चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिलनचे ग्लोरीफिकेशन म्हणाल तर नोलानचा तिसरा पिक्चर पहा. >> मला समजू शकते तुम्ही काय म्हणताय ते. त्यात बॅटमन चे सेल्फ डाउटींग कॅरॅक्टर असण्याचा अधिक वाटा असावा असे मला वाटते. एव्हढा व्हॅलिडॅशनची हाव असलेला सुपरहिरो नसावा.

असामी,अस्मिता आणि इतर सर्वांच्याच पोस्ट्स वाचतोय. छान चर्चा.
या सर्व मंडळींचा हेवा वाटतो. वेगवेगळ्या जॉनरचे सर्व चित्रपट पाहण्याची उत्सुकता , उत्साह आणि ते एंजॉय करणे हे सगळे टिकवून ठेवलेले आहे.

अवांतर
The Dark Knight
नोलानने केलेल्या सर्व सिनेमात The Dark Knight हा प्रेक्षकाना सर्वात जास्त आवडलेला सिनेमा आहे.
https://www.comicbasics.com/all-joker-movies-in-order/
जोकर सिनेमांची नामावळी.
असामी
Dark Knight Rises वरचा तुमचा प्रतिसाद वाचला. हे विश्लेषण माझ्यासाठी नवीन होते. Batman सिनेमांवर कुणीतरी स्वतंत्र धागा काढायला पाहिजे.

असामी, या सखोल आणि अर्थपूर्ण चर्चेने फार छान वाटले. मी बॅटमॅन ट्रिलजी/ डार्क नाईट सिरिज नक्की बघेन.
>>> +१
बघण्याचा (आणि समजून घेण्याचा) प्रयत्न तरी नक्कीच करेन.

----

असंच मला 'फॅन्टसी आवडत नसली तरी हॅरी पॉटर पुस्तकं वाचच' अशी परागने जोरदार शिफारस केली आहे. त्याचा प्रयत्न करावा की नाही अजून माझं ठरत नाहीये. Proud

Joker - सहमत . खूप काहीतरी अस्वस्थ, विचित्र, distrubing फील येतो .. अख्खा पिक्चर हा टोन तसाच आहे.
कलाकृती म्हणून महान जमला आहे, ॲक्टिंग, characters, आणि सगळ्यात महत्त्वाचं.. कथा खूप चांगली गुंफली आहे.

जोकर' सुपरहिरो नाही, चित्रपट स्वतंत्र आणि गडद आहे. --- yes बरोबर.. प्रेक्वल आहे वगैरे ऐकल होत, पण तसं नाहीये.

पिकू, आशुचॅम्प, आचार्य (चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांना) थॅंक्स. Happy
केकू, सुचवणीसाठी आभार. पोस्टी वाचल्या.

आचार्य, हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती नाहीये. काल थोडा वेळ 'अनाडी नं वन' बघितला. 'मै लैला लैला चिल्लाऊंगा कुर्ता फाडके, मै मजनू मजनू चिल्लाऊंगी कुर्ता फाडके' ह्या गाण्यापर्यंत, नंतर ते चॅनल अडकायला लागलं नाहीतर पूर्ण बघायचा होता. Lol

धमाल- गमतीदार पोस्टींनी मज्जा येते. पण सखोल चर्चेने समाधान मिळते. हेही आहे.

नेहमीपेक्षा वेगळी चर्चा झाली म्हणून अगदी वीकेंडलाही येऊन वाचायला उत्साह होता. श्रेय अस्मिताचे आहे जिने सुरूवात केली नि सुरू ठेवले. ह्यातून वाचून जर कोनी हे सिनेमे पाहून वेगळा टेक लिहिला तर तेही वाचायला आवडेल.

अनाडी नं वन' बघितला. 'मै लैला लैला चिल्लाऊंगा कुर्ता फाडके, मै मजनू मजनू चिल्लाऊंगी कुर्ता फाडके'
>>
एक वो दिन भी थे, एक ये दीन भी है...

