Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मॅक्सवेल जबरदस्त खेळला.
आज मॅक्सवेल जबरदस्त खेळला. ऑस्ट्रेलियाचा अनुभव, विजिगिषू वृत्ती वि. अफ्गाणिस्तानचा नवखेपणा, फिल्डिंगमधल्या चुका असा सामना होता. पण तरिही मॅक्सवेलने जे केलंत्याला तोड नव्हती. कपिलची १७५ वाली इनिंग कदाचित अशीच असेल.
"मॅक्सवेलला काहीतरी गोल्फ रिलेटेड इंजुरी झाली होती " - गोल्फ खेळून येत असताना कार्टमधून पडला होता.
असामी - टोटल पोस्टला अनुमोदन!!
"कदाचित रिकवायार्ड रन रेट इतका असेल की तो द्रविड मारू शकतो हा विश्वास त्याच्यावर नव्हता" - द्रविड तेव्हा नवखा होता. नंतरच्या काळात त्याच्यावर काहीए काळासाठी बसलेला 'टेस्ट प्लेयर' हा शिक्का तेव्हा त्याच्यावर बसला नव्हता. किंबहूना मांजरेकरला ड्रॉप करून लंकेत झालेल्या सिंगर कपला त्याला घेऊन गेले होते (त्यावेळी मांजरेकरने स्वतःच्या गाण्याचा एक अल्बम काढला होता आणि कुठल्याश्या मुलाखतीत 'सिंगर कप खेळायला जाताना सिंगरलाच नेलं नाही' अशी गरीब कोटीसुद्धा केली होती). त्यामुळे हे विधान परत एकदा 'दिब्रूगड" च्या वळणावर गेलंय.
त्या मॅचमधे कांबळी-द्रविड ची पार्टनरशिप चालू असताना मॅच जिंकू अशी शक्यता निर्माण झाली होती. २३-२४ व्या ओव्हरमधे जेव्हा तेंडुलकर कांबळीचा रनर म्हणून आला, तेव्हा भारत २/१९५ वर वगैरे होता. पन नंतर विकेट्स पडल्या आणि मॅच गेली. इतका मोठा स्कोअर चेस कसा करायचा हे तेव्हा कुणालाच माहित नव्हतं.
इतका मोठा स्कोअर चेस कसा
इतका मोठा स्कोअर चेस कसा करायचा हे तेव्हा कुणालाच माहित नव्हतं.
>>>>>
शेवटी फिरून तेच लिहिले
द्रविडवर टेस्ट प्लेअर चा शिक्का तेव्हा बसला असो वा नसो, पण फटकेबाज खेळाडू अशी त्याची ओळख नव्हतीच. त्यामुळे हा तेव्हाच्या काळातील भलामोठा स्कोर द्रविड सेंचुरीने जिंकता येईल हा विश्वास बघणाऱ्या कुणाला नव्हताच. अगदी पार्टनरशिप होताना सुद्धा रिक्वायर रनरेट वाढला की सामना गेला असेच समजले जायचे आणि तसेच व्हायचे. मोठा स्कोअर चेस करायचे आहे तर पहिल्या पंधरा ओवर पॉवर प्लेमध्येच मारायला हवेत. त्यासाठी मग गरज पडली तर पिंचं हिटर पाठवा असे तेव्हा हिशोब असायचे. ते देखील श्रीनाथ वगैरे एकेकाळी यायचे.
वर जो कानिटकर चौकाराचा उल्लेख झाला आहे तेव्हाही रॉबिन सिंगला वर बढती दिली होती. फिनिशर वगैरे प्रकार नव्हता तेव्हा आपल्याकडे तरी..
“शेवटी फिरून तेच लिहिले” -
“शेवटी फिरून तेच लिहिले” - तेच नाही लिहिलंय. तू म्हणतोयस कि इतका मोठा स्कोअर होता कि द्रविड चेस करू शकेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा असं काही वाटलं नव्हतं. साधारण २५ व्या ओव्हरला १९२/२ स्कोअर होता म्हणजे रिक्वायर्ड रनरेट (५.४) करंट रनरेटपेक्षा (७.७) कमी होता. फक्त चेस करून मॅच क्लोज करण्याचं तंत्र तेव्हा फारसं परिचित नव्हतं.
