Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्राउनचा ६ वा सिझन बघितला .
क्राउनचा ६ वा सिझन बघितला . कन्सपिरणसी थियारीजला थारा दिलेला नाही ते बर झाले. बऱ्यापैकी जमला आहे . चौथा सिझन रटाळ वाटलेला . ६ व्या सीझनचे अद्याप ४ च एपिसोड रिलीज झालेत . अजून येतील असे वाटते
रेल्वे मेन पाहिली. साबांचे
रेल्वे मेन पाहिली. साबांचे आई, बाबा, बहिणी, भाऊ सगळ्यांनी अनुभवलेली आहे भोपाळ दुर्घटना. त्यांचे वडील रेल्वेतच असल्याने रेल्वे क्वार्टरमध्ये रहायचे. त्यांच्याकडूनच ही घटना अगदी डिटेल्स मध्ये ऐकलेली. त्यामुळे बघायला उत्सुकता होतीच. याप्रकरणात कोणाला काही शिक्षा झाली नाही याचं फार वाईट वाटलं. कितीतरी लोकांचे हकनाक बळी गेले, आणि कितीतरी लोकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणाम अजून भोगत आहेत.
मला का आठवत नाही आता पण, “मास
मला का आठवत नाही आता पण, “मास मिडनाईट“ फार रटाळ वाटलेली. रेटुन ३ भाग पाहिले पण मग सोडुन दिली. चांगली आहे म्हणत आहेत तर पुन्हा एकदा पहिल्यापासुन सुरु करते व पहाते आवडते का.
रेल्वे मेन के के मेनन, आर
रेल्वे मेन के के मेनन, आर माधवन ह्यांना बघून इच्छा होतेय. पण गंभीर आहे का? शेवट दु:खी आहे का? तसं असेल तर स्कीप करेल.
ब्रेथ सिरीज अशीच उगा पाहिली हुरहुर लाऊन गेली होती.
शेवट ओके आहे, पाहू शकतेस.
शेवट ओके आहे(सुखी नाही पण अगदी दुःखी पण नाही), पाहू शकतेस.
ओके
ओके
हो, छान बनवली आहे रेल्वे मेन.
हो, छान बनवली आहे रेल्वे मेन.
जास्त अस्वस्थ व्हावे अशी नाही. अन्यथा त्यामुळे सिरीज योग्य त्या मूड ने बघणे होत नाही आणि विषय पोहोचत नाही असे मला वाटते.
मुलांनाही दाखवायला हरकत नाही. क्वचित कुठेतरी शिव्या आहेत. पण त्या मुलांना माहीत असतात हल्ली तश्याही. माझ्या सोबत माझ्या नऊ वर्षाच्या मुलीने बघितली. ऑकवर्ड व्हावे असे काही नव्हते. तसेच तिनेही डिस्टर्ब किंवा विचलित व्हावे अशी दृश्ये नव्हती.
उलट अध्येमध्ये pause करत मी तिला विषय आणि त्याचे गांभीर्य समजावून सांगत होतो.
Netflix वर The Railway Men
Netflix वर The Railway Men पाहिली. चांगली आहे.
भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल ऐकून वाचून माहिती होती...पण प्रत्यक्षात काय घडलं असेल ते कळलं.
अभिनय सगळ्यांचाच छान...के के मेनन, माधवन नेहमीसारखे उत्तम... बाबील खान नी पण चांगलं काम केलंय...खुपसे कलाकार नवीन आहेत...पण सगळ्यांनीच छान काम केलंय....
पाहिला पार्ट पहिला
पाहिला पार्ट पहिला
चांगला घेतलाय पण इतक्या साईड ट्रॅक आहेत की कळतच की हे सगळे लोक नंतर गॅस गळती सुरू झाल्यावर धावपळ करत लोकांना वाचवणार वगैरे
थोडाफार चेर्नोबल सिरीज च्या धाटणी ची वाटली
चरनोबिल मला आवडलेली खूप पण
चरनोबिल मला आवडलेली खूप पण नंतर कळाले की काहीही वाट्टेल ते दाखवले आहे त्या सिरीज मध्ये.
