भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीलिंगी भांग >> प्यायची असते
>>> अरे हो की ...कुठल्या तारेत लिहिलं कुणास ठाऊक

पुरुषांची पिट्युटरी ग्लॅन्ड असंतुलित राहिलेली का चालते? Nation wants to know Lol Lol

का फॉरवर्ड लिहू आणि मग समजणारे! Lol Lol

नुकतंच कधीतरी दंडात वाकी घालून कसलासा फायदा होतो असं पण वाचनात आलंय >>> हे असले फॉरवर्ड बहुतेक पु. ना गाडगीळ, चिपडे सराफ, वामन हरी पेठे ज्वेलर्स वगैरे करत असतील सिक्रेटली.

मी तर म्हणते, हे असं डोक्याला मागे गजरा लावून पुढे नाकाने वास घेण्यापेक्षा गजरा मनगटाला गुंडाळावा. केव्हाही नीट नाकापाशी नेऊन वास घेता येईल. काही पुरुष (उदा. हिंदी सिनेमात तवायफांचा नाच बघायला जाणारे अथवा मराठी तमाशापटांमधले व्हिलन) एकदम चतुर! हा फॉरवर्ड वाचून ते आनंदी का दिसत, याचे रहस्य उलगडले.

परदेशातील बाक थेरपी वाचून प्रभावित होऊन स्वदेशी बाक चालतील का म्हणून सोसायटीतले बाक पाहायला गेले. ते सोसायटीतल्या ज्येनांनी केव्हाच बळकावले आहेत. पाहावं तेव्हा तिथे हॅहॅहॅहॅ करत बसलेले असतात. हा फॉरवर्ड त्यांनी त्यांच्या व्हॉटसापांमध्ये कित्येक वर्षांपूर्वीच वाचला असणार.

मी आधी मनरेगात वाचलं. <<<<< Lol

का फॉरवर्ड लिहू आणि मग समजणारे! >>> Lol हे निसटलंच होतं आधी. हे भारी आहे. कोणतेतरी तत्त्व शोधावे लागेल त्याकरता.

गजरा घालून जर थंड वाटतं तर उन्हाळ्यात शॉर्टस घालून थंड का वाटू नये? >>> लोकांना 'हॉट' वाटायचं पण >>> Lol "स्त्रीचे शरीर उष्ण धर्माचे समजले जाते" असे पोस्टमधे आहेच. आयुर्वेदात कफ पित्त वगैरे असते माहीत आहे. "धर्म" ही नवीनच डायमेन्शन ऐकली. त्यातही, उष्ण व शीत वगैरे असलेली. लोक सॉफ्टवेअर कस्टमाइज करतात तसा हा कस्टमाइज्ड आयुर्वेद नवीनच आहे. आणि "समजले जाते" म्हणजे नक्की काय व कोठे समजले जाते? ट्रम्प जसा स्वतःच कंड्या पिकवून "लोक असे समजतात" म्हणतो तसे हे व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स (आणि बहुधा लौकरच अमित Wink ) स्वतःच हे फॉरवर्ड करतात आणि पुन्हा वर "समजले जाते" लिहीतात, असेच असावे.

मनरेगा - महात्मा गांधी समथिंग सम्थिंग एम्प्लॉयमेण्ट सम्थिंग. जवाहरलाल नेहरू रोजगार योजना सारखे काहीतरी.>>> व्वा, काय accuracy आहे या माहितीत. >>> Lol ती व्याख्या वेबवर शोधली पण ती क्लिष्ट निघाली.

पण गांधी व नेहरू दोघेही असून राजकीय पोस्ट नाही, इतके तरी श्रेय द्या Happy

स्त्रीचे शरीर उष्ण धर्माचे समजले जाते>>>> Lol इतकी हसतेय.
पण गांधी व नेहरू दोघेही असून राजकीय पोस्ट नाही, इतके तरी श्रेय द्या>>> घ्या मग, आता काय... Lol

नाकाने वास घेण्यापेक्षा गजरा मनगटाला गुंडाळावा. केव्हाही नीट नाकापाशी नेऊन वास घेता येईल.
>>> इन्ही लोगोंने ले लीना 'गजरा' मेरा Lol

कुठल्या तारेत लिहिलं कुणास ठाऊक >>> Lol

हा फॉरवर्ड वाचून ते आनंदी का दिसत, याचे रहस्य उलगडले. >>> Lol खरे आहे. हा योग्य उपाय आहे. मग बायकांनी गजरा "माळो" वा न माळो.