हृषिकेश कानिटकरचा लास्ट बॉल
हृषिकेश कानिटकरचा लास्ट बॉल चौका पण पाकिस्तान विरुद्दच होता ना? >> हो बुवा, ते ढाक्यातले तीनशे चेस करताना. पण शेवटचा बॉल नव्हता - चौथा असेल बहुधा. सचिन ने टर्बो स्टार्ट देत टेंपो सेट केला होता नि मग दादा- रॉबिन सिंग ने ७०-८०% कव्हर केले होते एकदम प्रोफेशनली.
माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा असं काही वाटलं नव्हतं. ... फक्त चेस करून मॅच क्लोज करण्याचं तंत्र तेव्हा फारसं परिचित नव्हतं. >> हो माझ्याही आठवणीप्रमाणे असेच आहे. द्रविड कंट्रोल मधे ठेवून होता असे वाटलेले. पण ढाक्यातली मॅच बहुधा पहिली तीनशे चेस केलेली मॅच होती - आपणच नाही तर एकूणच इंटर्नॅशनल लेव्हल ला बहुधा. तो पर्यंत २७० वगैरे झाले कि दुकान बंद करायचे अशी समजूत होती. त्य मॅच नंतर सचिन ने एक हाती डेझर्ट स्टॉर्म आणलेले तेंव्हा असे स्कोअर चेश करणे शक्य वाटायला लागले होते. युवी-कैफ ने त्यावर शिक्कामोर्तब के ले. अगदी जयसूर्या - अर्विंदा प्रोफेशनली धुमाकूळ घालत असतानाही ही फिलींग काँस्टंट वाटायची नाही . २००३-२००४ नंतर हे स्कोअर सेफ नसतात हे अधोरेखित व्हायला लागलेले. (माझ्यापुरते तरी)
पण तरिही मॅक्सवेलने जे केलंत्याला तोड नव्हती. कपिलची १७५ वाली इनिंग कदाचित अशीच असेल. >> +१. एक आफ्रिकेचे चारशे , ऑस्ट्रेलिया मधे लंकेविरुद्ध आपण तीस-पस्तीस ओव्हर मधे २८० वगैरे काढलेले (कोहली - शर्मा - गंभीर ?) वगळता अजून इतका थरारक प्रकार नसेल.
द्रविड सेंचुरीने जिंकता येईल
द्रविड सेंचुरीने जिंकता येईल हा विश्वास बघणाऱ्या कुणाला नव्हताच
>>
१९४ गेम मधली सेंच्युरी ही द्रविड ची पहिली सेंच्युरी होती, त्यामुळे असा विश्वास कुणाला यायला त्यानी असं काही कधी केलंच नव्हतं, पण अविश्वास असण्या जोगं काही ही केलं नव्हतं.
पाक इनिंग च्या शेवटी इंझी नी फटकेबाजी केली होती, जी करू शकेल असं आपल्याकडे कुणी नव्हतं. वर्म चार्ट वर आपला स्कोअर ४० ओव्हर पर्यंत पाक पेक्षा वर होता, पण शेवटचं acceleration होऊ शकलं नाही.
