हेच खरं.

श्रेयसचा चष्मा फारच विचित्र आणि विनोदी आहे >>> ट्रेलर पाहिला या पिक्चरचा आणि ट्रेलरभर तो चष्मा खटकत होता. रोज धुवून काही कपडे आक्रसत जातात तसे काहीतरी त्या चष्म्याचे झाले असावे. किंवा गांधीजी व हा रोल एकाच चष्म्यात गुंडाळू अशा हेतूने तो घेतला असावा.

आपल्याकडे माणूस थोडा वयस्कर दाखवायचा असला की त्याला शाल किंवा स्कार्फ का घालायला लावतात? ते ही भर कोकणात ("अहो कोकणात थंड हवा असती तर शिमला नसते म्हंटले रत्नांग्रीस?" - अंतू बर्वा)? झोपलेल्या स्त्री व्यक्तीच्या अंगावर तेथे आलेल्या पुरूष व्यक्तीने भर उकाड्यात सुद्धा पांघरूण घालणे ही गेली अनेक वर्षे हिंदीत सुद्धा सुरू असलेली रीत आहे आपण तिच्याकडे 'गलत अंदाज नजरोंसे' बघत नाही हे दाखवायला. इथे ही आहे.

एक चादर मैली सी मधे नवरा मेल्यावर त्याच्या भावाशी लग्न करायला लावतात हिरॉइनला. इथे उलटे दिसते. एक सोलापुरी चादर मैली सी असेही नाव चालले असते पिक्चरचे. नाहीतरी पिक्चरच्या नावात एक प्रचलित हिंदी शब्द वापरण्याची सध्या फॅशन आहे. मितवा, तू ही रे ई.

मग ती शेवटी नवर्‍याकडे परत येते, की प्रियकराबरोबर निघून जाते व श्रेयसला लगी आज सावन की फिर वो झडी है मोड मधे सोडून? (तेवढे एक गाणे फक्त कोकणात फिट्ट बसेल) काळजी करू नका. ट्रेलरनेच सगळे स्पॉईलर दिलेले आहेत.

पांघरूणचाही ट्रेलर पाहिला. त्यातही हीच आहे व त्यातही डान्स सीन वगैरे आहे. त्यामुळे हपा की कोणीतरी वरती लिहिले आहे तसे ते कौशल्य दाखवायला कहानी की मांग तयार केली असावी. हरकत नाही. There are worse kahaani ki maangs.

झोपलेल्या स्त्री व्यक्तीच्या अंगावर तेथे आलेल्या पुरूष व्यक्तीने भर उकाड्यात सुद्धा पांघरूण घालणे ही गेली अनेक वर्षे हिंदीत सुद्धा सुरू असलेली रीत आहे >> Lol
तसेच रिटायर झालेल्या माणसाचा पण गणवेष असतो सिनेमात. झब्बा पायजमा आणि शाल मस्ट . म्हणजे तोपर्यन्त सुटाबुटातला माणुस रिटायर झाला हे दाखवाय्ला ती शाल लागतेच. अमिताभ च्या बागबान मधेही होते तसे.
There are worse kahaani ki maangs. >> Happy

फा Lol

फा Lol

चटचट डोळ्यासमोर काही शाल चादर सीन आले Lol

मग, श्रेयस वयस्कर दाखवायला त्याच्या केसांचा लांबीच्या दिशेने 1 इंच जाडीचा एकच पट्टा पांढरा आणि बाकी केस काळे दाखवलेत काय?पूर्वीच्या काळी अरुणा इराणी चे केस कायम असेच सिलेक्टिव्ह पांढरे व्हायचे.आमचे मेले रुट्स ला सर्वत्र पूर्ण सरफेस एरिया वर पांढरे उगवतात.
मराठी हिंदीत चादर घालतात.के ड्रामा मध्ये तर कितीही कडाक्याची थंडी असली तरी नायिकेला चादरीची लहान केलेली घडी, ती पण पोट छातीवर घालून हात पाय थंडीत उघडेच ठेवतात.घाला की मस्त पसरून, सर्व हात पाय गळा झाकला जाऊन ऊब वाटेल अशी.

फारेण्ड Lol
खूप दिवस (वर्ष ?) नवीन काही लिहीलं नाही. येऊ दे असंच काहीतरी खुसखुशीत.

चादर…… Lol
केवळ या एका कारणासाठी ती त्याला सोडून गेली तरी माफ आहे.
बरं जो गलत अंदाज नजरेने बघतच नाहीये, त्याला ते प्रुव्ह का करावंसं वाटतं?
सर्व्हे केला पाहिजे की रिअल लाईफमध्ये आजारी किंवा झोपेत कुडकुडत नसलेल्या नवरा बायकोला कितीजण पांघरूण घालतात?

Lol

https://youtu.be/qTDn1VkBH18?si=rD821m2WUTtl3pGU
'ऐ दिल है मुश्किल' मधे अलिझेचे स्वप्न असते शिफॉन साडी नेसून चोप्रांच्या गाण्यावर नाचायचे पण जॅकेट असूनही रणबीरचा काकडा होतो आणि पडतो. मग ती लाथ घालते त्याला , बघाच. Lol

पण नवऱ्याने बायकोकडे गलत नजर से का बघू नये?>>>>
पुढेमागे ‘मेरा प्यार गंगाजल की तरह पवित्र है’ ड्वायलॉक टाकायची सोय म्हणून. कोकणासाठी आपण ‘राजापूरची गंगा’ म्हणू. शिवाय हिंदी चित्रपटवाले व केकता लग्नं होईपर्यंत भलेही प्रेमाच्या नावाखाली स्टॉकिंग, ईव्ह टीझिंग करतील. पण लग्न झाल्यावर कन्सेण्ट इज मस्ट.

रणबीरचा काकडा होतो आणि पडतो. मग ती लाथ घालते त्याला , बघाच.>>>> काकडा Rofl
भयंकर आवडता शॉट

जॅकेट असूनही रणबीरचा काकडा होतो आणि पडतो. मग ती लाथ घालते त्याला >>> Lol

कोकणासाठी आपण ‘राजापूरची गंगा’ म्हणू. >>> Lol

शिवाय हिंदी चित्रपटवाले व केकता लग्नं होईपर्यंत भलेही प्रेमाच्या नावाखाली स्टॉकिंग, ईव्ह टीझिंग करतील. पण लग्न झाल्यावर कन्सेण्ट इज मस्ट. >>> लोल हे भारी निरीक्षण आहे Happy

र.आ. - काही सुचलं तर नक्कीच Happy

तेवढे एक गाणे फक्त कोकणात फिट्ट बसेल
राजापूरची गंगा
Biggrin

राजापूरची गंगा १२ वर्षांतून एकदा प्रगट होते (ना?)... म्हणजे मग कोकणात प्यार पवित्र ठेवण्याची 'तप'चर्याच लावावी लागेल.

'तप'चर्याच
रणबीरचा काकडा होतो आणि पडतो. >> Biggrin

Pages