चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही बोअर झाला मडगाव एक्सप्रेस. पूर्ण बघितला नाही. मला तसेही असले स्लॅपस्टिक कॅटेगरी जोक्स फारसे आवडत नाहीत.

माझी पेशन्स लेवल जास्त आहे मग तुमच्या दोघींपेक्षा Wink .. मी पुढे ते गोव्यातून पळून जायचा प्रयत्न करतात तिथपर्यंत बघितला..
Lol पण आता नाही बघू शकत पुढे.

माझेमन, अनुमोदन. Happy

या चर्चेवरून मागे एकदा वाहत्या धाग्यावर स्पायडरमॅनचा प्रसिद्ध सुविचार With great power comes great responsibility. याचा - न्यूयॉर्क शहर भलतंच महाग म्हणून घर घेणंही नको लाईट(पावर) बिल भरणंही नको, नकोच ती जबाबदारी. म्हणून स्पायडरमॅन इकडे तिकडे लटकून आयुष्य काढतो असा अन्वयार्थ लिहिला होता, तो आठवला. Lol

अस्मिता Proud

'क्रु' ला अनुमोदन.

काहीकाही सिनेमांची नावं वाचुनच मला ते पहावेसे वाटतात. तसा एक नेटफ्लिक्सवर नाव आवडले म्हणुन पाहिला... 'Shadow in the Cloud'. Action/Horror आहे. मला आवडला. मास्टरपीस किंवा बलाढ्य हॉरर/अ‍ॅक्शनपट नाही पण गुंतवुन ठेवतो पुर्णवेळ. न्युझीलंडचा आहे. जवळजवळ पुर्ण सिनेमा अगदी छोट्या जागेत चित्रीत केलाय. खूपवेळ तर फक्त एक चेहरा पडद्यावर असतो व इतर पात्रांचे नुसते आवाज. पण त्या मुलीने छान काम केलंय व ड्रामा चांगला घेतलाय. एकदा पहायला हरकत नाही.

क्रू आवडला. ट्रेलर पाहून जसा वाटला होता त्यापेक्षा चांगला निघाला. सगळ्या प्रॉप्सचा नीट वापर करून घेतलेला आहे. क्रीती पायलट आहे हे तर सगळीकडे जाहिरात केल्यासारखे सांगितले आहे. तृप्ती खामकर ची कस्टम इन्स्पेक्टर भारी जमलीये. क्रिती चे टायमिंग मस्त जमले आहे. नवीन असून करीना आणि तब्बूच्या तोडीस तोड काम केले आहे.

Crew is really good if one can catch the vibes we were laughing throughout. Esp having seen the jet Airways and kingfisher airlines failures and how middle class staff suffered. It's a girlie movie . Who doesn't have windfall income fantasies. Wink

परत लापता लेडीजविषयी काही Happy

सगळ्यांची वेशभूषा प्रचंड आवडली, एकदम चपखल. थंडी सूचित करायला बायकांनी साड्यांवर घातलेले स्वेटर, साध्या साड्या, पुरुषांचे हाफ स्वेटर, मफलर, कानटोप्या सगळंच एकदम मस्त.

दीपक आणि फूल घरी जाताना किती वेगवेगळ्या प्रकारे प्रवास करतात. फटफटी, होडी, बसचं टप, रेल्वे आणि मग शेवटी सायकलवरून डबलसीट Happy

डिटेलिंगकडे बारकाईने लक्ष दिले आहे, घरं, स्टेशन, पोलीस चौकी, गावातील, दुकानातील जागा, भांडी, विविध वापरातील वस्तू सगळं काही अस्सल वाटतं. या चित्रपटाचे शूटिंग लोकेशनवरच झाले आहे, कुठलाच सेट वापरला गेला नाही हे ही कारण असावं. यातील फूल आणि जया प्रत्यक्षात एकदम गोर्‍यापान, मॉडेल टाईप दिसतात पण चित्रपटात एकदम अस्सल त्या मातीतल्याच वाटल्या आहेत. प्रत्येक पात्र त्या त्या जागी चपखल बसलं आहे. दीपकच्या घरातील मंडळी (वडील, आई, आजी आजोबा, भाभी, पुतण्या), स्टेशनवरची मंडळी (मंजू माई, छोटु, अब्दुल, चटणी घेणारा माणूस, स्टेशनमास्तर), दीपकची मित्रमंडळी (गुंजन आणि बाकीचे दोन मित्र), पोलिस चौकीतील लोक (इन्पेक्टर, दुबे, बेलाजी) सर्व काही एकदम अस्सल आणि चपखल Happy

हा धागा आता परग्रहावर आल्यासारखा वाटतोय. यातले ९९% चित्रपट पाहिलेले नाहीत.
लाले पहायचा आहे.

