चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy @both
हो , तिचा वरदहस्त असलेल्या सिनेमांची एक कृत्रिम + उरकून टाकूया टाईप बांधणी असते. बालाजी टेलिफिल्म्स व ते 'हम पांच' पासूनच 'टडॅं टडॅं' म्युझिक आलं की कुठल्या चरख्यातून आलेलं असावं याची साधारण कल्पना येते.

हो ड्रीमगर्ल २ फारच गंडलेला आहे. इतका बोर मुव्ही आजपर्यंत आयुषमान चा नव्हता कधी. खरंच नका बघू.

अंजली Happy
हो लंपन, आपल्या लहानपणी काही मराठी सिनेमे कसे झाले होते, ते व तो राकेश रोशन व ऋषी कपूर यांचा 'रफू चक्कर' व 'आपके दिवाने' वगैरेची आठवण आली होती. अशा विनोदांवर हसू येत नाही.

ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता.
>>>>

मलाही तो पाहिला उथळच वाटलेला. फार आवडला नव्हताच.
हा जर खो देऊन परत ही आला नसेल तर त्या वाटेला जायलाच नको. कारण उथळ विनोदाने नुसते बोअर नाही तर इरीटेट होते.

ट्रेलर पाहिला. पुरुषांनी बायकांचे कपडे घालणे, मोसंबी /सफरचंदे ठेवणे व ते पडल्याने झालेले विनोद इतके शिळे झाले अहेत की सरकारनेच त्यावर आता बंदी आणावी.

विनोद शिळा झाला तरी दरवेळी मोसंब्या ताज्या असतात Wink

बाई दवे, मी एकदा वेशभुषा स्पर्धेत भाग घेतलेला तेव्हा पिशवीत चिंध्या भरल्या होत्या. हे संत्रे मोसंबी वगैरे चित्रपटातच दिसते. पडणे सोडा, पिचकले तर रस नाही का निघणार..

अस्मिता, तुझा असाच रिव्ह्यू येईल असं वाटलं होतं म्हणून मी आधीच हा पिक्चर न पाहायचा निर्णय घेतला होता Proud ट्रेलर मध्येच समजलं की बकवास प्रकरण आहे

>> पुरुषांनी बायकांचे कपडे घालणे, मोसंबी /सफरचंदे ठेवणे >> हे जरा ‘चला हवा येऊ द्या‘वाल्यांना सांगा. सतत भाऊ कदमला स्त्री वेषतलीच स्कीट्स. तो ही विसरायला लागला असेल आपण पुरूष आहोत हे.

Lol रमड , अंतर्ज्ञानी. (तुझी पोस्ट वाचून ते) The fall of the house of Usher पाच एपिसोड बघितले, उत्तम आहे. पण ताण आल्याने हलकंफुलकं बघावं म्हणून हा बघितला. आता ते पूर्ण करेन. Happy ट्रेलर वरून मलाही टुकार असेल वाटलं होतं पण आयुष्मानचे सगळे सिनेमे बघायचा नियम आहे.

असल्या सिनेमा / नाटकात जेव्हां पुरूष स्त्रीरूप घेतो तेव्हा त्यातही तो भारी असल्याचे ( स्त्रीरूप हिरोगिरी) दाखवण्यासाठी मग त्याच्यावर लाईन मारणार्‍यांची लाईन दाखवणे मस्ट असते. मोरूच्या मावशीपासून सुरू आहे हे.
सर्वात भयानक स्त्रीरूप वैभव मांगलेचं होतं. एकच एपिसोड पाहिला. त्यात त्याच्या मागे एक निर्माता, एक नट आणि अजून एक कुणीतरी लागलेला असतो. तेव्हां सतत अरे हा विचित्रविग्र आडदांड शरीरयष्टीचा बुरूष वैभव मांगले आहे कळत नाही का ? असे ओरडून सांगावेसे वाटत होते.

