डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
(No subject)
The easiest way to burn fat
The easiest way to burn fat is neither dieting nor exercise.
It is immersion in cold water, with or without swimming. Water, due to its high specific heat capacity, depletes energy from the body faster than almost anything else.
Dieting is a distant second.
Exercise is not even in contenti
आपल्या पूर्वजांना हे आधीच
आपल्या पूर्वजांना हे आधीच माहित होतं. म्हणूनच दहा दिवस गुणिले एकवीस मोदक खाल्लेल्या बाप्पाचं थंड पाण्यात विसर्जन करतात
अनेकांना वाटत मोदीजी टाईमपास
अनेकांना वाटत मोदीजी टाईमपास म्हणून लक्षद्वीपला फिरण्यासाठी गेले होते.. त्यामागील कारण वेगळं आहे..
मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.. मालदीव ने इंडिया आऊटचा नारा दिला आणि भारतीय सैन्याला मालदीव सोडण्यास सांगितले.. इथेच आपल्या पर्यटनावर कुऱ्हाड मारून घेतली..
५ लाख लोकसंख्या असलेल्या मालदीवला धडा शिकवणे काही अवघड नाहीये.. पण मोदीजी मोदीजी आहेत. ते एकट्याने संपूर्ण जगावर भारी पडत आहेत.. मग मालदीवसारखा छोटा देश भारताला धमकावतो आणि मोदीजी ते कसे सहन करू शकतात..?
मोदीजींनी कोणतीही थेट कठोर कारवाई न करता मालदीवला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला..भारतीय सैन्यालाही त्याच्या जागेवरून हलण्याचे आदेश दिले.
मोदीजींनी शत्रूला अशा ठिकाणी मारायचे ठरवले की त्यांना ते सहन होणार नाही. मोदीजींनी मालदीवचे पर्यटन उत्पन्न कायमचे संपवण्याचा विचार केला आणि लक्षद्वीप गाठले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन्स केले आणि संपूर्ण जगाला आवाहन केले की, मालदीव ऐवजी लक्षद्वीपमध्ये या, तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील आणि तेही स्वस्त दरात.
मोदीजीं एवढ्यावरच थांबले नाहीत लक्षद्वीपच्या विकासासाठी त्यांनी 1200 कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले आहे. मोदीजींच्या फोटो सेशनची सध्या जगभरात जोरदार चर्चा आहे. येत्या 2-4 वर्षात 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी अर्थव्यवस्था असलेला मालदीव लवकरच पाकिस्तानसारखा कटोरा घेऊन संपूर्ण जगात भीक मागताना दिसेल.
याचे परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे.. सलग दुसऱ्या दिवशी लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला कीवर्ड बनला आहे..
नाद करा पण मोदींचा कुठं.. नमो..
(No subject)
फेफ हे त्या बीच वरती मोदी
फेफ
हे त्या बीच वरती मोदी फिरतानाच्या क्लिप्स येत आहेत यावर का? एक अफलातून मीम पाहिली त्यावर. इटलीची पंप्र मेलोनी तिला बीच आवडतो म्हणते आणि लगेच हे फोटो त्यात येताना दिसतात. सुपर्लोल आहे ती मीम.
फा, बघायला हवी रे. चुकवू नये
फा,
बघायला हवी रे. चुकवू नये असले काही 
मेलोडी ट्रेण्ड झालेले
मेलोडी ट्रेण्ड झालेले ट्विटरवर.
इटलीची पंप्र मेलोनी तिला बीच
इटलीची पंप्र मेलोनी तिला बीच आवडतो म्हणते आणि लगेच हे फोटो त्यात येताना दिसतात >>
https://www.deccanherald.com
https://www.deccanherald.com/india/narendra-modi-lakshadweep-snorkelling...
'फन'सेवार्थ, धन्यवाद फा.
फेफ, हे घ्या.
धन्यवाद अस्मिता
फाइन्डिंग नमो आणि बीच टॉयज
'फेन'सेवार्थ असाही एक फाकोचा खटाटोप करता येईल. फेन म्हणजे समुद्रातील लाटा असाही एक अर्थ वाचला आहे मराठीत. सागरा प्राण तळमळला मधे आहे.
It is immersion in cold water
It is immersion in cold water,
>>>>
कित्ती मज्जा ना? लोक उगीच स्टीम, जाकुझी, डाययुरेटिक्स वगैरे वापरून शरीरातल्या पाण्याचे प्रमाण घटवण्याचा प्रयत्न करतात.