आपण जिंकणार अशी आशा असताना
आपण जिंकणार अशी आशा असताना एका प्लेअर च्या खेळी मुळे हरलो असं वाटायला लावणाऱ्या इनिंग मधे सगळ्यात आधी आठवतो तो डग्लस मरीलिअर
बाकी ९६ वर्ल्डकप नंतर आपण गोल
बाकी ९६ वर्ल्डकप नंतर आपण गोल गोल फिरून श्रीलंका अन् पाक सोबत खेळायचो, अन् मेजर मार खायचो. पण त्यात अधल्या मधल्या काही मॅच कमाल जिंकलो होतो
- वर्ल्डकप सेमी नंतर पहिल्यांदा लंके सोबत सिंगापूर ला खेळताना आपण सचिन च्या १०० नंतरही १९९ ला संपलो होतो. आधीच्या पाक विरुद्धच्या मॅच मधे फास्टेस्ट १०० करणारा जयसूर्या आपली पिसं काढणार असं वाटताना श्रीनाथ नी कमाल स्पेल टाकून ५-६ विकेट्स काढल्या अन् आपल्याला जिंकवलं
- शारजा मधे सचिन सिद्धू च्या शतकांनंतर अझर नी अता उर रेहमान ला लास्ट ओव्हर मधे धोपटल्यानी आपण पहिल्यांदा ३००+ स्कोअर केला होता अन् जिंकलो
- असामी नी लिहिल्या प्रमाणे टोरोंटो ला पहिला सीझन ३-२ हरल्यावर पुढचा सीझन सौरव - जडेजा च्या कामगिरीवर ४-१ जिंकलो होतो
- याच्या जस्ट नंतर पाक मधे जाऊन एक मॅच जिंकलो. राजेश चौहान ची ४ आणि लास्ट बॉल ला मागे जात पकडलेला अक्रम चा झेल (पुढच्या मॅच मधे चेझ करताना इजाझ अहमद नी हग्या मार दिला होता)
- ९८ मधे बांगलादेश मधे (३१४ वाली कानिटकर सिरीज) आपण पाक ला बऱ्यापैकी कांसिस्टंटली हरवल्यानी बदलाचे वारे सुरू झाले
“ डग्लस मरीलिअर” - कायको
“ डग्लस मरीलिअर” - कायको जखमपें मीठाच्या गोण्या चोळ रहे हो??
मुळात झिंबाब्वेविरूद्ध ची मॅच. त्यातून ८ विकेट्स काढलेल्या असताना, शेवटचा बॅट्समन येऊन ५ ओव्हर्समधे ४०+ रन्स काढून मॅच जिंकून देतो हे पटलंच नव्हतं.
“ पण अविश्वास असण्या जोगं काही ही केलं नव्हतं.” - +१
“ शारजा मधे सचिन सिद्धू च्या
“ शारजा मधे सचिन सिद्धू च्या शतकांनंतर अझर नी अता उर रेहमान ला लास्ट ओव्हर मधे धोपटल्यानी आपण पहिल्यांदा ३००+ स्कोअर केला होता अन् जिंकलो” - त्या मॅचमधे अझहरने अता उर रहमानला शेवटच्या ओव्हरमधे धोपटल्यावर ‘आमिर सोहेल-वेंकटेश प्रसाद‘ gesture ची परतफेड केली होती. त्याच मॅचमधे (बहुदा) सिद्धू पॉइंटला उभं राहून स्लेज करणार्या आमिर सोहेलच्या दिशेने चाल करून गेला होता. तेव्हा इंडियाने पहिल्यांदा ३००+ चं टारगेट सेट केलं होतं. आणि असामीने लिहिल्याप्रमाणे ढाक्याला पहिल्यांदा ३००+ स्कोअर चेस केला होता.
काल मला खास कौतुक वाटलं तें
काल मला खास कौतुक वाटलं तें कमिन्सचंही. समोर 128 चेंडूत 200+ फटकवणारा लंगडत चालणारा फलंदाज असाध्य ते साध्य करायला निघालाय, आणि हा पठ्ठा त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवून, शांतपणे फक्त आपली विकेट टिकवण्याची भूमिका ठामपणे बजावतोय; ना धावून रन काढायची नको ती घाई, ना स्वतः चौकार, षटकार मारायचा आतताईपणा ! त्या स्थितीत 68 चेंडूत फक्त 12 धावा !! आपल्या सहकार्यावर केवढा प्रचंड, अढळ विश्वास व त्याला किती परिपक्व पद्धतीचा पाठींबा !!!ज्यांनी मॅच पहिली, त्यांना कमिन्समुळे स्थितप्रज्ञ म्हणजे काय हा प्रश्नच कधी पडणार नाहीं ! ऑसीज कितीही उद्दाम असोत, पण उगीच नाही 5वेळा विश्वचषक विजेते होत !!!