ताण आल्याने हलकंफुलकं >>> यासाठी मी बंद दरवाजा पाहिला Wink

अंतर्ज्ञानी >>> ड्रीमगर्ल-२ माझ्या नवऱ्याने पाहिला (त्याला बरा वाटला म्हणे!) मी चुकून शेवटची ५-१० मिनिटं पाहिली जेव्हा आयुष्मान काहीतरी फालतू भाषण करत होता. ते अगदी बळंचकर वाटलं. शिवाय तो पण आताशा तेवढा चांगला दिसत नाही असं जाणवलं तो सीन पाहून Proud तेव्हा तर खात्रीच पटली की आता clairvoyant म्हणून बिझिनेस करायला हरकत नाही Lol

clairvoyant = एव्हढ्यासाठी पहावा लागेल का ? Lol
आयुष्यमान, राजकुमार राव यांचे सिनेमे हिंदी बेल्ट मधे घडतात आणि तिकडेच शूट पण होतात हे वेगळेपण असल्याने फ्रेश वाटायचे एके काळी.

नाही, आताच जागा झालो. Lol

अस्मिता तुमचा review वाचायला पाहिजे होता आधी, कालच पाहिला, काहीही बकवास पिक्चर आहे. शेवटी ढकलला , आयुषमानचे पिक्चर आवडतात तसे, पण आता सारखं काय तेच असं झालय. आजिबात बघू नका.

The Man Who Never was - (1956) हा युद्धपट कम स्पाय मूव्ही बघायला सुरूवात केली. कालपर्यंत सगळे भाग होते. आज अचानक शेवटचा भाग सापडेना. यावर नेटफ्लिक्स वर सुद्धा २०२१ साली Operation Mincemeat या नावाचा सिनेमा आलेला आहे. जुनाच इतका भारी असेल तर नवीन कदाचित आणखी सफाईदार असेल.

SPOILER ALERT
दुसर्‍या महायुद्धात Operation Mincemeatनावाने दोस्त राष्ट्रांनी आखलेली एक मोहीम जी बॉण्डपटाचे लेखक इयान फ्लेमिंग यांच्या एका पुस्तकातून घेण्यात आली होती. फ्लेमिंग हे त्या वेळी रॉयल नेव्हीतल्या एका अधिकार्‍याचे सहाय्यक म्हणून काम करत होते. या ऑपरेशन साठी वापरलेली ट्रिक बॉण्डपटात नंतर वापरली गेली.

जर्मनी आणि इटलीने दोस्त राष्ट्रांना जेरीस आणले होते. त्यामुळे जर्मनीच्या बाजूने उभे असलेले इटली किंवा एखादे राष्ट्र पराभूत करून जर्मनीला एकटे पाडण्याची गरज होती. दोस्त राष्ट्रांचा डोळा इटलीवर होता. पण जर्मनीने उत्तम संरक्षक व्यूह रचला होता. हा व्यूह तोडण्यासाठी सिसिली बेटाचा वेढा उठवणे आवश्यक होते.

यासाठी ब्रिटीश अधिकार्‍यांनी एक प्लान आखला. त्यानुसार एके दिवशी स्पेन च्या किनार्‍याला एका ब्रिटीश अधिकार्‍याचा मृतदेह तरंगत आला. तो एका मच्छिमाराला मिळाला. स्पेन हे त्या वेळी जर्मनीच्या बाजूने होते. त्यानुसार त्यांनी जर्मनीला सूचना दिली. जर्मन अधिकारी दाखल झाले. मृतदेहाच्या खिशात होणार्‍या बायकोचा फोटो, एक पत्र , भेटवस्तू होत्या. अधिकार्‍याचे ओळखपत्र होते आणि खिशात आणखी एक पत्र होते त्यानुसार दोस्त राष्ट्रे ग्रीस वर हल्ला करणार असल्याचा उल्लेख आणि Operation Mincemeat ची गुप्त कागदपत्रे असलेली ब्रीफकेस खोलू नये अशा सूचना होत्या.

