चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरलेली नावं ठेवेन.>>>> अस्मिता नावंच ठेवायची असतील तर माबोवर जाहिररित्या ठेव.

जिंनामीदो आणि दिल चाहता है आणि धमाल पटांचा स्पूफ वाटला.
>>>>>
हो, दिल चाहता है तर त्याची म्युजिक वापरूनच डिक्लेअर केले. जिंनामीदो सुद्धा डोक्यात आलेला बघताना. आणि इतकेच नाही तर ट्रेन मध्ये बॅग अदलाबदल होते तेव्हा लापता लेडीज सुद्धा आठवलेला मला Happy

तेरे नाम फलक्से आणि दुसरे एक गाणे आवडते होते.
>>>>
तू है तो मुझे फिर और क्या चाहिये... दोन्ही रिपीट वर लागायची तेव्हा घरी.. त्यामुळे देखील उत्सुकता होतीच.

DCH, ZNMD हे दोन्ही सिनेमे ज्या एक्सेल एंटरटेनमेंट नी प्रोड्यूस केलेत (फरहान अख्तर + रितेश सिधवानी) त्यांनीच मडगाव एक्सप्रेस प्रोड्यूस केलाय. सहाजिकच स्वतः कडे कॉपी राईट असलेल्या मटेरियल वर स्पूफ अन् क्रॉस रेफरन्स आहेत. (रॉयल्टी वाचवा मोड). डायरेक्टर कुणाल खेमू असल्याने गो गोवा गॉन चे ही...

शेवटचे बेबी ब्रिन्ग ईट ऑन आयटम साँग सोडून.
>>> 'जाऊ द्या ना बाळासाहेब' मधलं 'ब्रिंग इट ऑन आलिंगनाला' आठवलं. धमाल होते तेही.
>>
त्याचंच रीमिक्स आहे हे...

आज पुष्पा टू सुरू केला

Submitted by रघू आचार्य on 2 June, 2024 - 15:47
>>

१५ ऑगस्ट रिलीज डेट आहे त्याची, ती पण थिएटर मधे.
तुमच्या प्राईम नी आजच कसा काय लावला???

Two
Too ©

आज सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' बघितला
>>

हा गेल्या वर्षीचा सरप्राइज हिट होता बॉक्स ऑफिस वर. अनपेक्षित पणे १०० करोड+ गल्ला. त्यामुळे जिओ नी ott रिलीज राखून ठेवला होता. थोड्या अपेक्षा होत्या.

Two
Too ©

>>>
च्यायला
Ipad पासून टीव्ही पर्यंत आणि यूट्यूब पासून विकी पेज पर्यंत सगळं धुंडाळून आलो. की चुकून माकून आधीच रिलीज केला की काय... कुठे प्रिंट उपलब्ध आहे की काय...???

थोड्या अपेक्षा होत्या.
>>>> मलाही. ट्रेलरही आवडले होते. जाऊ द्या ना बाळासाहेब'चेच रिमिक्स आहे का, अरे व्वा !

रॉयल्टी वाचवा मोड). डायरेक्टर कुणाल खेमू असल्याने गो गोवा गॉन चे ही..>>>>> Lol
बरं माझेमन. Happy

अन्जु मी पण आहे बोटित... पन्चायत चा मी फक्त सिझन एक बघित्ला आहे. दोन आणि तीन नाही पाहिलेले.
आता पुन्हा तिन्ही सलग बघेन म्हणतेय.

लाले - प्रत्येकजण काहीतरी खूण सोडतो हे निरीक्षण भारी आहे! माझ्या लक्षात आलं नव्हतं.

क्रू तोंडावर आपटल्यामुळे एकदम वेगळं काहीतरी, बिलकुल अपेक्षा न ठेवता बघायचं होतं. यूट्यूबवर 'हंपी' (मराठी) दिसला.
सो.कु. बिलकुलच आवडत नाही, तरी बघितला. कारण प्रिंट चांगली होती आणि ल.प्र. आवडतो.
आई-वडिलांचा घटस्फोट होतोय म्हणून अस्वस्थ झालेली तरुणी एकटीच हंपीत येते. जगात प्रेम असं काही नसतंच, असा तिचा ठाम समज झालेला असतो, कशातच रस वाटत नस्तो, आत्मशोधाचा प्रवास, इ.इ.... आणि शेवटी ती ल.प्र.च्या प्रेमात पडते - असा प्रेडिक्टेबल फ्लो. त्यातल्या त्यात जरा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न म्हणून प्राजक्ता माळीची एन्ट्री होते.
पण सो.कु.चा आत्मशोध, त्या प्रवासातली वळणं सगळं ठरवून, आखून-रेखून आणि वरवरचं वाटतं. प्रेमावर विश्वास नसणं ते प्रेमात पडणं यादरम्यानची आर्तता, असोशी कुठेच दिसत नाही.

एकूणात हंपीचं काम सर्वात आवडलं.

अन्जु मी पण आहे बोटित... पन्चायत चा मी फक्त सिझन एक बघित्ला आहे. दोन आणि तीन नाही पाहिलेले.
आता पुन्हा तिन्ही सलग बघेन म्हणतेय. >>> अगं मी दोन बघितलेत, आत्ताचा तिसरा लवकर बघून होत नाहीये, सगळ्यांचा झाला हा सीझनही बघून, असं म्हणत होते. हा होले होले सुरु आहे.