काल मला खास कौतुक वाटलं तें
काल मला खास कौतुक वाटलं तें कमिन्सचंही
>>
येस
विकेट फेकायची नाही
अतातायी फटके मारायला जायचं नाही
गरज नसताना पळून रन पण घ्यायची नाही
संयम दाखवण्याची परिसीमा
साधारण २५ व्या ओव्हरला १९२/२
साधारण २५ व्या ओव्हरला १९२/२ स्कोअर होता म्हणजे रिक्वायर्ड रनरेट (५.४) करंट रनरेटपेक्षा (७.७) कमी होता.
नवीन Submitted by फेरफटका on 8 November, 2023 - 03:44
>>>>>>>
जर खरेच २५ ओवरला १९२ असतील तर तुम्ही म्हणता ते बरोबर...
पण मला नाही वाटत. कुठे चेक करू शकतो हे.
खालील स्कोअरबोर्ड बघून सुरुवातीच्या कोणाचाही स्ट्राईकरेट बघून असे वाटत नाही की २५ ओवर १९२ धावा असतील.
उलट ऱोबिन सिंग वगैरे नंतर च्या खेळाडूंचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आणि तुमच्या हिशोबाने नंतरच्या २४.२ ओवरमध्ये फक्त १०० धावा मारल्या??
https://www.espncricinfo.com/series/pepsi-independence-cup-1997-61005/in...
थांबा यु ट्यूब वर शोधतो मी तो सामना..
“ काल मला खास कौतुक वाटलं तें
“ काल मला खास कौतुक वाटलं तें कमिन्सचंही” - +१. भाऊ, सगळ्या पोस्टला अनुमोदन.
साधारण २५ व्या ओव्हरला १९२/२
साधारण २५ व्या ओव्हरला १९२/२ स्कोअर होता म्हणजे रिक्वायर्ड रनरेट (५.४) करंट रनरेटपेक्षा (७.७) कमी होता.
>>>>>>
ईथे चेक करा,
२५.३ ओवर १४२-२ होत्या
तुम्ही थेट ५० धावा वाढवल्यात
https://www.youtube.com/watch?v=90T6bnWQois
“ खालील स्कोअरबोर्ड बघून
“ खालील स्कोअरबोर्ड बघून सुरुवातीच्या कोणाचाही स्ट्राईकरेट बघून असे वाटत नाही की २५ ओवर १९२ धावा असतील.” - माझी स्मरणशक्ती मला दगा देत असेल. कांबळी - द्रविडच्या पार्टनरशिपमुळे आशा निर्माण झाल्या होत्या. नंतर आपण ३०-३५ रन्सने हारलो कारण असा चेस प्लॅन करणं, पेस करणं ह्याचं तंत्र त्याकाळी कुणाला फारसं अवगत नव्हतं इतकाच साधा मुद्दा आहे.
माझी स्मरणशक्ती मला दगा देत
माझी स्मरणशक्ती मला दगा देत असेल. >>> फारच मोठा दगा दिला.. १४२ चे १९२ केलेत.. तरीही २५ ओवर १९२ असते तर मी आशा नव्हती असे म्हणालो असतो का
बाई दवे,
द्रविड मारू शकतो यावर का विश्वास नव्हता, आणि तेव्हा त्याची मनात असलेली इमेज चेक करायला त्या सामन्याआधीचा त्याचा रेकॉर्ड चेक केला.
सामने - ३४, इनिंग ३२
सरासरी - ३३ आणि स्ट्राई़करेट ६४.३३
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/28114.html?class=2;filte...