स्पेनने ब्रीफकेस द्यायला नकार दिल्यावर स्तवः हिमलरचा उजवा हात स्पेन मधे दाखल झाला. ब्रीफकेस उघडून पाहिल्यावर ग्रीस मधे हल्ल्याची योजना खरी असल्याची हिटलरची खात्रीच पटली. त्याने सिसिलीचा वेढा काढून ग्रीस मधे बंदोबस्त केला. ग्रीस च्या आजूबाजूला एक बनावट आर्मी दाखल झाल्याने त्यांना आता वेगळ्या युद्धाची अपेक्षा होती.

पण झाले भलतेच....
त्यावरच सिनेमा आहे. डॉक्युमेंटरी पण उपलब्ध आहे.
ज्या अधिकार्‍याचा मृतदेह सापडला तो कधीच अस्तित्वात नव्हता.

the pursuit of happiness (राहिला होता पाहायचा) बघितला काल नेटफ्लिक्सवर..
अप्रतिम सिनेमा.. आवडला

Operation Mincemeat पहिला
त्या बद्दल इतकं वाचलं होतं, म्हणजे ऑपरेशन बद्दल त्यामुळे खूप उत्सुकता होती की कसं दाखवणार ते
सपशेल निराशा, इतका रद्दी सिनेमा
मुळात ते ऑपरेशन राहील बाजूला, यांचे साईड ट्रॅक, लव्ह स्टोरी म्हणलं तर लव्ह ट्रँगल म्हणलं तर नाही, रशियन हेर असल्याचा संशय
भाई अखिर स्टोरी कब दिखावगे असं झालेलं
चित्रपटाचा जेमतेम 20मिनिटे भाग बघण्यासारखा आहे, तोही तुकड्या तुकड्यात शोधून
न झेपणारे विषय घेऊन उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करणाऱ्यात फॉरेन वालेही कमी नाहीत
#वेळ असेल तरी बघू नका
त्यापेक्षा पुस्तक वाचा किंवा आचार्य यांनी दिलेली डॉक्युमेंटरी बघा
ती खूप सरस आहे सिनेमापेक्षा

गडकरी हिंदीत बघावा कि मराठीत ?
पहिल्या आठवड्यात तिकीटबारीवर चेंगराचेंगरी आणि मारामारी असेल... पुढच्याआठवड्यात तिकीट मिळाली तर पाहीन. कुणी येतंय का ?

“ गडकरी हिंदीत बघावा कि मराठीत ?” - रिव्ह्यू तरी साधारण ‘बघूच नये‘ असा आहे. पण तुम्ही बघितला तर इथे नक्की लिहा.

फेफ Lol

नेफिवर "ओल्ड डॅड्स" नावाचा पिक्चर आला आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन बिल बर हा मुख्य रोल मधे आहे. इतर फारसे माहीत नाहीत. फक्त त्याच्या मुलाच्या शाळेची प्रिन्सिपॉल ही "सूट्स" मधली ती हार्वर्ड मधली लुईसची गर्लफ्रेण्ड लक्षात आली. याचे दोन मित्र कोठेतरी पाहिलेले आहेत पण लक्षात नाहीत.

टाइमपास आहे पिक्चर. पहिला काही भाग धमाल आहे.

१.फेअर प्ले बघितला ..एंगेजींग आहे ..मस्त आहे.. आवडला..

२.the craigslist killer इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
सत्यघटनेवर आधारित.
फिलीप मार्कोफ- मेडिकल विद्यार्थी हुशार, उज्वल भविष्य असणारा वाटत असला तरी काहीतरी वेगळंच व्यक्ती मत्व आहे याचं असं वाटत राहतं. लवकरच एका सुसंस्कृत मुलीबरोबर त्याचं लग्न ही होणार असतं.. ती सोबत राहत असूनही तीला त्याच्या वागणुकीवर कसलीही शंका येत नाही.. असं काय वीयर्ड वागत असतो हा फिलीप मार्कोफ..
चांगला आहे सिनेमा.

३. I came by ,इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एक ग्राफिटी आर्टिस्टला एका न्यायधीशाच्या घरातल्या सीक्रेट खोलीत असं काही सापडतं कि त्यांचं आयुष्य बदलून जातं..क्राईम थ्रीलर.. ठिकठाक..प्रेडिक्टेबल..

Pages