Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्रिधा चौधरी ना?
त्रिधा चौधरी ना?
आमच्या सोसायटीत दिसली
नवरात्रीत आलेली.
प्राईम वरच्या बंदीश बॅंडीट कि अशा नावाच्या मालिकेत पण होती. त्यातही तिचा होणारा नवरा पाप्याचं पितर होता.
बंगाली वेबमालिकेत दिसते नेहमी.
छान आहे ती.सर्व फॅशन मस्त
छान आहे ती.सर्व फॅशन मस्त कॅरी करते.
आदिती पोहनकर असेल.
आदिती पोहनकर असेल.
आदिती पोहनकर असेल.
आदिती पोहनकर असेल.
>>
नेटफ्लिक्स च्या she मधे होती
जाम डोक्यात जाते
इथे रेकोज मिळाल्याने सध्या
इथे रेकोज मिळाल्याने सध्या हॉन्टिंग ऑफ द हिल हाउस बघते आहे. ५ भाग बघून झाले. ज ब र द स्त आहे!! व्हेरी डिस्टर्बिंग. हाउस ऑफ अशर मधे आणि यात काही इन्टरेस्टिंग समान धागे आहेत. दोन्ही मधे वर वर सुपरनॅचरल टिपिकल हॉरर अशी सुरुवात वाटते पण जसे गोष्ट उलगडते ती जास्त सायकोलॉजिकल बनते, जे चाललंय, आपल्याला पडद्यावर दिसतंय ते तसेच दाखवायचे आहे की ते फक्त पात्रांच्या आजारी मनाचे खेळ, मनोविकाराचे परिणाम आहेत हे एक गूढ वाटते आणि गडद्च होत जाते. फ्लॅनगन आपल्याच मनाशी खेळ करतो एक प्रकारे.
हाउस ऑफ अशर ज्यांना आवडली असेल त्यांच्यासाठी हायली रेकमेन्डेड!!
डिरेक्टर म्हणून फ्लॅनगन ने प्रचंड इम्प्रेस केले आहे. आधी काही नव्हते पाहिले त्याचे पण आता शोधून बघणार आहे.
हुलू वर "सुलतान ऑफ देल्ही"
हुलू वर "सुलतान ऑफ देल्ही" बघतोय. बरी आहे. कथेपेक्षा "स्टाईलायझेशन" जास्त आहे अजून तरी. पटकथेतील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वलय घेउन येत असल्यासारखी येते सतत. सुमारे १५ मिनिटांनंतर "अरे आम्हाला समजले किती भारी लोक आहेत. जरा ड्रामा पुढे सरकवा आता" असे होते.
या बाबतीत मिर्झापूरने फार हाय बार सेट केला आहे.
गुड आवडली ना haunting. ही अशर
गुड आवडली ना haunting. ही अशर पेक्षा नक्कीच जास्त आवडेल शेवटी पोचाल तेंव्हा. पण बऱ्याच जणांना ही आवडली नाहीये इथे, संथ वाटल्या कारणाने. खूप पूर्वी झाली आहे चर्चा. आता ही झाली की bly manor बघा, तीच स्टारकास्ट आहे बरीचशी. मला manor स्लो वाटली होती पण ती सुद्धा ग्रेटच आहे. अशर मध्ये तितकी वातावरण निर्मिती नाही झाली असे वाटले का? मला ते प्रकर्षाने वाटले.
येस लंपन थॅन्क्स फॉर द रेको!
येस लंपन थॅन्क्स फॉर द रेको! हो मला ही जास्त उजवी वाटते आहे खरी अशर पेक्षा. वातावरण निर्मिती आणि इथे मुख्य कॅरेक्टर्स बद्दल आपल्याला सहानुभूती/ हळहळ वाटत रहाते हेही एक कारण असू शकेल ही सीरीज जास्त चिलिंग/ टचिंग वाटण्यामागे.
हिल हाऊस सगळ्यात बेस्ट आहे.
हिल हाऊस सगळ्यात बेस्ट आहे. ब्लाय मॅनोर त्याखालोखाल छान. अशर ची हाताळणी थोडी वेगळी वाटली पण ती ही आवडलीच. अशर पेक्षा midnight mass कणभर जास्त आवडली होती.
नोटेड.
नोटेड.
आर्या ३ पहातोय... सुश्मिताचा
आर्या ३ पहातोय... सुश्मिताचा चेहरा जाड झालाय त्यामुळे तिला बघवत नाही. आधीच्या दोन सिझनमध्ये बरी दिसायची. आधीचे दोन सिझन पाहिल्यामुळे हा ही पहातोय. पहिले दोन सिझन जास्त चांगले होते.
सुश्मिताचा चेहरा जाड झालाय
सुश्मिताचा चेहरा जाड झालाय त्यामुळे तिला बघवत नाही.
>>
हार्ट अटॅक नंतर एक्सरसाईज कमी केला असेल
सुश्मिताचा चेहरा जाड झालाय
सुश्मिताचा चेहरा जाड झालाय त्यामुळे तिला बघवत नाही. >>>
ती एका सिरीज मध्ये तृतीय पंथीयांची भूमिका करत होती ना? फार नाजूक दिसू नये म्हणून वजन वाढवले होते असे कुठे तरी वाचले.
