चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हिटलरच्या आयुष्यावर डाऊनफॉल नामक मुव्ही आली आहे. त्यातल्या लीड ऍक्टरचं व मुव्हीचं कौतुक होतंय. कुणी पाहिली का?

बहुचर्चित Action Hero पाहिला.
कथेचा जीव इवलासा आहे पण मला आवडला .
मस्त engaging वाटला.

डाऊनफोल बराच जुना आहे, त्यावर कित्येक मिम्स पण येऊन गेलेत
सगळ्यात खतरनाक तो पाकिस्तानी सिंगर चा होता
Your eyes वाला Happy

नेफ्लि वर धक धक पहिला
अत्यंत घिसीपीटी चावून चोथा झालेली कथा, बायकांचे प्रॉब्लेम मग सहलीवर जाणे, मग प्रत्येकीला जीवनाचा अर्थ गवसणे वगैरे
दारू पिणे, गैरसमज, भांडणे, दिलजमाई, शेवटी एकत्र येणे वगैरे सगळं अगदी टिकमार्क केल्यासारखं तंतोतंत
फातिमा शेख आणि एक दुसरी मुलगी बऱ्यापैकी वाईट अभिनय करतात
फक्त रत्ना पाठक आणि दिया मिर्झा ने तोलून धरलाय, त्या दोघी मस्त वावरल्या आहेत

मुळात इतकी मोठी ट्रिप आणि उद्यापासून निघायचं अस प्लॅनिंग करून निघतात हे बघून डोळ्यात पाणीच आलं, आमच्या ट्रिप च्या प्लॅनिंग मिटिंग, चर्चा, घनघोर वाद वगैरे आठवून आपण फारच यात वेळ घालवला का असं फिलिंग्ज आलं Happy

सिनेफोटोग्राफी मात्र आवडली आणि बकेत लिस्ट मध्ये ही ट्रिप राहिलीय ही जाणीव कुरतडून गेली
त्यामुळे शेवटपर्यंत नेटाने पहिला
अगदीच काही नसेल तर एकदा बघायला ठिके

बायकांचे प्रॉब्लेम मग सहलीवर जाणे,>> झिम्मा टेंप्लेट असावी. गांजलेल्या बायका हौसेने बघतात.

मी पाहिला, पण मस्त कथाबीज आणि पंकज त्रिपाठी असूनही मला कंटाळवाणा वाटला. ही कथा कितीतरी चांगली फुलवता आली असती असं वाटत राहिलं.
त्याची ती क्रश आणि मुलगी दोघींचेही शब्दोच्चार अस्पष्ट आणि सदोष होते, त्यानेही रसभंग होत होता.>>>>>अगदी
मी तर नंतर सबटायटल्स वाचत वाचत बघितला

सजनी शिंदेका व्हायरल व्हिडिओ" बघितला. (Netflix वर)
छान आहे.. >> अगदी हेच लिहायला आले होते. मस्त आहे मूव्ही. चांगली कथा आणि उत्तम अभिनय...

झिम्मा टेंप्लेट असावी. >>>> अगदी अगदी. पण झिम्मापेक्षा बरी जमलिये. बाकी बायका बायका ट्रिपला निघाल्या तर त्यांना प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम्सच येतात असं का वाटतं यांना?

धक धक पहावलाच नाही.

आर्चीज मध्ये सुहानीने खूप एनर्जेटिक काम केलय. आवडली मला.

खो गए हम कहाँ (Netflix)
इमाद (स्टँडअप कमेडियन), अहाना (कॉर्पोरेट कन्सलटंट) आणि नील (जिम ट्रेनर) ह्या 3 बेस्टफ्रेंड्सची गोष्ट.
सोशल मीडिया addiction आणि त्यातून होणारे प्रॉब्लेम्स, आजकालचे ऑनलाईन डेटिंग पॅटर्न्स, कमीटमेंट फोबिया ह्यावर फोकस आहे.
फ्रेश आणि खूप खूप रिलेटेबल वाटला. त्या तिघांची घट्ट मैत्री बघून मस्त वाटतं.
Recently जितके movies बघितले, त्यात खो गए हम कहाँ आणि 12th फेल हे पर्सनल favourites!

आज नेफि वर "खो गये हम कहाँ" बघितला.
सुरुवातीला ' खरच अशी जनरेशन झाली आहे का? मनात असंही म्हटलं की असा माहौल इथे आहे तर बरय लेक इथे नाही. जवळ जवळ 2/3 पर्यंत मी साशंक होते की नक्की कुठे चाललाय चित्रपट...'
पण मग शेवटच्या 10-15 मिनिटांत ट्रॅक एकदम क्लिअर झाला. सगळं धुकं, धुसरपणा, वरवरची चकाचौंध वितळली. अन चित्रपट आवडला. जरूर एकदा बघण्यासारखा.