आता फक्त म्हणूनच भारतात नदीत स्नान करण्याला कसे महत्व आहे, पूर्वजांनी याची जोड चार धाम यात्रेशी (गंगोत्री/यमुनोत्री) कशी घातली, नर्मदा परिक्रमा, प्रयागस्नान, उगाच का मानस सरोवरला जायचे वगैरे जोड पुरवण्या येणे बाकी आहे.
झालंच तर आर्क्टिक होम इन द वेदाज वगैरेचा आधार घेऊन तिथे तर किती कमी तापमान असायचे वगैरे कहाण्याही प्रसृत होतील.
बाकी 'मेलोडी' वाचलं कि मला
बाकी 'मेलोडी' वाचलं कि मला 'मेलोडी है चॉकलेटी' हेच आठवतं.
अस्मिता,
अस्मिता,
(No subject)
मलाही ते फाईन्डिग नमो, डॉ
मलाही ते फाईन्डिग नमो, डॉ ऑर्थो आणि व्हिडिओतले 'थोडी मठरी वठरी लेके चले' फारच सुपरलोल वाटले.
'पहिला लाईफ जॅकेट घातलेला स्नॉर्कलर'ही हहपुवा. कारण ते अजून आगळेच साहस आहे, लाईफ जॅकेटने तुम्ही तरंगता मग पाण्याशी लढून (?) आत जाऊन स्नॉर्कलिंग करावं लागेल. त्यांनी fact check दिले आहे, पण मनातल्या मनात 'तुझं फॅक्ट चेक गेलं तेल लावत, मला फक्त हसायचं आहे' असं झालं.
म्हणजे अजितच्या जोकसारखे - हम
तेच बरं आहे आपल्याला.
लाईफ जॅकेटने तुम्ही तरंगता मग
लाईफ जॅकेटने तुम्ही तरंगता मग पाण्याशी लढून (?) आत जाऊन स्नॉर्कलिंग करावं लागेल. >> हे मला समजलं नाही. स्नॉर्कलिंग हे पाण्यावर तरंगतच करायचं असतं ना? स्कुबा dive आणि स्नॉर्कलिंग गल्लत होते आहे का?
हर्पा, Snorkeling पाण्याखाली
हर्पा,
Snorkeling पाण्याखाली पण फार खोलवर न जाता करतात कारण त्यात श्वास घ्यायला ट्यूब वापरतात. Under water activity closer to surface आहे.
Scuba diving मात्र खोल पाण्यात जाऊन करतात, ज्यात ऑक्सिजन सिलिंडर वापरतात. Deep sea activity.
मीही वरवरचं वाचलंय.
मी दोन्ही केलं आहे. तेव्हा
मी दोन्ही केलं आहे. तेव्हा स्नॉर्केलिंगच्या वेळी आमच्या पैकी ज्यांना पोहता येत नव्हते त्यांना लाईफ जॅकेट दिले होते. मीही पोहून दमल्यावर लाईफ जॅकेट घालून स्नॉर्केलिंग केले, त्यामुळे हात पाय फार मारावे लागले नाहीत आणि शांतपणे आत पाण्यातल्या गोष्टी नीट बघता आल्या. स्कूबा - मी पाण्याखाली खोल गेल्यावर ठसका लागून आणि श्वास (अडकून सीताराम झाल्यामुळे) पॅनिक झाल्यामुळे फार वेळ करू शकलो नाही; लगेच वर यावे लागले.
मीही वरवरचं वाचलंय >>> म्हणजे
मीही वरवरचं वाचलंय >>> म्हणजे स्नॉर्कलिंग सारखंच
मोदींनी यातले काही प्रत्यक्षात केले की नुसतेच फोटो काढलेत हे माहीत नाही
पण आता मीमवर हसून झालं की हो.
वर पोस्टीत लिहिले आहे नं की fact check केलं नाही , आधी हसून घेतलं. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे (लक्षात राहिली तर) पुढच्या वेळी हसू येणार नाही, आता झालं हसून.
मजा आहे बुवा एका माणसाची, दोन्ही करून झाले आहे.
आम्ही आपलं गुगलच्या डुबक्या मारतोय.
हो फा,
हर्पा माझी फजिती करणार आहेत अशी शंका आली.