असामी
रॉजर एबर्ट ह्या सुप्रसिद्ध चित्रपट समिक्षकाचा डार्क नाईटचा रिव्यू
https://www.rogerebert.com/reviews/the-dark-knight-2008
अजून एक
चार्ल्स डिकन्स च्या "टेल ऑफ टू सिटीज" चा पण कथानकावर इन्फ़्लुएन्स आहे असे मानले जाते.

माझा इंटरेस्ट संपल्यासारखा झालाय. भेडिया पूर्ण पाहिला त्याचा आनंद झाला.
एरव्ही ज्यांची पिसं काढता येतील असे सिनेमे बघतो, पण ते पिसं काढण्याच्याही पलिकडे म्हणजे त्या क्षेत्रातल्या निर्वाणाला पोहोचलेले असतात.
इथे ओशाळले कणेकर !

इथली चर्चा वाचून मी डार्क नाइट लावला. तर तो आधीच पाहिलाय हे लक्षात आले Happy मग डार्क नाइट राइजेस पाहतोय. साधारण अर्धा झाला.

लहानपणी मी ही कॉमिक्स फारशी वाचली नव्हती. आमच्याकडे नसत आणि कोणाकडे दिसली तरी कधी फार इंटरेस्ट वाटला नाही. यातल्या अनेक गोष्टींचा संदर्भ मला माहीत नाही. तो माहीत करून घेऊन मग पिक्चर बघण्याइतका इंटरेस्ट नाही. आजूबाजूला लेझी करमणूक बरीच असते, अगदी त्याच स्ट्रिमिंग सर्विस वर.

बाकी एक reclusive प्रचंड श्रीमंत तरूण. त्याच्याकडे विविध कूल वाहने असतात. तो शहरात कोठे अन्याय होत असताना अचानक येतो. त्याच्याकडे सगळे सतत हरखून पाहात असतात. तरूणी त्याच्या मागे असतात. या सगळ्याची तेलुगू पिक्चर्सनी गेल्या काही वर्षात इतकी भरमार केली आहे की तुमच्या जरा जाड टायर्सच्या बाइकचे काय कौतुक सांगता असे होते Happy या सगळ्याचे ओरिजिन ही सुपरहीरो कॉमिक्स आहेत हे माहीत आहे. पण संजीवकुमारच्या नकला करणार्‍यांमुळे संजीवकुमारच्या ओरिजिनल मॅनरिजम्सचे कौतुक वाटत नाही, तसे काहीतरी होते Happy

डार्क नाइट राइजेस इतर संदर्भ नसतानाही पाहणेबल आहे. थ्रिल्स बरीच आहेत. पण हीरोची लॅब, त्याचे सहकारी, ती गॅजेट्स हे - अरे हे सगळे आयर्न मॅनमधेही होते. तेथेही स्मार्ट डॉयलॉग्ज होते, इथेही आहेत पण इथे अंडरप्ले आहे इतकाच फरक. असे सतत वाटत राहते. बहुधा हे पाहताना या सिरीजचे फॅन म्हणून तुम्ही एका विशिष्ठ मोडमधे जाउन हे पिक्चर पाहणे अपेक्षित आहे. नाहीतर हा इतका fuss कसला आहे असा प्रश्न पडतो.

. या सगळ्याची तेलुगू पिक्चर्सनी गेल्या काही वर्षात इतकी भरमार केली आहे की तुमच्या जरा जाड टायर्सच्या बाइकचे काय कौतुक सांगता असे होते >>> Lol

मुलंअगदी लहान असताना डार्क नाईट राईजेस (तिसरा भाग ना?) अलकाला दाखवला होता. खूप संथ वाटला. स्पायडी सारखं लहान मुलांना सतत हॅपनिंग काहीच नव्हतं, आणि चक्क मोठ्या माणसांचा सिनेमा वाटला होता. खरं तर बॅटमॅन बद्दल मला फक्त क्रिकेटमधूनच माहिती होती ही माझी चूक.

हो खरच कि. आताच हाती आलेल्या बातमी प्रमाणे बाबुराव अर्नाळकरांच्या काळापहाड कथा वाचून नोलान साहेबांनी बॅटमन सिरीज काढली. आता ते सगळी ऑस्कर परत करणार आहेत.