माझी पेशन्स लेवल जास्त आहे मग तुमच्या दोघींपेक्षा Wink .. मी पुढे ते गोव्यातून पळून जायचा प्रयत्न करतात तिथपर्यंत बघितला..
Lol पण आता नाही बघू शकत पुढे.

>>>> हे तं काहीच्च नाही. माझी तर पेशन्स लेवल इतकी जास्त आहे, इतकी जास्त आहे की इतक्या टेम्प्टिंग रेकोजनंतरही मी तो सिनेमा बघणार नाहीये.

माझी पेशन्स लेव्हल एवढी आहे की मला स्वप्न जरी पडलं की आपल्या टीव्हीवर असा चित्रपट लागलाय तर मी शांतपणे स्वप्नात चॅनल बदलुन दुसरा चांगला चित्रपट लावतो.

चीकू - मस्त निरीक्षणे आहेत, आणि सहमत. ते वेगवेगळ्या प्रकारे प्रवास, रेल्वेच्या डब्यातली ती एक खट बाई - जी तुलना करत असते (ती त्या दुसर्‍या मुलाची आई असते बहुतेक), यांच्यासाठी गावाच्या स्टॉपवर थांबवून ठेवलेले बॅण्डवाले, एक्स्प्रेस गाडी त्या मधल्याच स्टॉपवर थांबणे (रेग्युलर प्लॅटफॉर्म, स्टेशन ई नसलेल्या) व तेथेही लोकांना थांबायला/चढा-उतरायला एक रूळलेली सिस्टीम असणे सगळे फार भारी आहे.

दीपकने रेल्वेतून उतरायच्या वेळेस तिला नावाने हाक मारून उठवले असते, तर पुढचे सगळे नाट्य वाचले असते असेही वाटले दुसर्‍यांदा पाहताना. पण तेव्हा मध्यरात्र असते व सगळे झोपलेले असतात त्यामुळे गपचूप उठवून त्याने उतरायला सांगणे साहजिक वाटते. आणि मग इतका अफलातून पिक्चर आपल्याला बघायला मिळाला नसता, हे ही आहेच Happy

हाहाहा. सगळ्यांच्या पेशन्स लेवल्स धमाल आहेत. मानव यांची तर भन्नाट.

ला ले मध्ये दीपक जिथे फुल बसलेली असते तिथल्या बाईलाच हाताला धरून बाहेर पडतो. जया तर खिडकीजवळ असते. तरी फुलच्या जागी जया कशी हा प्रश्न मला पडलाय कारण यूट्यूबवरच्या पिक्चरमध्ये जागा बदललेल्या दाखवल्या नाहीयेत. खिडकीजवळ जया, मग तिचा नवरा आणि तो बोलवतो बसायला शेजारी, तिथे फुल बसते. त्याच जागेच्या बाईला दीपक हाताला धरून उठवतो मग तिची जया कशी होते.

हा प्रश्न मी आधीही विचारलेला पण तो धागा हा नव्हता, आधीचा चित्रपट धागा होता.

दीपक दुसरीकडे गेलेला असतो तेव्हा फूल सरकून खिडकीशी जाते. तिच्या शेजारी जयाचा नवरा येऊन बसतो. तो जयाला शेजारी बसायला बोलवतो. दीपकला वाटतं अलीकडची फूल आहे, म्हणून तिला घेऊन तो जातो.

ते शफल नक्की कसे झाले मलाही समजले नाही. पण हे दिग्दर्शकाने चेक केले असावे म्हणून सोडून दिले Happy

अरे नाही फा. गोजिरा चे मूळ अणुबॉम्ब मध्येच आहे. ५० च्या दशकात त्याचा पहिला पिक्चर आला. जपानला अणुबॉम्बचा बसलेला धक्का त्यामुळे त्यांनी त्याचे रेडिएशनमुळे हा गोजीरा तयार झाला असे म्हटलेले आहे >>> धनि - ओके. मला वाटायचे जपानी लोककथांमधे "गोजिरा" म्हणून त्याचा उल्लेख आधीपासून आहे.

