वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु, अभिषेक बॅनर्जी टाईपरायटर नावाच्या हॉरर सिरीज मधे 'फकीर' नावाचं भूत होता. उत्तम काम करतो. तो आणि तनु वेड्स मनु मधला पपी भैय्या /दिलीप डोब्रियाल आणि मोहम्मद झिशान( तनु वेड्स मनु मधला कूळ करून खोली लाटलेला वकील ). तिघेही एकाच पठडीतील पण जबरदस्त कामं करतात. आणि तिघेही अंडररेटेड आहेत.

अभिषेक बॅनर्जी टाईपरायटर नावाच्या हॉरर सिरीज मधे 'फकीर' नावाचं भूत होता. >>> ही कुठे बघायला मिळेल.

@sonalisl: the english भारतात दिसतेय का? मी एक एपिसोड पाहिलेला खूप आधी vpn लावुन, नंतर पैसे मागत होतं vpn, आणि ते एपीसोड पण गायब झाले

पपी भैय्या /दिलीप डोब्रियाल आणि मोहम्मद झिशान
>>>
हो दोघेही फारच छान काम करतात. मोहम्मद झीशानचे 'रांझणा' मधले काम पण छान आहे.

बॅनर्जी क्राईम पट्रोलमधे कितीतरी भागात होता. तिथे त्याची ओळख जास्त झाली. खरंतर क्राईम पट्रोलच्या खूप कलाकारांना त्यानंतर ओटीटीवर भरपुर काम मिळाले.

बीबी सी प्लेयर वर वुल्फ हॉल म्हणून मालिका बघितली. छान टेकिन्ग व संवाद लेखन. ब्रिटिश इंग्रजी आव डत असल्यास नक्की बघा. थॉमस क्रॉमवेल, अ‍ॅन बुलीन, हेन्री द एठ्थ ह्यांच्या सत्य जीवनावरच बेतलेली आहे. शेवटी अ‍ॅन बुलीन हिला मार तात ते ही दाखवले आहे. जबरद्सत प्रॉडक्षन

सुपर पंप्ड - उबरची जन्मकहाणी. टेक्नालजी मधे असाल तर काहि बातम्या कानावर पडल्या असतील पण हि वेबसिरीज अजुन खोलात नेते. ग्रेबॉलिंग, अनएथिकल प्रॅक्टिसेस, प्रायवसी इशुज, अ‍ॅपलशी पंगा, वॅलितलं डॉग-इट-डॉग कल्चर इ. चं चित्रण मस्त केलेलं आहे. जोसेफ गॉर्डन-लेविट तर कॅलनिकची भुमिका जगला आहे. नक्कि बघा, नेफिवर आहे...

Wilderness - प्राइमवर सिरीज आहे. याच नावाच्या पुस्तकावर आधारित. एकदम ग्रिपिंग वाटली. ३ भाग बघितलेत. ट्विस्ट्स्/टर्न्स मस्त आहेत.

Wilderness बघितली हल्लीच .ट्विस्ट्स्/टर्न्स मस्त आहेत. शेवट थोडासा abrupt वाटला .
पण एकंदरीत मस्त आहे .

"चूना" बघते आहे नेफ्लि वर. ३-४ भाग पाहून बरी वाटतेय. पोलिटिकल थ्रिलर टाइप, एक गुंड पण ग्रह तारे ज्योतिष यावर जबरदस्त विश्वास असलेला नेता (जिमी शेरगिल) कोअ‍ॅलिशन सरकार उलटवून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काही आमदार खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी एका बड्या बिल्डर कडून पैसा घेऊन वापरण्याचा प्लान आहे. त्याच वेळी त्याने पुर्वी कधी तरी त्रास दिलेले अनेक "ग्रह" आता एकत्र येऊन त्याचा पैसा पळवायचा प्लान करत आहेत. अशी थीम आहे.
अ‍ॅक्टर्स मस्त आहेत, संवाद खटकेबाज आहेत, टेकिंग कॉमेडीचा टच असलेले आहे त्यामुळे फार टेन्शन नाही.

आता सिटाडेल बघायला सुरुवात केलीये . सुरुवातीला प्रिचोजो आवडली .
बघूया , उत्साह किती वेळ टिकतोय . नेटाने बघायला लागेल वाटतेय .

पाहिली पूर्ण विल्डरनेस. शेवट मात्र आवडला नाही.

शेवट थोडासा abrupt वाटला . >>> स्वस्ति, तुम्ही त्या कड्यावरच्या संवादाबद्दल म्हणत आहात काय? मलाही तो झेपला नाही. पण ओव्हरऑल शेवटही मला आवडला नाही.

तसेच स्टोरी मधे अजून एक ट्विस्ट ठेवून पुढच्या सीझनची नांदी करता आली असती. त्या कड्यावरच्या शेवटच्या सीन मधे तिला असे काहीतरी दिसते की दुसर्‍या तिसर्‍या भागापासून असलेली सगळी गृहीतके बदलतात - असा एक ट्विस्ट डोक्यात आहे. पण स्पॉइलर नको म्हणून आधी लिहीत नाही Happy

बाकी लूपहोल्स आहेत काही. ऑफिसमधल्या इमेल्स डीलीट केल्यातरी पोलिस त्या मिळवू शकतात. एकतर त्याने त्या फक्त अकाउन्ट मधून उडवल्या आहेत. सर्वर वरून नाही. तो विल इतका भारी ई आहे ते का - तो नक्की काम काय करतो त्याबद्दल काहीच नाही. तसेच त्याला हे लग्न टिकवण्यात इतका का इंटरेस्ट आहे ते ही कळत नाही. फक्त एकदा उल्लेख आहे की तो त्याच्या आईवडिलांना जाब द्यावा लागू नये म्हणून हे करत आहे.

