Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ट्रेलरही न बघता फक्त लूक्स
ट्रेलरही न बघता फक्त लूक्स बघून मला शंका आलीच होती. आता प्राईम वर आला तर (पिसं काढण्यापुरता) पाहू.
बाकी आकाचे पिक्चरही नेटाने बघून पिसं काढणार्यांनी पण बंद केला म्हणजे कित्ती टूकार असेल!
@अस्मिता >>> बाकी तुमचा डॉगीही चांगला समीक्षक बनण्याच्या मार्गावर आहे.
अॅनिमल एवढा तुफान का चालत
अॅनिमल एवढा तुफान का चालत असावा? (तसा जवान पण चालला म्हणा
). सोशल मिडीयावर अॅनिमलला लोक शिव्या घालतायत. (माबोवर पण) तरीपण काही Multiplex 24x7 शोज ठेवायच्या गोष्टी करतायत. सॅम बहादुरला लोक खुप appreciate करतायत पण तो जास्त चालत नाही आहे. अॅनिमल बरोबर रिलिज करुन चुक केली.
ट्विटरवर कुणीतरी सुहाना आणि
ट्विटरवर कुणीतरी सुहाना आणि बहुतेक अगस्त्य नंदाचा एक हॉटेलमधला सीन टाकला आहे. ते इंग्लिशमधून हिंदी का बोलतात? सरळ इंग्लिशचा बोला ना!! लाडीकपणे बोलणे हा आजकालच्या टिनेजर्सचा नॉर्म आहे, पण सगळ्यांनाच नाही शोभत ते.
सुहाना, तुझ्या गालावरची खळी खूप छान आहे. पण वाक्यावाक्याला ती दिसलीच पाहिजे हा अट्टाहास कशाला?
आर्चीज म्हणजे अगदीच कै च्या
आर्चीज म्हणजे अगदीच कै च्या कै , हस्यास्पद !

ना धड लहान मुलांचा ना धड मोठ्यांचा.. सिनेमातली माणसं ना धड खरी ना धड अॅनिमेटेड, केवळ ओरिजिनल आर्चीज मधली नावं वापरता यावीत म्हणून अँग्लोइंडियन , तसे दिसावेत म्हणून एक से एक फनी विग्ज आणि तरीही कोणी लिड कॅरॅक्टर्स अँग्लो इंडियन दिसत नाहित
सुहाना शारुखची कॉपी करते , तिचा बाप झालेला अॅक्टर सुद्धा बरेचदा श॑रुखची कॉपी कर्॑तो , व्हेरॉनिका म्हणून सुहाना अज्जिबात शोभत नाही, स्पॉइल्ट रिच गर्ल वगैरे पर्सनॅलिटी नाहीये तिची, एकदम सामान्य, नेक्स्ट डो॑र मध्य्॑म वर्गीय मुलगी वाटते ती !
अगस्त्य नकळतपणे अभिषेकची कॉपी करतो पण अभिषेक इतका लोध्या दिसत नाही, क्युट आहे तसा , खुषी ही एक बोटॉक्स ने कापून कापून धारेदार कार्व्ह केलेली कठपुत्॑ली किंवा रोबो दिसते.
त्यातला रेजी झालेला वेदांग रैना उठून दिसतो नेपो गर्दीत !
जगहेड झलेला मेड इन हेवन मधला मिहिर आहुजा इथे खास नाही वाटत . इथेल मग्ज खालेली ‘आदिती डॉट’ दोन नेपो गर्ल्स पेक्षा जास्तं अँग्लो इन्डियन आणि फ्रेश दिसते .
बघाच आणि हसा
अॅनिमल एवढा तुफान का चालत
अॅनिमल एवढा तुफान का चालत असावा? (तसा जवान पण चालला म्हणा Happy ). सोशल मिडीयावर अॅनिमलला लोक शिव्या घालतायत. (माबोवर पण) तरीपण.........
Submitted by mandard on 8 December, 2023 - 10:23
>>>>>>>>
याचे उत्तर नेहा धुपियाने कैक वर्षांपूर्वी दिले आहे
केवळ ओरिजिनल आर्चीज मधली नावं
केवळ ओरिजिनल आर्चीज मधली नावं वापरता यावीत म्हणून अँग्लोइंडियन >>>
केवळ नावांसाठी त्यांना अँग्लो इंडियन करण्याची काय गरज आहे? ख्रिश्चन मुले नसतात का या नावांची? जुन्या चित्रपटात टीना मुनीम, अमोल पालेकर वगैरे ऑथेंटिक ख्रिश्चन नाही का वाटत? बळेच केलं आहे अँग्लो इंडियन तर विग कशाला पाहिजेत? जुन्या ज्युली पिक्चरमध्ये कोणी विग घातले होते? अगदी साऊथ इंडियन फीचर्स असलेली लक्ष्मी आणि खुद्द खुशीची आई नव्हती का अँग्लो इंडियन वाटत?
