चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज सॅम बहाद्दुर बघितला. साना शेख अशक्त दिसतेय अजुन ऊठावदार होऊ शकली असती भुमिका. विकी मात्र जगलाय ती भूमिका. किंचीत पोक काढून ऊभारायची लकब पण तंतोतंत जुळली आहे. बांगलादेश निर्मिती च्या वेळेस कसे निर्णय घेतले ते जरा विस्ताराने दाखवायला हव होतं

@आर्चीजवरचे सगळे प्रतिसाद धमाल आहेत. Happy

असह्य आहे ते, मला नाचगाणी-घरं-सेट काहीच आवडलं नाही. एकदम गंभीर सीनमध्ये अचानक गाणं सुरू होतं तेही जम्पी गाणं, आता एक मिनिटात आनंदी गाणं आहेच म्हणून गंभीर प्रसंगातही कुणी फारसं खोलात जात नाही. कपडे चांगले आहेत पण कुणीच आकर्षक वाटत नाही.

फा, Lol ह्या 'लिंकाळ्यात' आनंद तरी आहे ते काही तरी वेगळंच होतं.

सॅम बहादूर वर छान लिहिले आहे माझेमन. Happy
फा, खरंच. (भारत एक खोजपासून) रोशन सेठ कोटाच्या खिशातल्या गुलाबाच्या फुलासहित डोळ्यासमोर येतो. छान पोस्ट.

आचीज ( इंग्रजी) बघायला माझी मुलगी, पुतण्या आणि त्यांच्या मैत्रिणी असा जवळपास थिएटर भरेल एव्हढा ग्रुप , सगळेच पिंक पिंक होऊन गेले होते. सावरिया च्या एकदम उलटं वातावरण होतं. मुलाच्या ते सारखं डोक्यात जात होतं. त्याच्या कडे बघून माझेच दिवस आठवलेले. या मुली काहीही करतात आणि त्यांना काहीच वाटत नाही Lol

तरी पिंक वरून मी जायच्या वेळी डिवचलं होतं. पण न शिकवताही अशा गैरसोयीच्या कमेण्ट्स कडे दुर्लक्ष केलं तिने, हे उपजतच असतं याची खात्री पटली. तो आर्चीज बघणे शक्यच नव्हते, हा तर नाहीच नाही.

थंड वाऱ्याची झुळूक असे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आर्चिज या चित्रपटाचे परीक्षण आलेले आहे Uhoh

Lol

असह्य आहे ते, मला नाचगाणी-घरं-सेट काहीच आवडलं नाही>> मला नाच गाणी आणि सेट तर फारच आवडले. कपडे पट पण उत्तम आहे आणि तो कॅरी पण छान केलाय. त्याबद्दल दीपांजली अधिक चांगले मत देऊ शकतील. गाणी अशीच येतात ना म्युझिकल मध्ये. त्या दोघींनी जरा बरा अभिनय केला असता तर फायनल प्रॉडक्ट बरे झाले असते.

दोघींच्या रागापायी डोळ्यापुढे अंधारी आली लंपन, कशाचं म्हणून कौतुक वाटलं नाही. Lol
बार्बी बाहुली सारखी हालचाल होती दोघींचीही, यांना जगाची मुळीच कल्पना नाही असं वाटलं. तिकडे 'बार्बी' सिनेमात भावली 'सजीव' होत गेली आणि ह्या प्लास्टिकच्या होत गेल्या. भाषा कशीही असो अभिनय आणि उच्चार तर स्पष्ट हवेत. यांना कुणी तरी संस्कृत सुभाषितं शिकवायला हवीत. खुशी आणि सुहाना यांना त्यांची भातुकली सगळ्या जगाला दाखवायची होती पण सिनेमाचा आव आणून, मग अगस्त्यला घेतले. पार्ट टू मधे भावलाभावलीचं लग्न लावतील. आपण अकरा रू चे लिफाफे घेऊन 'खोतंखोतं' जेवायला जाऊ लग्नाला Wink

Proud त्या दोघी हिरोईन मटेरियल नाहीत, पण हलली वेगवेगळे हिंदी चित्रपट येत असतात, त्यामुळे खपून जातील. प्रेम कैदी ची करिश्मा, प्रेमची तबू आठवा Happy त्या कशा होत्या, तशाच ह्या पण खपतील.

