Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धृति नामक २ कन्या परिचित आहेत
धृति नामक २ कन्या परिचित आहेत, त्यांच्या पालकांना नावाचा अर्थ माहिती आहे की कसे याबद्दल खातरी नाही मला
**धृतिचा एक अर्थ धारणाशक्ती>>
**धृतिचा एक अर्थ धारणाशक्ती>>
चांगली माहिती.
पाचपोच (= सारासार विचार)
पाचपोच (= सारासार विचार) या शब्दाचा उगम कसा झाला असावा ?
"पाच"ला काही अर्थ आहे का निरर्थक पुनरावृत्ती म्हणून जोडला आहे ?
(सटरफटर सारखा)
धृति - छान माहिती अस्मिता. धृ
धृति - छान माहिती अस्मिता. धृ - धरणे आणि परोक्ष धारण करणे यापासूनच धर्म शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. धारयति इति धर्मः|
पाचपोच - मी हा शब्द पासपोस असा ऐकला आहे.
पासपोस/ पाचपोच : कुठलातरी
पासपोस/ पाचपोच : कुठलातरी एक अपभ्रंश असावा .
पाचपोच हा इथे ( https://vishwakosh.marathi.gov.in/25131/) व शब्दकोड्यात मिळाला आणि
या नावाचा इथे लेख पण आहे : https://www.maayboli.com/node/52268
“शासन करणारे” / राज्यकर्ते”
“शासन करणारे” / राज्यकर्ते” या अर्थाने वापरलेला “शास्ते” हा शब्द वाचनात आला. कोशांमधे नाही दिसला.
“शास्ती” = शिक्षा हे मात्र माहिताय.
शास्ता दिलाय :https:/
शास्ता दिलाय :
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%...
= शासनकर्ता, वागविणारा.
शास्ता दिलाय आभार !
शास्ता दिलाय
आभार !
‘उर्दू’ ची कोशानुसार
‘उर्दू’ ची कोशानुसार व्युत्पत्ती :
एक देशी भाषा; ही मूळ लष्करांतील भाषा असून हिच्यांत हिंदी, फारसी इ॰ अनेक भाषांचें मिश्रण आहे. हिला हिंदुस्थानी भाषा असेंहि नांव आहे.[तु. उर्दू = सैन्य, छावणी]
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%...)
पण,
इब्राहीम अफगाण असे म्हणतात :
(https://www.aksharnama.com/client/article_detail/6937)
“उर्दू भाषा ही लष्कराची भाषा आहे, उर्द म्हणजे लष्कर अशी सोपी व्युत्पत्ती या भाषेबाबत केली जाते. ती किती दिशाभूल करणारी आहे आणि त्याच्या खऱ्या इतिहासापर्यंत जाण्याचा मार्ग हिंदी आणि उर्दू या भाषांतील संघर्ष आणि राजकारणामुळे कसा धुरकट बनला आहे, यावर अनेक अभ्यासकांनी प्रकाश टाकला आहे”.
तरण
तरण
याचे २ अर्थ आहेत. त्यातला ' तरंगणे' हा परिचित
दुसरा अर्थ :
तांदुळाच्या कण्या, डाळ इ॰ पुष्कळ पाण्यांत शिजवून व त्यांत तिखट, मीठ, मसाला घालून केलेलें पातळ खाद्य.
तरण >>>> तरवणी ( = तरण + पाणी)
तरण >>>> तरवणी ( = तरण + पाणी
तरण >>>> तरवणी ( = तरण + पाणी)
भात शिजवताना काढलेलं पाणी किंवा कधी भातासाठी तांदूळ धुतलेलं पाणी उकळून त्यात कैरी, कोवळ्या चिंचा असं काहीबाही घालून सार / रस्सम टाइप डिश असते का नां कडे . त्याला तर्वाणी म्हणतात. तो शब्द तरवण वरून आला असवा
अच्छा ! चांगली माहिती
अच्छा ! चांगली माहिती
वैशाखनंदन
वैशाखनंदन
= गाढव; खेचर.
हा शब्द रंजक आहे. वैशाख महिन्याचा काय संबंध असावा ?
काय भारी शब्द आहे. एखाद्याला
काय भारी शब्द आहे. एखाद्याला "अरे वैशाखनंदना" अशी हाक मारल्यावर तो कौतुकाने आपल्याकडे बघतोय, असे दृश्य आले डोळ्यासमोर.
मस्त शब्द.
मस्त शब्द.
वैशाखा महिना गाढवांना बाळं व्हायचा हंगाम असावा. इथे एप्रिल हा Fawn season (पाडस- चैत्रनंदन ?). अंदाज आहे.
