भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साप मरे !

With apt proverbial accuracy मुंग्यांच्या वारुळात साप घुसला Happy

आता हळदीकुंकवी मुंग्यांना सापाचा कडकडून चावा घेण्याशिवाय गत्यंतर नाही Proud

म्हणजे वोल्डमोर्ट हा आमच्या पुराणात सगळं काही असल्याच्या काळापासूनचा साप आहे. "यू नो हु" म्हणायचं असतं, शास्त्र असतं ते.

Lol
हे लोक एसाप (asap) कसे म्हणत असतील?
मला ही फाईल हवी आहे, ए जनावर!
आणि एखादी वस्तू सापडली तर
ए, मला किल्ली लांबडाली!

आमच्या इथे तर साप नावाचे गावच आहे सातारा जिल्ह्यात रहिमतपूर जवळ. साप चा राजवाडा फेमस आहे तिथे बऱ्याच पिक्चर चे शूटिंग झाले आहे.

साप लोकांमध्ये आता वर्षांनुवर्षे अनुभवाचं ज्ञान असेल 'हे बघा अमुक अमुक शब्द त्या माणसांच्या बोलण्यात आले तर ते आपल्या बद्दल बोलत असतात'. >>> Happy Happy सापांचे मशीन लर्निंग.

कारण ते python वापरत नाहीत >>> Lol करेक्ट. पण त्या लँग्वेजचे नाव पायथॉन आहे हा योगायोग आहे का? मला तर दाट शंका आहे वरची कॉमेन्ट वाचून.

एआय ने टेक ओव्हर करण्याआधी सर्पसृष्टीने आपल्याला टेक ओव्हर केले असून आपण मॅट्रिक्स सारखे त्यात राहात आहोत. ९०ज मधे अचानक इच्छाधारी नाग वाले पिक्चर येऊन गेले तेव्हाच आपल्याला कळायला हवे होते. त्यांचे फण्डिंग कोणी केले याचा माग काढायला हवा. यापुढे गारूडी पुंगी वाजवताना दिसला तर नक्की कोण कोणाला डोलवतोय हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.

हे लोक शास्त्रीय संगीतही शिकत नसतील का मग >> होना.. साप मरे, साप मरे, धनी मग मरे म्हणजे भीतीच की ही! >>> Happy ते मधले दोन स्वर केवळ साप शब्द गातानाही वापरावा लागू नये म्हणून आणले गेले असतील Happy

धाग्यात साप शिरून बराच धुमाळूळ सुरु आहे की Lol

>> साप धनी
>> लोक शास्त्रीय संगीतही शिकत नसतील का
>> पुंगीय संगीत

Lol धनश्री नावाच्या मुलीला सा प ध नी शिकवताना साप आला तर अवघडच होईल

>> जनावर, लांबडं

खरंय. थेट साप असे म्हणत नाहीत खेडेगावात काही लोक (जसं कि त्याला कळेलच). म्हणून कुजबुज करत जनावर, लांबडं वगैरे म्हणतात.

>> हे लोक एसाप (asap) कसे म्हणत असतील? मला ही फाईल हवी आहे, ए जनावर!

Proud हे आठवलं, ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे त्यांनाही कळत नाही हा कसला साप..
https://youtu.be/kil75xeaI3c?t=130

>> कारण ते python वापरत नाहीत
ते SAP सुद्धा वापरत नसतील

साप चा राजवाडा फेमस आहे तिथे बऱ्याच पिक्चर चे शूटिंग झाले आहे.>> अच्छा माहीती नव्हते याबद्दल.
ते SAP सुद्धा वापरत नसतील>> अरे हो की.

साप मरे, साप मरे, धनी मग मरे >> गनिम साप धरे. (त्याच्या) मनी गरे! (तीव्र) मध पुरे! साप, मध, नी पसारे! गप! (बसा) Proud

हे बहुतेक आधी एकदा येऊन गेलं आहे इथे. पण मला आज एका ग्रुपवर परत एकदा वाचून परत एकदा इथे टाकावंसं वाटलं. Happy
हे लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून हेअरपिनमध्ये घातलेलं एक तरी फूल रोज केसांत माळायला लावलं पाहिजे. सगळे फायदे स्त्रियांनाच का म्हणून?

*गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.*

स्त्री चेआरोग्य सांभाळतो गजरा.

गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...

गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.

'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या 'pituitary gland' च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रीयांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण "concentration", "moto development" करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.

पण कसंय... घर की मुर्गी....

भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यां प्रमाणे अरोमा थेरपी घेऊ पण भारतीय पद्धती प्रमाणे गजरा माळून घेतल्यावर "old fashioned" म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ?

*आरोग्यम धनसंपदा*

मी असे अजून 5-6 फॉरवर्ड बॉडी वॉश, डिओडरंट, सुगंधी लीपबाम चे लिहू शकते.
काय वात्रटपणा आहे Happy
गजरा घालून जर थंड वाटतं तर उन्हाळ्यात शॉर्टस घालून थंड का वाटू नये?

केवढा तो खटाटोप बायकांच्या पिट्युटरी ग्लॅन्डचे संतुलन साधण्यासाठी - कपाळाला आणि भांगेत कूंकू, केसात गजरा.
हे लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून हेअरपिनमध्ये घातलेलं एक तरी फूल रोज केसांत माळायला लावलं पाहिजे. सगळे फायदे स्त्रियांनाच का म्हणून?
>>>> चला आपण रिवर्स फेमिनिझम करुया. हा फायदा सगळ्यांना मिळवून देऊ या...

नाही, सेफ्टी पिनने किंवा अडचणीला स्टेपलरने.
आता बायकांनी सेफ्टी पिन आणि पुरुषांनी स्टेपलर गन का कायम बाळगायला पाहिजे हे समजलं? का फॉरवर्ड लिहू आणि मग समजणारे! Proud

हे लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून हेअरपिनमध्ये घातलेलं एक तरी फूल रोज केसांत माळायला लावलं पाहिजे. सगळे फायदे स्त्रियांनाच का म्हणून? >>> Lol

टकलाला फूल सेलो टेपने चिकटवायचं का ? >>> Lol

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे >>> मी आधी मनरेगात वाचलं. सरकारी स्कीम्स मधे फुलांचा काय संबध असे वाटले.

मनरेगा - महात्मा गांधी समथिंग सम्थिंग एम्प्लॉयमेण्ट सम्थिंग. जवाहरलाल नेहरू रोजगार योजना सारखे काहीतरी.

का फॉरवर्ड लिहू आणि मग समजणारे! >>> हे एकदम सैराटच्या आर्चीटाईप वाटतंय +१ Lol

मनरेगा - महात्मा गांधी समथिंग सम्थिंग एम्प्लॉयमेण्ट सम्थिंग. जवाहरलाल नेहरू रोजगार योजना सारखे काहीतरी.>>> व्वा, काय accuracy आहे या माहितीत. Wink Lol

हे लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून हेअरपिनमध्ये घातलेलं एक तरी फूल रोज केसांत माळायला लावलं पाहिजे. सगळे फायदे स्त्रियांनाच का म्हणून? >>> Lol

गजरा घालून जर थंड वाटतं तर उन्हाळ्यात शॉर्टस घालून थंड का वाटू नये? >>> लोकांना 'हॉट' वाटायचं पण Lol

हे त्या - जोडवी घातली की हॉर्मोन्स संतुलित रहातात, बांगड्यांनी रक्ताभिसरण होते, मंगळसूत्राने थायरॉईडचे विकार दूर होतात, टिकलीने/ कुंकवाने आज्ञाचक्रातून ऊर्जा मिळते वगैरे गटातलंच जरा सौम्य फॉरवर्ड आहे.

हे त्या - जोडवी घातली की हॉर्मोन्स संतुलित रहातात, बांगड्यांनी रक्ताभिसरण होते, मंगळसूत्राने थायरॉईडचे विकार दूर होतात, टिकलीने/ कुंकवाने आज्ञाचक्रातून ऊर्जा मिळते वगैरे गटातलंच जरा सौम्य फॉरवर्ड आहे. >>> अगदी अगदी Lol कानातली आणि बांगड्या घालुन पण काहीतरी होतं म्हणे. नुकतंच कधीतरी दंडात वाकी घालून कसलासा फायदा होतो असं पण वाचनात आलंय ( कपाळावर हात मारून घेणारी बाहुली ). मी इमॅजिन करतेय की देशी बायकामुली छान फॉर्मल्स घालून फुल्ल वाकी, मेखला इ.इ. घालून ऑफीसला जातायत असं Lol

Lol हे असं काही वाचलं की माझ्या लेकीने लहानपणी (मंगळसूत्राच्या वाट्या बघून) विचारलेला प्रश्न आठवतो. Why does मंगळसूत्र look like butt ? Lol

Pages