Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉडीज, अशर दोन्ही पहायच्या
बॉडीज, अशर दोन्ही पहायच्या आहेत आल्यापासुन. नेटफ्लिक्स जरा जोरदार झालंय. चांगल्या मालिका येत आहेत आणि आगामी मालिका, सिनेमाबद्दल पण योग्य जाहिरात चालु आहे.
Bodies बघायची आहे , आजच
Bodies बघायची आहे , आजच मैत्रिणीने जोरदार रेको दिलाय.
मी Citadale बघत होते. आता अर्धवट सोडली.
आपली प्रिचोजो आहे म्हणून काय बॉलिवूड मसाला भरायचा लगेच .
वैतागून ब्रेक घेतलाय
अस्पायरंट सिझन 2 पूर्ण केला
अस्पायरंट सिझन 2 पूर्ण केला प्राईम वर.टीव्हीएफ ची प्रोडक्शन्स सुंदर असतातच.ज्याला ज्या मूड मधली सिरीज पहायची त्याने तशी निवडावी.
कोटा फॅक्टरी: मस्त हलकंफुलकं जास्त टेन्शन न देता सांगितलेली कोटा च्या मुलांची गोष्ट. नक्की पहावी.
अस्पायरंट: थोड्या मॅच्युअर, ग्रोन अप लोकांची युपीएससी परीक्षेच्या प्रवासाची कथा.जरा गंभीर.
संदीप भैय्या: अस्पायरंट मधल्या एका प्रेरणादायी पात्राच्या आयुष्यावर घेतलेला स्पिनऑफ.याचा मूड बराच गंभीर आहे पण ज्यांनी आयुष्यात स्ट्रगल केलाय त्यांना नक्कीच आवडेल.
अस्पायरंट सिझन 2 खूपच चांगला बनवला आहे.युपीएससी चे प्रश्न, समस्या, काही कॉन्फलिक्ट.यात एक परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली आहे त्यात बरेच लीडरशिप लेसन आहेत.
अनू+१. कोटा पाहिली. अस्पायरंट
अनू+१. कोटा पाहिली. अस्पायरंट सी१ युट्युब वर होती, पण इथल्या प्राईम वर ती दिसत नाहिये

मला गुल्लक पण जाम आवडलेली.
पर्मनंट रूममेट्स कुणी पाहिलियका/? सुमित भैया (मिकी) चे फॅन व्हाल जसे जीतू भैया चे फॅन्स अखंड भारत भर झालेत
मी आहे पर्मनंट रूममेट्सचा फॅन
मी आहे पर्मनंट रूममेट्सचा फॅन.
पर्मनंट रुममेट्स, पंचायत आणि ट्रिपलिंग फारच आवडतात.
मागच्याच आठवड्यात पर्मनंट रुममेटसचा तिसरा सिझन बिंजवॅाच केला. तो पण छान झालाय.
सीजन ३ कशावर पाहिलात?
सीजन ३ कशावर पाहिलात?
ट्रिपलींग भाषा खराब वाटली पहिल एपि पाहून सोडली होती..
सीजन ३ कशावर पाहिलात?>>>>
सीजन ३ कशावर पाहिलात?>>>>
Amazon prime वर.
अस्पायरंट सिझन 2 छान आहे.
अस्पायरंट सिझन 2 छान आहे. दुसर्या सिजन ने निराश केले नाही. पण संदीप भैय्या सिरिज on YouTube या दोन्ही सिजनस वर भारी आहे. ज्यांनी अस्पायरंट सिझन १ पाहिला आहे पण सिजन 2 अजुन पाहिला नाही त्यांनी सिजन २ पाहण्या आधी संदीप भैय्या जरूर पहावी.
शाइनिंग वाले पाहिली..
शाइनिंग वाले पाहिली.. कोर्टिनी कॉक्स फॅन असाल तर नक्की बघा…
संदीप भैय्या चांगली आहे पण
संदीप भैय्या चांगली आहे पण खूप ग्लुमी आहे.त्यातली मुलगी छान आहे.
Aspirant season 1 पाहिला
Aspirant season 1 पाहिला नाहीये infact ऐकलं पण नाहीये या बद्दल काही..तर direct season 2 सुरू केला तर चालेल का...