नंतर मी नोलान साहेबाला इथले प्रतिसाद सांगितले. ते इंग्लिशमध्ये काही बडबडले. ते इथे लिहिण्यास मी धजावत नाही.
बाकी त्यांना एक काळजी वाटली, "कुणी माझ्या सिनेमाची पिसे तर काढली नाहीत ना?"
मी म्हणालो. "नाही अजून तरी नाही. पण पुढचे काही सांगता येणार नाही."
ते म्हणाले, "बर्र."
हा धागा दुसऱ्या कोणाचा तरी असल्याने, "कंट्रोल."

सुपरहिरो चर्चा चालू असल्याने राहवले नाही.
एक reclusive प्रचंड श्रीमंत तरूण. त्याच्याकडे विविध कूल वाहने असतात. तो शहरात कोठे अन्याय होत असताना अचानक येतो. >> अ‍ॅक्चुअली या सगळ्याचे मूळ टेंप्लेट स्कार्लेट पिंपरनेल (१९०५) आहे. स्कार्लेट पिंपरनेल बॅरोनेस ऑर्त्शेचा हिरो. श्रीमंत हिरो पण आपल्या सुखासीन आयुष्याला कंटाळलेला, जवळच्या व्यक्तीसोबत काहीतरी अन्याय झालेला, युद्धकाळात त्याला अन्याय निवारण करण्याची उर्मी येणे, इमेज जपण्यासाठी एक नवीन आयडेंटिटी तयार करणे हे सगळे स्टीरिओटाईप्स या कादंबरीतून येतात. हे सर्व हिरो युद्धजन्य परिस्थितीत जन्माला घातलेले हिरो आहेत. जसे १९०५ मध्ये ब्रिटन जर्मनीशी युद्ध झालेच तर फ्रान्स मित्र हवा ही परिस्थिती असताना फ्रेंच अ‍ॅरिस्टोक्रॅट्सचा तारणहार म्हणून इंग्लिश लॉर्ड स्कार्लेट पिंपरनेल.
बॅटमॅन दुसर्‍या विश्वयुद्धाच्या काळात जन्माला घातलेला हिरो आहे. तसेच आयर्नमॅन व्हिएतनाम युद्धाच्या काळात जन्माला आला. सिनेमात आयर्नमॅनचे जे अफगाणिस्तानातले सीन्स आहेत तिथे अफगाण लोकांऐवजी व्हिएतकाँग सब्स्टिट्यूट केले तर आयर्नमॅनचा १९६८ चा पहिला कॉमिक्स विशेषांक तयार होतो. १९७०-१९८० मध्ये कॉमिक्स लेखकांमध्ये एक प्रकारचा एजीनेस आला. कारण इतका प्रिव्हिलेज्ड हिरो सामान्यजनांना रिलेट होईना. त्याचा एक इफेक्ट या पिंपरनेलसदृश हिरोंच्या व्हिलन्सना प्युअर व्हिलन दाखवणे बंद झाले. तसेच आले मनात केले अन्याय निवारण हा ट्रेंड बंद झाला आणि हिरोला सामान्यांना "तुम्हाला हिरो कडून काय अपेक्षा आहेत" हे जाणून घ्यायला भाग पाडण्यात आले. द बॉय्जच्या टेक नाईट आर्कमध्ये यावर खूपच भेदक भाष्य आहे. नोलनच्या सिनेमांत हा सर्व विचार प्रचंड टोन्ड डाऊन केला आहे आणि त्यामुळे कॉमिक्स प्युरिस्ट्सना ते तितकेसे भावत नाहीत.
व्यक्तिश: बॅटमॅनचा सर्वात चांगला सिनेमा मला बॅटमॅन: मास्क ऑफ द फँटाजम (१९९३) वाटतो. त्याची ओरिजिनल बॅकग्राऊंड आणि ही नवीन फिलॉसॉफी या चित्रपटात सर्वात बॅलन्स्ड पद्धतीने दाखवली आहे. आणि केविन कॉनरॉय-मार्क हॅमिल अर्ग्युएबली सर्वात भारी बॅटमॅन-जोकर जोडी.