माझे मन छान परीक्षण.

फारएन्ड अगदी बरोबर नेहरू म्हटलं की रोशन सेठ आठवतो.

भारत एक खोज परत बघायला हवी.

लिन्काळ्या >>>
खुशी आणि सुहाना यांना त्यांची भातुकली >>> Lol

मटाच्या कार्यालयाबाहेर स्नो फॉल झाला असेल. >>> र.आ. Lol

पुलंच्या एका लेखातील नाटकात ("खुर्च्या - एक न नाट्य") भाषांतरित स्क्रिप्ट मुळे मूळ चेरिंग क्रॉस जवळ पडणारे बर्फ मुंबईत चिराबाजारात पडते, ते आठवले Happy

आर्चीज बघते आहे. ग्रेट नाहीये, पण मला टाकाऊ किंवा वैतागवाणाही वाटला नाही.

फिक्शनल टाइम/स्पेस वापरून स्टोरीटेलिंगचं हे अगदी हिंदीतसुद्धा पहिलंच उदाहरण नाही.
‘कमिंग ऑफ एज’ मुलांची गोष्ट आहे, तेव्हा ‘आपण आपल्याला ओळखणं’ - मग ते ओळखणं करिअरच्या संदर्भात, प्रेमाच्या बाबतीत, लैंगिक कलाबद्दल, सोशोपोलिटिकल इश्यूजबाबतच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने, समग्र ओळख - हीच थीम दिसली.

म्यूझिकल जॉनरा आहे, आणि जावेदने त्याचं काम चोख केलं आहे. ‘एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स!’ हे गाणं तर ‘आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही हो’ हे कमीअधिक अभिमानाने सांगणाऱ्या (माझ्यासारख्या) अनेकांसाठी कानउघाडणी आहे.
ते पार्क प्रकरण आरे कॉलनीकडे हिंट आहे असं कोणाला वाटलं का?
तसंच ‘सगळेच ॲन्ग्लो परत गेले तर…’ या डिस्कशनचा रोख ‘सगळे मुसलमान पाकिस्तानात का जात नाहीत?’ हा प्रश्न छुपा वा उघडपणे पडलेल्या सर्वांकडे आहे असंही?

सुहाना खानकडे कानाडोळा करणं शक्य झालं तर हे सगळं दिसेल. Proud
बाकी मुलं ठीकठाक आहेत - क्यूट ईव्हन! Happy

तसंच ‘सगळेच ॲन्ग्लो परत गेले तर…’ या डिस्कशनचा रोख ‘सगळे मुसलमान पाकिस्तानात का जात नाहीत?’ हा प्रश्न छुपा वा उघडपणे पडलेल्या सर्वांकडे आहे असंही?
<<<
इतका विचार करून बनवलेला सिनेमा वाटत नाही, केवळ सगळी कॅरॅक्टर्स कॉमिक बुक सारखी दिसायला हवीत आणि प्रत्येकाची नावं /गावाचे नाव तेच घेता यावे म्हणून बळेच केलेली अँग्लो इंडियन अ‍ॅडजस्टमेन्ट वाटली Happy
नेटफ्लिक्स प्रॉडक्शनची /आर्चीज कॉपीराइटची डिमांड असु शकेल !

पाहिला. फार वाईट नाही म्हणणार. टिपिकल हायस्कूल म्यूझिकल टाइप असतात तसा + स्वाती म्हणते तसा फिक्शनल टाइम, प्लेस, कार्टूनिश व्यक्तिरेखा असा प्रयोग चांगला होता खरा, पण खूप जास्त खेचला आहे. टू लाँग.
नाच, गाणी मला मजेदार वाटले. अगस्त्य चांगला दिसतो. खुशी चक्क मला प्लेजन्ट वाटली. सुहाना मात्र अगदी काहीतरीच दिसते आणि अ‍ॅक्टिंग पण मिडिऑकर एकदम.
ते आरे , पाकिस्तान वगैरे इतका वैचारिक नाही वाटला मात्र Happy

अगस्त्य चांगला दिसतो, वागतो.रेजी चं काम आणि जगहेड चं काम केलेला मुलगा काही सीन्स मध्ये लांबून सारखे वाटतात. म्हणजे डीलटन सोडून बाकी 3 मुख्य मुलं,आर्ची जगहेड आणि रेजी तिघांचे फीचर्स सारखे आहेत(उभट चेहरा, उंची फिगर सारखी).त्यामुळे लक्षात ठेवावं लागतं की कुरळे केस दिसले की आर्ची, टोपी दिसली की जगहेड असं.जगहेड बनलेला मुलगा मेड इन हेवन s2 मध्ये संतप्त बंडखोर टीनेजर होता,आता सौम्य खादाड जगहेड व्यक्तिरेखा बनला तरी डोळ्यात संताप आहे तसा आहे.

