
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
शहण्याला शब्दांचा मार
शहण्याला शब्दांचा मार
ही म्हण आहे का.
आहे आहे रात्र थोडी सोंगं फार
आहे आहे
रात्र थोडी सोंगं फार
रोज मरे त्याला कोण रडे.
रोज मरे त्याला कोण रडे.
मोले घातले रडाया नाही प्रेम
मोले घातले रडाया नाही प्रेम नाही माया
नाही काम घरी आणि सांडुन
नाही काम घरी आणि सांडुन सांडुन भरी
कामापुरता मामा आणि ताकापुरती
कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई
दुधाने तोंड पोळले तर ताकही
दुधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून प्यावं
म्हण आहे का
वराती मागून घोडे
वराती मागून घोडे
दुधाने तोंड पोळले तर ताकही
दुधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून प्यावं >> हो. म्हणच आहे.
शहण्याला शब्दांचा मार >> ही पण बरोबर आहे.
धागा वर आणण्यासाठी मीच पुन्हा
धागा वर आणण्यासाठी मीच पुन्हा म्हण देते आहे. @संयोजक-मभागौदि-2023 चालेल का?
घोडे मेले ओझ्याने शिंगरू मेले हेलपाट्याने
मेल्या म्हशीला मणभर दूध
मेल्या म्हशीला मणभर दूध
भरवश्याच्या म्हशीला टोणगा
भरवश्याच्या म्हशीला टोणगा
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
(म्हशीवरून उतरणार नाय)
धन्यवाद संयोजक. माझा म्हणी
धन्यवाद संयोजक. माझा म्हणी आणि वाक्प्रचार यात गोंधळ होत होता.
मोरोबा म्हशीवर, म्हणींच्या वेशीवर (उगाच आपलं काहीतरी, ते म्हशीवरून उतरणार नाहीत म्हणाले ना
)
हलके घ्या मोरोबा.
शेळी जाते जीवानिशी, खाणारा
शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड
रिपीट लिहिली मी बहुतेक, झालेली आहे.
इथे जरा जास्त लुडबूड केली
इथे जरा जास्त लुडबूड केली म्हणून इथेच लिहिते.
पुर्ण संयोजक टीमसाठी जोरदार टाळ्या आणि कौतुक, बहारदार झाले सर्वच कार्यक्रम.
वर काढत आहे
वर काढत आहे
शेळी जाते जीवानिशी, खाणारा
शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड>>
खाई त्याला खवखवे
साखरेचे खाणार त्याला देव
साखरेचे खाणार त्याला देव देणार
दैव देतं आणि कर्म नेतं
दैव देतं आणि कर्म नेतं
(हे देव नाही माहीत आहे.कुणाला देव शव्ब्दावरून सुचल तर ओवरराईड करा)
देव तारी त्याला कोण मारी
देव तारी त्याला कोण मारी
ह्या वर्षी नव्याने सुरू करूया म्हणजे मागच्या वर्षी म्हणी झाल्या की नाही हे तपासत / आठवत बसायला नको.
करून करून भागली नि देवपूजेला
करून करून भागली नि देवपूजेला लागली (??)
चांभाराच्या देवाला खेटराची
चांभाराच्या देवाला खेटराची पूजा
देव देवळात आणि चित्त खेटरात
देव देवळात आणि चित्त खेटरात
ही बेस्ट म्हण आहे ममो. ऐकली
धन देवळात आणि चित पायताणात
धन देवळात आणि चित पायताणात असं ऐकलं आहे
देव देवळात आणि चित्त खेटरात >
अमित, धन्यवाद .
देव देवळात आणि चित्त खेटरात >> म्हणजे देवळात गेलो ट्टी देवाकडे लक्ष कमी आणि बाहेर ठेवलेल्या चपला कोणी चोरून नेत नसेल ना ह्यातच आपल लक्ष असत, असा त्याचा मला समजलेला अर्थ. किल्ली म्हणीत प्रदेशानुसार थोडा थोडा फरक पडू शकतो. अर्थ सेम आहे.
मनी नाही भाव आणि देवा मला पाव
देवावरूनच परत- मनी नाही भाव आणि देवा मला पाव
अरे देवा परत...
अरे देवा परत...
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन
Pages