डायरेक्ट 2 चालू केला तरी
डायरेक्ट 2 चालू केला तरी चालेल.फ्लॅशबॅक मधून कळेल.पण 1 पाहिला तर कॅरेक्टर अजून चांगली कळतील
5च एपिसोड आहेत.
okey अनु..thnx ग.. आज च सुरू
okey अनु..thnx ग.. आज च सुरू करते
नेफिवरील बॉडीज सिरीज बरी
नेफिवरील बॉडीज सिरीज बरी वाटतेय .
एक अनोळखी बॉडी पोलिसांना मिळते त्यावर तपास केलेला दाखवताना सिरीजचा दिग्दर्शक आपल्या डोक्याचे भजन करणे बाकी ठेवतोय.
प्रत्येक भागात कथा साल १८९० ते १९४१ ते २०२३ ते २०५२ पर्यंत फिरत असते त्यामूळे पूर्ण लक्ष देवून बघावी लागते .
ती बॉडी कोणाची ? खून कोणी केला ? तपास करणाऱ्या पोलीस ऑफिसर चे पण खून होतात ! पुढे काय होणार ?
या साठी ती सिरीज पूर्णपणे बघा
बॉडीज मी पण बघते आहे. ५ भाग
बॉडीज मी पण बघते आहे. ५ भाग झाले. आतापर्यन्त तरी एकदम सॉलिड इन्ट्रिगिंग आहे!
बऱ्याच दिवसानंतर डोक्याचा
बऱ्याच दिवसानंतर डोक्याचा भुगा करणारी सिरीज आली आहे , तुम्ही मध्येच सोडू शकत नाही !
आणि मला आवडलेली सिरीज एकाच सिटिंग मध्ये संपवण्याचे व्यसन आहे .....
मी सातव्या भागात सोडून दिली
मी सातव्या भागात सोडून दिली बॉडीज. कंटाळा आला.
त्या पेक्षा डायरेक्ट शेवटचा
मग त्या पेक्षा डायरेक्ट शेवटचा भग बघायचा !
Inception प्रकारात मोडणारी आहे .
मी सातव्या भागात सोडून दिली
मी सातव्या भागात सोडून दिली बॉडीज. कंटाळा आला. >>> मी पहिल्या भागातच खुरडतेय अजून
मी पण स्वस्ति. आवडली किंवा
मी पण स्वस्ति. आवडली किंवा नाही आवडली असं नाही पण पुर्ण पकड घेतली नाही (अर्धीच पकड घेतलीये) म्हणुन भिजत घोंगडं पडलंय. पण पहाणार आहे पुढे.
अतरंगी, आशु,
अतरंगी, आशु,
परमनंट रूममेट पाहायला घेतली.मिकेश हे एकाच वेळी क्युट आणि अनोईंग आणि कार्टून पात्र आहे.(अजून 2च भाग पाहिले.)
कोटा फॅक्टरी मधला संदीप माहेश्वरी अतिशय वेगळ्या रोल मध्ये आहे इथे.ड्रीमगर्ल मधली पूजाची पुरुषद्वेष्टी आशिक पण आहे.
आवडली किंवा नाही आवडली असं
आवडली किंवा नाही आवडली असं नाही पण पुर्ण पकड घेतली नाही (अर्धीच पकड घेतलीये) म्हणुन भिजत घोंगडं पडलंय. >>>>> Exactly !!!
सुनिधी, नाही बघितलीस तरी
सुनिधी, नाही बघितलीस तरी चालेल. मला पहिले काही भाग आवडलेले मग लेट डाऊन झालं.
अमितव, वेळ वाचल्याबद्दल
अमितव, वेळ वाचल्याबद्दल धन्यवाद.
अरेरे हो का, पुढचे भाग लेट
अरेरे हो का, पुढचे भाग लेट डाउन असतील असं वाटलं नव्हतं!! एनी वे. संपवेन आता आज कशीही असली तरी
परमनंट रूममेट पाहायला घेतली
परमनंट रूममेट पाहायला घेतली.मिकेश हे एकाच वेळी क्युट आणि अनोईंग आणि कार्टून पात्र आहे.(अजून 2च भाग पाहिले.)