मला हा पिक्चर पिक्चर पेक्षा रेट्रो फोटो आल्बम वाटला.शिवाय जरा स्टोरीत घुसायला जावं तर गाणी येतात.गाणी जरा चांगल्या माणसांकडून बनवून घ्यायला हवी होती.एकही लक्षात राहत नाहीये.

कदाचित आर्ची कॉमिक्स वाचली नसती तर एक वेगळी कथा म्हणून आवडलाही असता.
आता हा पाहून झाल्यावर रिव्हरडेल सिरीज बरीच जास्त बरी वाटायला लागली Happy
मला सुहाना चे डान्स चक्क आवडले.खुशी खूप प्लास्टिक वाटली.

यांना कुणी तरी संस्कृत सुभाषितं शिकवायला हवीत
>>>> अगदी, अगदी. आदि शंकराचार्यविरचीत एखादं स्तोत्र तोंडपाठ होत नाही तोवर ऑडिशन पण घेऊ नका. लूक्स, कपडेपट नी मार्केटिंगवर जेवढी मेहनत करतात त्याच्या १/१० मेहनत आपण ज्या भाषेत करीअर करण्याची आशा करतो त्यावर नको घ्यायला? निदान त्याच भाषेत काम करून करोडपती झालेल्या त्यांच्या पालकांना तसं वाटत नाही का?

आर्चीज बद्दल मुम्बईत रील्स करणारे म्हणत आहेत इट इज जस्ट सो बो किड्स ट्राइन्ग टु सेव्ह शिवाजी पार्क. ह्या मानसिकतेतुन बघितला तर आ व डेल कदाचित. अजून वेळ न्हाई झाला पूर्ण बघायला सुरुवात बघितली ते ओपनिन्ग ग्राफिक्स छान आहेत. कलरस्कीम मस्त वाटली. अगस्त्या चांग्ला दिसतो, तरुण उंचापुरा नवा नायक मिळाला आहे. टायगर श्रॉफ नंतर हीच नवी एंट्री आहे बहु तेक. ते जिओग्राफि कल लोकेशन काही पण असेल पण ते सोबोच आहे.

आज सकाळी प्राइम व्हिडीओ वर पास्ट लाइव्ज नावाचा सुरेख कोरिअन/ अमेरिकन सिनेमा बघितला. नायक नायि का बचपन का प्यार , हिरोइन चे वडील अमेरिकेस येतात कोरिआ सोडून. मित्र तिच्यासा ठी दिवा लावुन धरून असतो. देवदास टाइप. ते मोठे होतात. १२ वर्शांनी ऑनलाइन भेटतात थोडे चॅटिन्ग होते पण भेटु शकत नाहेत म्हणून टेंपरवरी ब्रेक अप होतो. २४ वर्शांनी ते प्रत्य क्ष भेटतात न्युयॉर्क मध्ये. मध्यंतरी तिने लग्न केले आहे. मग तो ती भेटतात एकत्र वेळ घालवतात. तोपरेन्त नवर्‍या ची घालमेल चालू असते. कोरिअन हिरो पण तिच्या प्रेमातच आहे. पण तिचा चॉइस तिने क्लीअर केला आहे. तिचे मनही त्याच्यात अडकले आहेच. शेवटी परिस्थिती समजून तो परत जातो पण काय होउ शकले अस्ते हे दोघांच्याही मनात असतेच. संयत लेखन उत्तम अभिनय . थोडासा बिफोर सनराइज टाइप आहे. काही च मारामारी व व्हल्गारिटी अब्युज नाही जर तसे आव्डत असेल तर बघु नका. बट गुड मुव्ही.

