वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धीरे चलोगे तो बार बार मिलेंगे
तेज चलोगे तो हरिद्वार मिलेंगे

हे एका टेम्पोच्या मागे लिहिलेलं वाक्य. नंबर राजस्थानचा होता.

धीरे चलोगे तो बार बार मिलेंगे
तेज चलोगे तो हरिद्वार मिलेंगे
>> Rofl पुलंनी पानवाला सारखं ट्रकवाला लिहिलं असतं तर कृष्ण चालले वैकुंठाला राधाबोले पकडुन बाही, इथे तंबाखू खाऊन घ्या हो ... ऐवजी हे लिहिलं असतं. Lol बाकी पानवाला वाचुन पुण्यात त्यांना मारहाण झाली असती ती वेगळी!

हरिद्वार मिलेंंगे Lol

असाच अजून एक मेसेज ट्रकच्या मागे वाचला होता:
जल्दी मत करो, जिन्हें जल्दी थी वो चले गये

Biggrin

हे हरिद्वार वालं आउटसायडर्स ना हरिद्वार 'व्हेकेशन' अर्थी वाटेल Happy
या मेसेज मध्ये ठिकाणानुरूप बदल करावा लागेल, पुण्यात वैकुंठ, मुंबईत कोपीनेश्वर वगैरे

तुम्ही चांगल्या जोकला रिव्ह्यू कमेंट दिल्यावर घ्या आणखी कमेंट! Proud
कोपीनेश्वर ठाण्यात आहे. ती ही स्मशानभूमी नसुन दहावं तेरावं करायची जागा/ देऊळ आहे. मुंबईची हवी असेल तर चंदनवाडी करा Lol

ओह ओके,धन्यवाद
मला खरंच हे डिटेल माहीत नव्हते
नेहमी नातेवाईकांकडून कोपीनेश्वर ला जाऊन आलो ऐकलं होतं त्यामुळे...

मला एका मित्राने रिक्षावर लिहिलेल्या सुविचाराचा फोटो पाठवला होता.
संदेश - नो कॉलेज फुल नॉलेज.

एका ट्रकवर लिहिलेला जाहीरनामा..
आने दो हमको शासन में, रसियन बटवा देंगे राशन में!

पण राजमा नीट शिजवता आला नाही तर माकाचू मध्ये प्रतिसादांची रेलचेल होईल. वरील एका ट्रकवर लिहिलेला जाहीरनामा.. माबो बंधुंसाठी (स्त्रीरुप पुरुष आयडीसहित सर्व) आहे

एका ट्रक च्या मागे लिहलेले वाचले ,
बेटे को जिंदगी दो मगर बाईक नही !
बेटी को शिक्षा दो मगर मोबाईल नही !

हो. अगदी मिसोगायनिस्ट मेसेज आहे हा.

मध्यंतरी एमपी मधल्या एका समाजाने ठराव केला होता कि मुलींना मोबाईल द्यायचा नाही. का तर म्हणे प्रेमविवाह करतात, पळून जाऊन लग्न करतात. आता रील्स बनवून टाकतात याची पण भर पडली असेल.

आजकाल अमेरिकेत हिंदूधर्माचा प्रभाव वाढतो आहे ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच ट्रक्समागे आजकाल रामनाम लिहिलेलं असतं.

अशी रिक्षा चक्क जिवंत आहे अजून..
कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत बहुतेक

अमेरिकेत लिहिलेल्या वाहनांच्या मागची वाक्य चालतील का? Wink परवाच दिसलं.

IMG_1552.JPG

अंजली, मस्त आहे हे. Happy
टेक्सासमधे पोलिसांच्या कार मागे In God we trust लिहिलेले असते. जे मला भयंकर खटकतं. ज्यांच्यावर सुरेक्षेची जबाबदारी आहे त्यांनी 'तुम्ही काही काळजी करू नका आमचा देवावर पूर्ण विश्वास आहे' म्हणणं चूक वाटतं. किमान डॉक्टर आणि पोलिस यांनी घराबाहेर देवदेव केले की त्यांच्यात आत्मविश्वास नसल्यासारखं वाटते. मी अशा डॉक्टरकडे जाणार नाही. मला इन- जनरल अशा लोकांचा भरवसा वाटत नाही. इथं भरपूर लोक धर्मांध आहेत. जो चर्चला जात नाही, त्याचा धंदा चालत नाही. फोटो घेतला तर डकवेन.
Don't bring God to your work .... please keep it home !

भारतात तर "In god , In reincarnation we trust" हे गाडीवर लिहावेही लागत नाही. लोक आपल्या ड्रायव्हिंग स्किल्स मधुनच ते अधिक प्रभावीपणे स्पष्ट करतात.

Pages