खरं आहे
खरं आहे
नॉर्मल गेटप ठेवून गोवा किंवा पोंडीचेरी पार्श्वभूमी पण चालली असती
बांद्र्या, सांताक्रूझच्या
बांद्रा-सांताक्रूझच्या गल्ल्या, ऑर्लेम गेला बाजार आय सी कॉलनी पण जास्त ऑथेंटिक वाटली असती.
अजुन एक रिव्ह्यु मधे म्हंटलं
अजुन एक रिव्ह्यु मधे म्हंटलं होतं कि ज्या स्टारकिड्ज ना इंट्रोड्युस करायचय त्यांचं हिन्दी भयानक असल्यामुळे त्यांना ‘अँग्लो इन्डियन‘ करून टाकले !
मी trailer बघून , movie
मी trailer बघून , movie बघायचा विचार केला होता .
आता विचार बदलतेच मग
आर्चिज मूवी जेन झी साठी बनवला
आर्चिज मूवी जेन झी साठी बनवला आहे वाटते. फक्त नेटफ्लिक्स वर रिलीझ केला म्हणजे टिपिकल प्रेक्षकांची अपेक्षा नसेलच. मी सध्या तरी तुकड्या-तुकड्यात पाहत आहे. एका झटक्यात पाहण्यासारखा तर नाहीच आहे. झोया आणि रीमाकडून खूप अपेक्षा असतात. इथे निराशा झाली.
सुहानाला पूर्वी एका युटूबवरच्या शॉर्ट फिल्म मध्ये पहिले होते तेव्हा बरीच इम्प्रेसिव्ह वाटली होती. इथे अजून तरी तिला खूप हसू येतेय आणि तिने दाबून धरले आहे अशी वाटली. खूप tiny वाटते. पण अगदी write ऑफ नाही करणार.
आलियाला पहिल्यांदा पहिले होते तेव्हा होपलेस वाटलेली. त्यानंतर आतापर्यंत तिच्या ऍक्टिंग, रूप बद्दलच्या मतात खूपच फरक पडला आहे. मग सुहानालाही चान्स देणारच. प्रॉपर रोल मिळाला तर कदाचित बरी वाटेल. अगस्त्य सध्या तरी आवडलाय. ख़ुशी नॉट इम्प्रेसिव्ह.
अगस्त्यचे प्रमोशनचे फोटो
अगस्त्यचे प्रमोशनचे फोटो पाहिले, कुरळ्या सोनेरी केसांपेक्षा इंडियन लुकमध्ये handsome दिसतोय. आता सुहाना, खुशीसाठी गाव की गोरी टाइप पिक्चर काढतील, झालं अॅक्टींग करियर सेट.
दुसरीकडे पब्लिक प्रतिक्रिया
दुसरीकडे पब्लिक प्रतिक्रिया पाहिल्यात ज्यात पिक्चर आवडलेले सुद्धा आहेत.
मी नाही बघणार कारण मला माझ्या टाईपचा वाटला नाही. पण ज्याना आपल्या टाईपचा वाटला त्यांनी बघायला हरकत नाही. आवडू सुद्धा शकतो.
सुहाना खान चे कौतुक जास्त कानावर येत आहे. कौतुक म्हणजे promising आहे असे.. त्यामुळे हा मी नाही पाहिला तरी येत्या काळात तिच्यावर नजर राहील..
नाचात चांगली वाटली.स्टेप्स
नाचात चांगली वाटली.स्टेप्स मोकळ्या आणि चांगल्या केल्या आहेत.
मूळ पिक्चरकथेच्या आडातच पाणी नाही तिथे स्टार किड्स च्या लुक्स आणि अभिनयाच्या पोहऱ्यात काय येणार?
नेटफ्लिक्सवर धक धक नावाचा
नेटफ्लिक्सवर धक धक नावाचा मुव्ही आलाय. रत्ना पाठक, दिया मिर्झा, फातिमा साना शेख, संजना सांघी.
स्टारकास्ट तरी चांगली वाटतेय. कोणी बघितला तर सांगा कसा आहे. मोटरसायकलवरुन रोड ट्रिप करायला चाललेल्या बायकांची स्टोरी आहे बहुतेक.
प्राईमवर A Good Person बघितला.