अट
अफगाणी गोलंदाजांनी मॅक्सवेलला डावपेच न वापरता फारच बाळबोध गोलंदाजी केली, हे खरं. पण वेगळ कांही केलं असतं, तर मॅक्सवेलही वेगळ्या तऱ्हेने खेळून वरचढ ठरण्याचीही शक्यता होतीच. शिवाय, कमिन्सही मग थोडा आक्रमक झालाच असता. तेंव्हा, जर - तर न करतां ऑसीजना , व विशेषत: मॅक्सवेलला , कालचं पूर्ण श्रेय देणंच योग्य !!!
अहो, पण हे आतां आणि तेंही मला दाखवून काय उपयोग ? कालच सांगायचं ना त्या रशिदला, मॅक्सवेलला कशी गोलंदाजी करायला हवी होती तें !!
भाउंची व्यंगचित्रं धमाल आणतात
भाउंची व्यंगचित्रं धमाल आणतात धाग्यावर.
मी मोठा मी भारी पोस्ट असूनही ह्या धाग्यावर त्यासाठी खास चक्कर होते.
भाउंची व्यंगचित्रं धमाल आणतात
भाउंची व्यंगचित्रं धमाल आणतात धाग्यावर.
>>
येस... Always
पुण्यात इंग्लंड वि. नेदरलँड.
पुण्यात इंग्लंड वि. नेदरलँड. पाऊस नसला तरी पावसाळी वातावरण. इंग्लंड हा सामना तरी जिंकेल, अशी आशा करूया. ' डिफेंडिंग चॅम्पियन्स " कडून ही किमान अपेक्षा !
चला, 300+ तर केले इंग्लंडने
चला, 300+ तर केले इंग्लंडने व 1 शतक, घरी गेल्यावर दाखवायला !
“ डग्लस मरीलिअर” - कायको
“ डग्लस मरीलिअर” - कायको जखमपें मीठाच्या गोण्या चोळ रहे हो?>>>>>
आता फेफ, अँकी तुम्ही सुद्धा उल्लेख केल्यावर हळू हळू त्या मॅचेस आठवतायत.
सिद्धू आणि सोहैलची बाचाबाची स्पष्ट आठवली आता. आणि परत मग सोहैलनी चौका मारुन प्रसाद ला बोट दाखवत खिजवलं आणि पुढचा बॉल जबरी ऑफ कटर टाकून त्याचा ऑफ स्टंप उडवला होता ते ही आठवलं! सो थ्रिलिंग टू वॉच! मला वाटतं प्रसाद नी त्याला चल बाहेर हो आता अशी खुण केली परतफेड म्हणून पण बिचार्याला फाईन लावला होता
भारतीत दर्शक म्हणून अक्षरशः नाचलो होतो तेव्हा.
टोराँटो ला कुठलीशी सिरिज झाली होती तेव्हा मला वाटतं दादा कॅप्टन होता बहुतेक आणि तेव्हा त्यानी महत्वाच्या विकेट घेतल्याचे आठवते. मला वाटतं देबशिश मोहंती पण होता टीम मध्ये तेव्हा.
दादाच्या कॅप्टनसी मध्ये आपण थोडी दादागिरी करायला लागलो हे खरय. क्रिकेटच्या पंढरीत जाऊन त्या वर्ल्ड फेमस बाल्कनीत शर्ट बिट काढून राडा/जल्लोष केला होता
मी मोठा मी भारी पोस्ट असूनही ह्या धाग्यावर त्यासाठी खास चक्कर होते.>>>>>>> हे बरोबर आहे.
येऊन छान चर्चा करणे, इतर लोकं काय लिहितायत ते वाचणे, थोडीफार आपली मतं लिहिणे पण ओवरॉल गेम बद्दल चर्चा होतेय त्यात आनंद मिळणे हा मुद्दा सोडून जेव्हा फक्त मी जे बोललो ते कसं बरोबर आलं ह्यावर भर का?At this point, If you think anyone truly cares or believes anything that comes out of your mouth (post) you have to re-evaluate. Because now this only an internal mind game where you feel by continuing to push your greatness or knowledge people will be impressed. Reality is far from it.
Why not focus on having fun instead of proving something?