मी अजून तिसरा सीझन चालू नाही केलाय. यावेळी prime lite घेतलं. फक्त tv वर चालतयं . मोबाईलवर सिरियल बघायला आवडली असती

मी चुकीच्या धाग्यात लिहीलं पंचायतबद्द्ल. वेबसिरीज सोडून चित्रपट धाग्यावर लिहीलं. लवकर लक्षातही आलं नाही.

गॉडझिला मायनस वन सुमारे १५ मि. पाहिला. पुढे व्हिज्युअल इफेक्ट्स खूप चांगले आहेत असे वाचले. पण एण्ट्री तशी फार भारी वाटली नाही. मॉन्स्टर च्या एण्ट्रीज मधे जुरासिक पार्क मधल्या टी रेक्सच्या एण्ट्रीला तोड नाही. गॉडझिला वाल्या आधीच्या पिक्चर्स मधे त्याचा साइज महाप्रचंड होता - पन्नासएक मजली इमारतीइतका. यात जरा टी रेक्स व १९९८ च्या गॉडझिलाच्या मधला साइज दाखवा असे सांगितल्यावर जो साइज येईल तो वाटला.

त्यात हा गॉडझिला अचानक लॅण्डवर का आला ते समजले नाही. दुसरे महायुद्ध संपल्याच्या वेळचा काळ दाखवला आहे. म्हणजे त्या आधी ५-६ वर्षे जपानच्या आजूबाजूला बोटी फिरत होत्या, तुंबळ युद्धे सुरू होती - तेव्हा कोठे न दिसता मग युद्ध संपल्यावर अचानक तो बाहेर का आला याचे स्पष्टीकरण पुढे बहुधा मिळेल. कारण जुरासिक पार्क, किंगकाँग (२००५) प्रमाणे पिक्चर मोठा असून सुरूवातीला बरीच "स्टोरी" दिसत आहे.

जपानी सैनिकांनाच हा कोणता मॉन्स्टर ते माहीत नसते हे आणखी एक आश्चर्य. मला वाटायचे जपानी लोककथांमधे हा इतका कॉमन आहे की कोणत्याही जपानी व्यक्तीला आपोआप माहीत असेल. १९९८ चा गॉडझिला न्यू यॉर्क मधे येतो पण तो स्पेसिफिकली कोणावर हल्ला करायला येत नाही. डाउनटाउन भागांत त्याच्या नुसत्या फिरण्याने बरीच नासधूस होते व नंतर अमेरिकन मिलिटरी त्याच्यावर हल्ला करते म्हणून होते. इथे हा येतो तो थेट समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करतो - ते का ते कळत नाही. मग ते सैनिक चांगले तो गॉडझिला सहज पोहोचणार नाही अशा एका खंदकात सेफ बसलेले असताना उगाचच तेथून बाहेर पडतात. इतरही अनेक लपायच्या जागा असताना एका मोकळ्या मैदानात येऊन त्याच्यावर गोळीबार करायचा प्रयत्न करतात.

टी रेक्स व १९९८ च्या गॉडझिलाच्या मधला साइज दाखवा असे सांगितल्यावर जो साइज येईल तो >>> Lol

गॉडझिला मायनस वन सुमारे १५ मि. पाहिला>>>>

Happy हा काल बघता बघता राहिला. न्यूयॉर्क सिटीची पत्रिका दाखवयाला हवी, सुपरव्हिलनच नाही तर अजस्र प्राणी पण तिथेच तरफडतात. मग परवडत नसतानाही हिरोला बाहेर लटकत वगैरे राहून तिथून हलता येत नाही. मला तर डायनासोर, किंगकॉग, एप, ट्रेमर वगैरे धूडपटांमधे मानवी भावभावनाच सापडत नाहीत. सगळे दूरदर्शन प्रमाणे ठरलेले कार्यक्रम होतात. विशेष अभिनयक्षमता नसलेली बी ग्रेड टीम असते. मार्व्हल पण याच मार्गाने जात आहे.

न्यूयॉर्क सिटीची पत्रिका दाखवयाला हवी, सुपरव्हिलनच नाही तर अजस्र प्राणी पण तिथेच तरफडतात >>>>
मला तर वाटतं अमेरीकेचीच दाखवावी. नुसते अजस्त्र प्राणीच नाही एलिअन्स, हिमवादळं, मोठे भुकंप, उल्कापात, धुमकेतु, रोबॉटिक वॉर सगळं तिकडे. नाही म्हणायला आयफेल टॉवर, बिग बेन, वॉल ऑफ चायना नी ताजमहाल/एव्हरेस्ट तोंडी लावण्यापुरते असतात. आता फक्त सुनामी राहिलीय. ती कशी काय कुणाला दाखवाविशी वाटली नाही कोण जाणे. ती पाहिली की सुडोमि.

जपानी लोककथांमधे हा इतका कॉमन आहे>> अरे नाही फा. गोजिरा चे मूळ अणुबॉम्ब मध्येच आहे. ५० च्या दशकात त्याचा पहिला पिक्चर आला. जपानला अणुबॉम्बचा बसलेला धक्का त्यामुळे त्यांनी त्याचे रेडिएशनमुळे हा गोजीरा तयार झाला असे म्हटलेले आहे

Pages