अ‍ॅक्चुअली या सगळ्याचे मूळ टेंप्लेट स्कार्लेट पिंपरनेल (१९०५) आहे >>> इंटरेस्टिंग माहिती पायस.

र.आ - डार्क नाइट राइजेस संथ वाटला नाही (अजून अर्धाच पाहिला आहे). तो इतर कोणतातरी असेल. अर्थात आपला सुपर हाय स्पीड थ्रिलर हा मुलांना संथ वाटू शकतो Happy

बॅटमॅन: मास्क ऑफ द फँटाजम (१९९३) हे अनिमेतेड कार्टून आहे. लाइव अॅक्शन मूवीमध्ये अभिनयाची कसोटी लागते.
कोणता जोकर सगळ्यात चांगला आहे? ही ज्याती त्याची आवड. हा वादाचा मुद्दा नाही. मला वाटतं जोकर ही व्यक्तिरेखा साकार करणे हे एक आव्हान आहे. तेवढ्या ताकदीचा नटच हे स्वीकारेल. It will make or break an actor!
जोकर बरेच झाले अजूनही होतील. तेव्हा घाई काय आहे?

अ‍ॅक्चुअली या सगळ्याचे मूळ टेंप्लेट स्कार्लेट पिंपरनेल (१९०५) आहे >>>
स्कार्लेट पिंपरनेल मधे खरं तर सगळं उलटं आहे. फ्रेंच उमराव हे सामान्य फ्रेंच जनतेवर अरेरावी, अत्याचार करत होते. त्यांना प्रतिकार म्हणून तळागाळातील फ्रेंच जनता पेटून उठली, राज्यक्रांती झाली आणि मग या उमरावांना कैद करून मृत्यूदंड देण्याचे पेव फुटले. तर कादंबरीचा हीरो एक इंग्लिश उमराव, त्याला फ्रेंच उमरावांविषयी सहानुभूती आणि मग तो त्यांचा तारणहार बनून त्यांना सोडवून सुखरूप इंग्लंडमधे आणतो आणि ब्रिटिशांचा हीरो ठरतो. पण कुठेही तो अन्यायाखाली पिचलेल्या सर्वसामान्य जनतेला मदत करत नाही. त्याचा कळवळा फक्त उमरावांसाठी असतो त्यामुळे त्याला खर्‍या अर्थाने हीरो म्हणता येणार नाही.

त्यामुळे त्याला खर्‍या अर्थाने हीरो म्हणता येणार नाही >> +१ बरोबर चीकू. तसेच मूळ कॉमिक्समध्ये कोणताच सुपरहिरो सर्वसामान्य जनतेची मुळीच मदत करत नाही, स्पायडरमॅनचा अंशत: अपवाद वगळता. १९७०-८० नंतर सुपरहिरोंची इमेज बदलायला सुरुवात झाली आणि सर्वसामान्य जनतेचे अन्याय निवारण दाखवले जाऊ लागले. त्यामुळे या दशकांतील कॉमिक्स चित्रपट लेखक/दिग्दर्शकांना फॅसिनेटिंग वाटतात पण त्यांनी सखोल वाचन न केल्याचे जाणवते.

फारएण्ड , बरोबर

मुलगा तीन वर्षांचा होता, त्याच वर्षी स्पाईडीचे दोन मूव्हीज आले होते. एक अ‍ॅमेझिंग सिरीजचा दुसरा भाग आणि एक जुना स्पाईडी. ते दोन्ही लागोपाठ मुलांना दाखवले होते. बॅटमॅन मधे बॅटकार, त्याची बाईक हे मुलाला आवडले होते. मुलगी थोडी मोठी होती.

एकदम उद्बोधक चर्चा. गरिबांवरचा अन्याय दूर करणारा सुपरहिरो हे रॉबिनहूड कादंबरीपासून चालू झाले असावे का?की ती खूप नंतरची आहे?

