भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळव्याध निवारण यंत्र !!!

Biggrin

कितने प्रतिभाशाली लोग हैं ये !!!!

पुढेमागे गवर-कांजण्यांसारखाच मूळव्याध बरे करणाऱ्या देवांचा अवतार नाही निघाला तर मिळवली

तळवडे गावातील बाळूमामा चा चमत्कार. भक्तिन मंदिरात पूजा करीत होती.
तिला बाळू मामा म्हणाले, मी चिंचोली मधील एकाच्या घरी दि-15/8/2021 ला मूलाच्या रूपाने
जन्म घेईन आणि जे लोक धर्माचा नाश करतात त्याचा मी नाश करीन.जी व्यक्ती माझ्या नावाने 20 व्यक्तिना हा संदेश पाठवेल त्याची 20 दिवसात मनोकामना पूर्ण करीन.पण जी व्यक्ति आज वाचून उद्या पाठवू असे 25 दिवस जाऊ देईन त्याचे नूकसान होईल.इतके म्हणून मामा 38 पावले जाऊन अदृश्य झाले.
हे ऐकून घाटणे येथील जीवन कदम यांनी 20 जणांना पाठवीला त्याला 17 17 नंबरची युनोवा गाड़ी लागली.
गावामधील
दूधवाल्याला जमीर ला बोलेरो गाडी लागली।
गणेशनगर येथील रोहन शिंदे यांना uninor कंपनी कडून apple चा iphone मिळाला*
कुर्डुवाडी येथील एका
शेख सरांनी १५ जणांना पाठवीले.त्याना स्वत:च्या घरात सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला.
*

*चिंचवड येथील पांडुरंग लोंढे या युवकाने 20 लोकांना व 15 ग्रुपवर हा मॅसेज पाठवला म्हणून त्यांचे ताबडतोब लग्न झाले*

शेटफळ येथील एक बेरोजगार युवक पाठविण्याचा विचार करीत होता.त्याला सरकारी नौकरी लागली. तेव्हा त्याने 10 जणांना पाठवीले.
तळवडे गावात राहणारे उत्तम राऊत यांना हा मेसेज मिळाला तर त्यांनी एक महीन्यानंतरही मोबाईल मध्येच ठेवला कूणालाच पाठविल नाही.त्यांना खूप नूकसान सहन करावे लागले हा मेसेज खोट समजून कोणत्याही प्रकारची संकटे आढवून घेऊ नयेत.
हा मेसेज डीलेट करू नका.
।। जय बाळू मामा ।।

हा मेसेज 7 जणांना पाठवा उद्या संध्याकाळ पर्यंत चांगली बातमी मिळेल...

वावे यांनी चपळाईने आणि चतुराईने हा मेसेज इथे छापला आणि अशाप्रकारे त्यांनी हजार लोकांना पाठवला. आहे. त्यांना त्याचे प्रचंड फळ मिळणार आहे. कृपया दिवे घ्यालच.

>> uninor कंपनी कडून apple चा iphone

तरीच uninor चा बाजार बसला २०१८ ला

>> युनोवा गाड़ी

हि कोणी UNO ने बनवली आहे वाटते

१७१७ नंबर ची गाड़ी लागली !!
गाड़ी सेकण्ड हैण्ड मॉडेल लागली म्हणजे Wink

--------
असे मेसेज कधी व्हाट्सअपला कोणा अनोळखी माणसाकडून आलेच तर त्यालाच रिटर्न ७ वेळा रोज पाठवतो, जोपर्यन्त वैतागुन ती व्यक्ति ब्लॉक करे पर्यन्त Biggrin

हा धागा फार हसवतो बुवा..:हाहा: आणि इतरांच्या प्रतिभे लाही पंख फुटतात Wink

मागे १ ताई आल्या होत्या त्यांनी टू मच अमुकरूपी तमुक च्या उपमा प्रचुर लेखाचा रतीब पाडला होता..त्या लेखाचे नाव आठवतेय का? फार विनोदी आहे ते देखील..

साडी नेसण्याचे शास्त्रीय फायदे?
>>> रिअली?

साडी नेसण्याने थर्मॉस फ्लास्कप्रमाणे, शरीराचे तापमान आजूबाजूच्या हवामानानुसार नियंत्रित राहाते. जसे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणं आणि हिवळ्यात शरीराला गरम ठेवणे.
>> टेम्परेचर कंट्रोल म्हणे ! मग हे लोक साडी का नाही नेसत घरात एसी लावून घ्यायच्या ऐवजी किंवा एसी कारमधून प्रवास करण्याऐवजी? तेवढाच जरा पर्यावरणाला हातभार.

साडीविषयी प्रॉब्लेम नाही पण असले लोक सोकावत चालले आहेत याचा नक्कीच राग आहे.

पुरुषांनीही नेसायला हवी मग.