मीही वरवरचं वाचलंय >>> म्हणजे
मीही वरवरचं वाचलंय >>> म्हणजे स्नॉर्कलिंग सारखंच >>> फा
आता झालं हसून >>
सिंगापूर हा COVID-19
सिंगापूर हा COVID-19 मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. सखोल तपासणीनंतर, असे आढळून आले की कोविड-19 हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही, तर एक जीवाणू आहे जो किरणोत्सर्गाच्या संपर्कात आला आहे आणि रक्तात गुठळ्या होऊन मानवी मृत्यूला कारणीभूत आहे.
असे आढळून आले की कोविड-19 रोगामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात, ज्यामुळे मानवांमध्ये रक्त गोठते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते; कारण मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे लोक लवकर मरतात.
श्वसन शक्तीच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी, सिंगापूरमधील डॉक्टरांनी WHO प्रोटोकॉलचे ऐकले नाही आणि COVID-19 वर शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी हात, पाय आणि शरीराचे इतर भाग उघडून काळजीपूर्वक तपासल्यानंतर, त्यांच्या लक्षात आले की रक्तवाहिन्या विस्तारलेल्या आणि रक्ताच्या गुठळ्यांनी भरल्या आहेत, ज्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला आणि ऑक्सिजनचा प्रवाह देखील कमी झाला. शरीरात रुग्णाचा मृत्यू होतो. या संशोधनाबद्दल जाणून घेतल्यानंतर, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 उपचार प्रोटोकॉलमध्ये तात्काळ बदल केला आणि पॉझिटिव्ह रुग्णांना ऍस्पिरिन दिली. मी 100mg आणि Imromac घेणे सुरू केले. त्यामुळे रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांची प्रकृती सुधारू लागली. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने एका दिवसात 14,000 हून अधिक रुग्णांना बाहेर काढले आणि त्यांना घरी पाठवले.
वैज्ञानिक शोधानंतर, सिंगापूरमधील डॉक्टरांनी हा रोग जागतिक फसवणूक असल्याचे सांगून उपचार पद्धती स्पष्ट केली, “हे इंट्राव्हस्कुलर कोग्युलेशन (रक्ताच्या गुठळ्या) आणि उपचार पद्धतीशिवाय दुसरे काहीही नाही.
प्रतिजैविक गोळ्या
विरोधी दाहक आणि
अँटीकोआगुलंट्स (एस्पिरिन) घ्या.
हे सूचित करते की रोग बरा होऊ शकतो.
सिंगापूरच्या इतर शास्त्रज्ञांच्या मते, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग (ICU) ची कधीच गरज नव्हती. सिंगापूरमध्ये या उद्देशासाठी प्रोटोकॉल आधीच प्रकाशित केले गेले आहेत
चीनला हे आधीच माहीत आहे, पण त्याचा अहवाल कधीच प्रसिद्ध केला नाही.
ही माहिती तुमचे कुटुंब, शेजारी, परिचित, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करा जेणेकरून ते कोविड-19 ची भीती घालवू शकतील आणि त्यांना समजेल की हा विषाणू नसून एक जीवाणू आहे जो केवळ रेडिएशनच्या संपर्कात आला आहे. अत्यंत कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनीच काळजी घ्यावी. या रेडिएशनमुळे जळजळ आणि हायपोक्सिया देखील होतो. पीडितांनी Asprin-100mg आणि Apronik किंवा Paracetamol 650mg घ्यावी.
थोडक्यात भारतीय डागटर अगदीच
थोडक्यात भारतीय डागटर अगदीच यडपट आहेत. इतकं साधं डोकं न चालवता आणि पंप्र फाईंडिंग नमो असतानाही ते पाश्चिमात्यांचं अनुकरण करत राहिले.
आता शिंगणापूरचं करतील.वरच्या चर्चेनंतर स्नॉर्कलिंग
वरच्या चर्चेनंतर स्नॉर्कलिंग व स्कूबा च्या उपमा अॅनिमल बाफवर अचूकरीत्या वापरल्याबद्दल मानव यांना एक लाइक बनतोच
मला पण, तिकडे मोदी पाण्यात
विषाणू नसून एक जीवाणू आहे जो
विषाणू नसून एक जीवाणू आहे जो केवळ रेडिएशनच्या संपर्कात आला आहे. >>> हे वाचून covid जीवघेणा नसून बापुडवाणा आहे आणि स्वतःच विक्टिम आहे असं फिलींग आलं
Pages