खो गए आवडला. इन्स्टा किंवा सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर्स वगैरे एकदम पटलंच. खरंच अशीच आहे हल्लीची जनरेशन. अनन्या पांडेला सगळे डंब वगैरे म्हणताना ऐकलं आहे पण मला तशी वाटली नाही. तिघेही मस्त दाखवले आहेत.

खो गये... मी पण पाहिला. चांगला आहे, वन टाइम वॉच. सगळ्यांची कामं आवडली. अनन्या पांडे पण एकदम लाइकेबल आहे यात.
मात्र थोडा चीजी वाटला मला. कॅरेक्टर्स लक्षात आली की त्यांचा आर्क कसा जाणार हे प्रेडिक्टेबल झालं.
कुणाला ४ मोर शॉट्स ची आठवण आली का बघताना? त्यात पण बानी जे चे कॅरेक्टर अगदी नील सारखे आहे. तसेच एक कॉमेडियन, श्रीमंत मैत्रिणीने बानीला जिम बिझिनेस मधे फायनान्स करणे, नंतर त्यांच्यातच भांडण, सगळ्या फ्रेन्ड्स ना एकाच सुमाराला आयुष्यात रॉक बॉटम म्हणतात ती फेज येणे आणि बाउन्सिंग बॅक. बर्‍याच सिमिलॅरिटीज वाटल्या प्लॉट मध्ये.

खो गए हम कहां
आवडलेल्या रिलेटेबल गोष्टी:
वर्क रिलेटेड सोशल मिडिया प्रेशरने अ‍ॅफेक्ट होणे, डेली लाइफ काँप्लिकेट करणे , सतत कंपॅरिझन्स, सेलिब्रिटी क्लायन्ट्स /सेलिब्रिटी शाउटाआउट्स मिळवण्याचे ऑब्सेशन, मैत्रीचे बाँड्स हे सगळं छान दाखवलय .
इन द एन्ड न्यु इयर्स रिझोल्युशन्स पण किती मस्तं ( त्यात एक अ‍ॅड करावसं वाटल मला नील साठी , हेल्थ कोच पर्स्॑नल ट्रेनर असून रोज ड्रिंक्स आणि स्मोकिंग करतो, ते कमी कर लेका !)
सगळ्यांनी मस्तं इझी एफर्टलेस काम केलय , अनन्या खूप प्लेझन्ट !
काय खटकले :
बिझनेस सुरु करणे वॉज सो इझ्झी.. मार्केटिंग मॅनेजर, फंडिंग करणारे नेमके बेस्ट फ्रेन्ड्स.. नील हा पर्सनल ट्रेनर असून रोज रात्री मित्रां बरोबर स्मोकिंग आणि दारु , बाकी दोघांचे समजु शकतो (एक वेळ )ते एका घरी रहातात आणि हेल्थ कॉन्शस वगैरे नाहीयेत.
सेलिब्रिटी इन्स्टा अकाउन्ट्/कुठलेही प्रोटेक्टेफ इन्स्टाग्रॅम अकाउन्ट हॅक करणे इतके सोपे नसते, पासवर्ड जरी ओळखला तरी प्रत्येक वेळा न्॑वीन डिव्हाइस वर लॉगिन केल्यावर टेक्स्ट येतो.
३ बेस्ट फ्रेन्ड्स लगेच हिन्दु मुस्लिम ख्रिश्चन Wink
तरी ओव्हरॉल वन टाइल वॉच, फ्रेश फेसेस , श्रीमंती असली तरी रिलेटेबल ठेवलाय !

Three of us पाहिला...सुंदर मूव्ही...कोकणातलं चित्रीकरण फार सुरेख आहे...जयदीप अहलावत कुठल्याही भूमिकेचे सोन करतो यात वादच नाही...शेफाली छाया नेहमीप्रमाणे उत्तम...स्वानंद किरकिरे छान...

मी पण पाहिला , संदीप नाही स्वानन्द किरकिरे आणि जयदीप अहलावत Happy
स्लो आणि प्रेडिक्टेबल आहे पण छान घेतलाय , कोकण हे कथेमधलं एक पात्रं आहे, फारच सुंदर चित्रीकरण !

‘खो गये…’बद्दल अनुमोदन - मला आवडला.
शिकलेली, करिअरचा सीरियसली विचार करणारी, आईवडीलांशी नॉर्मल नातं असणारी, धडपडणारी होतकरू तरुण मुलं हिंदी सिनेमात पाहूनच आधी गदगदून आलं मला. झोया आणि रीमा झिंदाबाद!