एका नॉर्मल हसत्या खेळत्या अॅलिसनचं तिच्या एका चुकीमुळे घडलेल्या कार अॅक्सिडेंटने आयुष्य कसं बदलून जातं आणि ती परत कशी पूर्वपदाला येते याची ही स्टोरी.
काही वेळा बघताना फार निराश, उदास वाटू शकेल कारण ती इतकी स्वतःला त्या अॅक्सिडेंटबद्दल अपराधी समजत असते ज्यात तिच्या होणार्या नवर्याची सख्खी बहिण आणि मेहुणा मरतात. प्रचंड निराशेत सापडलेली ती स्वतःला पेनकिलर्स, आणि दारुच्या आहारी जाऊन विसरायला बघते. जिथून मिळेल तिथून उधारीने दारू पिणे, पेनकिलर्स मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणे असे उद्योग करते. तिची आई तिला सतत सपोर्ट ग्रुप्/थेरपीला जायला सांगत असते. सरतेशेवटी ती आईचं ऐकते, तिथे जाते त्या थेरपी ग्रुप मधे तिच्या फियान्सचे वडील पण येत असतात. तेही मुलगी जावयाच्या अचानक जाण्याने स्वतःचं दु:ख बाजूला ठेवून टिनेज नातीचे मूड सांभाळत, मुलाशी सुसंवाद नसल्याने, स्वत:ला व्यसनापासून दुर ठेवणे या अनेक कारणांनी तिथे येत असतात.
दोघांच्या दु:खाचे दुवे समान असल्याने म्हणा किंवा एक दुखावलेला दुसर्या दुखावलेल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो या कारणाने ते एकमेकांना समजून घेतात. आधी तिला या परिस्थितीसाठी दोषी मानणारे सासरे तिच्यावर विश्वास ठेवून नातीची जबाबदारी सोपवतात.
काही काही प्रसंगात फार वाईट वाटतं तिचं जेव्हा ती रिहॅबमधे भेटायला आलेल्या तिच्या फियान्सला दाखवते बघ मी कशी दिसते तिच्या चित्रविचित्र कापलेल्या केसांवर २ लहान मुलींसारख्या क्लिप्स लावलेल्या असतात, म्हणते मी चोरल्या या पण आत्ता नाही जेव्हा मी विचित्र वागते होते.. आता मी तुझी माफी मागते की मी तुला सोडून गेले माझी चूक लपवण्यासाठी, मला खंत राहिलच जन्मभर पण माझं प्रेम तितकंच खरंय अजूनही! मला माझं अपराधीपण, दु:ख याला नीट कधी तोंड देताच आलं नाही. फार सुंदर प्रसंग वाटला मला तो.. एकदम टची!
अॅलिसनचं काम केलेली अॅकट्रेस Florence Pugh आणि तिच्या सासर्यांचं काम केलेले मोर्गन फ्रीमन दोघांचही उत्कृष्ट काम झालंय.
आलियाचा पहिला पिक्चर मी नाही
आलियाचा पहिला पिक्चर मी नाही पाहिला पण दुसरा बहुतेक ‘हायवे’ होता रणदीप हुडाबरोबरचा. ते पाहून वाटलं होतं की ही लंबी रेस की घोडी आहे.
बाकी हा पिक्चर लिमिटेड टार्गेट ऑडियन्ससाठी असावा.
मी लंच टाईम मध्ये थोडा वेळ
मी लंच टाईम मध्ये थोडा वेळ पाहिला Archie's तेव्हा मलाही काहीच्या काही वाटलेला. पण रात्री म्हटल बघुया थोडा अजून आणि मला actually आवडला. One time teen movie watch.
अगस्त्य आणि खुशी आवडले. अगस्त्य charming वाटला आणि खुशीने ठीक केले आहे काम. त्या getup मध्ये जरा विचित्र वाटते पण ती कधी कधी. Suhana sassy girl चांगली वाटली. बाकीची कास्ट मध्ये, मुलगे बरे वाटले. Accent baddal, Gen z actually असेच बोलतात bruh
अशा teen movies genre हिंदी मध्ये कधी नव्हते पाहिले. म्हणजे असतिल तर वयाने मोठ्या actors घेऊन काढलेत. Maybe Bobby असेल exception.
इंग्रजी मध्ये अशा कितीतरी teen movies cult झालेल्या आहेत आणि repeat values पण आहे त्यांना - clueless, fast life at ridgemont high, endless love, even टॉम क्रुज चा risky business.
या. मुलांना baghun देखील refreshing वाटलेच. टोटल हाय स्कूल teen movie आपल्याकडे कशा काढतील कोणास ठाऊक. Like i said, one time watch on ott.