गर्दभ- युरेका....
गर्दभ- युरेका....
https://potterindia.in/blog/baishakh-nandan-kise-kahte-hai/
गधे को वैशाख नंदन क्यों कहा जाता है?
वैशाख मे गर्मी पडने से घास आदि चारा सूख जाता है और जानवर चारे के लिए परेशान रहते हैं। पर गधा अपनी मस्ती मे जो भी थोड़ी बहुत घास मिलती है उसे ही खाकर जब पीछे मुड कर देखता है तो उसे कहीं घास नहीं दिखाई पडती और वह खुश हो जाता है कि आज तो उसने सारी घास खाली। और वह खुशी में रेंकता है । और इसी खुशी में उसकी सेहत बन जाती है।
अच्छा ! अशी ती गाढवाची नंदन
अच्छा ! अशी ती गाढवाची नंदन कथा.
छान
>>> आज तो उसने सारी घास खाली।
>>> आज तो उसने सारी घास खाली। और वह खुशी में रेंकता है । और इसी खुशी में उसकी सेहत बन जाती है।
हे भारी आहे!
वैशाखनंदन हिन्दीत वापरात
वैशाखनंदन हिन्दीत वापरात आहे बर्यापैकी
मराठीतही आहे हे आज समजले
ज “मायपोट” असा शब्द जुन्या
आज “मायपोट” असा शब्द जुन्या मराठी लेखनात (लेख वर्ष १९३४) वाचला. उत्सुकता म्हणून अर्थ चेकवला तर :
मायपोट = लपण्याची सुरक्षित जागा, शरणस्थान !
विचार करता वाटले खरचं की, आईच्या पोटात जितकं सुरक्षित आणि आरामात तसे अन्यत्र नसणारच. Very apt.
मायपोट >>> सुंदर ! आवडला.
मायपोट >>> सुंदर ! आवडला.
सांगोपांग
सांगोपांग
या शब्दाची फोड रंजक आहे :
स + अंग + उपांग
जास्ती करून हा शब्द विधी किंवा सोहळ्याचे विशेषण म्हणून वापरला जातो.
सार ,टार, गार, नार
सार ,टार, गार, नार
या चार शब्दांचा समूह रंजक आहे.
त्यांचे अर्थ अनुक्रमे असे :
सोंगट्या (द्यूत), घोडा, जवाहीर, स्त्री
आणि समान वैशिष्ट्य म्हणजे :
या सर्व गोष्टींवर पैसा उधळला जातो.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0+
सांगोपांग हे चर्चेचे विशेषण
सांगोपांग हे चर्चेचे विशेषण म्हणूनच वाचनात आले आहे.
वैशाखनंदन भारी!
धार्मिक विधी किंवा सोहळ्याचे
धार्मिक विधी किंवा सोहळ्याचे विशेषण म्हणून साग्र संगीत वाचलेले आहे. सांगोपांग हे भरत यांनी लिहिल्या प्रमाणे चर्चे च्या संदर्भात वाचलेले आहे.
सांगोपांग
सांगोपांग
essential and subsidiary;--used of a marriage, sacrifice, or other ceremony or rite.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%...
त्याचा उगम धर्मशास्त्रात झाला असावा. पुढे तो आधुनिक व्यवहारातील चर्चा किंवा इतर गोष्टींसाठी वापरात आला असावा.
>>मायपोट >>> सुंदर ! >>.+१
>>मायपोट >>> सुंदर ! >>.+१
>> वैशाखनंदन >>> भारीच!
इतक्यात दोन नवीन (माझ्यासाठी)
इतक्यात दोन नवीन (माझ्यासाठी) शब्द नजरेखालून गेले. लक्षात ठेऊन अर्थ शोधले मग.
1. घायवटा = घाव, जखम
2. राजकिंकर = राजाचा दूत/ नोकर / जासूद वगैरे
पैकी दुसरा थोड्या फरकाने आधी हिंदीत वाचला होता - “रामकिंकर” हे हनुमंताचे नाव म्हणून तुलसीदासांच्या रामायणात येते, रामदूत !
वरील दोन्हीही छान. आवडले.
वरील दोन्हीही छान. आवडले.
..
माष
हा शब्द प्रथमच वाचला. त्याचे दोन अर्थ :
१. उडीद.
२. (जवाहिरी धंदा) पांच, आठ किंवा दहा रतींचें वजन
किंकर म्हणजे दास किंवा नोकर
किंकर म्हणजे दास असे आठवते आहे.
Pages