अनेक रोगात पुरुषांचा रिस्क फॅक्टर जास्त असतो, स्त्रियांचा कमी असे वाचले आहे. साडी न घालण्याने भोगावी लागणारी फळे दुसरे काय!

थरा वर थर .... थर थराट
आज की ताजा खबर
क्वठ्या म्हाकाल आजपासून साडीत दिसणार आणि पूर्ण थिएटर वातानुकूलित करून दाखवणार

जसे आजच्या स्त्री ला सवत असते.तसेच पूर्वी केव्हमॅनला सवता असायचा.
मातृसत्ताक पद्धतीत एक स्त्री कुटुंब प्रमुख असायची.ती मुलं सांभाळून पुरूषांना कामे द्यायची. एका पेक्षा जास्त पुरूष एकमेकांना सवता म्हणत. ते सवताचा जीव धुक्यात टाकत असत.
अशा रीतीने सवताचा बंदोबस्त झाला कि स्पर्धा बंद!

त्यानंतर सवता ही पद्धत बंद झाली आणि सवत आली. त्याबदल्यात साडी स्त्री कडे अशी विभागणी झाली. आता ही विभागणी बदलणे शक्य नाही.

*चिंचवड येथील पांडुरंग लोंढे या युवकाने 20 लोकांना व 15 ग्रुपवर हा मॅसेज पाठवला म्हणून त्यांचे ताबडतोब लग्न झाले*>> बिचारा....

.. मेसेज त्यालाच रिटर्न ७ वेळा रोज पाठवतो, वैतागुन ती व्यक्ती ब्लॉक करे पर्यन्त ..

Biggrin

हे लै भारी !

अज्ञानी कसले, तुम्ही तर महाज्ञानी आहात !!!

काय भंपक आहे ती साडी वाली बातमी!! आणि साडीने थंडी पण कंट्रोल होत असेल तर कॅनडा बिनडा सारख्या अती थंड देशात सर्व भारतीयांनी साडयाच रोज नेसाव्या(एरवी बर्फात दिलवाले फोटोशूट ला नेसतात).
आणि काय महान नवा शोध लावलाय! दोन्ही हातावरून पदर घेतला तर तापमान 47% कंट्रोल होते म्हणे. मग ट्यूब टॉप घालून दोन्ही खांद्यावरून हातावर पष्मीना स्टोल घेतला तरी होईल की 67% कंट्रोल Happy

हे ऐकून घाटणे येथील जीवन कदम यांनी 20 जणांना पाठवीला त्याला 17 17 नंबरची युनोवा गाड़ी लागली.
गावामधील दूधवाल्याला जमीर ला बोलेरो गाडी लागली।

गाडी लागली म्हणजे? गाडीने धडक मारली का याला गाडीत उलट्या झाल्या? का आणि काय भलताच अर्थ आहे ?

युनोवा म्हणजे कुठली गाडी?

हो पण नवीन गाड़ी डायरेक्ट रजिस्ट्रेशन नंबर वाली कशी Biggrin फक्त इनोव्हा बोलायचं सोडून अति तेथे माती केलीच शेवटी !!

योगी :हहपुवा:

38 पावले>>>>>>>>>>> Lol
काय हिलेरिअस मेसेज आणि कमेंट्स आहेत एकेक.

वावे Lol

आता इतक्या दिवसानंतर काय फायदा झाला.

‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️

*३००० वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते.*
*त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!*

*त्यांनी एक पुस्तक लिहिले*
*ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!*
*(अस्तंग हृदयम्)*

*आणि या पुस्तकात त्यांनी *रोग बरे करण्याचे सूत्र लिहिले!*
*हे त्यापैकी एक सूत्र आहे!!*

*वाग्भट जी लिहितात की हृदयाला कधी झटका येतो!* *म्हणजे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहे!*

*म्हणजे रक्तात आम्लता वाढली आहे!*
*अॅसिडिटी तुम्हाला समजते!*
*ज्याला इंग्रजीत acidity म्हणतात!!*
*आम्लता दोन प्रकारची असते!*

*एक म्हणजे पोटाचा आंबटपणा!*

*आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता!!*

*जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढेल!* *तेव्हा तुम्ही म्हणाल*
✔️ *पोटात जळजळ होते!!*
✔️ *आंबट आंबट ढेकर येत आहेत!*
✔️ *तोंडाला पाणी सुटले!*
*आणि ही आम्लता आणखी वाढली तर!*
*म्हणून हायपर अॅसिडिटी होईल!*
*आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते!!*
*आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (रक्त) हृदयाच्या नळ्यांमधून बाहेर पडू शकत नाही!* *आणि नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो!*
*तेव्हाच हृदयविकाराचा झटका येतो!! त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येत नाही !!*
*आणि हे आयुर्वेदाचे सर्वात मोठे सत्य आहे जे तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगत नाही!*
*कारण त्याचा उपचार हा सर्वात सोपा आहे!!*