टोरेंटो, सहारा कप.. त्यात
टोरेंटो, सहारा कप.. त्यात दादा नाही सचिन कप्तान होता. त्याने दादाला सिक्रेट वेपन नाव दिले होते. दादाचा बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स. सलग चार सामनावीरचा विक्रम आहे. जवळपास सारेच सामने लख्ख आठवत आहेत. सलग चार सामने जिंकून पाचवा हरलो तरी त्यात दादाच सामनावीर होता. प्रत्येक सामन्यात दोन दोन विकेट होत्याच. एकात पाच काढल्या होत्या. एक कमी ओवरच्या सामन्यात चेस करताना सकलेनला सिक्स मारून सामना सील केला होता. गणपतीत असायचे ते सामने. आणि आरती उरकून रात्री बघत बसायचो. पहिले दोन सीजन धमाल आली. दादाने धमाल उडवली तो दुसरा सीजन होता. मोहंती हरविंदरसिंग वगैरे गोलंदाज पहिल्या सीजनला होते. नंतर तिसर्या सीजनला राष्टकुलला अर्धा संघ सचिनसोबत गेला आणि मजा गेली. पण त्यातही पहिला सामना दादा सामनावीर होता. म्हणजे त्या स्पर्धेपुरते बोलायचे झाल्यास सलग पाच सामनावीर होते
वर्ल्डकप झाल्यावर आठवणीतले
वर्ल्डकप झाल्यावर आठवणीतले क्रिकेट सामने असा धागा काढायला हवा... आपले बरेच वैयक्तिक अनुभव जोडले गेले असतात कित्येक सामन्यांसोबत. बरेचदा त्यामुळेच ते सामने लख्ख आठवत असतात.
टोरोंटो मधे 4 वर्ष सहारा कप
टोरोंटो मधे 4 वर्ष सहारा कप झाला
96, 97, 98 आणि 99. त्यात पाहिले 3 सीझन आपण आणि पाक होतो (2-3, 4-1 आणि 1-4)
चौथ्या सीझन ला आपण विरुद्ध विंडीज सामने होते. त्यात एका सामन्यात बुवांनी वर लिहिल्या प्रमाणे रिकार्डो पॉवेल नी बत्ते घालून कुटलं होतं...
पण नंतर हे सामने बंद झाले.
डे मॅच असल्यानं लाल बॉल अन् पांढरे कपडे घालून खेळायचे
भाऊ - व्यचि मस्त!!
भाऊ - व्यचि मस्त!!
बुवा - वेल सेड!!
"सामने - ३४, इनिंग ३२
सरासरी - ३३ आणि स्ट्राई़करेट ६४.३३" - आलास का फिरून भोपळे चौकात? एकीकडे म्हणतोस की क्रिकेट आकड्यांपलिकडे असतं आणि आता
आकडेवारीच रेटतोयस. मुळात टी-२० च्या आगमनाआधी स्ट्राईक रेट हा इतका मोठा कन्सेप्ट नव्हता. गंमत म्हणून सांगतो (तू चेक कर हवं तर), पण माझ्या अंदाजाप्रमाणे द्रविड आणि गांगुलीचा करियर स्ट्राईक रेट साधारण सारखाच आहे. त्याहीपेक्षा अजय जडेजा - जो बर्यापैकी स्फोटक बॅट्समन होता, त्याचा करियर स्टाईक रेट गांगुली-द्रविडपेक्षा कमी आहे. त्यामुळे अँकी म्हणतो त्याप्रमाणे द्रविड हा त्यावेळी बर्यापैकी unknown entity होता, यंग प्लेयर होता. आणि कांबळी-द्रविड पार्टनरशिप च्या वेळी मॅच जिंकायच्या आशा निर्माण झाल्या होत्या.
आता माझ्या मेमरीविषयी थोडसं. कांबळी साधारण इनिंगच्या मध्यावर आऊट झाला (कारण २२-२२५ व्या ओव्हरला सचिन त्याचा रनर म्हणून आला होता) आणि त्यावेळी स्कोअर १९२ होता अशी माझी train of thought होती. पण तू म्हणतोस तसं आकडे लक्षात ठेवण्यात थोडी गडबड झाली.