छान चर्चा.
पायस आणि चीकू, बरीच नवीन माहिती मिळाली. आमची धाव चाचा चौधरी, बिल्लु, पिंकी पर्यंत होती.

बॅटमॅन सुपरहिरो आहे, पण त्याच्याकडे एकही सुपरपॉवर नाही.>> +१

The dark night मी बघितलेला पहिला बॅटमॅनपट. त्यानंतर आधीचा पाहिला. तो डा ना एक स्वतंत्र पिक्चर म्हणूनही खूप भारी आहे. मी बिगिंस बघितला नसला तरी काही अडले नाही. हेथ लेजर वेड लावतो. ह्यासम हाच.

पोषाखी सुपरहिरो मधे सर्वात पहिला फँटम आहे. अतिमानवी पोषाखी सुपरहिरो मधे सुपरमॅन पहिला आहे.
द ग्रॉन हॉनट आणि झोरो पण जुने आहेत. पण सुपरहिरो म्हणून नव्हते आले.

रॉबिनहूड नायक आहे. सुपरहिरो आहे का ?

रआ, खरं उत्तर 'मला माहिती नाही' हे आहे.सुपरहिरो चे जे 1-2 पिक्चर पाहिले त्यात त्या हिरोच्या करामतीपेक्षा ऍनिमेशन जास्त लक्षात राहीले.त्यामुळे सुपरहिरो म्हटलं की डोळ्यासमोर तेच येतंय.
रॉबिनहूड तत्कालीन काळात कोणी करणार नाही इतकी चांगली आर्चरी करत असेल तर असेल तो सुपरहिरो.

कॉमिक्स वाचले नाहीत.
आमची धाव शेजारी कृपेमुळे चांदोबा पर्यंत.
काहीवेळा चंपक आणि ठकठक वाचायला मिळाले तेवढेच.
त्यामुळेच big bang बघताना शेल्डन किंवा इतर लोकं कॉमिक्स कलेक्शन साठी इतकी वेडी का हे सुरवातीला कळालं नव्हतं. नंतर लक्षात आलं ते.

पायस उत्तम माहिती दिलीत.
माबोमुळे भर पडते ती अशी.
जुने बॅटमॅन चित्रपट नाही पाहिलेत.

बॅटमॅन मध्ये आपल्या भितीवर मात करत त्यालाच आपली शक्ती म्हणून सादर करणे हाच हाय पॉईंट आहे.
एका चित्रपटात व्हिलन देखील अजिबात give up न करता गॉथम उध्वस्त करण्याइतका मोठा व्यक्ती बनतो.
बॅटमॅन हे इमोशन वर आणि भिती वर मात करणे ह्याबाबत सुपरहिरो आहे.
सुपरपॉवर्स नाहीत.
अर्थात व्हिलन देखील तोडीस तोड.

जोकर सारखा व्हिलन तर आधी पचनी पडत नाही.
बॉलिवूड चा अभ्यास वेगळाच आपला झालेला.
सुरवातीला हा जोकर असे करून के साध्य करणार हेच कळत नव्हते. बॉलिवूड लॉजिक सोडल्यावर लक्षात यायला लागली त्याची थेअरी.

पायस उत्तम माहिती…
लेट टीन्सपर्यंत वाचन मराठीपुरतेच मर्यादित होते त्यामुळे सुपरहिरोज किंवा इतर पॉप कल्चरशी कनेक्ट नाही.
आता फोमोतून अब्यास करावा म्हटलं तर इतकं सारं वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट ऍव्हेलेबल आहे की बळजबरी हे का वाचावं असं वाटतं.
झकासराव, असामी, चीकू यांनी मांडलेले पॉईंटस् व चर्चेतून जरा समजतं आहे. इंडिपेडंट कलाकृती म्हणून कदाचित बघितले जातील किंवा मग नोलनचं काहीही टीव्हीवर सुरू झालं की हलता येत नाही म्हणून….
(ही माझ्या भाषेत मांडलेली फारेण्डची पोस्ट आहे का, असा प्रश्न मलाच पडलाय. असो.)

Pages