रेल्वेमेन मध्येही काहीही सुरू
रेल्वेमेन मध्येही काहीही सुरू आहे, इतकी पात्रे, इतक्या स्टोऱ्या, आणि त्यात शीख दंगल चा पण पदर जोडलाय आणि इतका वेळ घालवला आहे त्यात की मूळ विषय बाजूलाच राहतो
रेल्वे मेन आवडली. मसाला आहे
रेल्वे मेन आवडली. मसाला आहे जरा, पण आवडली. बाबील खान हिरा आहे. भोपाळच्या भाषेचा लहेजा पकडण्यासाठी मेहनत फक्त त्यानेच घेतली आहे.
बेताल: छाn आहे, one time watch.
म्हणजे तो इरफान खान चा मुलगा
म्हणजे तो इरफान खान चा मुलगा का कुरळ्या केसांचा? तो ditto इरफान च वाटतो, बोलण्याची स्टाईल पण तशीच
हो तोच
हो तोच
आजच्या रजेचा सदुपयोग करून
आजच्या रजेचा सदुपयोग करून squid game the challenge पाहिला.आता स्पॉयलर देत नाहीये, पण हा सिझन 1 सारखा धीर गंभीर किंवा निगेटिव्ह प्रकार नाहीये आणि मूळ कोरियन सिरीज चा दुसरा सिझन नाहीये.दुसरा 2024 मध्ये येणार आहे.
एकदा पाहू शकता हा नवा सिझन.लीडरशिप लेसन्स.
नुकतीच gas well पाहून आले,
नुकतीच gas well पाहून आले, मागच्या महिन्यात.
Saftey / hse खूप strict झालं आहे आता
तिथे भोपाळ सारखी दुर्घटना पुन्हा कधीच होऊ नये म्हणून प्रशिक्षण दिल्याशिवाय आत सोडतच नाहीत.
Bhopal tragedy is mainly
Bhopal tragedy is mainly caused due to interaction of water with MIC (Methyl Isocyanate) which was stored in that plant.
Such level of tragedy is not possible at oil wells and present day HSE awareness & practices are better. For oil wells main toxic gas is Hydrogen sulfide, so yes some health risk is always there.
Correct mandard.
Correct mandard.
माझं म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट आहे.
नवीनच हे सगळं समजतंय म्हणून.
In case of emergency, gas leakage, वाऱ्याच्या उलट्या दिशेला पळा / जा असे सांगितले होते.
वाऱ्याची दिशा दाखवणारे यंत्र तिथे लावलेले असते
नशीब! ... नाही तर गोदीला नीट
नशीब! ... नाही तर गोदीला नीट उभं रहायला सांगायला लागलं असतं.
अमितव
अमितव
मी रेल्वेमेन ट्रेलर बघून
मी रेल्वेमेन ट्रेलर बघून सोडून दिले. खूप पिळवणूक असेल असं वाटलं. मला बिलाल खान इरफान खान सारखा न वाटता सिद्धार्थ जाधव सारखा वाटतो. इरफान म्हणजे 'आपलाच' वाटायचा, पण Qala मधलं काम आवडूनही बिलालबद्दल अजूनतरी तसं काही वाटलं नाही.
मिडनाईट मास (लंपन, मैत्रेयी आणि रमड मुळे) सुरू केले आहे, अतिशय संथ आहे. चौथ्या भागात थोडा वेग आला आहे. कन्सेप्ट व कन्टेन्ट अद्भुत आणि विचित्र आहे. पूर्ण करणारच आहे.