Three of us... अतिशय आवडला. संथ, soothing सुंदर, कोकणचं चित्रीकरण तर अफलातून. आणि शेफाली...काय म्हणू तिला. काय अभिनय करते यार ती. उगीच नाही अभिनयाच्या शहेनशाह अमिताभ ने तिचे या फिल्म बद्दल कौतुक केलंय. डोळे अफाट बोलतात तिचे. जयदीप आणि स्वानंद पण उत्तम...

12 वी फेल पाहिला
कसला भारी पिक्चर आहे.. कदाचित मी या वर्षी पाहिलेला सर्वोत्तम.

त्या हृतिकच्या सुपर 30 ची आठवण येत होती
याची चेहरेपट्टी सुद्धा साधारण तशीच आहे.
पण त्यात तो हृतिक गरीब पिचलेला वाटत नव्हता. हा अस्सल वाटत होता. आता यात याचा अभिनय अस्सल म्हणून की हृतिक राजबिंडा आहे हा हृतिकचा दोष यात पडायचे नाहीये..

आईवडीलांशी नॉर्मल नातं असणारी, धडपडणारी होतकरू तरुण मुलं हिंदी सिनेमात पाहूनच आधी गदगदून आलं मला. झोया आणि रीमा झिंदाबाद! >>> सही. बघायचा आहेच पिक्चर.

दिल धडकने दो मधे (प्रियांका - रणवीर) बहीण भावाची केमिस्ट्री सुद्धा अशीच आवडली होती. कोणतेही बॉलीवूड क्लिशे न वापरता दाखवलेली. आणि सहसा बॉलीवूड बहिणी हीरो असलेल्या भावाच्या पर्स्पेक्टिव्हने फक्त दाखवतात. यात दोन्ही स्वतंत्र लीड कॅरेक्टर्स म्हणून आपल्याला दिसतात.

दोन लाँग वीकेंड मध्ये बराच ओटीटी बॅकलॉग भरून काढला.
'12 फेल' खूप आवडला. विक्रांत मेस्सी नेहमीच आवडला आहे. इथेही त्याने अपेक्षेप्रमाणे मस्त काम केलंय.

'धक धक ' मध्ये रत्ना पाठक आणि काही प्रमाणात दिया मिर्झा लक्षात राहते. बऱ्याच गोष्टी पटत नाहीत. मुख्य म्हणजे ह्या बायका बाईक घेऊन दिल्ली ते लडाख प्रवास पुण्याहून लोणावळ्याला जाणार असल्यासारख्या सहजतेने करतात, हेच मला झेपलं नाही.

' सजनी शिंदे....' मध्ये पण सुबोध भावे,चिन्मय मांडलेकर, निम्रत कौर नेहमीप्रमाणे उत्तम! सजनी शिंदे चं काम करणारी मुलगी अगदीच पिचकवणी वाटली. तिचे संवाद पण नीट कळत नाहीत. मैने प्यार किया वाल्या भाग्यश्री बाई पण ह्यात आहेत.

लिव्हिंग वर्ल्ड बिहाईंड' कंटाळवाणा झाला. मूळात ओपन एन्डेड सिनेमा आहे हे वाचले आणि बघण्याचा मूड गेला.

Anatomy of a fall नावाचा फ्रेंच सिनेमा पाहिला. आवडला.

इथे वाचून फ्रायडे नाइट प्लॅन बघायला सुरुवात केली. (नेटफ्लिक्स)
बाबील खान खूप आवडला, पण सिनेमा बोअर झाला. अर्ध्यातच सोडून दिला.

थ्री ऑफ अस छान आहे सिनेमा. को कणाचे चित्रण एकदम लोभस. अभिनय मस्त. मला वेगळीच शंका येत होती पण तसे काही नाही हे कळ्ल्यावर बरे वाटले. और भी गम है जमानेमें फील्स. पहिल्या सीन मध्ये सुहिता थत्तेच्या अंगावर जी साडी आहे ती सेम माझ्याकडे आहे. शोधुन नेसते एक दिवस.

स्पॉयलर अलर्ट. : विहिरीला कठडा आहे ना मग बहीण कशी पडली असावी? का हिनेच ढकलली व आता आठवत नाही आहे?
ती समुद्रावरील खोपटातली बाई म्ह णजे एकदम नारायण धारपांची माटीमायच वाट ली. स्पूकी क्षण. एवढ्या गावात एक ही भटके कुत्रे नाही असा माझा एक आक्षेप होता पण जणू तोच दुर करायला शेवटाला एक गोंडस भटके पळत जाताना दाखव्ले आहे. असे दिवा धरुन बसलेले जुने बीएफ एफ किंवा बीएफ प्रत्यक्षात कुठे भेटतात असा विचार करुन अंमळ वैताग आला पण चलो पिक्चर है. लेट देम हॅव फन. हा एकदम
बीटा मॅन दिसतो. कविता करतो भरतकाम करतो. सो क्वीट. असते एखादीच्या नशीबात.

Pages