पुढे पाहिला तो पिक्चर. मधे बरीच स्टोरी तो हीरो, हीरॉइन, ती लहान मुलगी वगैरेंबद्दल आहे. नंतर पुन्हा गॉडझिला येतो. पहिल्यांदा यांना तो दिसल्यावर सुमारे दोन अडीच वर्षांनी अचानक तो पुन्हा दिसतो व थेट टोकियोवर चाल करून जातो. तेथे प्रचंड नासधूस करतो. हे सगळे तो का करतो ते कथेत नीट समजले नाही. मी इंग्रजी ऑडिओ लावून पिक्चर पाहतोय त्यामुळे एखादे डिटेल निसटले असेल तर माहीत नाही. पण नसावे. मी फरिश्ते बद्दल लिहीताना सदाशिव अमरापूरकरचे "मोटिव्ह नसलेले अन्याय" लिहीले होते तसाच प्रकार वाटला हे पाहताना Happy त्यामानाने १९९८ च्या गॉडझिला मधे हे स्पष्टीकरण होते.

अजूनही एका मोठ्या हमरस्त्यावर जर टी रेक्स, गॉडझिला आपल्या मागे लागला तर त्याच रस्त्याने सरळ पुढे पळत जाऊन उपयोग नाही हे या शहरांतल्या पब्लिकला समजलेले नाही. आजूबाजूला इतक्या गल्ल्या असताना गॉडझिला सहज चालू शकेल इतक्या मोठ्या रस्त्यावरच का पळत राहायचे? हा लोक पळण्याचा जो पॅटर्न आहे तसाच सीन स्पीलबर्गने मुद्दाम जुरासिक पार्क-२ (द लॉस्ट वर्ल्ड) मधे टाकला होता. त्यात जपानी/एशियन लोक असेच पळताना दाखवले होते. तो मुद्दाम टाकलेला "स्पूफ सीन" होता असे कळाले.

मग एका सीन मधे मोठ्या स्फोटामुळे वादळ आलेले असताना हिरॉइन हीरोला एका गल्लीत ढकलते व स्वतः तशीच तेथे थांबून वादळाबरोबर खेचली जाते. ती पुढे जिवंत सापडते का ते पुढे पिक्चर पाहिल्यावर कळेल. पण हीरोला ढकलण्यापेक्षा स्वतःही त्याच्याबरोबर गल्लीत का गेली नाही ते अगम्यच आहे. एखाद्या व्यक्तीला ढकलण्यापेक्षा स्वतःही त्यांच्या अंगावर झेपावून दोघेही धोक्याच्या बाहेर जातील असे का केले नाही माहीत नाही. पण एखाद्या व्यक्तीकडे येणार्‍या बंदुकीच्या गोळीच्या मार्गातून तिला केवळ बाजूला करण्यापेक्षा तिच्यापुढे स्वतः येउन गोळी खाणारे बॉलीवूडी पब्लिक आठवले.

हे के ड्रामा सारखं झालं.खलनायक किंवा समोरून येणारी गाडी नायिकेला उडवायला/भोसकायला/गोळी मारायला किमान 15 सेकंद अजून असली, अगदी पळून झाडावर चढण्या इतका वेळ असला तरी पण हिरो ने मिठीत नायिकेला घेऊन फिरवून ती गोळी किंवा सुरा किंवा गाडी आपल्या अंगावर झेललीच पाहिजे.एका मालिकेत तर एकमेकांना गाडीच्या रस्त्यातून ढकलून त्याग करताना दोन्ही हिरो गाडीखाली आले.गाडीला कोणाचा त्याग स्वीकारायचा हे कळलं नसेल.एका मालिकेत नायकाच्या मित्राला नायकाची गाडी दिली, मग त्या गाडीला ठोकायला नायकाच्या सावत्र भावाचा मामा मागे आला, मग त्याच्या मागे नायकाच्या सावत्र भावाची चांगली आई गाडी घेऊन आली, त्यामागे नायक अजून एक गाडी घेऊन आला आणि त्याला हा गोंधळ नीट कळून तो गाडी नंबर 1(नायकाची गाडी घेऊन गेलेला मित्र) आणि नंबर 2(नायकाचा सावत्र मामा) यांच्या मध्ये येऊन स्वतःच्या गाडीला ठोकून घेतलं.तोवर नायकाची सावत्र आईपण जखमी झाली.इतके लोक आणि इतक्या गाड्या यांचं गणित सोडवताना प्रेक्षक पण मेंदूने जखमी झाला. Happy

अवांतराबद्दल क्षमस्व
के ड्रामा बघत नाही. कधी कधी क्लिप्स येतात. यांचे चेहरे काचेपासून बनल्यासारखे का वाटतात ?