चूना आवडली आहे, सुरवातीला संथ वाटते पण धमाल आहे. चौथ्या भागापासून पकड घेते. थोडी अ आणि अ आहे पण सर्वांची कामं आवडली. रंजक आहे. चौथ्या भागात ते दोघे बहिणीला वाचवायला येतात तोवर ती व्यवस्थित हाणहाणून प्रेग्नंट असूनही आरामात आपापली बाहेर येते आणि हे दोघे अडकून बसतात. फारच कूल दाखवली आहे ती.
अमितव
अमितव
अस्मिता, सिरीज चांगली आहे.मला
अस्मिता, सिरीज चांगली आहे.मला वाटतं कन्टीन्यू केलीस तर आवडेल.
इरफान चा मुलगा बाबील, बिलाल नाही.तोही चांगला ग्रो होतो आहे.यात चांगलं काम केलंय.निव्वळ स्टारसन म्हणून पुढे असं वाटत नाहीये(अर्थात संधी कळायला, मिळायला थोडा फायदा होतच असेल.)
बाबीलची अजून एक सिरीज कि
बाबीलची अजून एक सिरीज कि चित्रपट पाहिलंय इतक्यात.. त्यात इन्ट्रोव्हर्ट उच्चभ्रू टीनएजर भूमिका त्यांनी अशी वठवलीये कि रेल्वेमेन मधला बाबील तो हाच का असा प्रश्न पडावा. खूप जास्त ब्रिलियंट अभिनेता आहे हा. आणि तितकाच डाऊन टू अर्थ माणूसदेखील आहे. इन्स्टावर विडिओ बघितला
तो फ्रायडे नाईट प्लॅन पिक्चर.
तो फ्रायडे नाईट प्लॅन पिक्चर.
अरे हो अनु, नाव माहिती असूनही
अरे हो अनु, नाव माहिती असूनही चुकीचे लिहिले. रेल्वेमेन बघेन.
squid game the challenge
squid game the challenge बघितली
मजा आली.. उत्कंठा कायम राहते..
५ एपिसोड होते. पुढचे एपिसोड २९ ला येणार आहे.. एक की सगळे माहीत नाही.. आले की लगेच बघणार
मी मिडनाईट मास पुन्हा सुरु
मी मिडनाईट मास पुन्हा सुरु केली. पुन्हा पहिले ३-४ भाग फार हळु असल्याने कसेतरी संपवले पण जे काही होतं ते चांगलं होतं ते जाणवत असल्याने पुर्ण केली. शेवटचे २ अडीच भाग मात्र फारच मस्त आहेत. त्यावरुन कळते की आधीची कथा संथच दाखवणे गरजेचे होते फक्त ती त्यांनी भयंकरच संथ केली आहे असं मला वाटलं. बायबल संबंधीत संवाद फारच लांबलचक, खूप ताणले गेले. त्यात भर म्हणुन पात्रे बोलताना फार पॉज दाखवलेत. आयुष्यं थबकलेली असतात ते दाखवावे पण फारच वेळा थबकलेत. तरीही पाहिलीच. व शेवटचे दोन भाग पाहुन समाधान वाटले. विषय मात्र भारी होता.
रेल्वे मेन जबरदस्त आहे. एकदम
रेल्वे मेन जबरदस्त आहे. एकदम बिन्ज-वर्दी! के के आणि बाबील कमाल आहेत. इतरांचे पण रोल्स जमून आले आहेत.
काला-पानी बघायचा प्रयत्न करतोय पण अजून पकड घेत नाहीये. सुरूवातीलाच ढोबळ चूका जाणवल्या कि इंट्रेस्टच येत नाही.
काला-पानी बघायचा प्रयत्न
काला-पानी बघायचा प्रयत्न करतोय पण अजून पकड घेत नाहीये.
>>>>
मी काल पहिला एपिसोड पाऊण तास बघून थांबलो.
काहीतरी घडेल अशी उत्कंठा वाटतेय पण खात्री नाही.. त्यामुळे कोणी बघितली पूर्ण नेटाने आणि बघण्यासारखी आहे कळवले तरच बघितली जाईल..
Pages