>>> चुकून २०१६ मायबोली आलो की काय वाटले…
>>..संदीप भैय्या जरूर पहावी.<
>>..संदीप भैय्या जरूर पहावी.<<
अॅस्परंट मधे पण संदिप भैया आहे; त्याच्यावरंच आहे काय? त्याचं कॅरेक्टर मजबुत आहे, अॅस्परंट मधे. तिसरा सिझन बहुतेक त्याच्यावरंच येणार..
जबरदस्त स्टोरीटेलिंग. वर्तमान आणि भूतकाळातल्या प्रसंगांची सांगड इतकि बेमालुम घातली आहे कि अजिबात गोंधळ उडत नाहि...
सुपर पम्प्ड पूर्ण पाहिली.
सुपर पम्प्ड पूर्ण पाहिली. पूर्ण ग्रिपिंग आहे. स्पॉइलर देत नाही पण शेवटच्या भागात ट्रॅव्हिस बिल्डिंगच्या बाहेर येउन उभा राहतो तो सीन प्रचंड आयरॉनिक आहे. त्याचे सगळे अवगुण वगैरे धरून सुद्धा त्या स्पेसिफिक सीनला त्याच्याबद्दल वाईट वाटते.
नेटफ्लिक्सवर The fall of the
'Maybe' Spoiler alert****
नेटफ्लिक्सवर The fall of the house of Usher बघितली. एडगर ॲलन पो यांच्या संकलित गूढ कथांना एकत्र करून तयार केलेले कथानक व Mike Flanagan याचं दिग्दर्शन आहे. प्रचंड खिळवून ठेवणारी, अनप्रेडेक्टिबल, गूढ, कुठंकुठं अभद्र आणि भयंकर आहे. सर्वांची कामं जबरदस्त झाली आहेत. एका अनौरस बहिणभावांवर- Madeline Usher आणि Roderick Usher झालेला अन्याय, जिजसवर अंधविश्वास ठेवून औषधं न घेता तिळातिळाने झिजून मरणारी आई, माणुसकी नसलेले वडील, समाजात नसलेले स्थान -अशी पार्श्वभूमी असलेले ते दोघे अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. त्यात बहिणीचे पात्र अतिशय धूर्त , मतलबी व बुद्धिमान आहे. वैचारिक स्पष्टता असलेले नकारात्मक स्त्री पात्र खूप दिवसांनी बघायला मिळाले. तिनं अमेरिकन आयुष्यावर व त्यातील औषधी कंपन्यांच्या गुंत्यावर बोलून दाखवलेलं भाष्य तर फारच चपखल वाटलं.
३१ डिसेंबरला रात्री एका अवांतर विश्वात असलेल्या पबमधे जातात, तिथल्या मृत्यूदेवतेला(Metaphysical -gothic entity) स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही वचनं देऊन बसतात. नंतर बाहेर येऊन हे गूढ ते विसरून जातात. त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी कथानक सुरू होते.
सुरवातीला कविमन असणारा भाऊही तिचं ऐकतऐकत मोठे मोठे न पटणारे निर्णय घेतो. एका वेदनाशामक औषधामुळे ते संपूर्ण फार्मास्युटिकल कंपन्यांवर अधिराज्य गाजवतात. त्यासाठी सामदामदंडभेद- जे योग्य वाटेल ते करतात. तत्वांच्या व्याख्या ह्या सोयीने मुरड घालण्यासाठी असतात, यावर त्या बहिणीचा पूर्ण विश्वास आहे. तिचा स्त्री म्हणून स्वतंत्र संघर्षही भावापेक्षा तापदायक आहे, त्यामुळे ती अधिक बधिर व खंबीर होत जाते. दोघे कुठल्याकुठे जाऊन अतिश्रीमंत होतात, मग वचनपूर्तीची वेळ येऊन मृत्यूदेवता एकेका वंशजाला-एकेका अशरला त्यांच्या कर्माप्रमाणे मृत्यू देऊन आपलं कार्य कसं करते ते प्रत्येक एपिसोडमध्ये एकाच्या मृत्यूने दाखवले आहे. जबरदस्त आहे. नक्की बघा.
सुपर पम्प्ड व अस्पायरंट नोट
सुपर पम्प्ड व ॲस्परंट नोट केली आहे.
Pages