फा , Happy नक्की काय ते सांगता येणार नाही , पण मलाही शेवट आवडला नाही. एका उंचीवर नेऊन ढकलून दिल्यासारखे काहीतरी वाटलंं. Second season बनवता आला असता .
विल event manager types काहीतरी कामं करत असतो ना. पण त्याच्यात भारी काही वाटलं नाही.
पण twists n turns मस्तच आहेत , अब्बास मस्तान टाईप

सध्या Lupin3 बघायला सुरुवात केली.
आपण ठरवल्याप्रमाणे , प्रत्येक गोष्ट तशीच त्याचवेळी , कुठलीही अडचण न येता घडली तर आयुष्यात आणखी काय पाहिजे. Happy

फ्रिलान्सर कोणी बघतेय का? माझे दोन एपिसोड पाहून झालेत. स्पेशल ओपस किंवा क्रॅकडाऊन पठडीतली आहे. बेबी,वेन्स्डे चित्रपटाचा दिग्दर्शकच ह्या सिरीजचे दिग्दर्शन करत आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली लोकांना कसे बहकवले जाते, बायकांना दिली जाणारी वाईट वागणूक याचे यथार्थ चित्रण आहे.

दोन एपिसोड तरी आवडले. पण प्रत्येक अश्या सिरीजमध्ये मेन हिरोची घरगुती प्रकरणे व इतर साईडलाईन स्टोरीला उगाचच जास्त फुटेज देतात असे वाटते.

Code Geass बघतोय. anime.
ब्रिटानिया (ब्रिटन) ने जपान जिंकून घेतले असते आणि जपानचे नाव एरिया ११ ठेवले आहे. एरिया ११ मधले लोक ब्रिटानियन लोकांपेक्षा खालचे समजले जात असतात. ब्रिटानीयन साम्राज्याला विरोध करणारे काही जपानी गट अजून कार्यरत असतात. त्यांना पकडण्याच्या नावाखाली ब्रिटानिया अमनुशपणे एरिया ११ मधल्या वस्त्याच्या वस्त्या नष्ट करत असते.
अशात लीलूश नावाच्या मुलाला एक अद्भुत शक्ती मिळते. त्या शक्तीचा वापर करून तो ब्रिटानिया पासून जपान स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करू लागतो.

मी पण पाहिली Wilderness. काहीकाही प्रश्न आले मनात पण एकुणात आवडली मला. दुसरा सिझन येईल की काय असे वाटत आहे, शेवट बरोबर करायला. टेलर स्विफ्टचे टायटल आवडले.

"जी करदा" मध्ये चर्चा करण्यासारखे खास काहीच नाही तेच श्रीमंत गरीब तरुणांचे(तरुण तरुणी)प्रॉब्लेम्स .लहानपणीच्या ज्योतिष्याच्या तरकावरूनच समजते स्टोरी पुढे काय होणार, लोकं सिरिज बघून बगून प्रो झालीत.पुढे तेच तेच ह्याची गिर्लफ्रेंड त्याच्याच मित्रावर प्रेम ,तेही नक्की नाही ,मैत्री ही तशीच मतलबी ह्या पेक्षा फ्रेंडस बघितलेलं बरं, ते कितीतरी पटीने चांगलं. फक्त तमन्नाचं काम त्यातल्या त्यात बरं आहे आणि दिसलीय सुंदर. खूपच वेळ जात नसेल तर बघा मी पण तेच केलं.

कल्की +१.
पियु मी पाहीली होती जी करदा पण आवर्जून उल्लेख करण्या सारखं काही विशेष नाही. हे कन्फ्युज्ड युथ वाले विषय आता अपिल होत नाहित. इम्तियाज अली ने गुळगुळीत करून टाकलेत Happy
सर्व गोड असून कुठे काही खुपत नसताना उगा प्लेबॉय वर फिदा व्हायचं आणि रेग्रेट करायचं हे होणार हे सर्व माहित असून खड्डा दिसत असून आपण हून त्यात पडायचं Wink

काल नेफ्लिवर The Fall of the House of Usher पाहून संपवली. अक्षरशः २ दिवसात बिंज वॉच केली इतकी captivating आहे. आत्तापर्यंतच्या Mike Flanagan सिरीज पैकी ही सगळ्यात जास्त आवडली.

सिरीज Edgar Alan Poe च्या कथेवर आधारित आहे. हॉरर ड्रामा आहे. सुरुवातीलाच एका नामांकित फार्मा कंपनीचा मालक एका Attorney ला कबुलीजबाब देतो की स्वतःच्या सहाही मुलांना त्याने स्वतः मारले आहे. वास्तविक ही मुले वेगवेगळ्या accidents मध्ये मेलेली असतात. पण तरीही तो आग्रह धरतो की त्याचा जबाब ऐकून घेतला जावा. आणि मग प्रत्येक एपिसोड मध्ये एकेक स्टोरी उलगडत जाते. त्याचं साम्राज्य लयाला का जातं, कोणामुळे जातं, या सगळ्याचा सूत्रधार कोण असतो आणि खरंच त्याने त्याच्या मुलांना मारलेलं असतं का याची उकल बघण्यासारखी आहे. काही काही सीन्स बऱ्यापैकी अंगावर येतात. काही रक्तरंजित आहेत. पण सिरीज fantastic आहे. छान बांधली आहे. सस्पेन्स शेवटपर्यंत टिकून राहतो. सध्या इथे चालू असलेल्या opioid problem ला Poe च्या कथेसोबत चांगले गुंफले आहे.

Pages