पाहावं तेव्हा तिथे हॅहॅहॅहॅ करत बसलेले असतात. हा फॉरवर्ड त्यांनी त्यांच्या व्हॉटसापांमध्ये कित्येक वर्षांपूर्वीच वाचला असणार. >>> Lol

जुन्या गाण्यांत "ये तेरा बाकपन" म्हणत त्याचा अर्थ आत्ता नीट समजला! अर्थात इथे आपण बाक शब्दांवरच्या कोट्यांनाही ये तेरा बाकपन म्हणू शकतो.

गजरा मनगटाला गुंडाळावा >>>> मराठीतला राजशेखर आठवला.
हिंदीतले कितीतरी.

बाकपन >>> Lol या शब्दांच्या बाबतीत "ये पीएसपीओ नही जानता" झालेय.

> हे असले फॉरवर्ड बहुतेक पु. ना गाडगीळ, चिपडे सराफ, वामन हरी पेठे ज्वेलर्स वगैरे करत असतील सिक्रेटली.
फार पूर्वी संतोषी मातेची छापील पत्रे वाटली जायची तेव्हा पत्राखाली प्रिंटिंग प्रेसचेही नाव असायचे !

र आ >>> थँक यू
श्रद्धा, अस्मिता, फारएंड >>> सगळेच सुटला आहात. Lol

सगळ्यांच्या पोस्ट्स मस्त Lol
टक्कल असेल तर पुरुष फूल/ गजरा कसा घालणार हा प्रश्न मलाही पडला होता, पण सेलोटेपची आयडिया सुचली नाही! Lol
पण खरंच, शतकानुशतके पुरुषांच्या पिट्युटरी ग्लँड्सवर घोर अन्याय झाला आहे. ( हाताला गजरा गुंडाळणारे मोजके शौकीन सोडल्यास) त्याचं परिमार्जन व्हायलाच हवं. हेअरपिन्स, सेफ्टीपिन्स, सेलोटेप वगैरे काहीही वापरण्याची मुभा आहे.

मनरेगा वाचून जुयेरेगा च आठवलं... ऊ रेंगाळत येतेय डोक्यात असं काहीतरी चित्र डोळ्यासमोर आलं... Lol

ते मगगटाला गजरे गुंडाळलेले पुरूष कसे लंपट कॅटेगरीतले झाले ना Wink अ‍ॅज पर मराठी आणि हिंदी सिनेमा.
जे बाकीचे पुरूष आहेत त्यांनी निदान बायकोच्या /मैत्रिणीच्या केसात माळलेल्या गजर्‍याचा वास तरी घ्यावा. पिट्युटरी ग्लँडसाठी काय पण

बाकपन >>> जबरदस्त Lol

पुरूषाचे आरोग्य आणि नदी

नदीत पोहणे हे हायजेनिक च्या नावाखाली शहरी लोकांच्यात बंद होत चालले आहे. त्या ऐवजी स्विमिंग पूल, हीटेड स्विमिंग पूल,फिल्टर्ड स्विमिंग पूल, रेन डान्स, वेव्हज असे कृत्रिम प्रकार बोकाळू लागले आहेत.

नदी च्या उल्लेखानेच किती तरी प्रसन्न वाटतं. नदीचे सांस्कृतिक, धार्मिक महत्व वेगळे सांगायला नको. आजही गावाकडे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व विधींसाठी नदीचा संबंध येतो. शेवटची यात्रा सुद्धा नदीसोबत होते. खेडेगावात आजही सकाळी नदीत डुबकी मारल्याशिवाय स्त्री पुरूष कामाला जात नाहीत.

