मराठी भाषा गौरव दिन ​२०२३ - खेळ - म्हणींच्या भेंड्या

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 03:16

"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.

"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.

अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.

समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.

सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.

चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हण देताना एकतर आधीचे अक्षर किंवा आधीच्या म्हणीतील कोणताही शब्द चाललेलं असा नियम आहे ना?
मागील एका कंमेंट मध्ये मी दिलेली म्हण आधीच्या अक्षरावरून सुरु होत नव्हती पण आधीच्या म्हणीतील शब्दावरून होती. ती म्हण रद्द केली होती. म्हणून एकदा नियम स्पष्ट करून घेत आहे.

म्हण देताना एकतर आधीचे अक्षर किंवा आधीच्या म्हणीतील कोणताही शब्द चाललेलं असा नियम आहे ना? >> हो. नियम पाळला गेला असेल तर प्रतिसाद रद्द करायची गरज नाही.

जी म्हण मागे रद्द केली गेली होती ती पुन्हा वापरत आहे. तसेही 'रोगापेक्षा उपचार भयंकर' यातील कशापासूनही अजून तरी म्हण आलेली नाही. 

नाचता येईना अंगण वाकडे रांधता येईना ओली लाकडे 

मराठी म्हणी आणि मराठी वाकप्रचार हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हल्ली दोन्हींचा वापर म्हणी म्हणूनच केला जातो. मभागौदि निमित्त वाकप्रचारांचा वेगळा खेळ असावा , जेणेकरून पुन्हा दोन्हीतला फरक प्रचलित व्हावा.

Pages