पिसे काढली तू अस्मिता की नक्की वाचेन पण
नेटफ्लिक्सवर धक धक नावाचा
नेटफ्लिक्सवर धक धक नावाचा मुव्ही आलाय. रत्ना पाठक, दिया मिर्झा, फातिमा साना शेख, संजना सांघी.
स्टारकास्ट तरी चांगली वाटतेय. कोणी बघितला तर सांगा कसा आहे. मोटरसायकलवरुन रोड ट्रिप करायला चाललेल्या बायकांची स्टोरी आहे बहुतेक. >> सरळधोपट आहे. जिथे अपेक्षा आहे तिथे पंचेस, क्लिशे सगळे आहेत पण एकंदर फील गूड टाईप सिनेमा आहे. लोकेशन्स फंडू आहेत.
सुहाना खुशीला बघून किंचाळली
सुहाना खुशीला बघून किंचाळली तर माझं कुत्रं अवाक होऊन टीव्हीकडे बघू लागलं >>>
पिक्चर पाहिलेला नाही पण एक वाइल्ड गेस. ती किंकाळी साधारण अशी आहे का? (यातल्या पुढच्या किंकाळ्याही बघण्यासारख्या आहेत)
https://www.youtube.com/watch?v=agtJ6M0cj4M&t=13s
Archies, अगस्त्य नंदाने
Archies, अगस्त्य नंदाने चांगलं केलं आहे काम, गाणी पण चांगली वाटली, एकदम situational. Tya दोघी मात्र येड्याचा बाजार आणि खुळ्याची चावडी. त्यातही सुहानाच्या डोळ्यात एकदम वेडेपणाची झाक दिसते. खुशी कपूर ने बहुदा बरीच चेहेर्याची मलमपट्टी करून घेतली आहे. दुसऱ्या दिग्दर्शकाकडे कसे काम करतील ते पहायला हवे.. ह्यात झोया अख्तर चे पण अपयश म्हणावे लागेल.
गाणी फ्रेश आहेत, हॉलिवुड
गाणी फ्रेश आहेत, हॉलिवुड म्युझिकल सारखी ट्रिटमेन्ट आहे पण कन्सेप्ट पूर्ण कन्व्हे झाली नाही !
फरहान अख्तरनेही प्लेबॅक दिला आहे, थोडी रॉक ऑन च्या गाण्यांची आठवण झाली !
कडक सिंग साठी चांगले रेको
कडक सिंग साठी चांगले रेको आहेत.
मलातर दिग्दर्शिका कमी पडली
मलातर दिग्दर्शिका कमी पडली असेच वाटत आहे. कोणीच कलाकार एकदम टाकाऊ नाही वाटले, पहिला चित्रपट असून. सुहानाला ,'अशी बावळ्यागत हसू नकोस सारखी ' हे सांगण्याच काम दिग्दर्शिका बाईंचं ना.
सरळधोपट आहे. जिथे अपेक्षा आहे
सरळधोपट आहे. जिथे अपेक्षा आहे तिथे पंचेस, क्लिशे सगळे आहेत पण एकंदर फील गूड टाईप सिनेमा आहे. लोकेशन्स फंडू आहेत.>>>>> ओके थँक्यू आसामी
दिला आहे, थोडी रॉक ऑन च्या
दिला आहे, थोडी रॉक ऑन च्या गाण्यांची आठवण झाली !::
मलाही. गीत कोणी लिहिले आहेत तेव्हा जावेद अख्तर दिसले! या वयात इतके छान तरुण पिढीला अनुरूप शब्द त्यांनी लिहिलेत, kudos! गाणी मी repeat ऐकतेय. जुन्या Archie's band che sugar sugar गाणे ही चांगले cover केलेय.
अरे वा ! न कळवताच या धाग्यावर
अरे वा ! न कळवताच या धाग्यावर साफसफाई झालेली दिसली. सुखद धक्का !!
स्पॉयलर अलर्टसह……
स्पॉयलर अलर्टसह……
‘सॅम बहादूर’ पाहिला.
विकी कौशलने माणेकशांचा रोल उत्तम केला आहे, त्यांची बॉडी लॅंग्वेज, डोळ्यातली चमक आणि मिश्कील स्वभाव हे पाहता कधी कधी स्वतःलाच आठवण करून द्यावी लागते की हा विकी कौशल आहे. मोहम्मद झीशान अयुब हे या पिक्चरमधले सरप्राईज पॅकेज म्हणावे लागेल. तनू वेडस् मनू, रांझणामधल्या या गुणी ॲक्टरने कमाल केली आहे. सान्या मल्होत्रा डिसेंट आर्मी वाईफ म्हणून शोभते.