नदीच्या पाण्याने स्त्री चे सौंदर्य निखारून येते तर पुरूषाचे शरीर पीळदार होते. नदीच्या पाण्यात नियमित पोहल्याने शरीराच्या सर्व व्याधी दूर होतात. त्रिदोषाचे निवारण होते. शरीराच्या सर्व शिरा मोकळ्या होतात. ज्या विहीरीला उफळा असतो तीत पोहण्याचे सुद्धा असेच फायदे आहेत. विहीर ही बंदीस्त असते असा लोकांचा गैरसमज असतो. पण तसे नाही. विहीरीला सुद्धा भूमिगत पाण्याचे प्रवाह मिळत असतात. तसेच विहीरीचे पाणी खालच्या दिशेने भूमिगत प्रवाहातून जात असते. त्यामुळे हे पाणी सुद्धा प्रवाहीच असते.

पाण्याचा गुणधर्म म्हणजे दिवसा ते शीतल असते तर रात्री उष्ण. त्यामुळे कुठल्याही वेळेला शरीराचे तापमान योग्य ते ठेवण्यासाठी पोहणे ही उत्तम कृती आहे.

हे कोणतेच फायदे बंदीस्त अशा तलावात अर्थात स्विमिंग पूल मधे मिळत नाहीत. एक वेळ कुत्र्याचे पिलू लहानपणीच पाळण्यासाठी आणले तरी त्याच्या डीएनए मधल्या गुणधर्मामुळे त्याच्या मधे कुत्र्याचे सगळे गुणदोष येतात. पाण्याचे तसे नाही. बंदीस्त तलावात सोडलेले आणि प्रवाही नसलेले पाणी हे उपरे असते. त्याच्यातले अनेक गुणधर्म नष्ट झालेले असतात.

प्रवाही पाणी माणूस, प्राणी तसेच जीव जंतू यांची घाण वाहून नेते. ते समाजाची घाण वाहून नेते. आणि पुन्हा नितळ बनते. या दैवी गुणधर्म बंदीस्त पाण्यात नसतो.

शरीराच्या तापमानाचे नियोजन प्रवाही पाणी करत असल्याने खेडेगावातील लोक काळेसावळे पण तजेलदार दिसतात. ते लवकर वृद्ध होत नाहीत. इतकेच काय पुरूषांना टक्कल पडण्याचे प्रमाण कमी असते. खेडेगावात राहून ज्याला टक्कल पडते तो पुरूष पोहण्याची टाळाटाळ करत असतो.

पुरूष केस कापायला जातो तेव्हां न्हाव्याकडच्या वस्तर्‍यासोबत टकलाचा व्हायरस एकाकडून दुसरीकडे संक्रमित होत असतो. त्यामुळे टकलाचा प्रसार होतो. सर्वांच्या केसात टक्कल वर्धक व्हायरसशी लढणारे अँटीव्हायरस नसतात. त्यामुळे मोजके लोक सोडले तर टकलाचा प्रसार वेगाने होतो. आधुनिक काळात टक्कलाचा प्रसार होण्यामागे वाचन, विचार हे कारण नसून वस्तरा आहे हे समजून घेतले पाहीजे.

यावर उपाय नदीचे प्रवाही पाणी आहे. नदीच्या पाण्यात केसातले असे जीवजंतू वाहून जातात. तसेच नदीच्या पाण्यात टक्कलविरोधी जीवजंतूही असतात. जे पुरूष पाण्यात बुडी मारतात त्यांच्या केसातले वस्तर्‍याने आलेले टक्कलवर्धक जीवजंतू पाण्यातले टक्कलविरोधी जीवजंतू नष्ट करतात.

अशा रितीने प्रवाही पाणी हे स्त्रियांपेक्षा पुरूषांना जास्त आरोग्यदायी आहे. चिरतरूण राहण्यासाठी नदीच्या पाण्यात पोहणे या पेक्षा चांगला उपाय नाही.

बंदीस्त पाण्यात टक्कलविरोधी जीवजंतू जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत. त्यात क्लोरीन असल्याने ते नष्ट होतात. तसेच अशा पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते. या पाण्यात टक्कलवर्धक जीवजंतूंना रान मोकळे मिळते. निगेटिव्ह शक्तींना ज्याप्रमाणे कोंदट, कुबट, अस्वच्छ घर आवडते तसेच.