हॉटस्टार वर जानकी जाने बघितला. ठीक आहे म्हणजे शेवटी अर्धा तास वेगवान आहे तो पर्यंत अति स्लो स्लो आहे. जो मूळ प्रश्न आहे तो सोडवायला शेवटी फक्त अर्धा तास दिलाय.

जानकीला मीडिया समोर यायचं टेन्शन समजून येतं पण इतका मोठा प्रश्न मीडिया समोर तिचा नवरा, आई, मैत्रिणी येऊन बोलू शकत होते, अति वेळ लावला आणि शेवटी मात्र भरभर गुंडाळले.

जानकीने superb अभिनय केलाय. तिला साथ देणारे सासू सासरे, नवऱ्याचा मित्र जास्त आवडले, आई आणि नवरा तर होतेच सोबत.

Archie चे जे पण सीन्स रील्समध्ये बघितले , त्या inst किंवा tiktok वर रील्स बनवणारी लहान मुलं जास्त चांगले expressions देतात असं वाटलं.
त्यातले dialogues पण या young brigade चा पहिलाच चित्रपट आहे , त्यांना जास्त जमणार नाही असे लिहीले आहेत. छोटी छोटी सोपी सोपी वाक्यं.

थंड वाऱ्याची झुळूक असे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आर्चिज या चित्रपटाचे परीक्षण आलेले आहे Uhoh:

पठाण, जवान, टायगर, Animal अशा विचित्रपटाच्या गर्दी मध्ये मला Archie's थंड वाऱ्याची झुळूक च वाटला Happy

आरे कॉलनी चा reference मलाही आठवला movie बघताना.
थेट पाकिस्तान नाही पण अँग्लो इंडीयन इथलेच हा मुद्दा पटला.

मी पहिल्या पोस्ट मध्ये हा एकदा baghanya लायक चित्रपट आहे असे लिहिले होते पण आज परत थोडा वेळ baghaycha प्लॅन करतेय!

Netflix वर Friday night plan बघितला. बाबील खान साठी पाहिला खरंतर, मला रेल्वे मेन पासुन खुप आवडायला लागला आहे. यातही आवडला. मूव्ही पण मस्त आहे हायस्कूल ड्रामा. दोघे भाऊ
आणि आई जुही चावला हे तीन च मुख्य कलाकार आहेत आणि तिघांची पण कामं natutal वाटली एकदम. त्या तिघांचं एकमेकांशी असलेलं नातं, एकेका प्रसंगातून उलगडत जाणारे त्यातले बारकावे सुंदर पणे दाखवलेत. बाबील अगदीच वडीलांसारखा दिसतो आणि तसाच नैसर्गिक अभिनय करतो. इरफान आता नसल्याची बोच जरा कमी झाली...

मस्तमे रेहनेका नावाचा एक सिनेमा पाहिला. अपना भिडू जॅकी आणि नीना गुप्ता दिसले ट्रेलरमध्ये म्हणून बघितला खरंतर. एकट्या राहणार्‍या वृद्ध लोकांच्या समस्यांभोवती सिनेमा फिरतो, मुंबईत सेटल होऊ इच्छिणार्‍या एका लेडीज टेलर कम चोराची स्टोरीसुद्धा समांतर धावते. मध्यंतरात सिनेमा अ आणि अ होतो. बघितला तरी ठिके नाही बघितला तरी ठिके Proud
हँगिंग गार्डन, म्हातारीचा बूट, हिंदू कॉलनी, फाईव्ह गार्डन पारसी कॉलनी वगैरे बघायला मजा आली..

हॅलो चार्ली हा अगेन अपना भिडू जॅकी आणि गोरीला यांचा सिनेमा पुन्हा पाहिला. काही ठिकाणी धमाल आहे. त्या आदर जैनचा आवाज आणि बोलण्याची स्टाईल सेम रणबीर कपूरसारखी रआहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सिनेमा कस्तूरी ( हिंदी) चा विशेष शो.
रविवार 17 डिसेंबर 2023, दुपारी 3.30 वाजता
मंगला थियेटर, शिवाजीनगर, पुणे - 5 इथे आयोजित करण्यात आला आहे.
तिकिट दर रूपये 150/
तिकिटासाठी संपर्क