फातिमा सना शेखने मात्र एका सुवर्णसंधीची माती केली आहे. इंदिरा गांधींचे फीचर्स सुंदर असतील. पण ती त्यांची ओळख नव्हती. त्यांचा वावर कमांडिंग होता. कितीही ढगळ ब्लाऊज वापरले तरी फातिमा फक्त सुंदर, नाजूक चणीची आणि फिजीकली वीक दिसते. इंदिरा गांधींची तीक्ष्ण नजर दाखवण्याच्या प्रयत्नात तर ती वेडगळ वाटते. जिथे संशयी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तिथे ती हताश वाटते. आणि बांगलादेश निर्माणाच्या कार्यात माणेकशा व इंदिरा गांधी टीम/इक्वल पार्टनर न वाटता माणेकशांवर अवलंबून असलेली वाटते.
नुकत्याच आलेल्या ओपनहायमरशी तुलना केली तर ओपनहायमर नायकाची जडण घडण, ग्रोथ दाखवतो. तर सॅम बहादूर नायकाच्या आयुष्यातील घटनांची जंत्री वाटतो. त्यात व्हर्टीकल ग्रोथ जरूर असेल पण माणेकशांच्या मनोव्यापारावर फारसा भर दिलेला नाही. एक दोन प्रसंगात त्यांची दूरदृष्टी, प्राग्माटिक स्वभाव, सैनिकांशी असलेले नाते दिसते. पण ते तेवढ्यापुरतेच.
इतिहासातले काही बारकावे मात्र अलगद टिपले आहेत.
युद्धाचे प्रसंग मोजके आणि इफेक्टीव आहेत. बांग्लादेश वॉरचे रिअल फुटेजही वापरले आहे.
संगीताला फारसा वाव नाही आणि गाणी गुलजारची असली तरी लक्षात राहत नाहीत. अपवाद फक्त प्रत्येक पलटणीच्या वॉर क्रायचा केलेला सुंदर वापर.
चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. तसंही भारतात खर्या हिरोजच्या कथा फार कमी वेळा पडद्यावर येतात.
ubmitted by MazeMan on 9
ubmitted by MazeMan on 9 December, 2023 - 16:0 >> सुरेख लिहीलंत. शक्य असेल तर स्वतंत्र परीक्षण लिहा. छानंय हे.
सुरेख लिहीलंत. शक्य असेल तर
सुरेख लिहीलंत. शक्य असेल तर स्वतंत्र परीक्षण लिहा. छानंय हे. >>> +१ पिक्चर बघायचा आहेच.
इंदिरा गांधींच्या बाबतीत - सहसा आपली/पब्लिकची एखाद्या व्यक्तीची "लास्टिंग इमेज" ही त्यांच्या आयुष्याच्या/करीयरच्या शेवटी जशी असते तशी फिट्ट बसलेली असते. इंदिरा गांधीची पंप्र म्हणून पहिली ४-५ वर्षे खडतर होती. पण पुढे बांगला देश युद्ध, संस्थाने व बँका ई बाबतीत घेतलेले कठोर निर्णय अशा काही गोष्टींमुळे १९७१ पासून त्यांची इमेज बदलत गेली. जेव्हा वेळ आली तेव्हा त्या कणखर बनल्या. पिक्चरमधे अगदी तसा प्रवास दाखवणे वगैरे हा त्यांचा फोकस नसेल पण माणेकशांच्या नजरेत पहिली एक दोन दशके जशा त्या होत्या तशा दाखवल्या गेल्या असतील असा अंदाज आहे. त्यात मग फातिमाच्या व्यक्तिमत्त्त्वातील आणि सादरीकरणातील वेगळेपण वगैरे फरक आलेच.
तुलनेकरता रोशन सेठ हा नेहरू म्हणून चपखल वाटे. अजूनही नेहरू म्हंटले की तोच डोळ्यासमोर येतो
फा तुम्ही म्हणता तसं इंदिरा
फा तुम्ही म्हणता तसं इंदिरा गांधींचं चित्रीकरण असतं तरी पटलं असतं. पण इथे पहिल्या प्रसंगात (चीनच्या आक्रमणासंबंधी डिस्कशनमधे) त्या ठाम दाखवल्या आहेत. नंतर गडबड आहे. आणि हा फातिमाच्या सादरीकरणाचाच दोष आहे. कथेत वीक प्रतिमा नाही. इव्हन नेहरू त्यावेळी वीक पोझिशनमध्ये असतानाही रिअलिस्टीक वाटतात.
जरूर पहा व परीक्षणही लिहा.
Pages