डग्लस मरीलिअर वाली सिरीज (यात
डग्लस मरीलिअर वाली सिरीज (यात रीतींदर सोधी वगैरे लोकांना ट्राय केलं होतं. एका मॅच मधे झहीर नी शेवटच्या 4 बॉल वर 4 सिक्स हाणल्या होत्या)
तसंच न्यूझीलंड विरुद्ध एक सिरीज (ज्यात बहुतेक नागपूर च्या दुसऱ्या सामन्यात सचिन अन् द्रविड ची रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप झाली होती, सचिन 186 अन् द्रविड 153, आपण 350+ केले होते. गंमत म्हणजे पहिल्या सामन्यात ख्रिस केर्न्स च्या शतकासह न्यूझीलंड नी 350+ केले होते)
या दोन्ही सिरीज लाल बॉल अन् पांढरे कपडे घालून खेळलेल्या वन डे सिरीज होत्या. माझ्या आठवणीतल्या शेवटच्या...
फेरफटका थोडी गडबड.. १४२ चे
फेरफटका थोडी गडबड.. १४२ चे १९२ करून तुम्ही रिक्वायर्ड रनरेट (५.४) करंट रनरेटपेक्षा (७.७) कमी होता असे गणितही बिनधास्त मांडले.
म्हणजे अगदी उलटेच करून टाकले
ईथे द्रविडला काही म्हटले की त्याची बरीच पाठराखण केली जाते. त्यामुळे द्रविड खेळत असूनही जिंकायची खात्री नव्हती हे वाक्य खोडायचे असल्यासारखे वाटले.
कारण तुम्हीही पुन्हा फिरून तेव्हा असे स्कोअर चेस करायचे कसे माहीत नव्हते म्हणून तेच म्हटले की जिंकायची आशा कमी होती.
आणि दादा-द्रविड-सचिन यामध्ये कोण किती स्फोटक आहे हे समजायला यांचा करीअर स्ट्राईकरेट चेक करायची बिलकुल गरज नाही. आकडे तर ज्यांना हे माहीत नसते त्यांना द्यायला , समजायला सोयीचे पडतात म्हणून असतात.
बाकी तो स्फोटक जडेजा सुद्धा ओपनर वा वरती यायचा तेव्हा स्लो खेळायचा. अझर सोबत फिक्सिंगमध्ये माती खायचा तेव्हा स्लो खेळायचा.
रॉबिन सिंग मारायचा पण त्याचे फटके मर्यादीत होते. ऑफ साइडला खेळता यायचे नाही त्याला. एकदा अटीतटीच्या सामन्यात लंकेने त्याला २६ बॉल १२ खेळवले होते आणि आगरकर येऊन १२ बॉल २६ मारून गेलेला आणि सामना संपवलेला.
फिनिशर हा प्रकार युवराज धोनी यांचा उदय होईपर्यंत नव्हताच तर एकदा रनरेट ७-८ झाला त्या काळी तर कोणाला जिंकायची आशा असणार होती. भले विकेट हातात का असेना, क्षमतेवरच विश्वास नाही ईतके सोपे गणित होते.
डग्लस मरीलिअर वाली सिरीज आणि
डग्लस मरीलिअर वाली सिरीज आणि झहीरनी शेवटच्या 4 बॉल वर 4 सिक्स हाणल्या होत्या या दोन्ही सिरीज वेगळ्या होत्या बहुधा.. झहीर चार सिक्सवाला सामना सुद्धा आपण हरलेलो
पण डग्लसने जे केले ते तेव्हा अदभुत होते. सगळे शॉट मागे मारलेले आणि आपली स्थिती काल अफगाणची झाली तशी क्ल्यू लेस झाली होती..
मारिलीयेर ची खेळी आठवते
मारिलीयेर ची खेळी आठवते म्हणजे ऋन्मेऽऽष , मला वाटले तेवढे लहान नाहीत,
Pages