वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पोस्टीत 'समांतर' लिहायचं तर 'अवांतर' लिहिलं आहे. कपाळाला हात आणि Proud . सारखं अवांतर केलं की असं होत असावं.

अन्जूताई, पुढल्या वेळी मी प्राईमवर काही बघितलं की तुला 'शाऊटआऊट' देईन. Happy

बॉडीज बघून झाली. फसवणूक झाल्यासारखे वाटले! गुंता इन्टरेस्टिंग होता पण तो न सोडवता आल्याने कात्र्या लावून कापल्यासारखे वाटले!

Pact of Silence (Mexican on NetFlix)
थोडी लांब आहे पण मस्त वाटली. हल्ली मेक्सिकन बर्‍याच सिरीज दिसतात.

मला नाही दिसल्या अजुन कारण मी एकही बघितली नाहीये. तुम्ही एक बघितली की एआयला चकवा लागतो आणि असेल नसेल तो माल तो पुढ्यात ओततो.
गुंता इन्टरेस्टिंग होता पण तो न सोडवता आल्याने कात्र्या लावून >> अगदी!

The fall of the house of Usher बघितली भन्नाट, अफाट आहे. Mike Flanagan च्या haunting of hill House , haunting of Bly manor पण जबरदस्त आहेत. ह्या तीन मधली मला सर्वात जास्त haunting of hill House आवडली. तो तेच कलाकार रिपीट करतो, haunting सिरीज बघितली असेल तर लगेच लक्षात येईल. मस्त काम करतात सर्वच. वातावरण निर्मिती साधारण तशीच असते. आता परत एकदा haunting of hill House बघणे आले.

नुकतंच Chandler Bing चं निधन झालंय. Friends च्या तमाम चाहत्यांना खूप वाईट वाटतंय. मी पण त्यातलीच एक, त्याच्या आठवणीत फ्रेंड्स चे एपिसोड पाहणं सुरू आहे. त्यांचं 2021 मध्ये friends : the reunion program झाला होता HBO Max वाहिनीवर. गूगल सांगतंय की ते झी5 वर आहे, पण झी5 वर नाही मिळाला मला. कुणी सांगू शकेल का पाहिला असल्यास. Plz

rmd हो ती राहिली आहे, बघतो. आता crown चे वेध लागलेत. ट्रेलर तर मस्तच आले आहे. Maitreyi नक्की आवडेल haunting सिरीज कदाचित usher पेक्षा जास्त. त्यात horror element जास्त आहे आणि वातावरण निर्मिती तर फारच उजवी आहे.

आजच कशावरुन तरी चँडलर जेनिसला टाळायला येमेनला जातोय म्हणून सांगतो आणि तिने पत्ता विचारल्यावर काहीतरी ‘येमेन रोड, येमेन‘ सांगतो ते आठवलं.

मला तर फ्रेंड्स शॉर्ट्स पण बघवत नाहियेत..त्याचं नसणं फार चटका देणारं आहे फॅन्स साठी. त्याचा शेवट एकटेपणात आणि फॅमिली साठी झुरण्यात गेला ही हेडलाईन बघून बेचैन वाटले.. त्याची केयरींग केमिस्ट्री मोनिका बरोबर, ते मित्रा वर जीव ओवाळून टाकणारे कॅरॅक्टर अगदी हॄदयाच्या जवळचे होते

खरंच.चॅनडलर मुळे अक्षरशः अमर झालेले कोटस आठवतात.
काल फ्रेंड्स चे सिझन 2 आणि 3 चे एपिसोड परत बघायला चालू केले. मजा येतेय.
मॅथ्यू चं व्यसन, त्यातून शरीराचे झालेले हाल आणि परिणाम यानुसार सुटला म्हणायचं.खूप लवकर गेला पण.
रियुनियन एपिसोड नंतर एंगेजमेंट रद्द झाली होती त्याची.
फार त्रास होऊन गेला नसावा ही आशा.
He will always stay aive in our memories.

पहिल्या ५-६ सीझन्स मधला चॅण्डलर म्हणजे प्युअर गोल्ड आहे! आता त्या क्लिप्स पाहताना वेगळेच वाटते.