हो तसेच वाटतात. प्लॅस्टिक Happy

मी_अनु Lol मला अशा बाबतीत टॉलीवूडच्या पेक्षा काही अचाट असू शकत नाही असे वाटले होते. पण के ड्रामा त्यापुढेही दिसतात.

सावत्र भावाची चांगली आई >> Lol त्या कॅरेक्टरवर अन्याय होऊ नये म्हणून घेतलेली काळजी Happy

ते सगळे चेहऱ्याची खूप काळजी घेतात, 9 प्रोसेस वाले स्किन रुटीन पाळतात, साखर अजिबात खात नाहीत, भरपूर व्यायाम करतात,जास्तीत जास्त सॅलड किंवा बीफ खातात, आणि धूळ रहित थंड हवामानात राहतात.ही कारणे, आणि उत्कृष्ट मेकप साधने याचा एकत्रित परिणाम.

यांचे चेहरे काचेपासून बनल्यासारखे >>> अहो तो कोरियन ग्लास लुक आणण्यासाठी जगभरातल्या नॉन कोरियन बायका हज्जारो रुपये खर्च करतात हो कॉस्मेटिक्सवर. कोरियन बायका अनुने सांगितले तसे उपाय आणि जीन्समुळे तशा दिसतात.

@अनु >>>त्या गाडी आणि जखमींचा घोळ काही समजेना. एक फ्लोचार्ट काढ बरं पटकन. हपा आणि स्वातीने पीएससाठी ग्राफ काढून माबो डेटा आणि कंट्रोल स्ट्रक्चर्सची सुरुवात केलीच आहे.

आजूबाजूला इतक्या गल्ल्या असताना गॉडझिला सहज चालू शकेल इतक्या मोठ्या रस्त्यावरच का पळत राहायचे? पण हीरोला ढकलण्यापेक्षा स्वतःही त्याच्याबरोबर गल्लीत का गेली नाही ते अगम्यच आहे.
>>> हा भारतीय चित्रपटसृष्टीने जागतिक चित्रपट कलेला दिलेला नवा आयाम आहे. उघडा डोळे बघा नीट #दोनतासकुठंहोताकाकू

अरे बापरे!!
अनु आणि माझे मन माहितीबद्दल धन्यवाद.
कोरिया ला जायलाच नको. सगळे असे ग्लासगोकर असतील तर मला चिखलीकर म्हणतील तिकडे.

नवा बडे मियां छोटे मियां पाहिला
टिपिकल टेम्प्लेट बेस्ड पेट्रिओटिक ऍक्शन सिनेमा.

भारताचा रोग एजंट भारताच्या सर्वनाशाचं / मेगा रूलर व्हायचं स्वप्न बघणार. त्यासाठी खूप महत्त्वाचं काहीतरी त्याच्या हाती लागणार. मग शक्यतो ऑर्डर फॉलो न करणाऱ्या पण रिझल्ट देणाऱ्या देशभक्त एजंट्स ना त्याच्यामागे सोडणार अन् ते काहीही अचाट स्टंट अन् आचरट विनोद करून मिशन ऑलमोस्ट पूर्ण करणार (शेवटी सिक्वल साठी शेपूट सोडलेल असणार). अधे मधे फारसा काही संबंध नसलेली एक दोन गाणी, शेवटी अजून एक गाणं...
पण चकाचक शूटिंग अन् स्लीक ॲक्शन यांनी स्टोरी अन् ॲक्टिंग याची भरपाई होत नाही ना...
हँगओव्हर उतरवण्यासाठी जुना बडे मियां छोटे मियां बघायला लागणार...

ए.. खुदको कुकर हमको मटन समझे हो का... कितना पका रहे हो...!!!

Pages