वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काला पाणी , railway man च्या सिरीज ची पार्श्वभूमी माहित असल्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याची इच्छा होत नाही.
सात आठ एपिसोड सहन करायचे ते पण माहित असलेल्या स्टोरी प्लॉट चे म्हणजे जरा अवघडच होतय...

मी चिकाटीने पहिली शेवटापर्यंत काळा पानी पण का बघितली असं झाले
शेवट कैच्याकै गंडलाय
इतका की संपुर्ण सिरीजवर बोळा फिरतो

असेही प्रचंड ढोबळ चुका आहेत त्यात
अमेय वाघ मधेच शूर पणा करतो मधेच त्याच भिजकं मांजर होतं
ज्योत्स्ना नावाची बाई का आहे तिथे, तिचा नक्की रोल काय हे कुणीही विचारत नाही

पार्श्वभूमी माहित असल्यामुळे
>>>>>

काय आहे? आम्हालाही सांगा स्टोरी
आता बघेल असे वाटत नाही. पाऊण तास खर्च केला पुरे झाले..

स्टोरी सांगायला स्पॉयलर्स चा वेगळा धागा टाका.

मला आवडली काला पाणी.काही विरोधाभास किंवा अतिशय 180 डिग्री बदललेले स्वभावाचे आर्क खूप चांगले रंगवले आहेत.स्पॉयलर धागा आला तर त्यावर लिहीन.

काला पानी ला कसलीच पार्श्वभूमी अशी नाही
ती भविष्यात घडलीय 2027 मध्ये
त्यात कोरोना चा उल्लेख आहे बस
कोरोनाचा सिरीज शी काहीही संबंध नाही

वेगळेपणा साठीच कारण असे काहीही भविष्यातली गॅजेट्स किंवा तंत्रज्ञान किंवा काहीही नाहीये
लोकं तेव्हाही मोबाईलवर गेम्स खेळतात, रेंज नसते आणि कोरोना पेक्षा अत्यंत भिकार दर्जाचे मास्क वापरतात Wink

PI Meena बघायला सुरुवात केली.
कहानी मधला इन्स्पेक्टर वेगळ्या रोलमध्ये आहे.
मीना चा अभिनय आणि पात्र एकदम संयत वाटलं .
झरीना वहाब आवडते.

पी आय मीना बघत आहे, आवडत आहे..
काही लोकांचा अभिनय इतका परफेक्ट असतो की ते कॅरॅक्टर बघून च कळते असं असं असणार आहे Lol
तारे जमिन मधला इशान चा बाप- ह्यात नीगेटीव कॅरॅक्टर आहे, बघूनच सणक जाते Lol
कहानीतला इन्सपेक्टर फारसे काम नाहीये.. १च एक्स्प्रेशन देत असतो.
मीना हिच सर्वे सर्वा आहे (हिचा जॅक असावा का? १स्ट सीरीज पण मेन रोल मिळाला होता, त्यात जराशी मेंगळट वाटली होती, मीना मधे छान काम केलेय)

आशु मला पण कालापानी अजिबात आवडली नाही. भले मी मन लावून शेवटपर्यंत पाहिली. आमेय वाघ चा रोलच मला समजला नाही. मोना सिंग ला फार लवकर मारून टाकली... पचका आहे.

प्राईम वर रेन्बो रिश्ते पाहिली... क्विअर रिलेशनशिप वर आहे. फार खास किंवा अगदि टाकाऊ नाही. ओकेओकेइश आहे.

द क्राउन ले टेस्ट सीझन बघितली. मला तरी आवडली. डायनाशी इमोशनल कनेक्ट आहे. व सर्व मेनिप्युलेशन बघून अगदीच कसे तरी झाले. शेवटी कमीला ला चार शिव्या हासडल्या. आता राणी म्हणून मिरवते.

मी बघायला सुरुवात केली, मीना मस्त काम करते, इंप्रेसिव्ह आहे फक्त डोळे जास्त मोठे वाटतात, अर्थात त्यासाठी काही नावं नाही ठेवायची पण ते हायलाईट होतात जास्त.

काहीतरी मोठा ट्रॅप आहे, जे तिच्या फॅमिलीबाबत झालं तेच झरीना वहाबच्या मुलाबाबत.

पाताललोकमधल्या हिरोचा बॉस इन्स्पेक्टर इथेही पोलिसातला दाखवलाय.

जे तिच्या फॅमिलीबाबत झालं तेच झरीना वहाबच्या मुलाबाबत. >>> नाही , पण त्यामुळे एक emotional angle आहे.

जीशु सेनगुप्ता भारी कंटाळवाणा आहे. काही गोष्टी पटापट। सापडतात तिला , उदा , ओमार , password , video ,इ.इ. , पण slow cooking drama बघायला मजा येतेय. पुढे पुढे कोणावर विश्वास ठेवायचा कळत नाही. तिच्या boyfriend चा angle कळत नाहीये.

नाही , पण त्यामुळे एक emotional angle आहे. >>> अच्छा, मला वाटलं लिंक असेल दोन्ही गोष्टीत.

Netflix वर Scoop सिरीज पहिली...चांगली आहे...पण बिग बॉस प्रेस कॉन्फरन्स मध्ये जिग्ना वोरा म्हणाली होती की त्यावेळेस तिला खूप attitude होता..मी म्हणजे कोण अशा थाटात असायची मी...तो attitude दाखवायला करिश्मा तन्ना कमी पडलीये ...ती साधी ,डाऊन टू अर्थ वाटते पूर्ण सिरीज मध्ये...