GPay or Phone pay Number - 9762939473 (Junoon Films)
••••••••••••••••••••••••••••••••••
Send Payment screenshot to below no. For More Details : Amandeep Singh
+91 88305 07578
icafilmfestival@gmail.com

#स्पेशल_शो_आयोजक :
ICA फिल्म फेस्टिवल | अक्षर मानव
ND 9 स्टुडिओ | होप स्टुडिओ
CAMP Studio & Academy

ही पोस्ट व्हॉटस अॅप वर मिळाली. कुणी चित्रपट शाखेचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक इच्छुक असतील तर त्यांच्या साठी कॉपी पेस्ट केले आहे.
जाहिरात आहे असे वाटल्यास उडविले तरी चालेल. यातल्या कुठल्याही व्यक्ती / संस्थेशी संपर्क नाही.

The Handmaiden (Amazon prime)
पार्क चान वुक म्हणून साऊथ कोरियन दिग्दर्शकाचा सिनेमा पाहिला. Erotic-thriller.

ओकजू म्हणून एक तरुण कोरियन मुलगी एका श्रीमंत जॅपनीज माणसाकडे त्या माणसाच्या दिवंगत बायकोच्या बहिणीच्या मुलीची सोबती (handmaiden) म्हणून नोकरीला लागते. ती मुलगी (लेडी अगासी) आणि ओकजु जवळपास समवयस्क असतात. ओकजु अनाथआश्रमात वाढलेली असते, तर लेडी अगासी तिच्या काकाच्या (म्हणजे, तिच्या आईच्या बहिणीच्या नवऱ्याच्या) क्रूर छायेत. अगासीशी लग्न केल्याशिवाय काका खरोखर श्रीमंत होणार नसतो. तो उपभोग घेत असणारी संपत्ती अगासीचा ट्रस्टी म्हणून उपभोगत असतो. त्याला जुनी पुस्तके, चित्रं जमा करण्याचा छंद असतो. म्हाताऱ्याचे त्याच्या नातीच्या वयाच्या अगासीशी लग्न करण्याचे प्लॅन असतात. अगासीचा चित्रकला शिक्षक काऊंट तिच्यावर लाईन मारत असतो. हा काऊंट एकदम देखणा असतो आणि स्वताला पोरी पटवण्यात एक्स्पर्ट समजत असतो.
ओकजू आणि अगासी मध्ये चांगली मैत्री होते, पण मग समजते की ओकजू ही काऊंटची पार्टनर असते. काऊंट खरेतर काऊंट वैगरे काही नसतो, तर एक आर्ट चोर, फॉर्जरी करणारा असतो. ओकजु पण एका चोर, फोर्जरी करणाऱ्या सिंडिकेट मधून आली असते. ती अगासीशी जवळीक करून अगासीला काऊंटच्या प्रेमात पाडायचे म्हणून आली असते. एकदा अगासीशी लग्न केले की तिला वेडी ठरवून संपत्ती हडपायचा काऊंटचां प्लॅन असतो. मोबदला म्हणून ओकजूला अगासीचे सगळे कपडे, दागिने आणि वर पैसे मिळणार असतात. (इथे गंमत आहे. सुरुवातीला सीन आहे, ओकजू जपान्याच्या घरी चालली असते तेव्हा तिची अनाथाश्रमातील बहिण "तुझ्याऐवजी मी जायला हवे होते ग..." असे ओक्साबोक्शी रडत असते. तेव्हा ओकजूच्या वाटचे खडतर काम तीच्याऐवजी आपल्याला मिळावे असे ती म्हणते आहे असे वाटते. नंतर तोच सीन परत दाखवला आहे तेव्हा ती जळत असते म्हणून रडते हे समजते.)
पण स्वार्थी ओकजू आणि भाबडी अगासी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे अनेक ट्विस्ट आहेत. Erotica म्हणून उत्तम, आणि कथा सुद्धा एकदा बघण्यासारखी नक्की आहे.

एनिमल मधील रणबीर ची एंट्री एका जुन्या चित्रपटातील गाणे आहे… कोणाला माहीत होते? मला आज कळले.. ए आर रहमान चे गाणे आहे .. तीस वर्ष पूर्वीचे.. चिन्नी चिन्नी आशा असे गाणे आहे.. नक्की गुगल करा…

Pages