पण कसंय , जे मोफत आहे त्याची किंमत नसते
भरगच्च पैसे देऊन लोक लोणावळा, खंडाळा आणि आता तर लातूर सारख्या दुष्काळी ठिकाणी वॉटरस्पोर्ट्स खेळायला जातात. सिंहगडला जाऊन गड चढण्याचा व्यायाम करण्याऐवजी तिथेच पायथ्याला झालेल्या जलक्रीडा खेळण्यासाठी जातात. अहो, ते काय पाणी आहे का ? रेनडान्स सारखा तद्दन भिकार प्रकार असतो. एका गोलात जिथे श्वास घुसमटतो तिथे पाईपाला भोकं पाडून पाऊस पाडला जातो. त्याला नैसर्गिक पावसाची सर कशी येणार ?

जेव्हां नैसर्गिक पाऊस पडतो, त्याला आपण नाकं मुरडतो. आया मुलांना या पावसात भिजू देत नाहीत. याच दिव्य आया रेन डान्स साठी मुलांना कौतुकाने घेऊन जातात. त्यांचे पुरूष सुद्धा एव्हढे मोठे पोट आणि टक्कल घेऊन त्या कृत्रिम पावसात भिजत असतात. असे कृत्रिम आयुष्य जगण्यापेक्षा नदी, विहीर जवळ करा आणि फरक बघा.

सिक्स पॅक्स साठी जीम मधे जायची काहीही गरज नाही. तुमचा नवरा काही दिवसातच मुकेश खन्ना सारखा देखणा दिसू लागेल. करून पहा.
पैसे देऊन कुठल्या तरी तलावात डुबकी मारण्यापेक्षा निसर्गाने जे मोफत दिलेले आहे त्याचा आनंद घ्या.

*आरोग्यम धनसंपदा*
चावरे गुरूजी आश्रम
सांगवडे

जुन्या गाण्यांत "ये तेरा बाकपन" म्हणत त्याचा अर्थ आत्ता नीट समजला! अर्थात इथे आपण बाक शब्दांवरच्या कोट्यांनाही ये तेरा बाकपन म्हणू शकतो.
>>> Good one ..! Lol

आता पुरुषांच्या मागे लागायचे आहे तर, माय प्लेजर Lol

एक वेळ कुत्र्याचे पिलू लहानपणीच पाळण्यासाठी आणले तरी त्याच्या डीएनए मधल्या गुणधर्मामुळे त्याच्या मधे कुत्र्याचे सगळे गुणदोष येतात. पाण्याचे तसे नाही.
>>>> ही काय तुलना आहे. Lol
खेडेगावात राहून ज्याला टक्कल पडते तो पुरूष पोहण्याची टाळाटाळ करत असतो.>>>> Lol याकरताच 'खेड्याकडे चला' म्हटले आहे, म्हणजे प्रत्यक्ष बघता येईल.
टकलाचा व्हायरस एकाकडून दुसरीकडे संक्रमित होत असतो. त्यामुळे टकलाचा प्रसार होतो. सर्वांच्या केसात टक्कल वर्धक व्हायरसशी लढणारे अँटीव्हायरस नसतात>>>> Lol
या पाण्यात टक्कलवर्धक जीवजंतूंना रान मोकळे मिळते.
त्यांचे पुरूष सुद्धा एव्हढे मोठे पोट आणि टक्कल घेऊन त्या कृत्रिम पावसात भिजत असतात.
तुमचा नवरा काही दिवसातच मुकेश खन्ना सारखा देखणा दिसू लागेल. करून पहा.>>>>> Lol शक्तिमान करायच्या नादात गंगाधर मिळायचा.
पैसे देऊन कुठल्या तरी तलावात डुबकी मारण्यापेक्षा निसर्गाने जे मोफत दिलेले आहे त्याचा आनंद घ्या.>>>
चला करुया सहकुटुंब 'चाक दुम दुम, चाक दुम दुम' Lol

र्मड Lol

बापरे ! Biggrin अशक्य फॉरवर्ड आहे!
त्यांच्या केसातले वस्तर्‍याने आलेले टक्कलवर्धक जीवजंतू पाण्यातले टक्कलविरोधी जीवजंतू नष्ट करतात. हे सारखं सारखं वाचून मला टक्कल वर्धक आणि टक्कलविरोधी एकच वाटू लागले!
तुमचा नवरा काही दिवसातच मुकेश खन्ना सारखा देखणा दिसू लागेल. करून पहा.
बट व्हाय मुकेश खन्ना? ऑफ ऑल हिरोज आऊट देअर? Happy

पुण्यातल्या लोकांनी काय आता मुळा मुठेत जावे काय स्नानाला?
रेनडांस वर का इतका राग आणि आजोबांचा? त्यांना बहुतेक नेलं नसणार !