नेटफ्लिक्स वर दर्जी किंवा
नेटफ्लिक्स वर दर्जी किंवा टेलर ही मूळ टर्किश भाषेतील ३ सी़अन्स आहेत. खूप स्टायलिश आणि आगळी वेगळी आहे. जरूर पहा
नेटफ्लिक्स वर दर्जी किंवा
नेटफ्लिक्स वर दर्जी किंवा टेलर ही मूळ टर्किश भाषेतील ३ सी़अन्स आहेत. खूप स्टायलिश आणि आगळी वेगळी आहे. जरूर पहा
हल्ली freelancer बघितली,
हल्ली freelancer बघितली, उत्तम research केला आहे, दाएश नेमके कसे काम करत होते, मोसुल, अलेप्पो, वगैरे शहरांत त्यांचे स्वशासन कसे चालत होते इत्यादी चित्रण उत्तम.
स्क्वीड गेम भाग २ येतोय परवा
स्क्वीड गेम भाग २ येतोय परवा केव्हातरी.
Crown episodes बघितले की नाही
Crown episodes बघितले की नाही कोणी? मी काल binge watch kele 3 episodes.
त्यात Diana खरोखर थोडी मूर्ख वाटते. Dodi महामूर्ख शामळू वाटतो. चार्ल्स बरा वाटायला लागतो. आणि राणी राजा totally disconnected!
खरे खोटे रॉयल घराणे जाणे!
Dodi च्या बापाने mosad वर आरोप केलेले असे एका पुस्तकात वाचलेले, तो एक अजून! बाकीचे भाग वीकेंड la संपवेन.
आर्या ३ पहातोय---/// सगळ्यात
आर्या ३ पहातोय---/// सगळ्यात बकवास सिजन
काय दाखवायचं आहे ते त्यांना तरी माहीत आहे की नाही काय माहित
मी आर्या २ पण मधूनच सोडून
मी आर्या २ पण मधूनच सोडून दिलेला.
पहिला सिजन भारी होता.
Bosch Legacy S2 चालू केलीय.
Bosch Legacy S2 चालू केलीय. इतर सगळ्या सीझन्सपेक्षा हा अ आणि अ कडे झुकणारा वाटतोय. पण मजा येतेय
Bosch and Madison aged over the years .
मी आर्या २ पण मधूनच सोडून
मी आर्या २ पण मधूनच सोडून दिलेला. >>> मी ती कोर्टात खोटं बोलते पहील्याच एपिसोडला, तिथेच सोडला सिझन.
पहिला सिजन भारी होता. >>> अगदी अगदी.
रेल्वे मेन काल बघून पूर्ण
रेल्वे मेन काल बघून पूर्ण केली.चांगली बनवली आहे.फार वाईट वाटतं बघून.
हो पहायची आहे.
बॉश मधे आता काही दाखवलं तरी आवडायला लागलंय कारण पात्रं आता घरची झालीत
…
Rmd मिडनैट मास झाली बघून,
Rmd मिडनैट मास झाली बघून, फारच आवडली , धन्यवाद. केवळ अचाट संकलप्ना असतात त्याच्या. ह्याचा background score कसला भारी आहे. डार्कच्या तोडीचा वाटला. लांबलचक संवाद आणि बायबल चे एवढे सारे reference असून बोर नाही झाली अजिबातच कसली सांगड घातली आहे सगळ्याची, अफाट. किती वेळ आणि मेहनत घेत असतील हे लोक अशा वेगळ्या कन्सेप्ट वरती..Bly manor पेक्षा सुधा छान आहे नक्कीच..
मी पण परवा संपवली मिडनाइट मास
मी पण परवा संपवली मिडनाइट मास. मस्त आहे. अजिबात प्रेडिक्टेबल नसतात फ्लॅनगन च्या गोष्टी. त्यामुळे वर वर थीम जुनीच वाटली तरी बघताना मजा येते. ती नन, तो फादर कसले सिनिस्टर वाटतात सगळे.
Ho खासकरून ती बया.. मला एकदम
Ho खासकरून ती बया.. मला एकदम आमच्या रिसेप्शनिस्ट चीच आठवण झाली, ती पण अशीच सारखी बायबल आणि जिजस करत असते
Railway Men - Netflix संपवली
Railway Men - Netflix संपवली रात्रभरात
4 episode
छान आहे.
मॅच हरलो त्याचा उतारा.. झोपतो आता. दिवाळीची सुट्टी चालू आहे माझी
डिस्नी प्लस ची तीन
डिस्नी प्लस ची तीन महिन्यासाची ऑफर घेतलेली .. जुन्या वेब सिरीझ strain , sleepy hollow संपवल्या. x files चालू आहे . star wars पण बघून घेतल १-२ movies
आणि amazon prime वर the boys चे उपकथानक असलेली generation V पण बघितली . मस्त आहे.
लंपन आणि मै, आवर्जून रेको
लंपन आणि मै, आवर्जून रेको आवडल्याचं सांगितलंत हे खूप छान वाटलं.
Pages