*उपचार काय?*

*वाग्भट जी लिहितात की रक्तात आम्लता वाढली की!* *म्हणून तुम्ही अशा गोष्टी वापरता ज्या अल्कधर्मी असतात!*
*तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत!*

*आम्लयुक्त आणि अल्कधर्मी!!*
*आम्लीय आणि अल्कधर्मी*

*आता आम्ल आणि क्षार मिसळले तर काय होईल!*

*आम्ल आणि अल्कधर्मी मिसळल्यास काय होते????*

*‼️तटस्थ‼️*
*असं सगळ्यांना माहीत असतं!!*

*म्हणून वाग्भट जी लिहितात!* *रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारयुक्त पदार्थ खा!*
*म्हणून रक्ताची आम्लता तटस्थ होईल!!!*

*आणि रक्तातील आम्लता न्यूट्रल झाली!*
*म्हणून आयुष्यात कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही!!*

*ही आहे संपूर्ण कथा!!!*

*आता तुम्ही विचाराल की कोणते पदार्थ अल्कधर्मी आहेत आणि आपण खावे????*

*तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अल्कधर्मी आहेत!*

*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!*

*आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वात अल्कधर्मी गोष्ट कोणती आहे आणि ती सर्व घरी सहज उपलब्ध आहे, तर ती म्हणजे बाॕटल गार्ड!!*
*ज्याला दुधी असेही म्हणतात!!*
*इंग्रजीत याला bottle gourd म्हणतात!!!*
*जे तुम्ही भाजी म्हणून खाता!* *यापेक्षा जास्त अल्कधर्मी काहीही नाही!*

*म्हणून तुम्ही दररोज लौकिचा रस प्या!!* *किंवा कच्चा लौकी खा!!*

*वाग्भट जी सांगतात की लौकीमध्ये रक्तातील आम्लता कमी करण्याची कमाल शक्ती असते. म्हणून तुम्ही लौकीचा रस खावा!!*

*किती सेवन करावे?????????*

*दररोज २०० ते ३०० मिलीग्राम प्या!!*

*कधी प्यावे?*

*सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला जाऊन आल्यावर) पिऊ शकतो!!* *किंवा नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर पिऊ शकतो!!*
*तुम्ही या बाॕटल गाॕर्डचा रस अधिक अल्कधर्मी बनवू शकता!*
*त्यात तुळशीची ७ ते १० पाने टाका* *तुळशी खूप क्षारीय असते!!* *तुम्ही त्यात पुदिन्याची ७ ते १० पाने मिक्स करू शकता!* *पुदिना सुद्धा खूप अल्कधर्मी आहे!* *यामध्ये तुम्ही काळे मीठ टाकू शकता किंवा खडकात मीठ घालावे!*
*हे खूप अल्कधर्मी आहे!!*
*पण लक्षात ठेवा*
*फक्त काळे किंवा खडे मीठ घाला!* *इतर आयोडीनयुक्त मीठ कधीही घालू नका!!* *हे आयोडीनयुक्त मीठ आम्लयुक्त आहे!!!!*

*म्हणून मित्रांनो, तुम्ही हा दूधीचा रस जरूर सेवन करा!!!*

*२ते ३ महिन्यांच्या कालावधीत तुमच्या हृदयातील सर्व अडथळे दूर होतील!!*

*आपल्याला २१व्या दिवशीच खूप परिणाम दिसू लागतील!!!*

*तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही!!*

*आमच्या भारतातील आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी उपचार केले जातील!!*

*आणि तुमचे मौल्यवान शरीर आणि लाखो रुपये ऑपरेशनमधून वाचतील!!*

*संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!*
*--------------------------------*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*
*--------------------------------*
*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*
*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*
*--------------------------------*
*दवा ना खाना*
*सही समय पर सही खाना, खाना.....*
*मो*
*8208426494*
*वरील नंबर सर्वांनी सेव करावा*
ग्रुप जॉईन करण्यासाठी या नंबर *नमस्कार* असे पाठवा.
*आरोग्य विषयी माहितीसाठी संपर्क- 8799853299करा*
*-----------------------------------------*
*आपण पुढे आपल्या परिसरातील वनस्पती या विषयावर माहिती पाठवणार आहे.*
*----------------------------*
ग्रुप लिंक...
नैसर्गिक व घरगुती आरोग्य विषयावरील,
दैनंदिन *आरोग्य टिप्स*
तसेच उपचार
याविषयी विषयावरील अधिक माहितीसाठी...
वरील लिंक ओपन करून "व्हाट्सअपग्रुप" मध्ये सहभागी व्हा...

*टीप -* ही ग्रुप लिंक तुमचे मित्र, नातेवाईक आणि इतर ग्रुपवर जरूर शेअर करा...
*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

Pages