कोणी नेफिवरिल breaking bad सीरिज बघतय का ?

कथानकाच्या मुख्य कलाकाराचं नाव मिस्टर Walter White (Bryan Cranston), वय एकूणपन्नास. हा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक असतो केमिस्ट्रीचा. पगार पुरत नाही म्हणून लपून छपून एका गैरेज मध्ये गाड्या धूवायचं काम पण करत असतो. घरी बायको आणि एक मतीमंद मुलगा. बाकी त्याचे मित्र आणि नातेवाइक हे सर्व त्याच्यापेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीतले. एके दिवशी Walterला कळतं की त्याला क्षयरोग आहे आणि एक फक्त वर्ष वेळ आहे! आता पुढे काय... कुटुंबाला कसं सांभाळणार, घर खर्च कसा होणार... आणि हे सगळं अचानकच, ह्या सर्व विचाराने त्याच्या मनात प्रश्नाचं वादळ निर्माण झालेलं असतं.

एके दिवशी त्याच्या जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे 'सरप्राइज' पार्टीसाठी आलेले असतात . त्या सर्व लोकांमधे वॉल्टरचा मेहुणा आलेला असतो, तो DEA (Drug Enforcement Administration) मध्ये नोकरी करत असतो, टीव्ही वर न्यूज़ चालू असतात तेव्हा बातमी मध्ये त्याचाच उल्लेख, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांना Hank Schrader (वॉल्टर चा साला) आणि त्याच्या DEA टीमनी छापा घालून अमुक अमुक पैसे आणि ड्रग्स जप्त केले वगैरे!

Schrader बोलता बोलता Walterला त्याच्या आगामी छाप्या बद्दल आमंत्रण देतो "एके ठिकाणी छापा माराययचा आहे, एक वेगळाच चित्त थरारक अनुभव मिळेल तुला!" Walterला नाही म्हणता येत नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे छापा मारण्याच्या आधी Schrader, Walterला घेतो, अख्खी टीम रवाना होते संदिग्ध घटना स्थळी, पहिली तूकडी त्या बंगल्याच्या आत घुसते, दूसरी बंगल्याच्या पुढच्या बाजूला वगैरे सर्व प्रकार सुरु.. छापा सुरळीत पार पडतो, पण एक अपराधी मात्र सुटतो, बंगल्याच्या खिडकीतून उड़ी मारून सटकताना Walter पाहतो त्याला, तो ज्या गाडीने पळ काढतो त्या गाडीचा नंबर ही लक्षात ठेवतो Walter, पण पाहिलेला प्रकार काही सांगत नाही Schraderला! कारण Walterच्या मनात वेगळीच गणितं चालू असतात.

Jesse Pinkman नावाचा माजी विद्यार्थी असतो वॉल्टरचा. तोच जो पळ काढतो त्या बंगल्यातून... तोच!
Walter त्याच्या घरी त्याची वाट बघत असतो, Walterला बघताच Jesse पळून जायचा प्रयत्न करतो, पण Walter त्याला थांबवतो, म्हणतो की तुझ्याकडे अमली पदार्थ घेणाऱ्या लोकांची यादी असेलच आणि माझ्याकडे ख़ास क्षमता जी तुझ्यात नाहीये ती म्हणजे 'केमिस्ट्री!'. आपल्या दोघांचा फायदा आहे ह्यात, तू नाही म्हणालास तर मी पोलिसांकडे जाइन आणि माझ्या ह्या 'ऑफर'ला 'हो' म्हणल्या शिवाय तुला दूसरा पर्याय नाहीये! अर्थात Walter चा उद्देश हा निव्वळ कमीत कमी वेळात प्रचंड पैसा कमवायचा असतो, कुटुंबाच्या भविष्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्याची मनस्थती झालेली असते. Jesse ही तयार होतो... आणि सुरुवात होते खऱ्या BREAKING BAD ला.

मालिकेच्या सुरुवातीचा Walter आणि प्रत्येक भागातील वॉल्टर च्या वागण्यातील फरक अप्रतिम दाखवला आहे .
काही भांगाचे दिग्दर्शन खुद्द मुख्य अभिनेता walter ( ब्रायन Cranston) ने केले आहे .
Imbd ९.५/१०
टोटल ५ सीझन.....

अरे वा ! इथे वाचून आठवली पी आय मीना मालिका.
खूप दिवस झाले असं वाटू लागलंय. दुसरा भाग लवकर येऊ द्या नाहीतर काहीच लक्षात राहत नाही.

ब्रेकींग बॅड बद्द्ल धागा वाचला की नाही ते लक्षात नाही, वाचून मग वाटलं तर आधीची कमेंट परत पोस्ट करेन.

नेटफ्लिक्सवर स्विडीश प्लॉट असलेली Nearly normal family बघायला सुरू केलीये.
पहिले २ भाग पाहिले. बघेन पुढे असं आत्ता तरी वाटतंय.

मी पुन्हा पाहतोय सध्या. तेथेही लिहून आलो. मधे एक दोन भागांत असे दिसले की काही प्लॉट डिव्हाइसेस/सबप्लॉट्स आणले होते पण पुढे वाढवलेले दिसत नाहीत. सविस्तर लिहीतो तेथे नंतर. (ब्रे बॅ)

Pages