तसेच विहीरीचे पाणी खालच्या दिशेने भूमिगत प्रवाहातून जात असते.
>>> ऑ, हे काय नवीन आता? विहिरीला सुरुंग, मोठा स्फोट वगैरेने आउटलेट झालेच तर विहीर आटते. भूमिगत आउटलेट कसं असेल मग?

आधुनिक काळात टक्कलाचा प्रसार होण्यामागे वाचन, विचार हे कारण नसून वस्तरा आहे हे समजून घेतले पाहीजे.
>>>>
मग पूर्वी कशाने केशकर्म करायचे म्हणे? एक ग्राम्य क्रियापद वापरायचा मोह कटाक्षाने टाळला आहे.

शरीराच्या तापमानाचे नियोजन प्रवाही पाणी करत असल्याने >>> नदीत/विहिरीत आंघोळीला किती वेळ लागतो? बाकी वेळच्या तापमानाच्या नियोजनाचे काय? खेडेगावातील लोक जागेपणी सर्व काळ वाहत्या पाण्यात डुंबत असतात असे लेखकाला म्हणायचे आहे काय?

मी आधी सिरिअसली अमितवने लिहिला आहे का म्हणून चेक केलं.

>> नदीच्या पाण्याने स्त्री चे सौंदर्य निखारून येते तर पुरूषाचे शरीर पीळदार होते.

हे खरं असतं तर जग किती वेगळं असतं. नद्या खाजगी कंपन्यानी घेतल्या असत्या. आयसीआयसीआय नदी, रिलायन्स नदी, टाटा नदी. सगळे सिने तारे/तारका सकासकाळी नदीवर गेले असते.

विचार करा.सगळे जिम इन्स्ट्रक्टर, प्रोटीन विकणारे, हेल्थ फिटनेस ईन्फ्लुइन्सर फुटपाथवर बेकार माश्या मारत बसलेत.आणि कपड्याचे बोचके पोटाशी घेऊन 6 आणि 8 पॅक बनवायला पुरुषांची तिकीट काढून नदीवर रांग लागलीय Lol

खेडेगावात राहून ज्याला टक्कल पडते तो पुरूष पोहण्याची टाळाटाळ करत असतो>>> हे कहर आहे, म्हणजे म्हटलेच कुणी की तमक्या गावातले लोक तर जास्त करून टकलेच आहेत तर ते सगळे पोहायची टाळटाळ करतात हे शास्त्र शुद्ध कारण आहेच Wink

जोडवी घातली की हॉर्मोन्स संतुलित रहातात, बांगड्यांनी रक्ताभिसरण होते, मंगळसूत्राने थायरॉईडचे विकार दूर होतात, टिकलीने/ कुंकवाने आज्ञाचक्रातून ऊर्जा मिळते वगैरे गटातलंच जरा सौम्य फॉरवर्ड आहे.>> हे सगळं (म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवी वगैरे..) जेव्हा माझ्या आयुष्यात आलं तेव्हापासून मी माझा थायरॉइड बॅलन्स हरवून बसले आहे Lol मग आता मी काय करायचं?

गळ्यात ठसठशीत वाट्यांचे जाड मंगळसूत्र रोज घालायचे.म्हणजे थायरॉईड ग्लान्ड दाबली जाऊन थायरॉईड आटोक्यात राहते Happy (मी नवा काल्पनिक शोध म्हणून लिहिलं, बघते तर काय, आधीपासूनच असं फॉरवर्ड अस्तित्वात आहे .काही म्हणून नवा विचार करण्याची सोय राहिली नाही बघा.)

Pages