त्याचा द वेस्ट विंग मधल्या ३-४ एपिसोड्स मधला रोलही छान आहे. "द होल नाइन यार्ड्स" हा पिक्चर तर धमाल आहेच. पण बघितला नसाल तर एक ऑफबीट पिक्चर "द रॉन क्लार्क स्टोरी" ही बघा. तो रोल कॉमेडी नाही पण चांगला आहे.

सरकॅजम वर त्यालाच घेउन केलेले एक एसएनएल मधले स्किट Happy नॉर्म मॅक्डोनाल्ड आणि विल फॅरेल हे तेथे "विद्यार्थी" म्हणून बसले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=_ZW-AZ2mNeA

रीयुनियन तर हल्लीच झालेले तेव्हा तर ५० शी ला आलेले सर्व जण.
एंगेजमेंट रद्द.. ?? Sad

ते शॉट्स आठवले ज्यात ते म्हणतात की ४० पर्यंत लग्न नाही झाले तर मी (चँडलर) तुझ्याशी (मोनिका) लग्न करेल...हे ऐकून हताश/ अगतिक होऊन मोनिका अजूनच सॅड होते Lol Sad

पी आय मीना - प्राईम
क्राईम - सस्पेन्स - इन्व्हेस्टिगेशन
सातवा भाग चालू आहे. उत्कंठावर्धक मालिका.
खूप दिवसांनी वेब सिनेमा / चित्रपट च्या वाटेला गेलो. मस्त आहे.

पी आय मीना चे आठही भाग पाहून झाले. (वाचू शकता. स्पॉयलर नाही).
एका छोट्याशा अपघातातून एका अनप्रोफेशनल प्रायवेट डिटेक्टीव्हच्या तपासाला सुरूवात होते. ती एका संस्थेसाठी नजर ठेवायचं काम करते जे काही हायली स्किल्ड तपासाचा भाग नाही. अपघातात मरण पावलेल्या मुलाच्या आईला (झरीना वहाब) ती एक डिटेक्टीव्ह आहे एव्हढंच कळतं आणि ती मदतीची याचना करते. तिच्या मते हा अपघात नसून खून आहे. मीनाक्षी (मीना) तिला सांगते कि डिटेक्टीव्ह म्हणजे तुम्ही समजता तसे नाही. हे काम पोलिसांचे आहे आणि डेटिक्टीव्ह ने करायला भारतात कायद्याने बंदी आहे.

पण तिच्या पर्सनल आयुष्यातल्या काही घटनांमुळे ती या केसला टाळू शकत नाही. सुरूवातीला एक उत्सुकता, मग इमोशनल अ‍ॅटॅचमेंट आणि नंतर एका व्यापक कटाचा भाग उलगडत जातो तस तसं ती माघारी न फिरण्याच्या रस्त्यावर येऊन पोहोचते. अशा ठिकाणी कि कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेच समजेनासे होते.

विनय पाठक, झरीना वहाब, जीशु सेनगुप्ता, परंब्रत चटर्जी, तान्या मनकटला आणि समीर सोनी (बर्‍याच दिवसांनी दर्शन) अशी तगडी स्टारकास्ट आहे. रहस्याची उकल कुठेच सनसनाटी पद्धतीने होत नाही. कथानकाचा संथ वेग या उकल होण्याला साजेसा आहे. तपासाचे काम हे काही रोचक नसते. त्यात लागणारा संयम, चिकाटी यासाठी काही तपशील आवडले. विशेषतः हवा तेव्हां पलिकडचा नंबर उपलब्ध नसणे. सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन मिळवण्यात येणार्‍या अडचणी इ.

पण अचानक अ‍ॅबरप्टली मालिका संपते. एक भला मोठा व्यापक आंतरराष्ट्रीय कट उकलणार असे वाटत असतानाच संभाव्य खलनायक मरतो. म्हणजे आता पुढच्या सीझनची वाट बघणे आले. यासाठीच अशा मालिका बघणे थांबवले होते. Proud

माझे पी आय मीना चे दोन भाग बघून झाले , त्यातील मीना चा रोल करणाऱ्या अभिनेत्री तान्या ला इंडस्ट्री मध्ये ब्राईट future आहे हे निश्चित .

पी आय मीना शिफारसी बद्दल धन्यवाद.
शी, आश्रम मधल्या हिरोईन बद्दल ही ब्राईट फ्युचर वगैरे वाटत होते, मला ती निराशा वाले वाईब्स देणारी वाटली, सध्या कोणत्या सीरीज मधे दिसली का ती ?

Pages